(सदरील मुळ लेख ईंग्रजीत असुन भाषांतराच्या चुका असु शकतात)
काल मित्राने डॉ. झाकिर नाईक व श्री श्री रविशंकर यांच्यात झालेल्या चर्चेचा विडीओ दिला. सदर कार्यक्रम पाहिल्यवर माझ्या मनात उठलेले विचार... कार्यक्रमाचा विषय होता: “the conecpt of god in Hinduism and Islam in the light of the sacred scriptures.”
पहिली गोष्ट जी माझ्या मनात आली ती कोणत्याही व्यक्तीच्या मनात येईल ती म्हणजे डॉ. झाकिर नाईक यांची स्मरणशक्ती. कमाल आहे राव ! त्या टोपीखाली एवढा डेटा साठवन्याची. हे व्हिडीओ पहान्याच्या अगोदरच मी ठरवलं होत कि - शक्य तितकं नि:पक्षपाती राहुन व्हिडीओ पहायचे. न की एक हिंदु म्हणुन.जरी मी या दोन्ही व्यक्तींबद्दल थोडफार वाचलेलं असल तरी या दोघांबद्दल विशेष माहिती नव्हती म्हणुन मला वाटते कि मी नि:पक्षपाती राहुन व्हिडीओ पाहु शकलो( नसता पाहु पण शकलो नसतो. :) )
विषयात शिरण्याच्या अगोदर काही विचारात घेतल्या पाहिजेत जसेकी...
१) हा कार्यक्रम डॉ. झाकिर नाईक यांनी आयोजीत केला होता.
२) कमीत कमी ८०% प्रेक्षक मुस्लीम होते.
३) १००% प्रश्नकर्ते मुस्लीम होते.
४) मध्यस्थी करणारी व्यक्ती मुस्लीम होती.
वर नमूद केल्याप्रमाणे जसा व्हिडीओ चालु केला तसा मी स्तब्ध झालो डॉ. झाकिर नाईक यांची स्मरणशक्ती पाहुन. या व्यक्तीने याचा मेंदु तपासला तर निश्चीत हार्ड डिस्क सापडतील.( ALU सापडणे जरा अवघड आहे.) एकदा श्री श्री यांनी मान्य केल की त्यांच्या पुस्तकात चुका आहेत. त्यांनी ते पुस्तक वेगळ्या परिस्थीत वेगळ्या उद्देशाने लिहीले होते. तर परत परत डॉ. झाकिर नाईक यांनी त्या पुस्तकावरुन छेडायला नको होतं.
डॉ. झाकिर नाईक तेथे ईस्लाम वाढवण्याच्या उद्देशाने आले होते, वादविवाद करायला आले होते, श्री श्री यांना मुस्लीम बनवन्यासाठी आले होते. त्यांनी बरेचदा तसं सुचवलं देखील.पण श्री श्री तेथे आले होते कारण त्यांना हिंदु- मुस्लीम ऐक्य करायची ईच्छा होती. हा त्या दोघांमधल्या उद्देशात असलेला फरक होता.
डॉ. झाकिर नाईक यांच जे पहिले भाषण झालं त्यात त्यांनी त्यांच्या पाठांतराने व बोलन्याच्या शैलीने उपस्थितांना प्रभावित केले. त्यांनी त्यांचा "पंडीतपणाने " अक्षरशः मंत्रमुग्ध केले. श्री श्री यांनी आपल्या भाषणाची सुरुवात कबीराच्या एका दोह्याने केली-
पोथी पोथी जग मुवा | पंडीत भया न कोई ||
ढाई अखर प्रेम के | पढे सो पंडीत होई ||
या एकाच दोह्याने डॉ. झाकिर नाईक यांच्या संपुर्ण भाषणाची हवाच काढुन घेतली. पण असे वाटते की पुणेरी जोडा कळायलापण काही पात्रता लागते. पुढे पण डॉ. झाकिर नाईक त्यांचा पंडितपणा दाखवतच होते. मला असे वाटते की श्री श्री सहसा जास्त बोलत नसावेत पण जेवढे बोलले ते पुरेसे होते.
डॉ. झाकिर नाईक जेव्हा दुसर्यांदा बोलायला उभे टाकले तेव्हा त्यांनी लव या शब्दाचा विपर्यास करुन बराच हशा मिळवला. जे की केवळ पोरकटपणाचं वाटत होतं. मुलाचं आणि वडिलांच उदाहरण केवळ पोरकटपणा , टवाळखोरपणा दाखवित होते. श्री श्रींना दुस-या भाषणास पुरेसा वेळ मिळाला नाही. पण त्यांनीपण सदरील मुलाचेच उदाहरण देउन दोन पाउल खालिच उतरले होते. जेव्हा तुम्ही कमी पात्रतेच्या व्यक्तीबरोबर वादविवाद करतात तेव्हा ते तुम्हाला त्यांच्या पातळीवर खेचुन नेतात हेच खरे.
त्यानंतर प्रश्न- उत्तराचा वेळ होता. सर्व प्रश्नकर्ते एकतर विकत घेतलेले वाटत होते अथवा डॉ. झाकिर नाईक यांचे भक्त वाटत होते. वर बावळटपणाचे प्रदर्शन करणारे प्रश्न विचारीत होते.
एक गोष्ट पुर्ण कार्यक्रमात लक्षात येत होती की श्री श्री पुर्ण कार्यक्रम होईपर्यंत दुस-या धर्माचा आदर वगैरे विषय बोलत होते तर डॉ. झाकिर नाईक एकच धर्म वगैरे वगैरे. श्री श्री तेथे काही तरी चांगला संदेश लोकापर्यंत पोचावा अश्या उद्देशाने आल्यासारखे दिसत होते तर डॉ. झाकिर नाईक फक्त वादविवाद करन्यासाठी. असं वाटत होतं की डॉ. झाकिर नाईक यांच्या साठी श्री श्रींची विचार करन्याची पद्धत खुप उच्च होती.
डॉ. झाकिर नाईक संस्क्रुत ग्रंथाचा श्लोक पान नंबर सहीत सांगुन असे दाखवत होते की त्यांना खुप ज्ञान आहे पण मला असे वाटते कि नुसते पाठांतर म्हणजे ज्ञान नव्हे. त्यांना वाटत असेल की त्यांनी हिंदु धर्मग्रंथांचा पुष्कळ अभ्यास केला पण डॉ. झाकिर नाईकच काय पण कुणालाही हिंदु धर्मग्रंथांचा संपुर्ण अभ्यास करणे अतिशय अवघड आहे. किंबहुना जवळजवळ अशक्य आहे.डॉ. झाकिर नाईक यांनी तिथे हिंदु धर्मग्रंथापैकी बरेच ग्रंथ दाखवले. पण ते केवळ हिंदु साहित्याचा एक छोटा भाग होता. विकिपेडीयाच्या संदर्भावरुन सांगु ईच्छीतो कि केवळ ॠग्वेद हा १० ग्रंथात आहे. असे चार वेद, उपनिषदे, आरण्यके, पुराण, सुक्त , स्म्रुती इत्यादी सोडुन द्या माझ्या आवडीचं फक्त महाभारत जरी घेतलं तरी विकिपेडीयाच्या संदर्भानुसार सर्वात मोठी ज्ञात कविता आहे. ज्यात १००,००० श्लोक आहेत. आणी भगवत गीता जे की या महाभारताचा छोटासा भाग आहे ज्यावर लोकमान्य टिळक, विनोबा भावे , पांडुरंग शास्त्रि आठवले यांसारख्या कित्येक विभूतींनी जिवन समर्पीत केली आहेत . आणि हि व्यक्ती असे भासवते की तिचा हिंदु साहित्याचा अभ्यास झाला. माझ्या मित्रा एक जिवन अपुर्ण आहे केवळ महाभारताचा अभ्यास करायला. बाकी तर दे सोडुन. फक्त पाठांतर म्हणजे ज्ञान मिळवणे नाही. चिंतन मनन केल्याशिवाय त्या विषया संदर्भातले ज्ञान मिळनार नाही. ज्याप्रमाने स्पंज पाणी शोषुन घेते त्याप्रमाणे ज्ञान मिळाले पाहिजे. हिंदु संस्क्रुती म्हणजे समुद्रावरचा हिमनग होय. वर उभ राहुन आकाराचा अंदाजच येउ शकत नाही.
हिंदु धर्मात प्रार्थनेच्या विविध पद्धती आहेत , सगुणवाद, निर्गुणवाद इत्यादी ईतकेच काय तर चार्वाक सारखा वेगळा मतप्रवाह पण हिंदुने त्यागला नाही. हिंदु धर्म म्हणजे पुर्णत्व- ज्याला जसा समजतो तसा घ्या . परंतु कुणिच पुर्ण घेउ शकत नाही कारण पुर्णातुन पुर्ण काढलं तरी पूर्ण उरणारच(पुर्णात पुर्ण मुदच्युते) डॉ. झाकिर नाईक यांनी सांगितले त्याप्रमाणे हिंदु व मुस्लीमांमध्ये काही साम्यता असु शकते नव्हे आहेच कारण - विश्व संच (Universal set) आणी उपसंच (subset) मध्ये काही तरी समानता असनारच ना ?
मी मान्य करतो की डॉ. झाकिर नाईक यांना मिळालेली प्रतीभा ही दैवी आहे. पण त्यांनी ती केवळ ईस्लामच्या वाढीसाठी न वापरता संपुर्ण मानवजातीच्या प्रगतीसाठी वापरली पाहिजे.
हे मान्य कराव लागेल कि डॉ. झाकिर नाईक यांच्या विचारात ब-याच चुकिच्या गोष्टी वाटतात(contradiction). आहेत जसेकी ईस्लाम हा पैगंबरच्या अगोदर होता वगैरे. त्यांच्या तर्कामध्ये पण बरेच गोष्टी चुकीच्या वाटतात जसे़की हिंदु धर्मामध्ये पैगंबराबद्दल लिहिलेल आहे वगैरे ( जे पुस्तक त्यांच्या जन्माच्या बरेच अगोदर लिहिल्या गेलं त्या पुस्तकात त्यांच्या बद्दल उल्लेख कसा असु शकतो) द्या सोडुन मला ईथे फक्त वादविवादासाठी वादविवाद करायचा नाही. मला असा म्ह्णायचय की ईतक्या प्रमाणात धर्मग्रंथाचे वाचन केल्यावर सुद्धा तुम्ही धर्माच्या वर उठुन विचार करु शकत नाही तर काय फायदा ? ईतके वाचन करुन पण तुम्ही दुस-या धर्माचा आदर करु शकत नाहीत, दुस-या धर्माचा व्यक्तिंना स्वत:च्या धर्मात खेचु ईच्छीतात तर काय फायदा ?
ईतका अभ्यास झाल्यानंतर तुम्ही केवळ ज्ञानाच्या शोधात, ख-या ज्ञानाच्या शोधात असाल.
वाचने
7203
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही इलेक्ट्रॉनिक्समधून
इलेक्ट्रॉनिक्स नाही . पण
In reply to तुम्ही इलेक्ट्रॉनिक्समधून by धन्या
हम्म
धन्यवाद...
In reply to हम्म by पैसा
डॉ. झाकिर नाईक....
G O D
उगा काहितरीच.
इथे त्या विडिओची लिंक द्याल का?
माफ करा मला PD मध्ये भेटले
In reply to इथे त्या विडिओची लिंक द्याल का? by संजय क्षीरसागर
एकतोय, ही घ्या लिंक, ते रविशंकरजींचं उत्तर आहे
काय वाटलं ऐकल्यानंतर ?
In reply to एकतोय, ही घ्या लिंक, ते रविशंकरजींचं उत्तर आहे by संजय क्षीरसागर
ह्या नाईक नावाच्या माणसाला
तो शब्द आहे "अह्ले किताब" -
In reply to ह्या नाईक नावाच्या माणसाला by निनाद मुक्काम …
@नाव आडनाव
मिपावरील जुनाच लोकप्रिय विषय.
धन्यवाद
In reply to मिपावरील जुनाच लोकप्रिय विषय. by एस
@मी मान्य करतो की डॉ. झाकिर
असल्या मुर्ख विधानांवर चर्चा
सहमत
In reply to असल्या मुर्ख विधानांवर चर्चा by रामपुरी
>>> बाकी वर एका प्रतिसादात
बरोबर
In reply to >>> बाकी वर एका प्रतिसादात by श्रीगुरुजी
विचार आवडले
धन्यवाद ...
In reply to विचार आवडले by श्रीरंग_जोशी
एकदा झाकिर भौन्नी
(No subject)
In reply to एकदा झाकिर भौन्नी by काउबॉय
काउबॉय!
In reply to एकदा झाकिर भौन्नी by काउबॉय
तुमचा लोकांना सर्व शिकवायचा उत्साह मी समजू शकतो
In reply to काउबॉय! by संजय क्षीरसागर
तुमच्या विरोधाभासामुळे उत्तर लिहिण्याची संधी मिळाली
In reply to तुमचा लोकांना सर्व शिकवायचा उत्साह मी समजू शकतो by काउबॉय
पोथी पोथी जग मुवा | पंडीत
In reply to तुमच्या विरोधाभासामुळे उत्तर लिहिण्याची संधी मिळाली by संजय क्षीरसागर
पण अशाने त्यांना वाटते कि लोक
झकीर नाईक हा तद्दन फालतु
कोण झाकीर नाईक? धन्यवाद.
+७८६
In reply to कोण झाकीर नाईक? धन्यवाद. by शिद
विद्वत्तेचा मुलामा
पोथी पोथी जग मुवा | पंडीत भया
विद्या विवादाय धनं मदाय,
श्री.श्री मधे पिपंरी चिंचवड