जमवून जमवून गोळा करून मांडून ठेवलेली असतात पुस्तके
माझ्या पुस्तकाच्या खास शेल्फवरची
संदर्भ ग्रंथासकट
काही कवितेची
मी चाळत रहातो मला हवे तेव्हा हवी तशी
मी फिरत असतो पुस्तकाच्या रानात
अक्षरांच्या ओळीओळीतून मनसोक्त फिरत राहतो
घुसतो शब्दांच्या निबिड रानात
मला हवा तो मोसम सुरु होतो
जेव्हा माझ्या हातात पडतात मला हवे ते शब्द
जादू करतात मनावर
भ्रमित करतात मला
मग कोसळू लागतो पाऊस
मी शब्दांच्या पावसात भिजून जातो नको ईतका
माझ्या बेड रूमची खास खिडकी
मी काढून टाकल्यात त्या दुधी काचा
नि बसवल्यात शुभ्र पारदर्शक
ज्यातून सकाळचा सूर्य अलगद येतो भेटीला
सांडतो प्रकाश माझ्या पुस्तकावर
मग ती मला निराळीच भासू लागतात
चंद्र पण येतो त्याच खिडकीतून भेटीला
एकाच खिडकीतून येणारा चंद्र आणि सूर्य
मला नव्यानेच जाणवून जातो
मी बघत बसतो कधीतरी भर रात्री पौर्णिमेच्या चंद्राला
मी कधीतरी प्रयत्न करतो चंद्र प्रकाशात कविता वाचण्याचा
एक अनोखी संवेदना पसरते तेव्हा माझ्या रक्तात
हल्लीहल्ली खूप छान छपाईची पुस्तके दिसतात
चित्रासकट
परदेशातील काय किंवा माझ्या देशातील काय
माझ्या मनात छान सूर लावून जातात
तरी देखील
मी कधी कधी वाद घालत बसतो पुस्तकांशी
त्यातील शब्दांशी ,त्यातील विचारांशी
पण ती मात्र गप्प असतात ,मौन धारण करून बसतात
कुठलाच वाद न घालता...!!
प्रकाश
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडली. ते सेल्फ ऐवजी शेल्फ
आवडली. ते सेल्फ ऐवजी शेल्फ असं करून घ्या संपादकांकडून.
त्यांना त्यांच्या आल्टर इगोनं
In reply to आवडली. ते सेल्फ ऐवजी शेल्फ by एस
त्यांना त्यांच्या आल्टर इगोनं इगो वर लिहीलेली पुस्तकं म्हणायचं असलं तर?
आय मी मायसेल्फ मधलं सेल्फ असायला काही हरकत?
आहेत की मिपावर बरीच सेल्फं ;)
नका आठवण काढू त्यांची.
In reply to त्यांना त्यांच्या आल्टर इगोनं by प्यारे१
नाहीतर ह्यांच्याही काव्याला कसलं कसलं विरसग्रहण लागायचं!
@लेखकसाहेब, पुलेशु.
सॉरी… लिहिताना झाले .शेल्फ
सॉरी… लिहिताना झाले .शेल्फ ऐवजी सेल्फ कशी दुरुस्ती करायची माहित नाही . सेल्फ ऐवजी शेल्फ वाचावे .
चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल आभार . मनापासून
मस्त!
पुस्तकं आवडतात. त्यांच्याबद्दल लिहिलेली कविताही आवडली!
छान.
छान.
मी सध्या विनोबांनी लिहीलेले "कुराण-सार" वाचतोय.
पुस्तकप्रेमी की गति
पुस्तकप्रेमी की गति पुस्तकप्रेमीही जाने!अावडली कविता.
कविता आवडली हे सांगायचं
कविता आवडली हे सांगायचं राहीलं.
बाकी मिपावर असलेला प्रत्येक जण पुस्तक प्रेमी आहे असं माझं मत आहे.
प्रतिसाद नाही दिले म्हणून पुस्तकप्रेमी नाही असा कुणाचा समज हो ऊ नये म्हणून सांगावंसं वाटलं. आगावू धन्यवाद.
सर्व मित्रांचे मनापासून आभार
सर्व मित्रांचे मनापासून आभार . हसत खेळत चूक दाखवून देणा-या मित्राचे आभार .
मस्त ...! शेवट आवडला.
मस्त ...!
शेवट आवडला.