काही महीन्यांपूर्वी पौड रोड,पुणे (दशभुजा गणपती ते चांदणी चौकापर्यंत) येथील एकमेव पेट्रोलपंप श्रीमती अनघा घैसास या धाडसी महिलेने केलेल्या तक्रारीमुळे बंद पडला.अजुनही तो बंदच आहे.
अनघा यांनी आपल्या कारमध्ये पेट्रोल भरले आणि त्यात हातचलाखी केल्याचा त्यांना संशय आला. केवळ तिथल्या कर्मचार्यांशी वाद घालुन न थांबता त्यांनी भारत पेट्रोलियम कंपनी व पोलिसांकडे तक्रार केली. ईतकेच नाही तर त्याचा पाठ्पुरावा केला आणि पंप बंद करण्यात यश मिळवले.त्यांना अनेक प्रकारच्या धमक्याही आल्या असतील किंवा अजुनही येत असतील. त्यामुळेच त्यांच्या धाडसाला सलाम.
मला आलेले पेट्रोल मारण्याचे काही अनुभव
१.पेट्रोल भरताना लक्ष दुसरीकडे वळवणॅ,अवांतर गप्पा मारणे--उदा. बाईकवर स्वामी समर्थ लिहिले असल्यास "काय?स्वामींचे भक्त का?" वगैरे
२ रिसीट पाहीजे का?कार्ड पेमेंट करणार का? असले फालतू प्रश्न विचारणे
३ नळीचे नॉझल बाईकच्या टाकीत गेल्यावर लगेच क्लच न दाबणे, यावेळी मीटरवर मात्र आकडे वाढत चालले असतात.मध्येच कधीतरी क्लच दाबला की खरा पेट्रोलचा फ्लो चालु होतो.
४ नॉझल आत असताना मधे मधे क्लच दाबणे, यानेही फ्लो थांबतो बहुतेक.
५. ३ लिटर पेट्रोल भर असे सांगितल्यास " राउंड फिगर करु का?" (म्हणजे ३०० किंवा ४०० रुपये असे)विचारणे. यात ही काही ठिकाणी P1 म्हणजे २०० रुपये P2 म्हणजे ४०० रुपये असे सेट केलेले असते आणि त्यात फसवले जाण्याचा धोका असतो.
आणि त्यानंतर भारत पेट्रोलियममध्ये (आय.टी मध्ये) काम करणार्या मित्राशी चर्चा केल्यावर मिळालेले काही उपाय
१.डिजिटल मशिन असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरावे. कंपनी संचालित असेल तर उत्तम. जिथे पेट्रोलची किंमत सेट केल्यावर पेट्रोलचा फ्लो सुरु होण्याआधी कर्मचारी एक टोकन स्वाईप करतात तिकडे तर अजुनच उत्तम.
२ नॉझल एकदा टाकीत घालुन क्लच दाबला , की कर्मचार्याला हात काढुन घ्यायला सांगावे. नळी पडेल वगैरे फालतू कारणे ऐकुन घेउ नयेत. हवे असल्यास स्वतः नळी धरावी.
३. ३२०,४१० रुपये असे ऑड नंबर किंमतीचे पेट्रोल भरणे, त्यासाठी वरचे १० २० रुपये सुट्टे ठेवणे.त्यामुळे झक मारुन ते पूर्ण आकडे मशीनवर दाबावे लागतात.
४.मशीन तुमच्या उजव्या हाताला येईल अशी गाडी लावणे. निदान मलातरी ते बरे पडते लक्ष ठेवायला.
५.स्कूटी/अॅक्टीवा अशा गाड्यांची टाकी आतमध्ये असते,शिवाय बरेचदा डिकीत काही सामानसुद्धा असते. डिकी उघडणे,गाडी स्टँड्ला लावणे यात मशीनवरच्या आकड्यांकडे दुर्लक्ष होण्यास जास्त वाव असतो.
६.पेट्रोल मारल्याचा संशय आल्यास तुम्ही टाकी उघडुन कर्मचार्याला चेक करुन दाखवायला सांगु शकता.तसे करणे त्यांना बंधनकारक आहे.
आपण एखाद्या पंपावर कधीतरी पेट्रोल भरत असु, पण रोज तिकडे येणारे काही शे लोक आणि प्रत्येकाची ५० रुपयाची फसवणुक गृहित धरली तर एकेका पंपावर किती लाखाची लूट होत असेल?
तुमच्या काही सूचना आहेत का ही लूट थांबवायला?
वाचने
12386
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
हिंजवडीतला 'शेल' चा किंबहुना
शेल च्या पंपा बद्दल सहमत.
In reply to हिंजवडीतला 'शेल' चा किंबहुना by प्रचेतस
जोर दार +++१११
In reply to हिंजवडीतला 'शेल' चा किंबहुना by प्रचेतस
अगदी अगदी...
In reply to हिंजवडीतला 'शेल' चा किंबहुना by प्रचेतस
अनघा घैसासांबद्दल
राऊंड फिगरबाबत फेसबूकावर
माझा अनुभव-
असाच अनुभव मला मुलुंड पश्चिम
हा अनुभव मला
In reply to असाच अनुभव मला मुलुंड पश्चिम by सुबोध खरे
काका
In reply to हा अनुभव मला by चौकटराजा
ह्या असल्या चालूगिरीमूळे
फायदा होत असावा
In reply to ह्या असल्या चालूगिरीमूळे by शिद
हम्म
मलाही असे अनुभव आले आहेत.
सिंहगडरोडवरील वडगावचे पेट्रोल
+१
In reply to सिंहगडरोडवरील वडगावचे पेट्रोल by दशानन
माझा एक प्रश्न आहे.
In reply to +१ by दादा कोंडके
एवढं सगळं केल्यावर तुम्हाला
In reply to माझा एक प्रश्न आहे. by त्रिवेणी
पुण्याच्या दिसताय ;-)
In reply to माझा एक प्रश्न आहे. by त्रिवेणी
संशय का मनी आला? आता फक्त
In reply to पुण्याच्या दिसताय ;-) by विश्वनाथ मेहेंदळे
टाकीत maximum १०० रु चे
In reply to संशय का मनी आला? आता फक्त by काळा पहाड
मुळची खांन्देशी पण आता पुणेरी
In reply to पुण्याच्या दिसताय ;-) by विश्वनाथ मेहेंदळे
मी काहीही झालं तरी शून्य आहे
आमची लय वट्ट आहे पंपच मुळात
लोकजागृती व्हावी म्हणून लिंक
अजून राष्ट्रवादी वाले आहेतच
In reply to लोकजागृती व्हावी म्हणून लिंक by पाषाणभेद
लेख चान्गला आहे. मराठी शब्द
In reply to लोकजागृती व्हावी म्हणून लिंक by पाषाणभेद
वाशीमार्गे पामबीच कडे जाताना
प्रथम प्राधान्य शेल ला.
In reply to वाशीमार्गे पामबीच कडे जाताना by वेल्लाभट
मुंबईत नाही शेल; मग मुंबईकर
In reply to प्रथम प्राधान्य शेल ला. by काळा पहाड
वाचतीये …
कर्वे पुतळ्याचा एच्.पी. पंप
मुंबईत नाही शेल
पेट्रोल मारणे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15विचारुन बघतो...
मी तर डायरेक्ट कॅन किंवा