ज्या सदस्याने उपक्रमावर प्रस्ताव टाकला तो सदस्य एरवी कणभरही तिथे आपला सहभाग दाखवत नाही. मात्र असली खुसपटे काढून वाद उकरण्यास तयार. यालाच धार्मिक कृत्यांच्या संदर्भात अपसव्यकृत्ये म्हणतात. या लोकांना मी , स्वतः , आपण , अस्मादिक यापलिकडचे क्षितीज दिसत नाही असे दिसते. जिकडे सर्वत्र "बघताय काय ! सहभागी व्हा !" अशा मंत्राचा गजर चालू तिकडे यांची गंगा उलटीच वाहताना दिसते. मिसळपावरून गच्छंति , मनोगतवरून शंख करत बाहेरची वाट आणि आता उपक्रमावरचा ठणाणा. "इक काबा न बन सका हमसे , तोड डाले सौ बुतखाने !" असे उर्दूत म्हण्टले आहे. स्वत:चे असे काही आम्ही बनवू शकलो नाही आम्ही , तरी काय झाले ? इतरांना प्रिय अशी शंभर देवालये तर तोडली ना !
असो. एकेकाळी प्रत्युन्मति समजल्या जाणार्या अशा ज्येष्ठ व्यक्तीचे एका प्रदीर्घ कालावधीतले असे वर्तन पाहून खिन्नता वाटते. त्यांना कुणीही गावकुसाबाहेरचे म्हण्टलेले नाही ; पण अशी पाळी त्यांनी स्वतःवर आणलेली आहे.
"इक काबा न बन सका हमसे , तोड डाले सौ बुतखाने !" असे उर्दूत म्हण्टले आहे. स्वत:चे असे काही आम्ही बनवू शकलो नाही आम्ही , तरी काय झाले ? इतरांना प्रिय अशी शंभर देवालये तर तोडली ना !
आयला! हे बाकी अगदी खरं बोललात बरं का मुक्तराव! काळजावरून सुरी चालवलीत...!
आपला,
(खिन्न) तात्या.
>>प्रत्युन्मति म्हणजे शहाणपणाचे व्यवच्छेदक लक्षण
=)) चामारी हे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर झाला हो ..
माफकरा विप्रकाका पण आता व्यवच्छेदक हे बेणं कोण म्हणायचं हो ??
मुक्तसुनीतांचा अभिप्राय आवडला.
अत्यंत योग्य शब्दात विचार व्यक्त करणे ते ही संतुलितपणा न सोडता.....
हे त्यांचे गुण आम्हाला आवडतात.
आपला,
(चाहता) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
विनायक नावाची ऍलर्जी आज लक्षात आली.
संपलो..! :)
स्वगत : आयला हा समुपदेशक विनायक प्रभू मास्तर महा बेरकी दिसतो! :)
आपला,
(विनायक प्रभू मास्तरांचा आंगठे धरून उभं रहायची सजा झालेला विद्यार्थी) तात्या.
>>>नावाची ऍलर्जी
लहान तोंडी मोठा बेसनचा लाडू -- तुम्ही नाव बदला !
नाय तर लफडा कधी काळी मोठा होऊ शकतो ;)
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
सनासुदीच्या दिवसामुळे सध्या मौन धारण केले आहे.
(तसेच काही दोस्तांना शब्द दिलाय त्या विषयावर राडा करणार नाही म्हणुन )
पाव्हणे, रावळे गेले की, मग घेऊ तगडा समाचार !!! :)
-दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया
विलि
अपसव्यकृत्ये
"इक काबा न
अवांतर प्रतिसाद
प्रत्युन्मति
रोगापेक्षा इलाज भयंकर
अवांतर प्रतिसाद
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!
लक्षवेधी
मुक्तसुनीत
हा हा हा!
विनायक
विनायक
ह्म्म्म...
>>हाताचेच
>>>नावाची
मला
मस्त प्रस्ताव !!!
>>>पाव्हणे,
दिवाळी आहे...