शब्द छटा - खडा भाग १
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मित्रांनो,
टाईम पास चा हा विरंगुळा!
घाला भर शब्दांची, अर्थ होऊ द्या खुळा!!
खडा
भाताचा घास तोंडात जातो तोच गालावर हात ठेवून चेहरा रागिट झालेला पाहिला की समजावे, 'खडा' लागला आहे!
कधी कधी तरूणींच्या डोळ्यांची फडफड पाहिली की तरुणांना 'खडा ' टाकायची हुक्की येते.
ज्वेलरीच्या दुकानातून 'खडा' ऐटीत अंगठीत खुलताना दिसतो.
दगडाचा छोटा कठीण तुकडा अनेक छटांनी सामोरा येतो. त्याला 'खडू' केला की सानेगुरूजींसारखा मवाळ होऊन होऊन सर्वांग झिजवत फळ्यावर जीव देतो.
ख नंतर 'ड' ला डा डकवला तर इतरांसाठी खणलेल्या खाईत कधी कधी आपल्याला कपाळ मोक्ष घडतो.
डी केले तर तोंड गोड करायची शर्करा मुखी येते.
पारशी बाबाजी मुंबईत उभा खडा राहीला आहे.
ख ला खा चा खो दिला तर कामाची गैरहजेरी सामोरी येते.
खा पुढे डी समुद्राशी सलगी करते.
खु शी डा ने जमवून घेतले तर फुलावर आफत येऊन झाडाशी नाते संपते.
डा मागे खो केले तर अडकाठी करून पडायची भिती वाटते.
अशी ही खड्याची शब्दार्थ छटा!
प्रतिक्रिया
म्हटलं "खडा" टाकून पहावा
नाक्यावरची खमंग आणि लज्जतदार खड़ा पावभाजी
सुनवा
+१११
उद्धवजींच्या खड्या बोलांचा परिणाम?
सगळ्यांची
खडाजंगी.
खंडा
खडांखडा.
सुंदर भर
निवडणुकको खड़ा हय वोह