लेखकदिपक.कुवेतयांनी सोमवार, 13/10/2014 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः
१. स्वीट कॉर्न / मक्याचे दाणे - १ बाउल
२. बारीक चीरलेली हिरव्या कांद्याची पात - १ बाउल (नसेल तर पालक + बारीक चीरलेला कांदा घ्या)
३. गरजेप्रमाणे बेसन
४. तांदूळाचं पीठ - २ चमचे
५. मक्याचं पीठ - ४ चमचे (नसेल तर बेसनाचं प्रमाण वाढवा)
६. पेस्ट - ३ ते ४ चमचे (मुठभरं कोथींबीर, हिरव्या मिरच्या, १ चमचा जिरं आणि पेरभर आलं)
७. चवीप्रमाणे मीठ
८. तळण्यासाठि तेल
९. चाट मसाला (वैकल्पीक)
कॄती:
१. एक ४ ते ५ चमचे कॉर्न बाजूला काढुन बाकि मिक्सर मधे भरडसर वाटुन घ्या
२. आता त्यात अनुक्रमे मका पीठ, बेसन, तांदूळाचं पीठ, चवीप्रमाणे मीठ घाला. गरज लागली तरच पाणी घाला. बच्चेकंपनीचा भाग वेगळा काढुन वाटलेली पेस्ट मिश्रणात घाला. पकोडे कितपत तिखट हवे आहेत त्यानुसार पेस्ट मधे मिरच्या घ्या. ४ ते ५ चमचे बाजूला काढलेले कॉर्न नंतर भरडसर वाटणात मिसळायचे जेणेकरुन खाताना मधे मधे दाणा लागेल.
३. मंद आचेवर गोल्डन ब्राउन होईस्त तेलात तळून घ्या. हलके गरम असतानाच आवडत असल्यास वरुन चाट मसाला भुरभुरवा. पकोडे/भजी मंद आचेवरच तळा. गॅस मोठा असेल तर पकोडे बाहेरुन तर लाल होतील / दिसतील पण आतुन कच्चे राहतील.
४. गरमागरम पकोडयांचा वाफाळाणार्या चहा किंवा थंडगार बियर सोबत आनंद लुटा. खा, खिलवा आणि स्वस्थ रहा.
तुझ्या पाकृने सोमवार सार्थकी लागला.
कुवेतमध्ये दिपक शिवाय आणखी कोणी मिपाकर आहे का? दिपकला अनेक वेळा प्रेमाने समजावुन सुध्दा हा काही सोमवारी पाकृ टाकायचे सोडत नाही!
यावर एकच ऊपाय! दर रविवारी त्याला कट्टयामध्ये गुंतवून ठेवायचे. नविन पाकृ करून बघायला वेळच मिळाला नाही पाहिजे त्याला.
तरच आपली या त्रासातुन सुटका होऊ शकेल. :)
सोमवारी सकाळी हिपासात पाकृ आणि फोटो बघितल्यावर त्रास होतो. विकांताला (शनिवार/रविवार) पाकृ आली तर ती करून बघण्याचा किंवा बाहेर जाऊन खाण्याचा पर्याय ऊपलब्ध असतो. :)
आवडेश प्रकार आहे हा. कॉर्न कुठल्याही फॉर्ममध्ये आवडतेच. अगदी चिकन कॉर्न कॉम्बिनेशनवाले स्टार्टरही विशेष आवडीचे.
बायको माहेरी असल्याने तुर्तास हे वाचनखूण :)
एकदा ट्राय करा आणि कळवा कसं होतेयं ते. पाकॄत एक सांगायचं राहिलं कि ४ ते ५ चमचे बाजूला काढलेले कॉर्न नंतर भरडसर वाटणात मिसळायचे जेणेकरुन खाताना मधे मधे दाणा लागेल. संमं हे वाक्य वरील पाकृत अॅड केलं तर पुढे वाचणार्यांना सोपं जाईल. धन्यवाद.
प्रतिक्रिया
तुमच्याच तिक्क्र या रेसिपी ब
आहाहा...तोंपासु. मस्त पाकृ
आलास??????? भेटच तू!
ह्यातला आणखी एक प्रकार म्हणजे
मस्तं.
व्वा! बियर टाईम स्नॅक्स....
In reply to मस्तं. by प्रभाकर पेठकर
खा, खिलवा आणि स्वस्थ रहा
विलासराव विचार कसला करताय???
In reply to खा, खिलवा आणि स्वस्थ रहा by विलासराव
का त्रास देतोस रे मित्रा ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारणहम्म बाणा
In reply to का त्रास देतोस रे मित्रा ? by मदनबाण
मरा तिच्यायला !
मस्त!!!!!!!!!!!
एकदम भारी!
आता मी पण काय तरी रेशिपी
आलात? या!
इतकेच ना?
In reply to आलात? या! by भाते
असं काय रे भात्या
In reply to आलात? या! by भाते
विकांत
In reply to असं काय रे भात्या by दिपक.कुवेत
हम्म... पण भात्या मला ईकडे
In reply to विकांत by भाते
एकदम टेस्टी..
नेहमीप्रमाणेच कौतुक!
मस्तं पाकृ
आवडेश प्रकार आहे हा. कॉर्न
लै भारी
चकाणा ऐ स्पेशल डिश आवडली.
मस्त रे!
हे हे हे
In reply to मस्त रे! by पैसा
धन्यवाद मंडळी