Skip to main content

भाजपला मत देण्याअगोदर

लेखक सागरलहरी यांनी शनिवार, 04/10/2014 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
भाजपला मत देण्याअगोदर या प्रश्नाची उत्तरे भाजपाने, त्यांच्या समर्थकांनी अथवा कोणीही द्यावीत ..?? वरील पैकी मी कोणीही या सदरात येतो व कोणीही उत्तरे दिल्यास हवीत म्हणून मी माझ्या अल्प बुद्धी प्रमाणे ती देत आहे. १) महाराष्ट्रात सुद्धा मोदींच्या नावेच मते का मागता .. >> मोदी हे देशव्यापी नेतृत्व आहे. राज्य भाजपा ही अखिल भारतीय स्तरावरील पक्षाची शाखा आहे. न चालणारा माल दुसरीकडून कच्च्या ब्रांड खाली विकायला काढलेली स्वतंत्र सिस्टर कन्सर्न नव्हे. मग देशव्यापी नेता जो काही नवीन घडवू पहात आहे त्याच्याच नावाने मते मागायची ना ? २) लोकसभेत मोदींना बघून मत दिले, ते पंतप्रधान झाले, आता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार का ? >> मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत , ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत हे उघड आहे. तरी प्रश्न विचारावासा वाटतो कुणाकुणाला म्हणून हे उत्तर. ३) नसेल तर मग महाराष्ट्रात मोदीएवढा आश्वासक चेहरा कोण ..? >>> महाराष्ट्रात आज पर्यंत अखंड आश्वासक चेह-यांचीच परंपरा जणू आहे असे समजून हा प्रश्न विचारलेला दिसतो. या राज्याने बाबासाहेब भोसलेंसारखे मुख्यमंत्री पण पाहिले आहेत. तरीही सांगायचे तर प्रशासकीय कामकाज, विधीमंडळाचे कामकाज, समस्यांची जाण या निकषावर टिकणारी अनेक नावे आहेत - नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे ही काही उदाहरणे. निव्वळ आश्वासक चेहरा नव्हे तर आश्वासक धोरणे व नीती आणि ती अंमलात आणण्याची क्षमता देखील आवश्यक आहे. नुसते अग्रलेखातून शब्दांचे फवारे उडवण्यापेक्षा भविष्याची जाण , दीर्घकालीन धोरण, नियोजन आणि गव्हर्नन्स मध्ये सकारात्मक बदल याची आवश्यकता आहे. ती फक्त भाजपाच पूर्ण करु शकेल असे वाटते. ४) नसेल तर मग युती का तोडली.. ? >> क्र. तीन चे उत्तर आहे असे असल्यामुळे प्रश्न लागू नाही. तरीही . . . युती तोडली नाही चर्चा करण्यास पुरेशा वेळेअभावी तुटली. ५) राष्ट्रवादी - पवार साहेब , काॅग्रेस - पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना - उद्धव ठाकरे, मनसे - राज ठाकरे, तर मग भाजप - ?????? महाराष्ट्राचा चेहरा कुठे आहे. दोन डझन आयात नेते /उडते कावळे आता भाजप चालवणार का..? (कृपया मोदींना या मध्ये ओढू नये. ते केंद्रात उत्तम काम करताहेत) >>>> या ???? प्रश्नातच भाजप चे वेगळे पण आहे. दुस-यांच्या मांडीवर बसून मोठे होणारे नेते या पक्षात कमीच आहेत. पक्ष = व्यक्ती हा लोकशाहीचा जावई शोध नवाच आहे. मोदी केंद्रात उत्तम करत आहेत याचे दाखले मागण्याची वेळ अद्याप आली नाही. ६) सबब मी मोदींच्या नावे महाराष्ट्रात भाजपला मत का द्यायचे... ? >>> वर प्रश्नांची उत्तरे दिलीच आहेत. केंद्रात आणि राज्यात एक पक्ष सरकार असणे राज्याच्या फायद्याचे हे धोरण म्हणून मत द्यायचे. >>> घरात पोर अंगठा चोखत मोठे होऊ लागले की आपोआप ते पोर बालनेता, युवानेता, उद्याचे आशास्थान, आणि मग नेता होत जाते आणि कार्यकर्ते खपत रहातात. ही संस्कृती अपवाद वगळता सरसकट या पक्षात नाही म्हणून मत द्या. >>> घराणेशाही, घराणेशाहीच्या बोंबा मारत तीच घराणेशाही पाळण्याची पद्धात गल्ली ते दिल्ली पर्यंत या पक्षात सरसकट नाही म्हणून मत द्या. >>> मोदी केवळ स्वत:चांगले काम करत नाहीत तर सहका-यांनी पण तसे केले पाहिजे याचा आग्रह धरतात तसे करायला लावतात आणि हेच ते राज्यात भाजप सरकार आले तर करायला लावतील हि खात्री बाळगायला जागा आहे म्हणून मत द्या. >>> कावळे मावळे गद्दार तलवार असल्या शब्दांच्या फुलो-यात आणि सतराव्या शतकात वावरण्यापेक्षा प्रशासन, नियोजन, विकासकारण याचे भान आणि अनुभव इतरांच्या मानाने चांगला असलेल्या कार्यकर्त्यांचा भरणा या पक्षात तुलनेने अधिक आहे म्हणून मत द्या. ७) उत्तरा शिवाय मत नाही..., कारण आम्ही आंधळे किंवा कळपातले प्राणी नाही. आम्ही छञपती शिवरायांचे मावळे आहोत.. >>> उत्तरावर विचार करालच, आंधळे तुम्ही नाहीतच, कळपातले नाही ना मग झुंडी मागे जाऊ नका. शिवरायांचे मावळे आहात ना मग शिवराय धोरणी होते, प्रशासक होते, आणि मी शहाजी राजेंचा मुलगा आहे म्हणून मला राजा करा असे त्यांनी न म्हणता ईश्वरी प्रेरणा म्हणून स्वकर्तृत्वाने स्वराज्य निर्माण केले. दोन दोन हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेली एखादी पालिका वर्षानुवर्षे खड्ड्यांमध्ये आणि झोपड्यांमध्ये कशी रहाते , किल्लेदारच किल्ल्याची रसद खातो आहे काय याचा शोध सच्च्या मावळ्या प्रमाणे घ्या. -- एक सामान्य नागरिक

वाचने 30672
प्रतिक्रिया 165

प्रतिक्रिया

In reply to by नानासाहेब नेफळे

RBI, पुण्यातली फोक्सवॅगनची फॅसलीटी गुजरातला गेल्यामुळे गळे काढत आहेत ,ते RBI गुजरातला गेल्याचा काही पुरावा आहे का नेफळे की उगा फुकाची बडबड?

In reply to by मृत्युन्जय

>>> RBI गुजरातला गेल्याचा काही पुरावा आहे का नेफळे की उगा फुकाची बडबड? नेफळे कशा पुड्या सोडतात आणि पुरावे मागितले कसे सोयिस्कर मौन पाळतात याची कल्पना आहे ना तुम्हाला? त्यांचं नाव नानासाहेब नेफळे ऐवजी नानासाहेब फेकडे असायला हवं होतं.

In reply to by श्रीगुरुजी

ते फेकत आहेत ते माहिती आहे हो मला. पण मग विचार केला की माझ्याकडे नसलेली एखादी माहिती नानासाहेबांकडे असेल तर बघावे म्हणुन प्रश्न विचारला आपला. बाकी ते आता बर्‍याच कोलांट्या उड्या मारणार हे तर माहिती आहेच. पण त्यांनी आपल्या ज्ञानात भर घातली तर आपल्याला बरेच आहे की. आभारच मानेन मी त्यांचे मग.

In reply to by मृत्युन्जय

RBIचे महत्वाचे तीन डीव्हीजन मुंबईतून दिल्लीत हलवणार आहेत. http://www.ahmedabadmirror.com/news/business/RBI-to-shift-3-forex-divis…

In reply to by नानासाहेब नेफळे

एकुणात तुम्ही निखालस खोटी विधाने करत आहात हे मान्य करत आहात तर. तुम्ही म्हणालात की आख्खे मुख्यालय गुजरात मध्ये हलवले. इथे तर दिसते आहे की ३ डिव्हिजन्स दिल्लीला हलवली. तुमचा खोटारडेपणा इथेच सिद्ध होतो. तरीही तुम्हाला अजुन खोटा पाडतो: The divisions will continue to be part of Foreign Exchange Department, Central Office, Mumbai, RBI added अजुन ऐका: आरबीआयची एकुण २० -२५ डिपार्टेमेंट्स आहेत. फोरेन एक्स्चेंज हे त्यापैकी एक. फोरेन एक्स्चेंज डिपार्टमेंट मध्ये अनेको डिव्हिजन्स आहेत. त्यातील ३, केवळ ३ डिव्हिजन्स दिल्लीला हलवली आणि तुम्ही म्हणत आहात की "मुख्यालय गुजरातमध्ये हलवले". अजुन किती वेळा माती खाणार नेफळे?

In reply to by मृत्युन्जय

चला वादासाठी मान्य करु ! पण मुंबईतच ठेवायला काय धाड भरलीय?, तीन डीविजन्स जड झाली आहेत का मुंबईत?

In reply to by नानासाहेब नेफळे

वादासाठी मान्य करु? म्हणजे काय? इतरवेळेस अमान्य करण्यासारखे आहेच काय त्यात? आधी तुम्ही अपप्रचार करता आहात हे मान्य करा. चला तुमच्या सोयीसाठी असे मान्य करा की तुमची माहिती निखालस चुकीची होती. ढळढळीत पुरावे दिले आहेत. मग पुढचे बोलु.

In reply to by नानासाहेब नेफळे

आंधळे भक्तांना काही दिसत नाही कुठे तुम्ही प्रकाश दाखवत आहेत. मराठी मत मिळावे म्हणुन मोदी म्हणत आहे मुंबई महाराष्ट्रापासुन वेगळी करणार नाही विदर्भ वेगळा होणार नाही. शिवसेनेच्या प्रचाराला "घाबरुन" शेवटी बोलावे लागले. नाहीतर आधी यांची भाषा वेगळी होती रंगबदलु लोकांचा काय भरोसा ठेवतात

In reply to by उदयन

फुकट्या लोकांच्या हाती मुंबई असल्यापेक्षा ती वेगळी केलेली काय वाईट? बाकी विदर्भाला वेगळं व्हायचं असेल तर रोखणारे आम्ही कोण? त्यांचं काय भलं केलंय आतापर्यंतच्या सरकारांनी?

In reply to by काळा पहाड

विदर्भात जे प्रकल्प आहेत ते काय गुजरात ने उभे केले का? नागपुरातल्या काही लोकांनाच वेगळा विदर्भ हवा आहे कारण उभ्या महाराष्ट्रात डाळ शिजत नाही. मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पडत आहेत त्यांना म्हणुन्च हे खेळ

In reply to by उदयन

इथं गुजरातचा काय संदर्भ? बाकी तुम्ही म्हणता तसा विदर्भ सुजलाम सुफलाम असता तर त्यांना वेगळं राज्य मागायची काही गरजच नव्हती. बाकी तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही नागपूर मधल्या लोकांना मुख्यमंत्री बनू देत नाही तर. मग त्यांची मागणी वाईट कशी? की कायम पस्चिम महाराष्ट्रातल्याच लोकांनी मुख्यामंत्री व्हायचं?

In reply to by काळा पहाड

काय हास्यास्पद लिहिले आहे . जरा परत वाचुन बघा काय लिहिले ते. महाराष्ट्रातुन पंतप्रधान मिळाला नाही तर काय तुम्ही महाराष्ट्र देशच वेगळा मागणार आहेत का? ;) काहीही प्रतिवाद करायचा ?

In reply to by उदयन

मुख्यमंत्रीपद पश्चिम महाराष्ट्राकडे कायम कधी होते? विदर्भाचे वसंतराव नाईक (११ वर्षे सलग) आणि मारोतराव कन्नमवार (१ वर्षे) मुख्यमंत्री राहिले आहेत.मराठवाड्याचे पण शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण, विलासराव, निलंगेकर, शिवराज पाटील चाकूरकर असे मुख्यमंत्री झाले आहेत. उत्तर महाराष्ट्राला कधी मुख्यमंत्री पद मिळाले नाही.मात्र ते वेगळे राज्य मागत नाहीत.

In reply to by उदयन

मुंबई आणि विदर्भ वेगळी झालीच पाहीजे महाराष्ट्रातुन, म्हणजे पुण्याचे, सातार्‍याचे, कोल्हापूर चे महत्व वाढेल

In reply to by मृत्युन्जय

अरे मृत्युन्जया, श्रीगुरुजी गपा की रे जरा. किती छळता माझ्या नानाला. तो एकटा एका बाजुला अजुन आठ महिन्याचाच आहे आणि तु रे मृत्युन्जया साडेसहा वर्षाचा आहेस ना सांभाळुन घेत जा त्याला जरा आपला आप्पासाहेब फुरसुंगीकर

In reply to by विजुभाऊ

@ विजुभाऊ, १) इथले उद्योग गुजराथला गेले हा काय गुजराथ सरकारचा दोष आहे काय ?? पळवले नाहीत त्यांनी. कर्नाटकात पण जात आहेत इथले उद्योग. २) १५ वर्षे सत्तेत नसलेले गडकरी टोल सम्राट कसे काय?? नेफले भाऊ, RBI स्वायत्त संस्था आहे. अन फोक्सवॅगन खासगी … मनसेचे रेमेडोके सांगणार अन तुम्ही ऐकणार

In reply to by लोटीया_पठाण

@लोटीया पठाणजी, RBI स्वायत्तवगैरे सांगोवांगी असतं ,अर्थखात्याचाच अप्रत्यक्ष होल्ड असतो. आणि तुमचे लॉजिक लावले तर गॅस कंपन्या पेट्रोल डीझेल कंपण्यानाही बरीच स्वायत्तता आहेच की, मग दरवाढीविरोधात सरकारच्या नावे दहा वर्षे शिमगा का चालू होता? महाराष्ट्रात येऊन गुजरातच्या मुख्यमंत्री राज्यातल्या उद्योगांना गुजरातेत यायचे आमंत्रण देत आहेत, मोदी सरकारकडून अशा कंपन्यांना करसवलतीचे आमिष दाखवून महाराष्ट्राबाहेर पडायला उद्युक्त करत आहेत. मुंबई पुणे बुलेट ट्रेन कॅन्सल करुन अहमदाबादकडे नेली, कशासाठी? आजपर्यंत परदेशी पाहुणे दिल्लीत यायचे व नंतर मुंबईत, मोदीने दोन्हीला टांग देउन चीनच्या पंतप्रधानांना अहमदाबादेत कशाला नेले? तुंबड्या भरुन घेणारा धुर्त माणुस आहे मोदी, महाराष्ट्र अशांच्या ताब्यात अजिबात नको देऊयात.गुजरात्यांनी अखेर लायकी दाखवली.

In reply to by नानासाहेब नेफळे

काही चांगल्या गोष्टी, कंपन्या, उद्योग गुजरात मधे गेले तर इथे लोक "पाकीस्तानात" गेल्या सारखे गळे काढत आहेत. इथल्या पि.चि. MIDC मधे छोटे, मध्यम उद्योग चालवणे ह्या गुंडांनी आणि खंडणीखोरांना कसे अशक्य करुन ठेवले आहे हे माहीती दिसत नाही. असे वातावरण असेल तर जाणारच कंपन्या गुजरात मधे. स्क्रॅप सुद्धा खंडणी दिल्या शिवाय विकता येत नाही पुणे परिसरात.

In reply to by नानासाहेब नेफळे

मी मांडलेला मुद्दा पक्षीय नव्हता. मला म्हणायचे होते, जे राज्य चांगले व्यवसायिक वातावरण देइल तिथे उद्योग आणि इतर संस्था जातील. मोदी किंवा दुसरे कोणी असे जबरदस्तीने घेउन जाउ शकत नाही. जर नविन सरकारनी पिं.चि. मधली गुंडगीरी कमी केली नाही तर कोणाचेही सरकार असेल तरी उद्योग दुसरीकडे जातील.

In reply to by प्रसाद१९७१

@ प्रसाद : तुमचे म्हणणे मान्य आहे. कोंग्रेस असो की इतर कोणी स्थानीक पुढार्‍यानी इथल्या एम आय डी सी ची अक्षरशः वाट लावली आहे. सातारा वाई इथल्या एम आयडीसी पाहिल्या तर वाटते की उद्योजकानी केवळ मागील जन्माचे पाप फेडण्यासाठी उद्योग स्थापले आहेत. सातार्‍यात असलेले बरेच उद्योग तेथून स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आधारीत उद्योग हे डबघाईस आलेले आहेत. सातार्‍यात पथेजा फोर्जींग्स , परांजपे ऑटोकास्ट , डोबर्ग ब्रूअरीज हे उद्योग गायब झालेत. महाराष्ट्र स्कूटर्स चा कारखाना गेले वीस एक वर्षे उत्पादन बंद अवस्थेत आहे. तेथे पर्यायी अनेक उत्पादने निर्मान होऊ शकतात. मात्र स्थानीक अडमुठे नेतृत्व आणि त्यांची जी हुजुरी करणारे यांचे प्राबल्य असणारे यांची चलती असल्यामुळे विकासाच्या नावाने ठणाणाच आहे. अर्थात हा कोंग्रेस चा दोष आहे असे नाही. तेथले खासदार एकदा भाजपच्या नावावर निवडून आले होते. त्यानंतर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नावार निवडून येतात. आमदारानी नक्की काय केले हे त्याम्चे त्याना माहीत असेल तरीही खूप म्हणायचे. अर्थात मुख्य दोष आहे तो सातार्‍याच्या नागरीकांचा.

In reply to by विजुभाऊ

@विजुभाऊ - तसे बघायला गेले तर देशाच्या सर्वच प्रॉब्लेम साठी सर्व नागरीकच जबाबदार आहेत. तेच तर प्रत्येकवेळेला सरकार निवडुन देतात. माझ्या मते अति लोकशाही करण झाले आहे. काही चमत्कार झाला तरच ह्या देशाला भवितव्य आहे. आत्ता तरी मोदी हाच एक आशेचा कीरण आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

नाना, सातारच्या लोकांबद्दल सरसकटीकरण करण्याची ही तुमची दुसरी वेळ.. आता ह्या साताराबाहेरच्या व्यक्तीने लिहिलेल्या लेखावरची 'सातारच्या' लोकांच्या (म्हणजे आमच्यापण) प्रतिक्रिया वाचा. मग बोला. कुठल्याही बाबतीत सरसकटीकरण वाईटच. आणि मुजरे/दंडवत/चपला उचलणे अशी लाळघोटी कामे (आपल्या देशात तरी) पक्षनिरपेक्ष व स्थल-काल निरपेक्ष चालू असतात. सातारकरांना या बाबतीत 'निर्लज्ज' आणि 'बसा बोंबलत' म्हणायची गरज नाही आणि तुमची लायकीही नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

एम.आय.डी.सी. सारख्या ठिकाणी व्यवसाय करायला महाराष्ट्र सगळ्यात नालायक राज्य आहे. अरे उद्योजकाला किती नाडतात स्थानिक गुंड ते एकदा फिरुन बघा. साध्या भंगाराच्या कंत्राटावरुन पार खुन पडायच्या वेळा येतात.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

जर इतकी गुंडगिरी आहे तर या कंपन्या आल्याच कशा राज्यात ?एखाद्या ठिकाणी घडत असेलही प्रत्येक ठिकाणी नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

कंपन्या आधीपासुनच होत्या हो. पण PCMC बद्दल बोलायचे झाले तर सलग ३०+ वर्षे शरद पवार / एनसीपीचे वर्चस्व आहे या भागावर. मागच्या १० वर्षात जनरल मोटर्स, वोक्सवॅगन, जेसीबी वगैरे कंपन्या आल्यामुळे त्यांना पुरवठा करणार्‍या लघु-उद्योगांची गरज वाढली. कित्येक नविन वर्कशॉप्स उभे राहीले, जुने वर्क्शॉप्स अजुन वाढले. आधीपासुन सत्तेत असलेल्या एनसीपीने (त्यांचे नगरसेवक, कार्यकर्ते) युनियन बनवल्या. उद्या वर्कशॉप चालु करायचे तर सुरक्षारक्षक, सफाई कामगार यांचे घ्यायचे, ट्रान्स्पोर्टेशन ट्रक, क्रेन, ट्रेलर वगैरे यांचेच वापरायचे, भंगार हे सांगतील तिकडेच विकायचे. या सगळ्यात यांचे कमिशन. एखादी मोठी ऑर्डर आली तर सरळ टक्केवारीत कमिशन द्यायचे. या दादागिरीतुन जुने, मोठे वर्कशॉप्स टिकले मात्र ज्यांनी ७/८ वर्षापुर्वी मोठ्या हिम्मतीने आधीची नोकरी सोडुन नविन वर्कशॉप टाकले त्यातले बहुतांश बंद पडले. माझ्या ओळखीत दोन उदाहरणे आहेत. १०-१२ वर्षाची नोकरी झाली होती त्याची बचत धंद्यात टाकली सुरुवातीला बरा चालला पण नंतर या दादागिरीमुळे पैसे सुटेनासे झाले तरी आज्-उद्या ठीकठाक होईल म्हणुन १.५-२ वर्षे काढली मात्र शेवटी धंदा बंद करावा लागला, नविन नोकरीची मारामार आता दुसर्‍या वर्कशॉपमधे सुपरवायजरची कामे करतायत.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

हे कल्चर पवारने माजवले आहे, त्याचा काँग्रेसशी संबंध नाही. थोरली पाति काँग्रेसमध्ये असताना वरुन दट्ट्या आल्यानंतर सरळ व्हायची, आता पवार प्रा लि कंपनी असल्याने कोण बोलणार तिकडे? मुंबईतही जय भवानी जय शिवाजी टाक खंडणी 'वाले बंधुद्वयी प्रायवेट लीमीटेडच आहेत. यासाठीच राष्ट्रीय पक्षांना निवडून द्यायचे असते ,तिथे शिस्त असते.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

वर्कशॉप चालु करायचे तर सुरक्षारक्षक, सफाई कामगार यांचे घ्यायचे, ट्रान्स्पोर्टेशन ट्रक, क्रेन, ट्रेलर वगैरे यांचेच वापरायचे, भंगार हे सांगतील तिकडेच विकायचे. या सगळ्यात यांचे कमिशन. एखादी मोठी ऑर्डर आली तर सरळ टक्केवारीत कमिशन द्यायचे. ह्यात नक्कीच तथ्य असावे. माझ्या मित्राने नविन मुंबईत त्याचे स्वतःचे घर दुरुस्तीला काढले तर लोकल गुंडांनी त्याला हव्या असलेल्या कंत्राटदारास काम देण्यास, त्याला हवे असलेल्या ठिकाणाहून दुरुस्तीला आवश्यक सामान आणण्यास बळजबरी करून विरोध केला. प्रकरण मारामारी पर्यंत पोहोचलं. शेवटी मित्राला स्नायूबलापुढे नमतं घ्याव लागलं. भरपूर पैसे गेले आणि निकृष्ट काम गळ्यात आलं. अजूनही अश्रू ढाळतोय बिचारा.

In reply to by प्रभाकर पेठकर

मुंडे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी गुंडांवर एन्काऊंटर्ची कारवाई केलेली माहिती आहे. दुर्दैवाने ते आता नाहीत. या काँग्रेसच्या (रा.काँ. ही काँ. तर आहे!) किंवा शिवसेनेच्या गुंडांना संपवून टाकायची गरज निर्माण झाली आहे.

In reply to by काळा पहाड

काय धडधडीतखोटं सांगत आहात, ९३च्या बॉम्बब्लास्टनंतर शरद पवारांना काँग्रेसने मुख्यमंत्रीपदी पाठवले, शरद पवारांनी मुंबई पोलिस कमिशनर रिबेरो यांना सर्वाधिकार देऊन अंडरवर्ल्डचा कणा मोडला होता.

In reply to by नानासाहेब नेफळे

नेफळेसाहेब, काही दुवे देतोय आंतर्जालावरचे. १) The BJP-Shiv Sena government saw its credibility slipping as the 40,000-strong Mumbai Police watched helplessly. The then home minister Gopinath Munde gave the police a virtual carte blanche to eliminate the gangsters. In 1999, the police department recruited officers for their newlyformed CIU. Hard-nosed policemen with an extensive network of informants and a track record showing they were unafraid to pull the trigger were picked up. The CIUs eliminated gangsters in cold, extra-judicial killings. Select policemen were armed with sweeping powers, allowed to tap phones, given secret service funds to pay informants and rewarded with cash bounties ranging from Rs.1-15 lakh. Gangsters were abducted, detained and then shot in cold blood. Weapons were planted on their bodies. http://indiatoday.intoday.in/story/mumbai-encounter-specialists-killers… २) When he assumed office, among the first priorities was to improve the law and order scenario – and the department cracked the underworld's backbone. “There were several encounters in which criminals of various gangs – Dawood Ibrahim, Chhota Rajan, Arun Gawli and their splinter groups were killed and several arrested,” said an officer, who served in the Mumbai Police during that period. “There were allegations of human rights violations, but he always stood by the teams,” the officer added. http://www.sakaaltimes.com/NewsDetails.aspx?NewsId=5509317610950310437&… ३) As the then State Home Minister, Munde contributed in a big way in controlling organised crime in Mumbai. At a time when the metropolis came under the iron grip of the underworld, who thrived on handing extortion threats to moneyed people from different walks of life and killing those who failed to oblige them, Munde gave a free hand to “encounter-specialists” of the Mumbai police, who went virtually for the kill, eliminated scores of gangsters and broke the very back of the once-powerful underworld. http://www.dailypioneer.com/print.php?printFOR=storydetail&story_url_ke…

In reply to by नानासाहेब नेफळे

मोदींना हिशोब काय मागितला इतकी मिर्ची लागली की सगळी कडे तेच सांगत फिरत आहे मात्र हिशोब देत नाही काय जबरदस्त मिर्ची झोंबली

कॉंग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांनी केलेली टीका पहा. टीका कोण करताय यापेक्षा काय करत आहे या बाजूने पहा. '..पंतप्रधान मंत्रिमंडळाला गौण समजतात. केंद्रीय मंत्री नामधारी बनले आहेत. इतिहासात प्रथमच देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री नाही. अर्थमंत्र्यांना संरक्षण मंत्रालयाची हंगामी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मोदींनी आजवर एकदाही देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावलेली नाही.' मोदींना आम्ही पण लोकसभेत मत दिले होते मात्र गेल्या ४-५ महिन्यात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मोदींची मनोवृत्ती ही एकाधिकारशाहीची आहे. गुजरातमध्ये ते चालून गेले. राष्ट्रीय स्तरावर असेच करत राहिल्यास त्यांना अडचणी येतील. महाराष्ट्रात मोदी २५ सभा घेणार आहेत अगदी तासगाव, तुळजापूर अश्या तालुका ठिकाणी ते जाणार आहेत. एवढी अगतिकता कश्यासाठी तर नक्कीच मुंबई हे आर्थिक केंद्र आपल्या ताब्यात असावे. मुंबईत बसणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्या ऐकण्यातला असावा हेच असू शकते.राज ठाकरे म्हणतात तसे राज्य भाजपचा एकही नेता उद्या मुख्यमंत्री झाल्यास मोदींना उलट प्रश्न विचारू शकणार नाही. मोदी- शहांसमोर बोलण्याची तावडे/ खडसे /देवेंद्र यांची छाती होईल का? मुंडे असते तर गोष्ट वेगळी होती. उद्या महाराष्ट्रावर अन्याय होत असता ते उठून बोलले असते आता तशी स्थिती नाही.अशोक चव्हाण, पृथ्वीराज यांना महामंडल नियुक्त्या, राज्यमंत्री नेमणे यासाठी दिल्लीत ४-४ चक्र माराव्या लागायच्या. सत्ता परिवर्तन होवूनही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीश्वरांच्या हातचे बाहुले ही परिस्थिती राहायला नको. महाराष्ट्रात लोक विधानसभेला स्थानिक मुद्दे पाहूनच मत देतात. आघाडी नको तर लोकांना शिवसेना तर काही ठिकाणी मनसे हा पर्याय जास्त जवळच वाटू शकतो.

भाजपाच्या गृहमंत्र्यांनी मुक्ताफळे उधळली आहेत. पाकिस्तानाला दम देताना बोलले की

"पांढरे निशाण फडकवायला"

आधीचे सरकार नाही. आता पांढरे निशान म्हणजे शरणागती. भारताने कधी पाकिस्तानापुढे शरणागती पत्करली ??? अरे राजनाथासाहेब याच काँग्रेस ने पाकिस्तानाचे दोन तुकडे केले होते. हे विसरतात का ? तुमच्यासारखे अतिरेक्यांना सोडुन नाही आले होते. उपमा द्यायला पण येत नाही म्हणे हे गृहमंत्री

In reply to by उदयन

संपुर्ण कॅबिनेट मोदींच्या दहशतीखाली आहे, अगदी राजनाथसुद्धा. इतका स्वार्थी पंतप्रधान देशाने पाहिला नव्हता.

In reply to by नानासाहेब नेफळे

अगदी अगदी खर्र्र्र बोल्लात....अगदी शु ला जायचं असलं तरी सोडत नाहीत म्हणे मोदीगुर्जी....कमीत कमी दरारा असणारा तरी पी.एम. आहे आमच्याकडे. कळसुत्री नाही.

मै "हरियाणा" को नंबर १ बनाउंगा ...!! मै "महाराष्ट्र" को नंबर १ बनाउंगा ...!!
कधी दोन राज्य एकाच नंबरवर असु शकतात का ?

In reply to by उदयन

मोदी म्हणणार की नंबर एक पोझिशनवरुन हरीयाणा व महाराष्ट्रात भांडण नको, त्यापेक्षा मध्यममार्ग म्हणुन मी गुजरातचा विकास करतो.

अर्थमंत्री अरुण जेटली आजारी असल्याच्या बातम्या गेले काही दिवस येत आहेत. आपल्याकडचा संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त भार हंगामी असून लवकरच नवीन संरक्षण मंत्री नेमला जाइल असे ते ४ महिन्यापूर्वी म्हणाले होते मात्र अजून कुणाची नेमणूक झाली नाही. अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार ही अति महत्वाची खाती असतात. कॅबिनेट कोर कमिटीमध्ये या चार खात्याचे मंत्री असतात.आपल्या ऐकण्यातला संरक्षण मंत्रीपदाचा दावेदार मिळत नसल्याने मोदी पूर्ण वेळ संरक्षण मंत्री नेमत नाहीत असे दिसतेय. पण अशी परिस्थिती चांगली नक्कीच नाही. पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष पण आपल्या ऐकण्यातलाच हवा यासाठी अमित शहांची पार्श्वभूमी, सध्या प्रलंबित असलेले गुन्हे याकडे पण डोळे झाक केली आहे. सत्ताधारी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हा त्याच्याच गुजरातमधून तडीपार केलेला आहे.सगळ्या महत्वाच्या पदावर आपले पित्तू बसवण्याचा हा मोदींचा अट्टाहास चांगला नाही.'सबका साथ सबका विकास' वगैरे नुसत्या गप्पा आहेत.

भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मनसेतून आयात उमेदवार केलेले आहेत काँग्रेसचे १६, राष्ट्रवादीचे २०, शिवसेनेचे ९, मनसेचे २, शेतकरी संघटनेचा १, अपक्ष २ व समता परिषदेच्या एकाचा समावेश आहे. गेली १५ वर्षे महाराष्ट्र खड्ड्यात घालणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनाच भाजपने प्रवेश देऊन तत्काळ उमेदवारी का दिली भाजपचे स्वतःचे असे काय उरले आहे आता. त्याना सगळ्या ठिकाणी उभे करायला स्वतःचे असे उमेदवार देखील मिळत नाहीत. भाजपच्या आयात उमेदवारांची यादी उमेदवार मतदारसंघ आधीचा पक्ष मनोहर बडने धुळे ग्रामीण काँग्रेस सुनील देशमुख अमरावती काँग्रेस समीर मेघे हिंगणा काँग्रेस माधवराव किन्हाळकर भोकर काँग्रेस आनंद भरोसे परभणी काँग्रेस शिवाजीराव नाईक शिराळा काँग्रेस अजित घोरपडे तासगाव काँग्रेस प्रशांत ठाकूर पनवेल काँग्रेस राजन तेली सावंतवाडी काँग्रेस संजय दुधगावकर उस्मानाबाद काँग्रेस शैलेश लाहोटी लातूर काँग्रेस माणिकराव कोकाटे सिन्नर काँग्रेस बाळासाहेब मुरकुटे नेवासा काँग्रेस भाऊसाहेब वाकचौरे श्रीरामपूर काँग्रेस विलासराव खरात घनसावंगी काँग्रेस अमोल महाडिक कोल्हापूर दक्षिण काँग्रेस अभय नगरकर नगर राष्ट्रवादी विजयकुमार गावित नंदुरबार राष्ट्रवादी संजय सावकारे भुसावळ राष्ट्रवादी योगेंद्र गोडे बुलढाणा राष्ट्रवादी किसन कथोरे मुरबाड राष्ट्रवादी मंदा म्हात्रे बेलापूर राष्ट्रवादी लक्ष्मण जगताप चिंचवड राष्ट्रवादी बबन पाचपुते श्रीगोंदा राष्ट्रवादी शरद बुट्टे पाटील खेड राष्ट्रवादी राहुल कुल दौंड राष्ट्रवादी प्रताप चिखलीकर कंधार राष्ट्रवादी स्नेहलता कोल्हे कोपरगाव राष्ट्रवादी भीमराव धोंडे आष्टी राष्ट्रवादी मोनिका राजळे पाथर्डी राष्ट्रवादी जगदीश वळवी चोपडा राष्ट्रवादी शिवाजी कर्डिले राहुरी राष्ट्रवादी राजेंद्र पिपाडा राहाता राष्ट्रवादी अद्वय हिरे नांदगाव राष्ट्रवादी अरविंद चव्हाण जालना राष्ट्रवादी रामदास सदाफुले देवळाली राष्ट्रवादी भगवान बोरस्ते निफाड शिवसेना किशनचंद तनवाणी औरंगाबाद मध्य शिवसेना बाबासाहेब तांबे पारनेर शिवसेना विनायक हिवाळे पैठण शिवसेना शरद ढमाले भोर शिवसेना नेताजी डोके जुन्नर शिवसेना जयसिंग एरंडे आंबेगाव शिवसेना चंद्रकांत खाडे इगतपुरी शिवसेना दिलीप कुंदकर्ते नांदेड दक्षिण शिवसेना संगीता राजे निंबाळकर पुरंदर मनसे राम कदम घाटकोपर पश्चिम मनसे संजय गव्हाणे कन्नड समता परिषद प्रशांत बंब गंगापूर अपक्ष अनिल गोटे धुळे शेतकरी संघटना शिवाजी मानकर येवला मागील वेळी अपक्ष उमेदवार

In reply to by विजुभाऊ

>>> भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मनसेतून आयात उमेदवार केलेले आहेत जो पक्ष निवडून यायची सर्वात जास्त शक्यता तिकडेच आयात होणार ना? बादवे, इतर पक्षाने आयात केलेल्यांची सुद्धा नावे दिलीत तर बरे होईल. उदा. पुण्यात कसब्यातून राकाँचा उमेदवार दीपक मानकर आहे. तो कुठून आयात केला. पर्वतीत शिवसेनेने सचिन तावरेला कोठून आयात केले? कोकणात दीपक केसरकरला शिवसेनेने कोठून आयात केले?

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही तुमच्या आवडत्या पक्षाबद्दल तर बोला मास्तुरे उगाच बगल देऊ नका जुनीच सवय आहे म्हणा तुमची काय अपेक्षा करावी

पंकजा मुंढे ला एका मुलाखतीत बघितले होते ... तोंडात च्विंगम चघळत एखाद्या भाईच्या आवेशात उत्तरं देत होती ... पोकळ अतिआत्मविश्वास ठासून दिसत होता .. असले नेते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार ??? अर्रे कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा ???

मुळात याआधी भक्तजन गुजरातचे जे आकडे द्यायचे तेच फुगवून सांगितलेले असायचे हे एव्हाना सिद्ध झाले आहे. गुजरातपेक्षा महाराष्ट्र, तामिळनाडू ही राज्ये बर्याच (चांगल्या) बाबतीत पुढे आहे.

In reply to by दुश्यन्त

>>> मुळात याआधी भक्तजन गुजरातचे जे आकडे द्यायचे तेच फुगवून सांगितलेले असायचे हे एव्हाना सिद्ध झाले आहे. हे कधी सिद्ध झाले?

In reply to by श्रीगुरुजी

हरियाणाचा 8 वा नंबर कोणी सांगितले? तुमच्याच प्रधानसेवकाने आकडे खोटे सांगितले हाच पुरावा आहे अजून काय पुरावा हवा ;)

इतर राजकीय पक्षांनी किमान त्यांचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तरी घोषित केले आहेत. भाजपावाल्यांचे काय? जसे लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणुन आधीच घोषित केले होते तसे महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडणुकीअगोदर घोषित करायला का घाबरत आहेत हे भाजपावाले? त्यांच्यातच एकमत नाही आहे. मुंडे यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राचे नेतृत्व करू शकणारा कोणीही नेताच भाजपाकडे नाही आहे. म्हणुन तर विधानसभा निवडणुक प्रचारासाठी देशाच्या पंतप्रधानाला यायची गरज वाटते. दिल्लीमधुन केंद्रीय नेतृत्व सांगेल त्याला/तिला मुख्यमंत्री बनवणार हा कुठला न्याय? आधीचा मुख्यमंत्री दिल्लीमधुन पाठवलेला होता. यावेळीही भाजपाचा दिल्लीमध्ये ठरलेला उमेदवार मुख्यमंत्री म्हणुन आला तर गेल्यावेळी प्रमाणे तो/ती प्रत्येक लहानसहान गोष्टीसाठी दिल्लीच्या वाऱ्या करणार. दिल्लीमधुन आलेल्याला जर प्रत्येक गोष्टीसाठी तिकडे धाव घ्यायला लागत असेल तर काय करायचा आहे तो दिल्लीतला मुख्यमंत्री? मग काय बदल झाला महाराष्टात?

In reply to by श्रीगुरुजी

वृत्ती गेली नाही अजुन ? भाजपाचा विचारला तर आधी उत्तर द्या मग प्रश्न विचारा. उत्तर न देताच प्रश्न विचारुन पळुन काय जातात

In reply to by उदयन

अर्रे. बाकीच्यांनी जाहीर केला पण भाजपाने नाही केला म्हणून गळा काढता आहात ना? मग द्या की उत्तर, कोणी कोणी जाहीर केला काँग्रेसशिवाय?

In reply to by उदयन

अर्रे डिफरंट आहे म्हणुन केवळ त्यांनीच उमेद्वार जाहीर करायचा? पार्टी विथ डिफ्रन्स म्हणजे काय हेच तुम्हाला कळालेले नाही हाच मुख्य लोच्या आहे. असो. अभ्यास वाढवा.

In reply to by मृत्युन्जय

नीरो च्या पार्टी बद्दल काय समजायचे आहे तिथे भारतीयांवर गोळीबार होत आहे आणि हे प्रचार करत आहे ना काळजी ना खंत.... निर्लज्जपणा तो हाच आहे

In reply to by प्रदीप

आधीच्या सरकारांमधे पण होत होते पण धडा शिकवायची भाषा करणारे स्वतः काय करत आहे वेगळे ते सांगा आर्मी स्वतः कामगिरी चोखच बजावत असते

In reply to by उदयन

तुम्ही प्रथम लिहीलेतः "तिथे भारतीयांवर गोळीबार होत आहे आणि हे प्रचार करत आहे ना काळजी ना खंत.... निर्लज्जपणा तो हाच आहे" आता ह्या दुव्यांवरून असे दिसते की भारतही चोख प्रतिसाद देत आहे. विशेषतः हे पहा: "The Narendra Modi government on Tuesday directed the Border Security Force (BSF) and the Indian Army not to seek a flag meeting with Pakistan on the international border that has witnessed heavy firing in the last two days." एका विशीष्ट पातळीपलिकडील निर्णय सरकार घेते, आर्मी नव्हे. ते इथे घेतले गेलेले दिसतात. अगोदरची सरकारे काय करत होती, हा प्रश्न नाही, तुमचा आरोप सध्याचे मोदी सरकार ह्या बाबतीत काहीही करत नाही, असा आहे. आता अर्थात, moving goalposts च्या न्यायाने, तुम्ही मोदींनी स्वतःच सीमेवर जावयास पाहिजे होते, असे म्हटलेत, तर pass!

In reply to by प्रदीप

लोकसभेच्या प्रचारात 56 इंचची छाती दाखवून पाकिस्तान ला ललकारणारे आता प्रचारात एक अक्षर बोलत नाही यावरून दिसते कि लोकसभेत मारलेल्या फुशारक्या होत्या काँग्रेसच्या 10 वर्षात जितके उल्लंघन केले असेल तितके या 6 महिन्यांतच झाले म्हणे भारताचा डंका बाजवला ;) आताचा प्रधानसेवक फक्त बोलूच शकतो करू काहीच शकत नाही हे जगाला कळले

In reply to by उदयन

म्हणजे सरकारने प्रत्यक्ष कृती केली, ते पुरेसे नाही. आता, तुमची (सरकलेली) अपेक्षा ही की मोदींनी त्यांच्या महाराष्ट्र व हरीयाणा येथील विधानसभांच्या निवडणूकांच्या प्रचारधुमाळीच्या दरम्यान ह्या मुद्द्यावरून डरकाळ्या फोडल्या पाहिजेत! ते इथे कमी पडले हे खरे :) बाकी, त्यांनी प्रत्यक्ष तिथे जाऊन रणधुमाळीत भाग घेतला पाहिजे, असे (सध्यातरी) न म्हटल्याबद्दल (सध्यातरी) तुमचे कौतुकच केले पाहिजे!

In reply to by प्रदीप

नाही सरकारने स्वतः जाउन त्यात मोदींनी स्वतः बंदूक हातात घेउन सीमेवर जाउन लढावे आणि लाहोर, कराची, इस्लामाबाद आणि पेशावर मध्ये स्वतः जाउन गाढ्वाचा नांगर फिरवावा आणि भुट्टॉ आणि शरीफला बैलगाडीला जुंपुन दिल्लीला घेउन यावे अशी अपेक्षा आहे,

In reply to by मृत्युन्जय

बंदूक? कुठल्या काळात वावरताय? मोदींनी वाघनखे घेऊन पाकड्यांचा कोथळा बाहेर काढावा, पाकड्यांना मातीत गाडावे, गेलाबाजार त्यांची बोटे तरी तोडावी, निदान त्यांच्या मस्तवाल जिभा तरी छाटाव्यात ... मोदींनी पाकड्यांवर अशा तर्‍हेची २१ व्या शतकातील कारवाई करावी. बंदूक वापरणे म्हणजे १७ व्या शतकात वावरण्यासारखे आहे. जरा २१ व्या शतकात या हो.

In reply to by श्रीगुरुजी

खरंय !बंदुकीच्या कॅलिबरऐवजी व फायरींग रेट ऐवजी पहाडी छाती ,५६ इंच अशा गप्पा देखिल माराव्यात.

In reply to by नानासाहेब नेफळे

बरोबर. पण कोणी अशा गप्पा माराव्यात. त्यांच्या छातीच्या घेराची इतरांनाच जास्त काळजी लागलेली दिसतेय.

In reply to by मृत्युन्जय

प्रतिकारवाई सुरू झालेली दिसतेय. http://maharashtratimes.indiatimes.com/nation/pakistan-targets-bsf-post… पंतप्रधान मोदींची मैत्री झिडकारुन वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय नागरिक आणि सैनिकांना लक्ष्य गोळीबार करणा-या पाकिस्तानच्या बंदुका आणि तोफांचा आवाज बंद करण्याचा निर्णय केंद्रातल्या मोदी सरकारने घेतला आहे. पाकिस्तानचा गोळीबार पूर्णपणे थांबेपर्यंत प्रत्युत्तर देण्याचे स्पष्ट आदेश भारतीय सैन्याला देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या हल्ल्याला कोणत्या भागात किती प्रमाणात प्रत्युत्तर द्यायचे याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य सैन्याला देण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून हिरवा कंदिल मिळताच भारतीय सैन्याने पाकचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकने रविवारपासून गोळीबाराचे प्रमाण एकदम वाढवले आहे. मागील बारा वर्षात झाला नाही एवढा गोळीबार आणि मॉर्टरचा मारा पाकने सुरू केला आहे. पाकच्या या हल्ल्याला मंगळवारी रात्री भारताने तीव्र प्रत्युत्तर दिले. भारताने पाकच्या ३७ चौक्या आणि आसपासच्या भागात गोळीबार केला. भारताने दिलेल्या प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानमध्ये सियालकोट भागात १५ जण ठार आणि ३० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. याआधी पाकिस्तानच्या रेंजरनी सीमा सुरक्षा दलाच्या ६३ चौक्या आणि २५ गावांना थेट लक्ष्य करुन गोळीबार केला तसेच मॉर्टरचा मारा सुरू केला. पाकच्या हल्ल्यात सतरा नागरिक आणि सीमा सुरक्षा दलाचे तीन सैनिक जखमी झाले तसेच ५५ वर्षाच्या एका महिलेचा मृत्यू झाला. याआधी भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ (लष्कराचे महासंचालक) पातळीवर तब्बल आठ मिनिटे चर्चा झाली पण तोडगा निघाला. या चर्चेत दोन्ही डीजीएमओंनी परस्परांवर गंभीर आरोप केले. अखेर पाकच्या कारवाया बंद होईपर्यंत गोळीबार करा, असा स्पष्ट आदेश केंद्राकडून सैन्य दलांना आला आणि त्याचे लगेच पालन करण्यात आले.

In reply to by श्रीगुरुजी

हेच मोदी तीन महीन्यापुर्वी नवाज शरीफच्या आईला साडी पाठवत होते, कालपर्यंत पाकिस्तानला मिठाई पाठवत होते. यांच्या हे लक्षातही आले नाही कि आपला शेजारी किती घातक मनसुबे रचतोय! हे म्हणे कणखर देश बनवणार आहेत, इतका बाळबोध पंतप्रधान देशाने आजपर्यँत पाहिला नव्हता. मनमोहन सिंग यांनी या पाकड्यांशी लाळघोटेपणा कधीच केला नव्हता, अतिरेकी कारवाया थांबवा चर्चा करतो असे ठणकावले होते.

In reply to by नानासाहेब नेफळे

खिक्क. आणि २०, ५०, १०० ची यादी आणि निषेध खलिते पाठव्ले होते. आणि ते ही काम इतके धेडगुजरीपणाने केले होते की त्यातले काही लोक नंतर बर्‍याच काळापासुन भारतीय तुरुंगातच सापडले. मनमोहन सिंगांनी कोणाला ठणकावले तरी ते मजा करताहेत असे वाटत असेल. त्यांना काय डोंबलाचे ठणकावले? बादवे हिंदी पाकी भाई भाई असे नारे तर नाही ना दिले मोदींनी. नवाझ शरीफांना एनडीएत नेउन स्वतःची तयारी किती तोकडी आहे हे तरी नाही ना सांगितले?

In reply to by मृत्युन्जय

खरंय! बहुधा ५६ इंच छातीवाले पाकड्यांना मिठाया पाठवुन त्यांना डायबेटीक करणार, मग ते पाकडे डायबेटीसने मरणार!!! काय जबरी प्लान आहे! ५६ इंच छातीच्यावरती यांना डोकेही आहे तर! इतका कुटनितीने वागणारा पीएम देशाने कधीच पाहिला नव्हता. :lol:

In reply to by नानासाहेब नेफळे

मिठाई वाटणे ही लष्कराची परंपरा आहे. त्यासाठी ते सरकारची परवानगी घेत नाहित. बाकी छाती च्या वरच्या भागावर डोके असणारा पंतप्रधाना आहे हे बरे आहे. गुडघ्यात असणारा नाही हे उत्तम.