सोराक
सोराक हि गोवन लोकांची एक पारंपारीक, साधी, सोपी ओला नारळ घालून केलेली एक लाल ग्रेव्हि आहे जी खासकरुन पावसाळ्यात करतात. कोसळणार्या पावसात जेव्हा ताजी मासळी मिळणं दुरापास्त असतं तेव्हा अश्या वेळी सुखी मासळी आणि जोडिला हे कालवण करतात. व्हेजवाले ह्यात त्यांच्या आवडिच्या भाज्या (उदा. बटाटा - हिरवी सिमला मिरची, तोंडली, फरसबी ई.) घालू शकता पण हे असचं प्लेन मस्त लागतं (स्वानुभव आहे!!!).
खरं तर हे सोराक भाज्या घालून किंवा न घालताहि छान लागतं...पण ते दुसर्या दिवशी अधीक चवदार लागतं कारण कच्च्या कैरीचा आंबटपणा पुरेपुर उतरतो.
साहित्यः
१. खवलेलं ओलं खोबरं - १ बाउल
२. लसुण ३ पाकळ्या
३. कांदा - १ मध्यम वाटणासाठि आणि १ मध्यम चिरलेला
४. सुख्या लाल मिरच्या (बिया काढलेल्या) - ४ ते ५
५. तिखट - १ चमचा, हळद - पाव चमचा
६. मसाला - २ चमचा
७. मधुन चिरलेल्या हिरव्या मिरच्या - ३
८. टोमॅटो - १ मध्यम चिरलेला
९. जिरं - १ चमचा
१०. आख्खे धणे - २ चमचे
११. कच्च्या कैरीच्या फोडि - ६
१२. तेल - १/२ वाटि (चित्रात कमी आहे पण नंतर जास्त घेतलं)
१३. चवीनुसार मीठ, बारीक चीरलेली कोथींबीर
कॄती:
१. मिक्सर मधे ओलं खोबरं, १ कांदा, टोमॅटो, धणे, जीरं, सुख्या लाल मिरच्या आणि लसुण घालुन गरजेप्रमाणे पाणी घालुन मुलायम वाटुन घ्या
२. मंद आचेवर एका नॉनस्टिक कढईत तेल तापलं कि चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या घालुन कांदा मउ होईस्त परतत रहा. आता वाटलेली पेस्ट घाला. एक ५ मि. हळद, तिखट आणि मसाला घालून बाजुच्या कडेने तेल सुटेस्त पेस्ट सतत परतत रहा. आता आंब्याच्या फोडि घालून त्या मउ होईस्त परतुन घ्या.
४. चवीप्रमाणे मीठ आणि गरजेप्रमाणे पाणी घालुन मंद आचेवर एक ५-७ मि. ग्रेव्हि उकळू द्या.
५. ५-७ मि. गॅस बंद करुन गरमागरम सोराक वाफाळणार्या भातासोबत वाढा.
टीपा:
१. जोडिला वांग्याचे काप, लोणचं/पापड हा बेत फक्कड जमेल - गोड कोळाच्या शेंगांची तिखट बाजु :)
२. कच्ची कैरी न मिळाल्यास आंबटपणासाठि चिंच किंवा कोकम घालू शकता
वाचने
17325
वाचनखूण
प्रतिक्रिया
48
मस्तं.
चिंच किंवा कोकम वापरायचे
In reply to चिंच किंवा कोकम वापरायचे by विजुभाऊ
हो विजुभाउ
तिरफळाशी कट्टी असते का यात ?
In reply to तिरफळाशी कट्टी असते का यात ? by कंजूस
गाडगीळ साहेब
In reply to गाडगीळ साहेब by दिपक.कुवेत
गप्राव मेल्या
In reply to गप्राव मेल्या by पैसा
एकच प्रतिसाद तीनदा झाल्याने
In reply to एकच प्रतिसाद तीनदा झाल्याने by विजुभाऊ
गोव्यातली रेशिपी
In reply to गप्राव मेल्या by पैसा
हम्म...
In reply to हम्म... by दिपक.कुवेत
अरे बाबा
In reply to अरे बाबा by पैसा
तिरफळं
In reply to गाडगीळ साहेब by दिपक.कुवेत
दीपक, गोव्यातल्या जेवणात,
In reply to दीपक, गोव्यातल्या जेवणात, by यशोधरा
सहमत.
मस्त. पुर्वी खाल्लेली आहे.
अयोयो!!
मस्त
यात असलेला मसाला कसला आहे.
In reply to यात असलेला मसाला कसला आहे. by विजुभाऊ
विजुभाऊ
In reply to विजुभाऊ by दिपक.कुवेत
हा मसाला का?
In reply to हा मसाला का? by बहुगुणी
हो बहुगुणी
फोटू आवडला. पहिल्यांदाच ही
छान!
दिपक शेफ अभ्यास नीट करा.
In reply to दिपक शेफ अभ्यास नीट करा. by कंजूस
दिपक शेफ अभ्यास नीट करा
बुम !!
ह्ह्ह्ह्हाआआआआ!!!!
ईस्टमनकलर पाकृ
सोराक
In reply to सोराक by राही
=))
In reply to सोराक by राही
हा सोराक शब्द म्हणजे बहुतेक
ह्यो कायरसा सारखा प्रकार
उफ्फ! काय सुंदर फोटो आहेत!
मस्तच. उकड्या तांदळाचा भात
मस्त. तोपासु एकदम.
खल्लास
चला
अहाहा!
व्वा.
मस्त दिसतीये डिश.कैरीला
मस्त दिसतेय ही डीश. सध्या
भारी दिसतंय प्रकरण. भात घ्या
आमच्या गोयचं हे
In reply to आमच्या गोयचं हे by गौरीबाई गोवेकर
कशी घालायची?
In reply to कशी घालायची? by प्रभाकर पेठकर
आख्खीच फोडणीत
In reply to आख्खीच फोडणीत by गौरीबाई गोवेकर
कालवणात घातली.
आवडेश
करेश! खायेश!! आवडेश!!!
In reply to करेश! खायेश!! आवडेश!!! by स्पंदना
+१