माकुल रिंग्ज चिली.
साहित्यः
नळ (पाईप्) माखुल
आल, लसुण, पेस्ट १ चमचा
चिमुटभर हिंग
पाव चमचा हळद
१ ते दोन चमचे मसाला किंवा अर्धा चमचा मिरची पुड
२-३ पाकळ्या ठेचलेला लसुण
१ मोठा कांदा चिरुन
१ सिमला मिरची कापून तुकडे करून
थोडी चिरलेली कोथिंबीर
थोडिशी चिंच
चविनुसार मिठ
२ चमचे तेल.
पाककृती :
नळ माखलीची मी आधी रेसिपी दिलेली आहे त्यावरून ती ओळखता येईल.
१. नळ माखळीच्या थोड्या रिंग्ज धुवून त्याला आल-लसुण पेस्ट लावून वेळ असल्यास थोडे मुरवुन किंवा डायरेक्ट कुकरला १० ते १५ मिनीटे शिजवून घ्या.
२. एका भांड्यात तेलावर लसणाची फोडणी देऊन त्यावर कांदा गुलाबी रंग येई पर्यंत शिजवा.
३. आता त्यात हिंग, हळद, मसाला हे जिन्नस घालून थोडे परतवा आणि लगेच त्यात शिजलेल्या माकुळच्या रिंग्ज आणि सिमला मिरची घालून, मिठ घालून चांगले परतवा.
४. लगेच थोडा चिंचेचा कोळ घाला आणि त्यावर कोथिंबीर घालून परतवा. २-३ मिनीटे परतवून लगेच गॅस बंद करा.
ही डिश स्टार्टर म्हणून पण खाऊ शकता व मेन कोर्स म्हणूनही घेऊ शकता. :स्मित:
अधिक टिपा:
चिंचे ऐवजी लिंबू वापरू शकता.
आवडत असल्यास थोडा गरम मसाला वापरू शकता.
४. लगेच थोडा चिंचेचा कोळ घाला आणि त्यावर कोथिंबीर घालून परतवा. २-३ मिनीटे परतवून लगेच गॅस बंद करा.
ही डिश स्टार्टर म्हणून पण खाऊ शकता व मेन कोर्स म्हणूनही घेऊ शकता. :स्मित:
अधिक टिपा:
चिंचे ऐवजी लिंबू वापरू शकता.
आवडत असल्यास थोडा गरम मसाला वापरू शकता.
वाचने
13325
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
वाह पाकॄ तोंपासु दिसतेय
In reply to वाह पाकॄ तोंपासु दिसतेय by दिपक.कुवेत
दुबईत असताना 'कासा-दि-गोवा
लाजवाब.
In reply to लाजवाब. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
दिपकशेठ बरोबर...
In reply to दिपकशेठ बरोबर... by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
च्यायला
मस्त जागु
मस्त...शेवटचा फोटो तोंपासू.
छान पाकृ
माकुल्या जितक्या ताज्या तितक्या उत्तम...
मला माकुल्या म्हणजे काय ते ही
In reply to मला माकुल्या म्हणजे काय ते ही by सुहास..
सुहास, मलाही तोच प्रश्न पडला होता...
In reply to सुहास, मलाही तोच प्रश्न पडला होता... by बहुगुणी
अगदी बरोबर.
ठिक आहे हो , पण ते स्किव्ड
In reply to ठिक आहे हो , पण ते स्किव्ड by सुहास..
जागु ह्यांचा हा धागा पहा.
ओय्य्य्य !! मालक , तो जो काही
In reply to ओय्य्य्य !! मालक , तो जो काही by सुहास..
हो नव्या लोकांना पाहताना थोडं
आयला, पाकृ वाचल्यापासनं मला
अहो तो दिसायला तसा आहे पण
In reply to अहो तो दिसायला तसा आहे पण by जागु
>>> तुम्ही हॉटेलमध्ये चिकन
In reply to >>> तुम्ही हॉटेलमध्ये चिकन by प्यारे१
अरेरे!
In reply to अरेरे! by प्रभाकर पेठकर
(No subject)
आवडेश..
पेठकर काकांशी १०००००००००००००%
In reply to पेठकर काकांशी १०००००००००००००% by विजुभाऊ
खरंच चूकच झाली.
In reply to खरंच चूकच झाली. by प्यारे१
जीवन...
In reply to खरंच चूकच झाली. by प्यारे१
यवडं डिट्टेल मंदी लिव्हुण
In reply to यवडं डिट्टेल मंदी लिव्हुण by गणपा
णॉण्व्हेज आमचं पैलं पिरेम हाय
लहान पणी आमच्या शेजारी राणे
पाककृती आवडली... पण लई