✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कबिनीकाठचे हती

स
सर्वसाक्षी यांनी
Tue, 10/28/2008 - 17:59  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10470 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

श
श्रावण मोडक Tue, 10/28/2008 - 18:04 नवीन

४ आणि ५

क्रमांकाची छायाचित्रे पाहून 'मदुमलाईच्या जंगलात'ची आठवण झाली. त्यात उल्लेखिलेले हत्ती हेच की काय? पूर्ण सुळ्यांचे. त्यातही पाचव्या क्रमांकाच्या छायाचित्रातील हत्ती त्या पुस्तकातील एका छायाचित्रातील हत्तीशी अगदी मिळताजुळता. सु रे ख छायाचित्रे.
  • Log in or register to post comments
म
मीनल Tue, 10/28/2008 - 18:14 नवीन

पिल्ल

मला मम्मा मम्मा करत आईच्या पाठी मागून फिरणारी हत्ती पिल्ल आवडतात. आपण पिल्लू म्हटलं की छोटूस्स गोंडस रूप डोळ्यासमोर येत आणि हत्ती म्हटल की अजस्त्र रूप. `हत्ती पिल्ल` म्हणजे मजेशीर विरोधाभास. फोटोत तेच शोधत होते.थोडे दिसलेही! मीनल.
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 10/28/2008 - 18:38 नवीन

सुंदर

मस्त! इतक्या मोठ्या संख्येने हत्तींचा कळप पाहून छान वाटले. वीरप्पनच्या गच्छंतीनंतर वन्यजीवांची सुरक्षा वाढली असावी अशी आशा. अजुन इतर प्राणी व प्रवासवर्णन येउ द्या साक्षीजी.
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 10/28/2008 - 18:38 नवीन

सुंदर

मस्त! इतक्या मोठ्या संख्येने हत्तींचा कळप पाहून छान वाटले. वीरप्पनच्या गच्छंतीनंतर वन्यजीवांची सुरक्षा वाढली असावी अशी आशा. अजुन इतर प्राणी व प्रवासवर्णन येउ द्या साक्षीजी.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 10/28/2008 - 18:42 नवीन

सुळेवाला...

हत्ती हा तसाही माझा आवडता प्राणी. साक्षीदादा फोटो छानच काढतात. हे इतके हत्ती पाहून खूपच मस्त वाटलं. ते सुळेवाले बघून 'कुडकोंबनच्या दादा'ची आठवण झाली. कृष्णमेघ कुंटेच्या मदुमलाईवर लिहिलेल्या पुस्तकात या सुळेवाल्याबद्दल खूप लिहिलंय त्याने. वर मोडकांनी लिहिलं आहे तसे तेच हे हत्ती नसावेत कारण पुढे तो दादा आणि त्याचा साथीदार दोघेही गायब झाले आणि सगळ्या सुळेवाल्यांचं जे काही होतं तेच प्राक्तन त्यांच्याही नशिबात असल्याचा संशय खुद्द कृष्णमेघनेच नमूद केला आहे. आणि त्याला आता खूपच वर्षे झाली असतिल. पण हा हत्ती बघून एकदम तीच आठवण आली हे मात्र खरे. साक्षीदादा, फक्त हत्तींचीच छायाचित्रं काढली की अजूनही काही प्राणी आहेत? बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 10/28/2008 - 19:00 नवीन

हे हत्ती...

ते नव्हेतच. पण हे पाहिल्यानंतर त्यांची आठवण झाल्यानं मनात एकदम निर्माण झालेला तो प्रश्न होता. यापैकी पाचव्या छायाचित्रातील हत्तीच्या सुळ्यांची लांबी त्या पुस्तकात अशाच पोझमध्ये असलेल्या हत्तीच्या सुळ्यांच्या लांबीपेक्षा थोडी कमीच वाटते. म्हणजे हा हत्ती वेगळाच आहे. चौथ्या छायाचित्रातील हत्तीच्या सुळ्यांची लांबी थोडी अधिक आहे, पण त्याला तितकासा बाक असल्याचे दिसत नाही. कृष्णमेघच्या त्या पुस्तकातील हत्तींच्या निरिक्षणाला आता बरीच वर्षे (किमान पाच तरी खचितच) झाली आहेत आणि मला ते वाचूनही दोनेक. बिपिनराव, हा खुलासा सहजच केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ल
लिखाळ Tue, 10/28/2008 - 22:38 नवीन

वा

वा ! हत्तींची चित्रं मस्तच ! असे कळपाने असलेले हत्ती पाहायला काय मजा आली असेल ! त्यात सुळेवाला नर पाहायची संधी मिळाली म्हणजे भाग्यच ! एकदम एखाद्या मंदिराच्या भिंतीवरील कोरीव कामाची आठवण झाली. पुण्यात कधी रस्त्यावर हत्ती आला की मी आ वासून पाहायचो ! हत्तीच्या चालीकडे पाहून तबल्यामध्ये एक 'मत्त ताल' आहे. मत्त ताल एका श्रेष्ठ-ज्येष्ठ तबलजींच्या तोंडुन ऐकायला मिळाला होता :) --लिखाळ.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 10/28/2008 - 22:47 नवीन

सुंदर चित्रे

आवडली. (प्रेक्षक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Tue, 10/28/2008 - 23:18 नवीन

काय क्युट

काय क्युट हत्ती आहेत?!! मला तो फोटो साठी पोझ देणारा हत्ती खूप आवडला.. आणि हम दो हमारे दो पण एकदम मस्त आहे!! मला हत्ती खूप आवडतो.. रस्त्यावरून जायला लागला की बघत राहावंस वाटतं!
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 10/28/2008 - 23:26 नवीन

मस्त

हत्तींची छायाचित्रे आवडली. कबिनीकाठच्या सफरीची माहितीही मस्तच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 10/29/2008 - 00:20 नवीन

अतिशय सुंदर चित्रे!

गजराज! काय सुरेख शब्द आहे ना? खरोखरच राजा असतो हा. एकदम दिमाखदार, आपल्या सामर्थ्याविषयी पूर्ण खात्री असलेला तरिही कुणाच्या उगाच वाटेला न जाणारा! सर्वसाक्षी, तुम्ही साक्षात गजांतलक्ष्मीचे दर्शन एवढ्या मोठ्या स्वरुपात तेही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिलेत, आपल्याला किती म्हणून धन्यवाद देऊ? अलभ्य लाभ! (पाचव्या चित्रातला तो सुळेवाला पहा काय डौल, काय दिमाख, काय अधिकार! छ्या..केवळ अशक्य!) (आणि शेवटच्या चित्रातले ते इवलेसे पिल्लू! वा फारच गोंडस!) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 10/29/2008 - 00:41 नवीन

साक्षीदेव

साक्षीदेवा, सगळेच हत्ती लै भारी रे! त्याला पाहून आम्हाला आमच्या एलिफन्ट गॉडची आठवण झाली! :) अर्रे, लालबागच्या राजाचा बिजय असो..... (सरळ चालणारा) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 10/29/2008 - 04:47 नवीन

व्वा,सुरेख

व्वा,सुरेख्..एकदम कोल्हापुर च्या रंकाळा तलावावर फिरणार्‍या हत्तीणीची आठवण झाली.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 10/29/2008 - 08:19 नवीन

वा!

वा! चांगले फोटो.. हत्तीचे सुळे शिल्लक असल्याचे बघून आनंद झाला.. :) मात्र पहिल्यांदाच इतके "काटकुळे" हत्ती पाहिले. अगदी बर्‍याच जणांच्या बरगड्या/हाडांची टोके दिसताहेत.. ते बघून वाईट वाटले. :( -(संमिश्र) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 10/29/2008 - 08:25 नवीन

झकास

सर्वच हत्तींचे फोटो झकास !!!
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Wed, 10/29/2008 - 09:12 नवीन

सही फोटोज !!

हत्तींची चित्रं मस्तच ! येउ द्यात अजुनही प्रवास वर्णन !! (कळपातला ) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Wed, 10/29/2008 - 12:33 नवीन

कृष्णमेघ कुंटे

यांच्या पुस्तकाविषयी कुतुहल निर्माण झाले आहे, आता वाचलेच पाहिजे. अभिप्रायाबद्दल आणि माहितीबद्दल मिपाकरांचे सप्रेम आभार.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Fri, 10/31/2008 - 14:18 नवीन

मस्त आहेत

मस्त आहेत हत्ती. अजुन काहि वेगळ्या प्राण्यांचे फोटु असतील तर टाका. :) ................ बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय. http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा