पाया सूप
गेली अनेक वर्ष माझ्या गुढघेदुखी पुढे मी गुढघे टेकले होते. सुरवाती सुरवातीला या व्याधीचं जरा कौतुक वाटायचं एका एका बाजूला डोलत डोलत चालताना म्हातारी झाल्याचं मस्त फिलिंग यायचं. पण दुखायला लागलं आणि सगळी मजा निघून गेली. त्या आधीच कित्येक वर्ष याच कारणाने मैफिली बंद करायला लागल्या गळा गाता होता पण गुढघा बोंबलला. शिवाजी महाराजांना नाही का याच गुढघी रोगानं ग्रासलं होतं? हिंदवी स्वराज्याच स्वप्न तेंव्हापासून बोंबललं ते बोंबललच.
डॉक्टर म्हणायचे आजी याला एकच उपाय आणि तो म्हणजे सर्जरी करून गुढघा बदल शस्त्रक्रिया करायची. पण याला माझी तयारी नव्हती.
सुरवातीला आणल्या त्या घट्ट ईलेस्टीकच्या पुंगळ्या. पायातून घालायच्या आणि मोज्यासारख्या चढवत गुढग्यावर आणून ठेवायच्या घट्ट आवळ बसून बरं वाटायचं दु:ख कमी व्हायचं गुढघे पण या चढवलेल्या कोटांमधे फुशारक्या मारायचे. पुढे त्यांना ह्याच काही नवल उरलं नाही. सरळ हे घातलेले कोट कधीही उतरवून टाकायचे मग चालला चालता ह्या पुंगळ्या गुढग्यावारून पावलाशी यायच्या.
मग सुरू झाली ती विविधं तेलं. वर्तमानपत्रातल्या जाहिराती वाचून ती आणायची आणि वापरून बघायची. गुण आला नाही की दूररं ट्राय करायचं. त्यांचीही गत पुंगळ्यांसारखीच झाली.
एकदा एका वर्तमान पत्रात एक जाहिरात वाचली. गुढग्यावर पडणारा शरीराचा भार बायपास करून कमी करणाऱ्या एका पायावर घालायच्या पट्टेरी यंत्राची. पूर्वी पोलियो झाल्यावर नाही का लोखंडी कांब असलेला बुट घालत? तसच काहीसं दिसत होतं. जयपूरची कंपनी होती. एकाची किंम्मत बारा हजार. जयपूर फुट बद्दल खूप चांगलं ऐकलं होतं. मागवला वापरायला लागले. जड जड वाटायचं. दुखण्याच्या दृष्टीने काही उतार नाही. पन्नास हजाराचे भारी (वजनाने) पाय घेऊन चालायला लागले खरी पण आता नवीनच समस्या उद्भवली. ते यंत्र माझ्या त्वचेवर चालताना घासलं जाउन जखम व्हायला लागली मग ते ही नको असं झालं.
आता सगळे मार्ग संपले अस वाटलं. वेदना वाढतच होत्या. वेदनाशामके घेण्यावर पण बंधने आहेत. किती म्हणून घ्यायची. त्याचाही परीणाम होईनासा झाला. मग़ शेवटी शस्त्रक्रियेला शरण जायचं ठरवलं. गेल्या वर्षी याच महिन्यात पहिला गुढघा बदलला. आणि एप्रिलमधे दुसरा. संपूर्ण रिकव्हरीला एक वर्ष लागलं. पण दुखण गेलं. मुलं म्हणतात आता दुखायसारखं आहेच काय तुझ्या पायात पोटऱ्यांपासून मांड्यांपर्यंत ईन्फ्रास्टक्चर आहे. डॉक्टर मात्र लाख मिळाला. माझ्या मोठ्या नातवाच्या वयाचा आहे. मी गायिका आहे/होते हे कळल्यावर माझी जरा आपुलकीने विचारपूस करायचा. त्याला शास्त्रीय गाण्याची खूप आवड आहे. ऑपरेशन करता करता. भिमसेन, किशोरी, केसरबाई ऐकतो म्हणे.
सांगायचा मुद्दा काय की आता जरा सगळ्यातुन सावरून जरा मिपा वर यायला जमतं आहे. स्वयंपाकघरात तर कित्येक महिन्यात पाऊल नाही टाकलं. पण हे सेक्शन मला माझं स्वैपाघरच वाटतं. या सगळ्या कृत्या वाचते आहे. आणखी काही काळाने काही ट्राय करेन. काही नविन टाकेन. पण या किचनमधे येणार मात्र रोज. इथे आल्यावर मला माझ्या किचनचाच फिल येतो.
वाचने
14708
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
छान सूप पासून सुरवात केलीच आहे
बाय द वे तुम्हि गायलेली गाणी
In reply to बाय द वे तुम्हि गायलेली गाणी by दिपक.कुवेत
हेच विचारतो!!
In reply to हेच विचारतो!! by सूड
गाण्याच्या टेप्स आहेत माझ्याकडे
तुम्ही माहेरच्या अभ्यंकर का
In reply to तुम्ही माहेरच्या अभ्यंकर का by सूड
नाही हो
In reply to नाही हो by गौरीबाई गोवेकर
शिरोडकर म्हळ्यार शेट/शेटे मूं
In reply to तुम्ही माहेरच्या अभ्यंकर का by सूड
हॅहॅहॅ
आज्जी येत रहा इथे ! प्रकॄतीची
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्कजस्ट चील अॅन्ड एन्जॉय
तुम्हाला इथे किचनचा फील येतो
In reply to तुम्हाला इथे किचनचा फील येतो by मनीषा
संधीवात नाय गो.
त्याच्या कहाणीला त्यानी नाव
शीर्षक आवडलं. चपखल आहे. लवकर
समदु:खी..
In reply to समदु:खी.. by प्रभाकर पेठकर
हाडांचे बारीक तुकडे वेदनादायक
@पण या किचनमधे येणार मात्र
In reply to @पण या किचनमधे येणार मात्र by अत्रुप्त आत्मा
किच्चुताई
खल्लास समर्पक शीर्षक हो
गोवेकर आज्जी,आजाराच्या सुरुवातीसच..
In reply to गोवेकर आज्जी,आजाराच्या सुरुवातीसच.. by बाबा पाटील
धन्यवाद.
नक्की या पेठकर काका.
गौरीताई, अगदी मस्त शीर्षकाचं छान अनुभवकथन!
In reply to गौरीताई, अगदी मस्त शीर्षकाचं छान अनुभवकथन! by बहुगुणी
धन्यवाद बहुगुणी
In reply to धन्यवाद बहुगुणी by गौरीबाई गोवेकर
मी इंटरनेट वर खरेदी केली पण फिलिप्स
पाया करी
पहिल्यांदा तर पाया सूपाची
In reply to पहिल्यांदा तर पाया सूपाची by डॉ सुहास म्हात्रे
आभारी आहे इस्पिकचा एक्का..