चावडीवरच्या गप्पा - अफझलखानाचे सै(दै)न्य

Primary tabs

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
8 Oct 2014 - 9:11 pm

chawadee

“काय शिंचा जमाना आलाय? कोणाला काही बोलायचे तारतम्यच उरले नाही!”, चिंतोपंत तणतणत चावडीवर प्रवेश करत.

“काय झाले चिंतोपंत? कोणी उचकवलंय तुम्हाला आज?”, नारुतात्या उपहासात्मक सुरात.

“अहो, उद्धवाबद्दल असणार, अजून काय?”, बारामतीकर खोचकपणे.

“हो ना, अहो काय बोलायचं ह्याला काही सुमार, चक्क अफजल खान?”, चिंतोपंत हताशपणे.

“अरे शिंच्यांनो, मग युती मोडल्यानीतच कशाला? ”, घारुअण्णा बाळासाहेबांच्या आठवणीने डोळे ओले करीत.

“अहो, म्हणून काय ह्या थराला जायचे? असे बोलायचे, तेही एकेकाळच्या मित्राला? ते ही चक्क उपरा असल्याच्या थाटात?”, इति चिंतोपंत.

“मित्रं??? असा पाठीत खंजीर खुपसणारा मित्रं?? शिरा पडो असल्या मित्राच्या तोंडात!”, घारुअण्णा गरगरा डोळे फिरवत.

“अहो घारुअण्णा, भावुक होऊ नका उगीच. शांतपणे विचार करा जरा. खरोखरीच ते वक्तव्य चुकीचे नव्हते का? अशी उपमा योग्य आहे का? कितीही मतभेद असले तरीही अफझल खानाचे सैन्य असे म्हणणे हे जरा अतीच होते बरं का!”, इति बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका.

“तुम्ही बोलणारच हो, तुम्हाला तर मनातून मांडेच फुटत असतील! युती तोडायचे पातक केलेन ते केलेन वरून मिज्जासी दाखवताय कोणाला? ते सहन करून घेतलेच जाणार नाही बाळासाहेबांच्या महाराष्ट्रात! महाराष्ट्र हे खपवून घेणार नाही असा संदेश द्यायलाच हवा. शिवसेनाप्रमुख असते तर त्यांनीही हेच केले असते.”, घारुअण्णा तिरमिरीत.

“खी खी खी... बाळासाहेब असते तर युती तुटलीच नसती! कुठे ते हिंदूहृदयसम्राट आणि कुठे हे स्वहृदयसम्राट!”, नारूतात्या तेवढ्यात पांचट विनोद मारायचा चान्स मारून घेत.

“हो ना! अहो दिल्लीत सरकार आले ते ह्यांच्याच युतीमुळे असे समजून बेडकी फुगावी तसे फुगले हे उदबत्ती ठाकरे! उदबत्ती फटाका पेटवायच्या कामी येते पण तिच्यात स्वतःमध्ये कसलाही दम नसतो हे कळले असते तर असली बाष्कळ वक्तव्य करायची वेळ आली नसती त्याच्यावर.”, बारामतीकर चर्चेच्या मैदानात येत.

“हो ना, आणि ते ही डायरेक्ट मोदींवर हल्ला? स्वकर्तृत्वावर आणि हिकमतीवर बहुमत मिळवून मिळालेल्या एका पंतप्रधानावर? ”, बारामतीकर हसत.

“स्वकर्तृत्वावर? संघानं डोक्यावर घेतला आणि भाजपाने पैसा ओतला म्हणून हा शिंचा पंतप्रधान! त्यात पुन्हा ब्राह्मणही नाही, कसले स्वकर्तृत्व त्या शिंच्याचे?”, घारुअण्णा कुजकटपणे.

“घारुअण्णा, रागात असलात म्हणून काहीही बरळू नका! पुरोगामी महाराष्ट्रात आहात, असल्या जातीयवादी पिंका टाकवतात तरी कशा तुम्हाला!”, भुजबळकाका उग्र आणि गंभीर चेहरा करून.

“अच्छा, म्हणजे मोदी ब्राम्हण नाही हे कारण आहे होय घारुअण्णांच्या मोदीद्वेषाचे? बरं बरं...”, नारुतात्या संधी अजिबात न सोडत खाष्टपणे.

“अहो विषय काय, चाललात कुठे? आमच्या साहेबांकडून धोरणीपणा शिकावा जरा उद्धवाने आणि तुम्हीही घारुअण्णा! कितीही कट्टर विरोधक समोर असला तरीही जिभेवर साखरच असणार साहेबांच्या!”, इति बारामतीकर.

“साखर तर असणारच, साखर कारखान्यांच्या सहकारातून ती तर फुकटच असेल नै?”, नारुतात्या उगा काडी लावण्याच्या प्रयत्नात.

“मला तर हा पवारांचाच काहीतरी कावा वाटतोय. तिकडे मोदींची दाढी कुरवाळताहेत आणि इकडे दोन्ही ठाकरे बंधूंना पण गूळ लावताहेत. कुछ तो गडबड है!”, चिंतोपंत.

“बारामतीकर, है कोई जवाब?”, नारुतात्या जोरात हसत.

“अहो पण, असे अफझलखानाची उपमा देणे शोभते का? अरे, अफझल खानाने केलेला हल्ला हा लूट करून शिवरायांसकट महाराष्ट्राला बुडवण्यासाठीचा होता. त्याचीशी तुलना करायचा विचार येऊच कसा शकतो? इतिहास माहिती असला अन पक्षाचे नाव शिवरायांच्या नावावरून असले म्हणजे असे काहीही निंद्य बोलायचा परवाना मिळतो का? इतकी वर्षे सोबत मिळून सत्ता उपभोगली आणि आता तोच हिंदुत्ववादी मित्र अचानक अफझलखानाच्या पातळीवरचा होतो? अजब आहे? अकलेची दिवाळखोरी नाहीतर काय हे?”, चिंतोपंत उद्विग्न होत.

“ऐतिहासिक दाखले देऊन जनतेला इतिहासातच रमवत ठेवण्याची ही जुनीच चाल आहे शिवसेनेची आणि एकंदरीतच राजकारण्यांची!”, बारामातीकर.

“हा मुद्दा पटण्यासारखा आहे!”, भुजबळकाका.

“मुद्दा तुम्हाला पटेलच हो! हा घारुअण्णा काहीही म्हणाला तरी त्याची फिकीर इथे आहे कुणाला? आज बाळासाहेब असते तर हे दिवस दिसले नसते! ”, घारुअण्णा उद्वेगाने.

“होय! घारुअण्णा तुम्ही म्हणताय ते खरेच आहे!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, तुम्ही सुद्धा?”, चिंतोपंत एकदम चमकून.

“हो, आज केलेले घूमजाव बघितले का? म्हणे मी टोपी फेकली पण त्यात तुम्ही डोके का घातले? ते ही त्या विधानावर भाजपाकडून कडाडून प्रत्युत्तर आल्यावर लगेच! अरे जनतेला टोप्या घालायचे आतातरी बंद करा!”, सोकाजीनाना कठोर बोलत, “अहो, शिवसेनाप्रमुख जेव्हा काही विधानं करीत तेव्हा ते आपल्या मतांवर ठाम असायचे मग ते मत चूक असो की बरोबर. शिवसैनिक कधीच संभ्रमात असायचा नाही. भूमिका ठाम, पक्की आणि रोखठोक असायची. त्यांना अशी सारवासारव करायची बहुदा गरजच पडत नसे! धाकली पाती उगाच आव आणून बाळासाहेबांचा तोरा आणण्याचा प्रयत्न करते आहे पण ते जमत नाहीयेय.

'शिवसेनाप्रमुखपद' हे शिवधनुष्य आहे आणि ते पेलविण्याची ताकद उद्धवाकडे नाही हेच युती तुटल्यावर सिद्ध झाले. मारे बाळासाहेबांचा आव आणाल, पण मुत्सद्दीपणा कुठून आणाल? बरं, ते विधान केले ते केले पण अफझल खान दिल्लीचा सरदार नव्हता, तो दक्षिणेकडून महाराजांवर आणि महाराष्ट्रावर चाल करून आला होता हा साधा इतिहास माहिती असू नये? त्याचे तारतम्य न बाळगता बेजबाबदार विधाने करणे हा भलताच मूर्खपणा आहे!

तर ते एक असो, निकालानंतर सत्तेसाठी गळ्यात गळे घालतील ते फोकलीचे, तुम्ही का उगाच फुकाचा वाद घालत बसला आहात."

“काय पटते आहे का? जाऊद्या, चहा मागवा!”. सोकाजीनाना चेहरा निर्विकार ठेवत.

सर्वांनीच चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

साहित्यिकसमाजमाध्यमवेधवादविरंगुळा

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

8 Oct 2014 - 9:33 pm | चित्रगुप्त

खूप दिवसांनी चावडीवर मस्त जमलीत मंडळी. मजा आली.

प्यारे१'s picture

8 Oct 2014 - 10:04 pm | प्यारे१

उद्धव ठाकरे चुकून राजकारणी जास्त वाटतात.
साधा सरळ माणूस आहे हो तो! कशाला पडला ह्या फंदात कुणास ठाऊक.

दशानन's picture

8 Oct 2014 - 10:05 pm | दशानन

+१

फोटोग्राफर म्हणून उत्तम कला त्यांच्या हाती आहे.

नानासाहेब नेफळे's picture

8 Oct 2014 - 10:51 pm | नानासाहेब नेफळे

ठाकरे प्रा.लि. सांभाळणार कोण मग.

नानासाहेब नेफळे's picture

8 Oct 2014 - 10:53 pm | नानासाहेब नेफळे

पप्पू, नागपुरचा गोट्या,दादाची तायडी ह्ये पण पुढल्या वक्ताला चावडीवर येऊ देत.

काउबॉय's picture

8 Oct 2014 - 11:24 pm | काउबॉय

.

मुक्त विहारि's picture

8 Oct 2014 - 11:31 pm | मुक्त विहारि

गळ्यात गळे घालतील ते फोकलीचे.

+ १

सुमार वकुब बेताल वक्तव्ये

यात एकटे भाजपाची महायुती व पृथ्वी बाबाची महाराष्ट्र कांग्रेस सोडली तर इतर सर्व थोडक्यात प्रादेशिक चणीचे सर्वच बेताल बोलत आहेत.

पवार उवाच "नाथूराम" संदर्भ व जातिवाचक बोल

राज उवाच "उद्या पंतप्रधान जिल्हा परिषदेच्या निवडणुकी त पण प्रचार करणार का" व इतर पंतप्रधानांवर शरसंधान करणारी शेलकी वाक्य

आबा व भुजबळ यांची जातिवाचक मुक्ताफळे

सामनातील कारकुन पण असू नये असा सुमार वकुबाचा संपादक "युती तोडणाऱ्या लोकाना भांडी घासाला लावू"

भावी मुख्यमंत्री स्वप्न रंजक म्हणतात "दिल्लीतील औंरंगजेब फौज घेउन महाराष्ट्रात, दिल्लीच्या शब्दा वर नाचणारे राज्य भाजप नेतृत्व, ढोकला काय फाफडा काय वडा पाव काय, भवानीचा आम्हालाच आशीर्वाद काय"

काय पोरखेळ आहे. आज हातात सत्तेतला स सुद्धा नाही तो ही गुर्मी?

आता कोण सांगेल यांना "दुसऱ्याची रेषा छोटी करून आपली रेषा मोठी होत नसते"

भ्रम 1: सेना हा मराठी वादी पक्ष आहे

भ्रम 2: भरपूर टीका करत राहिले तर लोक आपल्या बाजूने येतील

भ्रम 3: आपल्याला राज्य शकट चालवता येइल

भ्रम 4: शिवाजी महाराज हे आपल्याच पक्षाचे कुणाची मराठी अस्मिता वाले म्हणून तर कोणी मराठा जन्माने म्हणून

भ्रम 5: लोकांना फार समजत नाही, महापालिका ते मंत्रालय केला असलेला भोंगळ व अपारदर्शी लोकहित बाजूला
ठेवून केलेला कारभार लोकाना काय समजणार?

भ्रम 6: आपल्या नाकांतला शेंबूड लोकांना दिसत नाही

आता तुम्हीच ठरवा की असे प्रादेशिक सत्ता लोलुप पक्ष हवेत की "सर्वांची साथ सर्वांचा विकास" हा सर्व समावेशक नारा देणारा पक्ष हवा.

प्रभाकर पेठकर's picture

9 Oct 2014 - 2:50 am | प्रभाकर पेठकर

दिल्लीतील औंरंगजेब फौज घेउन महाराष्ट्रात

बाळासाहेब ठाकरे ह्यांनीही हिच चुक एकदा भाषणात केली होती. औरंगझेब दिल्लीहून नाही, विजापूर दरबारातून आला होता.

औरंगजेब दिल्लीवरूनच आला होता, अफजलखान विजापूरहून आला होता.

प्रभाकर पेठकर's picture

9 Oct 2014 - 9:59 am | प्रभाकर पेठकर

होय. टंकनचूक.

बाळासाहेब आणि उद्धवही अफझलखानाबद्दलच बोलत होते.

आणखी काय अकलेचे तारे तोडलेत ? म्हणे कि अफझल खान व त्याच्या मोगल सैन्याचा पराभव करून दाखवेल.

जेम्स बॉन्ड ००७'s picture

9 Oct 2014 - 9:59 am | जेम्स बॉन्ड ००७

औरंगझेब दिल्लीहून
नाही, विजापूर दरबारातून आला होता.

*crazy* *shok* *ROFL*

अविनाशकुलकर्णी's picture

9 Oct 2014 - 9:54 am | अविनाशकुलकर्णी

ठाकरे बंधु विकासवाले......आमचे कडे ब्लु प्रिंट व विकासाच्या व्हिजन डोक्युमेंटस ची छपाई होते..
तसेच चिकन सुप..तेलकट वडे व ट्याबलेट पण मिळतिल

हाण तेजायला =))

अकुकाका फॉर्मात =))

अर्धवटराव's picture

9 Oct 2014 - 10:02 am | अर्धवटराव

:(

निकालानंतर सत्तेसाठी गळ्यात गळे घालतील ते फोकलीचे, तुम्ही का उगाच फुकाचा वाद घालत बसला आहात.
अगदी ! अगदी ! आणि सामान्य जनता बसते बोंबलत!
आजचीच बातमी :- गरज पडल्यास उद्धवबरोबर एकत्र येईल - राज ठाकरे
सगळा नुसता तमाशा चालु आहे ! सगळेच भ्रष्ट राजकारणी लुटारु आणि दरोडेखोर आहेत. आता पैश्यांचा पाउस पाडतील आणि नंतर आपल्याच जीवावर उठतील. या लोकांची संपत्ती कधी १०० कधी २०० तर कधी ३०० टकक्यांनी वाढलेली दिसुन येइल ! ही कुठल्या प्रकारची राज्याची / देशाची सेवा करतात की ज्यातुन इतकी ग्रोथ होते ? साला आम्ही दिवस-रात्र घासतो तरी बापजन्मात इतकी ग्रोथ करु शकत नाही ! :( माजलेत साले !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1 billion in revenue from India in FY15

तिमा's picture

9 Oct 2014 - 2:22 pm | तिमा

आणि हा राज ठाकरे पण कसा बोलतो? परवा पाऊस पडला तर भर सभेत म्हणाला," घरातून निघताना ढग दिसले म्हणून विचार केला, कुर्ता पायजमा घालू का नको? हो भिजलो तर आमची मंदाकिनी व्हायची."
असा माणूस मुख्यमंत्री होणार ?

श्रीगुरुजी's picture

9 Oct 2014 - 2:39 pm | श्रीगुरुजी

राज ठाकरेची गंमत आहे. भाजपने शिवसेनेचा विश्वासघात केला, बाळासाहेबांचा विश्वासघात केला, भाजप सेना पोखरत होता असे काहीतरी प्रचारात बोलतो. आपण २००५ साली बाळासाहेबांचा व शिवसेनेचा विश्वासघात बाहेर पडलो आणि २००९ मध्ये युतीच्या ३८ उमेदवारांच्या पराभवाला कारणीभूत ठरलो याचं याला विस्मरण झालेलं दिसतंय.

राकाँ, काँग्रेस, शिवसेना व भाजप या चौघांचं साटंलोटं असून ते आतून मिळालेले आहेत असंही तो बोलतो. याच्या पक्षाने नाशिकमध्ये महापौरपदासाठी राकाँ व काँग्रेसची मदत घेतली हे तो विसरला असला तरी इतरांच्या लक्षात आहे. याच्या पक्षाने भुजबळ व राणे पिता-पुत्रांविरोधात उमेदवार दिलेला नाही हे सुद्धा लोकांच्या लक्षात आलेले आहे. जर साटंलोटं असेल तर याचंच काँग्रेस-राकाँ बरोबर आहे.

याच्या पक्षाने नाशिकमध्ये महापौरपदासाठी राकाँ व काँग्रेसची मदत घेतली हे तो विसरला असला तरी इतरांच्या लक्षात आहे. याच्या पक्षाने भुजबळ व राणे पिता-पुत्रांविरोधात उमेदवार दिलेला नाही हे सुद्धा लोकांच्या लक्षात आलेले आहे.
अगदी...
ताक :- मनसेचा दुटप्पीपणा उघड... गुजरातींपुढे लोटांगण!

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

पगला गजोधर's picture

9 Oct 2014 - 6:37 pm | पगला गजोधर

"याच्या पक्षाने भुजबळ व राणे पिता-पुत्रांविरोधात उमेदवार दिलेला नाही "

अहो मग बरोबरच कि, भुजबळ व राणे विरोधी मते कन्सोलीदेत होतील कि. उमेदवार दिला असता तर विरोधी मते विभागली नसती का !

श्रीगुरुजी's picture

9 Oct 2014 - 8:59 pm | श्रीगुरुजी

>>> अहो मग बरोबरच कि, भुजबळ व राणे विरोधी मते कन्सोलीदेत होतील कि. उमेदवार दिला असता तर विरोधी मते विभागली नसती का !

मग एकही उमेदवार उभा करायचा नव्हता, म्हणजे काँ-राकाँ च्या विरोधातली सर्व मते एकवटली असती.

लईच मोदीप्रेम उतु जाणार्‍यांसाठी ( बुवा )

मोदीसाहेब किती चुका करताय ..

६० वर्षे काहीच केल नाही या एका गोष्टीवर कॅम्पेन उभी होती तुमची मात्र तिकडे युएस मध्ये गेल्या गेल्या , ६० वर्षात आम्ही कुठे पोहोचलोय बघा हे ही तुम्हीच म्हणताय. असो ..तुम्हाला म्हणुन सांगतो , सत्तरी च्या दशकात, रोज सांय्काळी, भोंगा वाजल्यावर, सायकल ला रिकामा डब्बा घेवुन जथ्याने कामगार वर्ग बाहेर पडताना दिसायचा, आता आयटी वर्ग दिसेल, पाठीला सॅक आणि अ‍ॅक मध्ये लॅपी ..असो..जरा मुद्द्याच बोलुयात .

सर्वात पहिले तुम्ही आणलेली कामकाजाची " सेक्रोटिरियल " पध्दत , ते म्हणजे मंत्री फक्त नियम बनविणार आणि त्याच्या फॉलो-अप सनदी अधिकार्‍यांनी करायचा, म्हणजे पुढे त्यात अनियमितता, भ्रष्टाचार झाला की मंत्र्यांच नाव घ्यायला जागाच नाही. सरळ सनदी अधिकार्‍याच्या अंगावर येणार, तुमच्या मंत्र्यांनी दबाब आणुन जर अनियमतितता वा भ्रष्टाचार केला तरी सनदी अधिकारी च गेला , उद्या सिचंन सारखा घोटाळा घेवुन जर उद्या एखादा अधिकारी टिव्ही वर आला तर आश्चर्य वाटणार नाही मला , शिवाय सगळ्या नाड्याच सनदी अधिकार्‍याच्या हातात दिल्यात , जर तो भ्रष्ट निघाला तर ! त्याला जोडुन एखादी पध्दत अथवा मॉनिटरिंग बॉडी चा उल्लेख च नाही. मान्य आहे की कॅग किंवा तत्सम ऑडिटिंग बॉडीच कोणी मनावर घेत नाही, पण ते किमान लोकापर्यंत पोचते तरी .

दोन तुम्ही परदेशी रासायनीक खतांना दिलेली परवानगी, सुफला युरिया वाली लोकल मंडळी , सरकार परदेशी कपंन्या आणणार नाही, या अटीवर सरकारला खत पुरवठा करत होती, फुकटात , हो, सरकार गरीब शेतकर्‍यांना अनुदानात मध्ये खते उपलब्ध करुन देते, ( त्यातलं किती टक्क्यापर्यंत पोचत नाही हा भाग वेगळा ) पण ते ही पोचणार नाही आता.

तीन सरंक्षण आणि रेल्वे मध्ये थेट गुंतवुणीकाला परवानगी, विषेश म्हणजे जेव्हा काँग्रेस ने हा प्रस्ताव मांडला होता, तो ही फक्त सरक्षण खात्यात २० % परवानगीचा , तेव्हा त्याला विरोध करणारे म्हणजे तुमच्या भाजपा वाले , इतका गोंधळ घातला होता सभागृहामध्ये की गडकरीतात्यांना मार्शल्स नी उचलुन बाहेर काढले होते. त्यात तुम्ही तो ३५ % इतका आणला आणि रेल्वे ही संस्था सरकारी आहे , त्यातला जो नफा-तोटा होतो, त्याचा सरकारला च फायदा होतो, ही गुंतवणुक करण्यापेक्षा त्यातील नियमन, स्वच्छता, या ढोबळ बाबींकडे लक्ष दिले असते तर नफा झाला असता असे मला वाटते, आणि ही बुलेट ट्रेन आणणार ती सरकारी आहे की निम्न सरकारी हे ही स्पष्ट नाही.

चार हे कापुस खरेदीला डिसेंबर मध्ये कशासाठी आणि का ढकललं गेलं, ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकर्‍याकडं चार पैसै असल्यास सरकारचं काय बिघडत होते, शिवाय डिसेंबर पर्यंत एखादी गारपीट झाली की जबाबदारी कोण घेणार, पॅकेज देवुन टाळ्या मिळवायच्या आहेत की काय अशी शंका यायला लागली आहे, मला तर कारणच समजेना

पाच इराण वरून कांदा आणायचा निर्णय ही हा असाच शेतकरी विरोधी, मान्य आहे की सर्वसामान्य माणसाला कांदा स्वस्त होईल, पण मालक आपला शेतकरी कोडमडुन पडेल त्याच काय , त्याच्या कांद्याला काय भाव देणार , की आता तुम्ही पण उसाला जसं आमचे मोठे साहेब हमी भाव देतात, आणी वसुली होत नाही, म्हणुन मळीपासुन वारूणी बनवुन, दोन-दोन वर्षे थकवुन, मग पैसै फिरवितात , तस काही करणार आहात का

सहा दसर्‍याच्या दिवशी रेडिओ वरुन भाषण , दसरा हा खुप मोठा सण असतो महाराष्ट्रासाठी , धम्मचक्रपरिवर्तन दिवस असतो दलीत बांधवाचे, दसरा मेळावा असतो शिवसैनीकांचा ( आम्ही आजही बाळासाहेबांचे रिकार्डिंग ऐकतो दसर्‍याला ) आणि संचालन असतय, भाषण संदेश असतो सरसंघचालकांचा, त्या दिवशी तुम्ही टाळ्या घ्यायला गेलात आणि भागवतांची नाराजी ओढुन घेतल्याची शक्यता नाकारता येत नाही, उगा भागवतांनी निवडणुकीतुन अंग काढुन घेतल का

सात ते वेगळा विदर्भ मागणार्‍या फडणविसांना पुढे का केल जातय, भारतातल्या कुठल्या ही राज्याचं अधिवेशन दोन ठिकाणी होतय हे एकलय का कधी , आमच्या महाराष्ट्रात होते , हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपुरात होतय खास त्यांच्यासाठी, मौनीबाबा दरवर्षी पॅकेज ( काय च्यामायला शब्द आहे, शेतकर्‍यांच्या आत्महत्यापण कार्पोरेटेड विषय करून ठेवलाय ) देऊनी देवुन थकला की , त्याचा किती वापर केलाय विदर्भातील मंत्र्यांनी , तुमचे ही आमदार/खासदार शामील आहे त्यात, गडकरी आणि फडणवीस , अर्थात फडणविसांनी ही, त्या आयबीएम लोकमत च्या वागळे शो मध्ये , आव्हाड आणी भाई जगतापांशी भांडणाशिवाय काय केले इतके दिवस, ( आव्हाडांनी आणि जगतापांनी ही तेच केलय म्हणा ) . आणि वेगळा विदर्भ दिल्यावर रेव्हेन्युअ जनरेट होण्याच कस काय, काय आहे विदर्भाकडे असे, सोन्याच्या खाणी सापडल्यात की काय ?

आठ ते जन - धन योजने द्वारे एक करोड खाते उघडलेत म्हणे , किती रक्कम जमा झाली, त्यात एका लाखापर्यंत कर्ज देणार आहात म्हणे , ते कुठल्या खात्यातुन देणार आहात, रघुराम राजन ऐकणार का तुमच याबाबत, ते चिदंबरम च्या जबळचे असुन , त्यांनी बँकाच पत धोरण बदलल नाही, नाकी नऊ आणले चिदंबरम च्या ! तो माणुस ऐकणारा नाही, इथे बॅ़कावर आधीच ती खाती मेन्टेन करण्याच खर्च पडलाय, वर अजुन कुठल्याही गॅरंटी शिवाय कर्ज देणार म्हणजे वसुलीचा प्रश्न च नाही, हे बॅंकाना भुर्दंड नाही का. हे म्हणजे घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे..

ते काश्मीरला मदत केली ई.ई. मला सांगु नका, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या फंडाची कल्पना आणि त्याच सगळं नियमन आमच्या इथल्या मोठ्या साहेबानी आणलेली आहे..सो प्लिज त्यात छाती टाईट करण्यासारखं काहीही नाही , शिवाय ते फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च विकेंद्रिकरण कधी करणार आहात, तुम्ही म्हटले होते ना मुलाखतीत, एक बिल तर पास करायचय. बघा जमतय का ? मागच्या सरकारला जमलं नाही ते म्हणुन अन्नसुरक्षा बिल आणाव लागलं त्यांना , त्यासाठी लागणारा निधी आणायला देखील पैसै नव्हते सरकारकडे, आता तुम्ही गुंतवुणक आणताच आहात परदेशातुन तर करा जरा लवकर

वेळीच सावध व्हावे , पल्बीक की जब पडती है ना तो बे-भाव की पडती है, देनेवाला देता है तो छप्पर-फाडके देता है, और लेता है तो चड्डी भी ले लेता है, समाजाला भुलवुन तुम्ही जास्त दिवस तरु शकणार नाही, मी घरात भांडण करुन अर्धे-अर्धे वाटणी केली आहे मत-दानाची , मला हक्क आहे हे जाणुन घेण्याचा ...
टीप : भक्तगणांना फाट्यावर मारले जाईल..धन्यवाद

पगला गजोधर's picture

9 Oct 2014 - 7:06 pm | पगला गजोधर

@ सुहाससर, मस्तच, 1 नं, ठासून मारली .....

श्रीगुरुजी's picture

9 Oct 2014 - 8:45 pm | श्रीगुरुजी

>>> ६० वर्षे काहीच केल नाही या एका गोष्टीवर कॅम्पेन उभी होती तुमची मात्र तिकडे युएस मध्ये गेल्या गेल्या , ६० वर्षात आम्ही कुठे पोहोचलोय बघा हे ही तुम्हीच म्हणताय.

६० वर्षात जी काय प्रगती झाली आहे ती जनतेच्या श्रमातून झालेली आहे. ६० वर्षात काँग्रेसने फारसे काही केलेले नाही. असे ते कॅम्पेन होते.

>>> असो ..तुम्हाला म्हणुन सांगतो , सत्तरी च्या दशकात, रोज सांय्काळी, भोंगा वाजल्यावर, सायकल ला रिकामा डब्बा घेवुन जथ्याने कामगार वर्ग बाहेर पडताना दिसायचा, आता आयटी वर्ग दिसेल, पाठीला सॅक आणि अ‍ॅक मध्ये लॅपी ..असो..जरा मुद्द्याच बोलुयात .

हे होण्यात काँग्रेसने काय केले? १९९१-९२ पूर्वी भारतातून अमेरिकेत संगणकवाले बिझनेस व्हिसावर जायचे व महिन्याला करमुक्त ८००-१८०० डॉलर मिळवायचे. सुरवातीला ३ महिन्यांसाठी कन्सलटंट कामासाठी गेलेले प्रत्यक्षात प्रोग्रॅमिंग, टेस्टिंग अशी कामे करायचे (अशी कामे वर्क परमिट शिवाय करणे बेकायदेशीर आहे) व ३ महिन्यांचा व्हिसा वाढवत वाढवत १८-२४ महिने वास्तव्य करून परत यायचे. आल्यावर महिनाभराने नव्याने व्हिसा मिळवायचे आणि परत जायचे. या सगळ्या प्रकारात अमेरिकेला कररूपाने काहीच उत्पन्न मिळत नव्हते, भारतीय काँट्रॅक्टर बेकायदेशीर काम दीर्घ काळ करीत होते व एक वाईट बेकायदेशीर प्रथा पडली होती. हे सर्व बंद करण्यासाठी व आयकर उत्पन्न मिळविण्यासाठी अमेरिकेने १९९२-९३ पासून बिझनेस व्हिसावर अनेक बंधने आणून एच-१ व्हिसा मोठ्या प्रमाणात देणे सुरू केले. त्यामुळे भारतीयांना अधिकृत वर्क परमिट मिळू लागले व त्यामुळे अमेरिकेला त्यांच्या पगारावर आयकर मिळू लागला. तसेच एच-१ व्हिसावाल्यांना तेथील कंपन्यांना प्रतिमाह कमीतकमी ३००० डॉलर व पगारी रजा, आरोग्य विमा इ. इतर फायदे द्यावे लागले, जेणेकरून अमेरिकन कंपन्यांचा खर्च खूप वाढला.

त्यातून आउटसोर्सिंगला चालना मिळाली व १९९४ पासून अमेरिकेत न जाता भारतात बसूनच काम करणे सुरू झाले व त्याद्वारे भारतात आयटी बूम सुरू झाली. पुण्यात १९९४ पर्यंत मॅस्टेक (एकूण कर्मचारी ६०-७०), काळे कन्सलटंट्स (४०-५० कर्मचारी), डीएसएस (७०-८०), थर्मॅक्स (१०० च्या आत), टीआरडीडीसी (१०० च्या आसपास) इ. मोजक्याच कंपन्या होत्या. त्यांची एकूण कर्मचारी संख्या १००० च्या आत होती. १९९५-९६ पासून आऊटसोर्सिंग सुरू झाल्यामुळे एमबीटी, इन्फोसिस, विप्रो अशा अनेक मोठ्या कंपन्या पुण्यात सुरू झाल्या व आज पुण्यात त्यांची एकत्रित कर्मचारी संख्या २ लाखापेक्षा जास्त असेल.

हे सगळे होण्यात काँग्रेसचे शून्य योगदान आहे.

>>> सर्वात पहिले तुम्ही आणलेली कामकाजाची " सेक्रोटिरियल " पध्दत , ते म्हणजे मंत्री फक्त नियम बनविणार आणि त्याच्या फॉलो-अप सनदी अधिकार्‍यांनी करायचा, म्हणजे पुढे त्यात अनियमितता, भ्रष्टाचार झाला की मंत्र्यांच नाव घ्यायला जागाच नाही. सरळ सनदी अधिकार्‍याच्या अंगावर येणार, तुमच्या मंत्र्यांनी दबाब आणुन जर अनियमतितता वा भ्रष्टाचार केला तरी सनदी अधिकारी च गेला , उद्या सिचंन सारखा घोटाळा घेवुन जर उद्या एखादा अधिकारी टिव्ही वर आला तर आश्चर्य वाटणार नाही मला , शिवाय सगळ्या नाड्याच सनदी अधिकार्‍याच्या हातात दिल्यात , जर तो भ्रष्ट निघाला तर ! त्याला जोडुन एखादी पध्दत अथवा मॉनिटरिंग बॉडी चा उल्लेख च नाही. मान्य आहे की कॅग किंवा तत्सम ऑडिटिंग बॉडीच कोणी मनावर घेत नाही, पण ते किमान लोकापर्यंत पोचते तरी .

सध्या देखील असेच आहे की. आदर्श घोटाळ्यात लटकलेले सर्व सनदी अधिकारी आहेत. एकही मंत्री त्यात अडकलेला नाही.

>>> दोन तुम्ही परदेशी रासायनीक खतांना दिलेली परवानगी, सुफला युरिया वाली लोकल मंडळी , सरकार परदेशी कपंन्या आणणार नाही, या अटीवर सरकारला खत पुरवठा करत होती, फुकटात , हो, सरकार गरीब शेतकर्‍यांना अनुदानात मध्ये खते उपलब्ध करुन देते, ( त्यातलं किती टक्क्यापर्यंत पोचत नाही हा भाग वेगळा ) पण ते ही पोचणार नाही आता.

कोणी सांगितले की ते पोचणार नाही आता? काही आकडेवारी, पुरावे आहेत का?

>>> तीन सरंक्षण आणि रेल्वे मध्ये थेट गुंतवुणीकाला परवानगी, विषेश म्हणजे जेव्हा काँग्रेस ने हा प्रस्ताव मांडला होता, तो ही फक्त सरक्षण खात्यात २० % परवानगीचा , तेव्हा त्याला विरोध करणारे म्हणजे तुमच्या भाजपा वाले , इतका गोंधळ घातला होता सभागृहामध्ये की गडकरीतात्यांना मार्शल्स नी उचलुन बाहेर काढले होते.

इतिहास कच्चा आहे तुमचा. गडकरी मे २०१४ मध्ये पहिल्यांदाच संसदेत आलेत. मार्शल्सने खासदारांना उचलण्याचा प्रसंग फक्त एकदाच आला होता. तो म्हणजे जेव्हा तेलंगणाचे विधेयक चर्चेत आले तेव्हा.

>>> ते त्यापूर्वी त्यात तुम्ही तो ३५ % इतका आणला आणि रेल्वे ही संस्था सरकारी आहे , त्यातला जो नफा-तोटा होतो, त्याचा सरकारला च फायदा होतो, ही गुंतवणुक करण्यापेक्षा त्यातील नियमन, स्वच्छता, या ढोबळ बाबींकडे लक्ष दिले असते तर नफा झाला असता असे मला वाटते, आणि ही बुलेट ट्रेन आणणार ती सरकारी आहे की निम्न सरकारी हे ही स्पष्ट नाही.

बुलेट ट्रेन सरकारी आहे का नाही याने काहीच फरक पडणार नाही.

>>> चार हे कापुस खरेदीला डिसेंबर मध्ये कशासाठी आणि का ढकललं गेलं, ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकर्‍याकडं चार पैसै असल्यास सरकारचं काय बिघडत होते, शिवाय डिसेंबर पर्यंत एखादी गारपीट झाली की जबाबदारी कोण घेणार, पॅकेज देवुन टाळ्या मिळवायच्या आहेत की काय अशी शंका यायला लागली आहे, मला तर कारणच समजेना

कापूस खरेदी ही राज्याच्या अखत्यारीत येते.

>>> पाच इराण वरून कांदा आणायचा निर्णय ही हा असाच शेतकरी विरोधी, मान्य आहे की सर्वसामान्य माणसाला कांदा स्वस्त होईल, पण मालक आपला शेतकरी कोडमडुन पडेल त्याच काय , त्याच्या कांद्याला काय भाव देणार , की आता तुम्ही पण उसाला जसं आमचे मोठे साहेब हमी भाव देतात, आणी वसुली होत नाही, म्हणुन मळीपासुन वारूणी बनवुन, दोन-दोन वर्षे थकवुन, मग पैसै फिरवितात , तस काही करणार आहात का

ग्राहक आणि शेतकरी यांचे हितसंबंध परस्परविरोधी असतात. भाव कमी झाले तर ग्राहकांना फायदा होतो व शेतकर्‍यांना तोटा. भाव वाढले तर याच्या उलट होते. दोघेही एकाच वेळी खूष असणे अवघड आहे.

>>> सहा दसर्‍याच्या दिवशी रेडिओ वरुन भाषण , दसरा हा खुप मोठा सण असतो महाराष्ट्रासाठी , धम्मचक्रपरिवर्तन दिवस असतो दलीत बांधवाचे, दसरा मेळावा असतो शिवसैनीकांचा ( आम्ही आजही बाळासाहेबांचे रिकार्डिंग ऐकतो दसर्‍याला ) आणि संचालन असतय, भाषण संदेश असतो सरसंघचालकांचा, त्या दिवशी तुम्ही टाळ्या घ्यायला गेलात आणि भागवतांची नाराजी ओढुन घेतल्याची शक्यता नाकारता येत नाही, उगा भागवतांनी निवडणुकीतुन अंग काढुन घेतल का

रेडिओवरील भाषण ऐकण्याची कोणावरही सक्ती नव्हती. दूरदर्शन बघण्याची देखील सक्ती नव्हती. काँग्रेसवाल्यांनी आजतगायत धम्मचक्रपरिवर्तन कार्यक्रमाचे कधीही थेट प्रक्षेपण केले नाही. याचवर्षी कशी एकदम पवारांना त्याची आठवण झाली? भागवतांचे भाषण निव्वळ दूरदर्शनने नव्हे तर इतर अनेक वाहिन्यांनी दाखविले होते. २४ डिसेंबरच्या मध्यरात्री व्हॅटिकनच्या चौकातील सोहळा देखील थेट प्रक्षेपित केला जातो. त्यामुळे भागवतांचे भाषण दाखविणे यात काहीही चुकीचे नाही.

>>> सात ते वेगळा विदर्भ मागणार्‍या फडणविसांना पुढे का केल जातय, भारतातल्या कुठल्या ही राज्याचं अधिवेशन दोन ठिकाणी होतय हे एकलय का कधी , आमच्या महाराष्ट्रात होते , हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपुरात होतय खास त्यांच्यासाठी, मौनीबाबा दरवर्षी पॅकेज ( काय च्यामायला शब्द आहे, शेतकर्‍यांच्या आत्महत्यापण कार्पोरेटेड विषय करून ठेवलाय ) देऊनी देवुन थकला की , त्याचा किती वापर केलाय विदर्भातील मंत्र्यांनी , तुमचे ही आमदार/खासदार शामील आहे त्यात, गडकरी आणि फडणवीस , अर्थात फडणविसांनी ही, त्या आयबीएम लोकमत च्या वागळे शो मध्ये , आव्हाड आणी भाई जगतापांशी भांडणाशिवाय काय केले इतके दिवस, ( आव्हाडांनी आणि जगतापांनी ही तेच केलय म्हणा ) . आणि वेगळा विदर्भ दिल्यावर रेव्हेन्युअ जनरेट होण्याच कस काय, काय आहे विदर्भाकडे असे, सोन्याच्या खाणी सापडल्यात की काय ?

वेगळ्या विदर्भाची मागणी खूप जुनी आहे. भाजपप्रमाणे काँग्रेसच्या विदर्भातील बहुतेक सर्व नेत्यांना वेगळे विदर्भ हवे आहे. काही वर्षांपूर्वी काँग्रेसच्या साळवे व वसंत साठ्यांनी त्यासाठी उपोषण देखील केले होते (उपोषण सुरू केल्यानंतर ३ तासातच त्यांना रूग्णालयात हलवावे लागले व उपोषणाची फजिती झाली). उर्वरीत महाराष्ट्रातील नेत्यांचा वेगळ्या विदर्भाला विरोध आहे. तेलंगणाला सुद्धा आंध्रातील काही काँग्रेस नेत्यांचा पाठिंबा व काहींचा विरोध होता. एखाद्या प्रश्नावर पक्षात दोन परस्परविरोधी भूमिका असणे यात काहीही वावगे नाही.

>>> आठ ते जन - धन योजने द्वारे एक करोड खाते उघडलेत म्हणे , किती रक्कम जमा झाली, त्यात एका लाखापर्यंत कर्ज देणार आहात म्हणे , ते कुठल्या खात्यातुन देणार आहात, रघुराम राजन ऐकणार का तुमच याबाबत, ते चिदंबरम च्या जबळचे असुन , त्यांनी बँकाच पत धोरण बदलल नाही, नाकी नऊ आणले चिदंबरम च्या ! तो माणुस ऐकणारा नाही, इथे बॅ़कावर आधीच ती खाती मेन्टेन करण्याच खर्च पडलाय, वर अजुन कुठल्याही गॅरंटी शिवाय कर्ज देणार म्हणजे वसुलीचा प्रश्न च नाही, हे बॅंकाना भुर्दंड नाही का. हे म्हणजे घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे..

प्रत्येक सोम्यागोम्याला कर्ज मिळणार नाही. पत बघूनच कर्ज मिळेल. आधी ती योजना काही काळ चालू देत आणि मग त्याचा आढावा घेऊ.

>>> ते काश्मीरला मदत केली ई.ई. मला सांगु नका, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या फंडाची कल्पना आणि त्याच सगळं नियमन आमच्या इथल्या मोठ्या साहेबानी आणलेली आहे..सो प्लिज त्यात छाती टाईट करण्यासारखं काहीही नाही , शिवाय ते फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च विकेंद्रिकरण कधी करणार आहात, तुम्ही म्हटले होते ना मुलाखतीत, एक बिल तर पास करायचय. बघा जमतय का ? मागच्या सरकारला जमलं नाही ते म्हणुन अन्नसुरक्षा बिल आणाव लागलं त्यांना , त्यासाठी लागणारा निधी आणायला देखील पैसै नव्हते सरकारकडे, आता तुम्ही गुंतवुणक आणताच आहात परदेशातुन तर करा जरा लवकर

होईल हो, जरा थोडा अवधी द्या. लग्न झाल्यावर मूल व्हायला सुद्धा किमान ९ महिने लागतात. इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी ४ महिन्यात हव्या आहेत.

>>> वेळीच सावध व्हावे , पल्बीक की जब पडती है ना तो बे-भाव की पडती है, देनेवाला देता है तो छप्पर-फाडके देता है, और लेता है तो चड्डी भी ले लेता है, समाजाला भुलवुन तुम्ही जास्त दिवस तरु शकणार नाही, मी घरात भांडण करुन अर्धे-अर्धे वाटणी केली आहे मत-दानाची , मला हक्क आहे हे जाणुन घेण्याचा ...

तुम्ही कशाला भाजपची काळजी करता. ते समर्थ आहेत आपल्या पक्षाची काळजी करायला.

>>> टीप : भक्तगणांना फाट्यावर मारले जाईल..धन्यवाद

मारा.

सुहास..'s picture

9 Oct 2014 - 8:52 pm | सुहास..

कॉग्रेंसचीच भाषा असल्यामुळे फाट्यावर मारलेच आहे !!

१५ ला उत्तर देतोच म्हणा मी !!

इकडे राज ठाकरे आणि इतर पक्ष मोदींवर पाकिस्तान सिमेवर गोळीबार करत असताना प्रचार करत असल्याची राळ उठवण्याचा प्रयत्न करत होते, तर तिकडे मोंदींनी हिंदूस्थानी सैन्याल्या फ्री हॅन्ड देउन आले आणि त्याचा परिणाम खालील प्रमाणेच दिसला :-
Islamabad shocked as Indian Army launches 'massive' retaliation to border firing... and confident PM Modi promises 'everything will be all right soon'
Pakistan shocked by massive Indian Army retaliation after govt's fire-at-will directive
बाकी कुठे नेउन ठेवलाय महाराष्ट्र माझाची जाहिरात आणि व्हॉट्सअ‍ॅपवरचे विनोदी मेसेजेस सध्या पेव फुटलेल आहे,पण खरचं महाराष्ट्राची अवस्था भिकारी करुन ठेवली आहे ! याचे उत्तम उदाहरण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातले रस्ते ! फार लांब कशाला जाऊ ? माझ्या कंपनीकडे जाणार्‍या हायवेची पावसाळ्या नंतर भयानक दुरावस्था झालेली आहे ! तसेही पावसाळ्या आधी ती चांगली कुठे होती म्हणा ! पण रोज ज्या रस्त्यावरुन प्रवास करतो त्याच रस्त्याचे काही दिवसांपूर्वी मोबाइल वरुन फोटो काढले ते इथे देतो... नावालाही डांबर उरलेले नाही ! याच रस्त्यावरुन मी रोज प्रवास करुन पाठ आणि कंबरडे मोडुन घेतो. आमचे फिरंगी क्लायंट येतात ते मनात काय विचार करत असतील ? धुळीचे चक्रीवादळ आले आहे काय इथे ? रस्ता नसलेल्या जागी आयटी कंपनी असु शकते ? की साप-सपेर्‍यांचा देशाची अजुन हीच अवस्था आहे ?
This is highway ?

 This is highway ?
आता कळलं महाराष्ट्रातले उध्योग धंदे का बाहेर गेले /जातात ते ? जिथे हे लोक पाणी रस्ते आणि २४ तास वीज देउ शकत नाही तिथे ते महाराष्ट्राचे उज्वल भविष्य काय घंटा घडवणार ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

सुहास..'s picture

9 Oct 2014 - 9:47 pm | सुहास..

बाणा, तु आहेस म्हणुन, नायतर हे बी फाट्यावरच मारणार व्हुतो ;)

इकडे राज ठाकरे आणि इतर पक्ष मोदींवर पाकिस्तान सिमेवर गोळीबार करत असताना प्रचार करत असल्याची राळ उठवण्याचा प्रयत्न करत होते, तर तिकडे मोंदींनी हिंदूस्थानी सैन्याल्या फ्री हॅन्ड देउन आले आणि त्याचा परिणाम खालील प्रमाणेच दिसला >>>>

राज बोलल्यानंतर मोदींना ही ऐकावे लागत याच उत्तम उदाहरण याच्या पेक्षा काय देवु मी !

रोडच्या अवस्थेबद्दल ही राज च पहिल्यापासुन बोलतो आहे !! असो आपला प्रतिसाद " गिरे तो भी टांग उप्पर आहे "

अडाणी मंत्री , येडे भक्त ! जाने दो , नये है !!
-----------------------------------------------------------
" सीज फायर चालु असताना, सीमेवर चालणारे गोळीबार ही नवीन गोष्ट नाही. शत्रूंनी गोळीबार केला कि आता आम्ही काय करायचे असा प्रश्न सीमेवरील सैन्य सरकारला विचारत नसते. ते तिथल्या तिथे जशासतसे उत्तर देवून मोकळे होतात. सीमेवर आगळीक करायची असेल तरी सैन्य त्याची परवानगी मागत नाही ! त्यामुळे महाराष्ट्रात येवून निवडणूक प्रचार सभेत आम्ही चोख उत्तर देण्याचे आदेश दिलेत असे सांगणे म्हणजे मोदीच्या मंत्र्यांचा अडाणीपणा आहे. मग भक्त कसे मागे राहतील ? त्यांनी सेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून बढाया मारणे केले सुरु ! अरे येड्यानो , सरकारी पातळीवर जो निर्णय घ्यायचा असतो तो बोलणी करण्याचा किंवा युद्ध पुकारण्याचा , गोळीबाराला प्रत्युत्तर देण्याचा नाही !! जाने दो ,नया है ..!!! चेपुवरुन साभार
काय म्हणु " नया है वह " की " नो उल्लु बनाविंग " !!

बाणा, तु आहेस म्हणुन, नायतर हे बी फाट्यावरच मारणार व्हुतो
हेच मी सुद्धा म्हणतो... तसेही ना मी राज ठाकरे विरोधी आहे ना मोदी समर्थक. मी फक्त देशाचाच विचार करणार्‍या आपल्या सध्याच्या पंतप्रधांनांचा समर्थक आहे असे हवे तर समज ! जो कोणी योग्य काम करेल त्याचे मी समर्थनच करीन मग तो राज असोवा अगदी राहुल बाबा देखील ! पण फरक इतकाच आहे की आपले पंतप्रधान करुन दाखवत आहेत आणि बाकीचे त्यांच्यावर टिका करण्या पलिकडे अजुन काहीही करुन दाखवु शकले नाहीत.
अगदी ताजे उदा :- From CCTV to sudden calls: PM Modi keeps MPs on a tight leash

राज बोलल्यानंतर मोदींना ही ऐकावे लागत याच उत्तम उदाहरण याच्या पेक्षा काय देवु मी !
हॅहॅहॅ... फार मोठा भ्रम आहे तुझा ! ;) राज ठाकरेंना सिरीयसली घ्यायचे दिवस कधीच गेले ! ;)

रोडच्या अवस्थेबद्दल ही राज च पहिल्यापासुन बोलतो आहे !! असो आपला प्रतिसाद " गिरे तो भी टांग उप्पर आहे "
अडाणी मंत्री , येडे भक्त ! जाने दो , नये है !!

राज ठाकरे पण नुसतेच बोलतात... आणि त्यांनाही आता कोणी सिरयसली घेत नाही ! ;) कार्यकर्त्यांना आपला पक्ष प्रमुख देवा वाटला तर त्यात नवल ते काय ? ;)

" सीज फायर चालु असताना, सीमेवर चालणारे गोळीबार ही नवीन गोष्ट नाही. शत्रूंनी गोळीबार केला कि आता आम्ही काय करायचे असा प्रश्न सीमेवरील सैन्य सरकारला विचारत नसते. ते तिथल्या तिथे जशासतसे उत्तर देवून मोकळे होतात. सीमेवर आगळीक करायची असेल तरी सैन्य त्याची परवानगी मागत नाही ! त्यामुळे महाराष्ट्रात येवून निवडणूक प्रचार सभेत आम्ही चोख उत्तर देण्याचे आदेश दिलेत असे सांगणे म्हणजे मोदीच्या मंत्र्यांचा अडाणीपणा आहे. मग भक्त कसे मागे राहतील ? त्यांनी सेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून बढाया मारणे केले सुरु ! अरे येड्यानो , सरकारी पातळीवर जो निर्णय घ्यायचा असतो तो बोलणी करण्याचा किंवा युद्ध पुकारण्याचा , गोळीबाराला प्रत्युत्तर देण्याचा नाही !! जाने दो ,नया है ..!!! चेपुवरुन साभार
काय म्हणु " नया है वह " की " नो उल्लु बनाविंग " !!

वरती हायलायइट केलेले वाक्य परत वाचावे ! ;)

बाकी तू सिरीयसली घेउ नकोस बरं का ! आपले राजकारणी स्वतः लोणी ओरपुन जनतेला भिकेला लावतात म्हणुन आल आपल्या देशाची ही अवस्था झाली आहे ! कोणता झेंडा घेउ हाती अशी अवस्था कार्यकर्त्यांची राहते आणि इकडे महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याच्या चर्चांना उत येतो. ;)

जाता जाता :- परत एकदा, मी राज ठाकरे समर्थक या पूर्वी होतो आणि आता नाही, त्यांचे बरेचसे मुद्दे अगदी योग्य आहेत पण क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. लोक आता भावनिक राजकारणाच्या पुढे जाउ लागले आहेत्,आणि सर्वांनाच आज विकासाची इच्छा, गरज आणि महत्व देखील कळले आहे असे म्हंटल्यास ते वावगे ठरु नये ! त्यांना सत्ता मिळाली आणि त्यांनी महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे भले केले तर मला आनंदच होइल.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

सुहास..'s picture

9 Oct 2014 - 9:52 pm | सुहास..

लिंक द्यायची राहिली ...

http://timesofindia.indiatimes.com/india/Numbers-show-Maha-ahead-of-Guja...

वरचे फोटो पाहुन आणि स्थानिक पातळीवर काम करुन सुद्धा तू आकड्यांच्या किमया सांगतोस याची गंमत वाटली ! ;) असो.
बाकी... महाराष्ट्र अजुन अनेक गोष्टीत पहिला आहे हे तुला माहित नाही ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

सुहास..'s picture

9 Oct 2014 - 10:21 pm | सुहास..

in compare !!

मदनबाण's picture

9 Oct 2014 - 10:26 pm | मदनबाण

in compare !!
हो का ? याच राज्यातल्या लोकांनी याच राज्यातल्या लोकांना गटाराचे पाणी पिताना आणि रेल्वेच्या टॉयलेटच्या फ्लश मधे बादल्या लावुन पिण्यासाठी पाणी भरताना पाहिले आहे ! हे कुठल्या कंपेरिझन मधे बसते ते सांग जरा ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

नंबरिंग मध्ये एखाद उदाहरण उचलले तर कसे चालेल ? गुजरात च्या अवस्थेच्या ही अश्या प्रकारच्या बातम्या येतातच की ...आहेत माझ्याकडे ( १५ वर्षे सरकार होते ) ! तु एक रस्ता दाखवतोय , मी पन्नास चकाचक रस्ते दाखवु शकतो ! :)

असो बोलु नंतर कधीतरी ..नायतर आपल्या दोघांचा वीट यायचा मिपाकरांना ;)

नंबरिंग मध्ये एखाद उदाहरण उचलले तर कसे चालेल ?
एखादेच ? अरे महाराष्ट्रा शेतकर्‍यांच्या आत्महत्येत नंबर १ वर आहे ही काय अभिमानाची गोष्ट आहे का ? ही नंबरिंग का उचलु नये,तीच गोष्ट इतर आत्महत्येंची. ज्या राज्यात सर्व प्रकारचे लोक इतक्या मोठ्या प्रमाणात आत्महत्य करत आहेत तो जर खरच पुढे असेल तर असे घडुच कसे शकते ?

तु एक रस्ता दाखवतोय , मी पन्नास चकाचक रस्ते दाखवु शकतो !
हॅहॅहॅ... जरुर दाखव. त्यासाठी किती वर्षा पासुन लोक टोल भरत होते,त्यात किती टोल आत्ता पर्यंत जमा झाला आणि राज ठाकरेंनाही टोल विरोधी आंदोलन करण्याची गरज का भासली ते सुद्धा सांग. :)

असो बोलु नंतर कधीतरी ..नायतर आपल्या दोघांचा वीट यायचा मिपाकरांना
अगदी हेच म्हणतो. ;)

जाता जाता :- राज ठाकरेंना प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी आणि ब्लु-प्रिंट प्रत्येक्षात उतरवण्यासाठी शुभेच्छा ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

धन्यवात ..आम्ही मोदींना पण सिरियसली घेत नाही आता ...आजुन आहेत पाच वर्षे !! रिंगणच लावतो बघ ;)

आम्ही मोदींना पण सिरियसली घेत नाही आता
हॅहॅहॅ... हरकत नाही,निवडुकीच्या आधी सुद्धा असे म्हणणारे अनेक होतो सगळ्यांची बरोबर पाचर मारली एकट्या मोदींनी ! ;) त्यांनी एकंदर किती सभा घेतल्या याचा आकडा {लोकसभेच्या} तो जरा शोधुन बघ हो... ;) हो आणि ५ वर्ष काय पुढची ५० वर्ष मोदी असले तरी चालेल आम्हाला ! रोबोट पेक्षा काम करणारा पंतप्रधान नक्कीच आवडेल मला. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

पैसा's picture

9 Oct 2014 - 10:33 pm | पैसा

चावडी नेहमीप्रमाणेच फस्कलास आणि खुसखुशीत! बाकी एवढ्या खुसखुशीत धाग्याचं काश्मिर करणार्‍या प्रतिसादांचं काय करायचां सोकाजीनाना? बोला, जनता उत्तर मागते आहे!

नाखु's picture

10 Oct 2014 - 8:35 am | नाखु

कारण हे वाद्-प्रतिवाद अतिशय निकोपपूर्ण वाटत आहेत.
बाणरावांचा समारोपच पुरेसा आहे.
जाता जाता :- परत एकदा, मी राज ठाकरे समर्थक या पूर्वी होतो आणि आता नाही, त्यांचे बरेचसे मुद्दे अगदी योग्य आहेत पण क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. लोक आता भावनिक राजकारणाच्या पुढे जाउ लागले आहेत्,आणि सर्वांनाच आज विकासाची इच्छा, गरज आणि महत्व देखील कळले आहे असे म्हंटल्यास ते वावगे ठरु नये ! त्यांना सत्ता मिळाली आणि त्यांनी महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे भले केले तर मला आनंदच होइल.

सुहास..'s picture

9 Oct 2014 - 10:34 pm | सुहास..

आलीच बघ संपादिका कुठची ;)

मुक्त विहारि's picture

10 Oct 2014 - 9:53 am | मुक्त विहारि

मदनबाणाने केलेले विश्लेषण मस्तच...

चावडीवरच्या गप्पा म्हणजे मराठी मनाचा आरसाच .....

प्यारे१'s picture

10 Oct 2014 - 3:50 pm | प्यारे१

उद्धव राजकारणी नसूनही इतरांच्या नुसत्या तोंडपाटीलकीवर राजकारणाचा आव पाहता बाळासाहेबांनी घेतलेला निर्णय बरोबर घेतला होता असं म्हणावंसं वाटत आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Oct 2014 - 2:05 am | निनाद मुक्काम प...

युतीत असतांना कुतुबशहा
युती तुटल्यावर आदिलशहा
सोच बदललो , शाह्या बदलतात.

अर्धवटराव's picture

11 Oct 2014 - 6:10 am | अर्धवटराव

मोदिंनी बारामतीत सभा का घेतली असावी? काकांनी विनंती केली म्हणुन? मोदिंना आप्ली प्रतिष्ठा एव्हढी जड झाली नसावी.

पडद्यामागचे राजकारण लवकरच कळेल! पवारंाना संपलेअशसे मजण ारे भलेभले पोहोचले!

- (पवारांच्या मँनिप्युलेशचा पंखा) सोकाजी