माणसाचं मन हा प्रचंड क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा प्रकार आहे. मन नक्की कुठं असतं हे सुद्धा अजून स्पष्टपणे कळलेलं नाही. तो शरीराचा अवयव आहे की नुसती कल्पना हेच एक मोठे गौडबंगाल आहे. 'माझ्या मनात विचार आला' म्हणजे नक्की काय झालं ते मलाही सांगता येणार नाही पण माझं अख्खं आयुष्यच त्यावर अवलंबून असतं . मी इतरांशी कसा वागलो,वागतोय आणि इथून पुढे वागणार हे तिथेच ठरतं. मन म्हणजे काहीसं धुक्यात हरवलेला लोहगडाच्या विंचूकाट्यासारखं… ते तिथे आहे हे पक्कं माहित असतं पण धुक्यामुळे कायम अस्पष्ट आणि संदिग्ध….
तसंच त्याला पूरक म्हणून दुसरं एक स्वतःच असं एक जग दिलंय माणसाला निसर्गाने …. ते म्हणजे स्वप्नांचं … आता इथे स्वप्न हे शास्त्र आहे की केवळ मनाचे खेळ कि ज्योतीषासारखे वादग्रस्त हा वादाचा मुद्दा होऊ शकतो पण बऱ्याच वेळा पडणाऱ्या स्वप्नातून निष्पन्न असे काहीच होत नाही. भोवतालच्या परिस्थितीनुसार पडणारी स्वप्ने कोणतेही फळ देत नाहीत. उदाहरणार्थ घड्याळाचा गजर कानावर पडून खूपदा आगीचा बंब किंवा रुग्णवाहिका स्वप्नात दिसते म्हणजे त्या स्वप्नाला तसा अर्थ नसतो. मात्र काही सूचक स्वप्नेही असतात ज्यायोगे नजिकच्या भविष्यात घडणाऱ्या काही घटना अगोदर दिसू शकतात पण त्यासाठी आपले मन रेडियो सारखे त्या लहरी शोषण्यासाठी तयार हवे.
मला स्वतःला बऱ्याचदा मी अधांतरी आकाशातून खाली पडतोय किंवा रेल्वेचे रूळ , रेल्वेचा प्रवास, नाणी गोळा करणे अशी स्वप्न नेहमी पडत असतात. त्याचा खरच काही अर्थ असतो का नाही हे कळायला काही मार्ग नाही. 'मनी वसे ते स्वप्नी दिसे' असे सगळेजण म्हणतात पण मी स्वतः बाईक आणि चारचाकी चालवायला स्वप्नातच शिकलोय. आदल्या रात्री स्वप्न पडल्यावर दुसर्या दिवशी मी तशी गाडी चालवून पहिली असताना ती मला यायला लागली होती. माझ्या कित्येक देवाघरी गेलेल्या आप्तेष्टांना मी स्वप्नातच भेटलोय. त्यांच्या स्पर्शापासून सगळं मनापासून अनुभवलंय. त्याचा अर्थ माहित नाही पण प्रचंड मानसिक शांतता मात्र नक्की लाभली आहे…
मी कुठेतरी ऐकले होते की स्वप्न म्हणजे माणसाचा थोडक्या पण ठराविक काळासाठी झालेला मृत्यूच असतो.आपले सूक्ष्म शरीर जड देह सोडून त्याच्या जगात विहार करायला निघून जाते पण ते त्या जड देहाशी बांधलेले असते. ज्या क्षणी सूक्ष्म शरीर परत येत नाही म्हणजेच कायमचा मृत्यू ! आपण स्वप्नात ज्या व्यक्तींना बघतो त्यांचे आणि आपले सूक्ष्म शरीर एकमेकांना भेटते (पण ह्याची खात्री मी केलेली नाही ). जे आयुष्य आपण प्रत्यक्षात जगू शकत नाही ते तात्पुरते का होईना जगायला मिळते ते केवळ स्वप्नांद्वारेच !
खालील दुवा मला ह्या बाबतीत प्रचंड उपयोगी वाटला :
http://www.dreamscience.org/idx_science_of_dreaming_section-1.htm
हे स्वप्नांचे जग अद्भुत आहे… पण मानवनिर्मित खेळ की निसर्गनिर्मित चमत्कार ?
वाचने
16228
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपले सूक्ष्म शरीर जड देह
सध्या जे स्वप्नात पाहतो तेच
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteXस्वप्न
In reply to सध्या जे स्वप्नात पाहतो तेच by मदनबाण
नशीब सनी लिओने नाही येत
In reply to सध्या जे स्वप्नात पाहतो तेच by मदनबाण
नशीब सनी लिओने नाही येत
In reply to नशीब सनी लिओने नाही येत by खटपट्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15खराब दिन...
In reply to नशीब सनी लिओने नाही येत by मदनबाण
जीनके दिन खराब चल रहे होते है
In reply to खराब दिन... by प्रभाकर पेठकर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15आजकाल सन्नी लिओनी स्वताचे
In reply to जीनके दिन खराब चल रहे होते है by मदनबाण
इंसेप्शन
मनाचे अद्भुत खेळ हे नक्कीच.
मला देखील आपण ईंजिनिअरिंगच्या
In reply to मनाचे अद्भुत खेळ हे नक्कीच. by आनन्दा
क्लासट्रोफोबिआ असल्याने मलाही
वाजवीपेक्षा जास्त चिंता वा भीती
In reply to क्लासट्रोफोबिआ असल्याने मलाही by रेवती
माझ्या नवर्यानं जर हा तुमचा
In reply to वाजवीपेक्षा जास्त चिंता वा भीती by काउबॉय
स्वप्नांना काही अर्थ नसतो,
अहो
In reply to स्वप्नांना काही अर्थ नसतो, by नानासाहेब नेफळे
स्वप्नांना अर्थ नसतो, परंतु
In reply to स्वप्नांना काही अर्थ नसतो, by नानासाहेब नेफळे
रोचक धागा. मला माझ्या
अनुभव ऐकण्यास उत्सुक आहे
In reply to रोचक धागा. मला माझ्या by जेपी
स्वप्नात सापासारखे विषारी
स्पांडुकथांचे वाचन अंमळ जास्त
In reply to स्वप्नात सापासारखे विषारी by सूड
स्पांडुकथा आता दोन तीन
In reply to स्पांडुकथांचे वाचन अंमळ जास्त by बॅटमॅन
नाय नाय स्पांडु सोबत फिरणे
खरंच रोचक विषय
हम तो भैया, घोडे बेचके सोते है!
जवळपास १-२ वर्षं स्वप्न जशी
स्वप्न का पडतात....
चांगली माहिती दिलीत.
In reply to स्वप्न का पडतात.... by प्रभाकर पेठकर
हवं ते स्वप्न सरावानी पाडुन
आमचा आण्भव
नशिबवान.
In reply to आमचा आण्भव by चौकटराजा
ह.घ्या.
In reply to नशिबवान. by प्रभाकर पेठकर
+१
In reply to आमचा आण्भव by चौकटराजा
सपान हाय वो त्ये.
In reply to +१ by कपिलमुनी
मला पोहता येत नाही
माझे स्वप्न
In reply to मला पोहता येत नाही by भिंगरी
परवा सकाळी ऊठायला उशिर झाला,
थोडसं विचित्र आहे पण तरी सांगतो
कदाचीत ज्या जन्मात मनुष्यजात
In reply to थोडसं विचित्र आहे पण तरी सांगतो by जिन्क्स
तुम्ही काही सिक्रेट लपवण्याचा
In reply to थोडसं विचित्र आहे पण तरी सांगतो by जिन्क्स
स्वप्नात आरसा मिळाला तर चेक
In reply to थोडसं विचित्र आहे पण तरी सांगतो by जिन्क्स
++1
In reply to स्वप्नात आरसा मिळाला तर चेक by टवाळ कार्टा
शंका विचारतो... सहजच.
In reply to थोडसं विचित्र आहे पण तरी सांगतो by जिन्क्स
.........
काही लोक म्हणे ठरवून स्वप्न
होय. लुसिड ड्रीमिंग त्याला म्हणतात.
In reply to काही लोक म्हणे ठरवून स्वप्न by प्रकाश घाटपांडे
मजा आली
आणखी एक अटकळ..
झोपेची आंदोलने.
In reply to आणखी एक अटकळ.. by चौकटराजा