जेट एअरवेजने परवाच्या दिवशी घेतलेला ८०० कामगार कपातीचा निर्णय काल रात्री मागे घेतला. जेट व्यवस्थापनाने परवा तडकाफडकी ८०० कामगारांना काढण्याचा निर्णय घेतला. बहुतेक कामगार प्रोबेशन पिरियड वर होते, त्या सर्व कामगारांनी श्री. राज ठाकरेंन कडे धाव घेतली. मुंबईत श्री. छगन भुजबळ यांच्या वाढदिवसा निमीत्त बडे - बडे नेते उपस्थित होते, तरीहि जेट कामगारांनि श्री. राज ठाकरेंची भेट घेतली. राज यांनी जेट व्यवस्थापनाला जाहीर ईशारा दीला. म.न.से. चे शिष्टमंडळ काल जेट व्यवस्थापनाला भेटले त्यावर त्यानी २ दिंवसांची मुदत मागितली. त्या नंतर काल रात्री जेट एम. डी. श्री. गोयल यांनी सर्व कामगार म्हणजे माझा परीवार आहे, त्यांना कामावरुन काढल्यापासून आपल्याला मानसीक त्रास झाला व हा निर्णय आपल्या गैरहजेरीत घेतला गेला असे सांगुन सारवासारव केली व सर्व कामगारांना परत सेवेत सामावुन घेतले.
ह्या बातमीच्या अनुषंगाने काही नवी समीकरणे / प्रश्न निर्माण झाले त्यावर चर्चा - संवाद - विचार अपेक्षीत आहे.
१) राज ठाकरे यांच्या ईशा-या नंतर जेट एअरवेज ची तिकीटे रद्द व्हायला सुरुवात झाली त्यामुळे श्री. गोयल राज बरोबर सतत संपर्कात होते. त्याचेच पर्यवसन म्हणजे कामगार कपातीचा निर्णय मागे घेतला. एकुण काय मनसे स्टाईल दणका दील्याशीवाय कोणीही सुधारत नाही मग तो बच्चन परीवार असो वा ईंग्रजी पाट्या लावणारा दुकानदार असो. मग मनसे करते ते बरोबर आहे का ? आज अचानक राज ठाकरें भोवतालचे वलय वाढलेय. जेट कामगारांचे सरासरी वय २०-२५ आहे त्यानी मुंबईत शरद पवार, नागरी उड्डान मंत्री प्रफुल पटेल उपस्थीत असताना देखिल त्याना न भेटता, युवा नेते राज यांची भेट घ्यावी. का त्याना असे वाटले ? ८०० पैकी ४०-५० फक्त मराठी आहेत मग ह्या अमराठी लोकांना आज राज ठाकरेंचा का आधार लागला? आणी हाच चिंतेचा विषय आहे शिवसेनेचा. जेट युनीयन शिवसेनेची पण कुरघोडी मनसे ची.? शिवसेनेच्या सुरवातीच्या काळात श्री आदरणीय बाळासाहेबांनी गिरणी कामगारांच्या मुद्दयाला हात घालुन शिवसेना बळकट केली होती. त्यावेळेपासुन आत्ता -काल परवा पर्यंत युवा पिढीचे आशास्थान - स्फुर्थीस्थान शिवसेना होती, मग आता असे काय झाले की युवा पिढीला मनसे जवळ वाटायला लागली? युवा पिढीला आक्रमक पणा खुप भावतो, एक घाव दोन तुकडे, आर या पार ची भाषा त्याना खुप आवडते. पण आता सळसळणा-या रक्ताला वाट मनसे कडेच मिळते असे का?
२) सध्या मंदीचा काळ आहे, कंपन्याना तगुन राहण्यासाठी कॉस्ट कटिंग करावी लागतेय. महाराष्ट्रात विजटंचाई, पाणीटंचाई व दंगल सद्रुश परीस्थीती आहे. नवीन गुंतवणुकदार महाराष्ट्रात येण्यास ऊत्सुक नाहीत अशा परीस्थीत प्रस्थापित कंपन्यांवर जेट शह-काटशह चे राजकारणा चे काय परीणाम होतील.
३) सर्वात महत्त्वाचे हिंदी मीडीया जेट बाबतीत राज ठाकरेंचे यश खुल्या मनाने स्विकारतील की परत एकदा आपल्या बातम्या एडीट करुन दाखवतील ?
वाचने
9345
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
काही मुद्दे
जेट मधले
In reply to काही मुद्दे by llपुण्याचे पेशवेll
काढले होते
श्री तुम्हांला जे प्रश्न पडलेत तेच मलाही पडलेत
+१
In reply to श्री तुम्हांला जे प्रश्न पडलेत तेच मलाही पडलेत by अनामिका
+१०० दिल्ली
In reply to +१ by llपुण्याचे पेशवेll
मला पण तसेच वाट्ते.
In reply to +१ by llपुण्याचे पेशवेll
याला काहीच अर्थ नाही
In reply to श्री तुम्हांला जे प्रश्न पडलेत तेच मलाही पडलेत by अनामिका
प्रसिध्दी
प्रसिध्दी
इथेही एक लेख
श्रेय कोणाचे???
ह्म्म....
ध्.मु. तुझे
In reply to ह्म्म.... by धमाल मुलगा
+१०००००००००००००००
In reply to ह्म्म.... by धमाल मुलगा
स्वार्थ
ते म्हणतोय मीही..
In reply to स्वार्थ by मराठी_माणूस
दुसर्याचे श्रेय लाटणे इतकेच राष्ट्रवादीला माहित.
काही मुद्दे
या
In reply to काही मुद्दे by विकास
मुक्त बाजारपेठ व्यवस्था !!!
+१
In reply to मुक्त बाजारपेठ व्यवस्था !!! by संदीप चित्रे
मुद्दा
ह्यात
माझे विश्लेषण ...
सुंदर
In reply to माझे विश्लेषण ... by छोटा डॉन
अयोग्य तुलना
In reply to सुंदर by भाग्यश्री
अमेरिका
In reply to अयोग्य तुलना by मराठी_माणूस
जगदम्ब जगदम्ब जगदम्ब !!!!!! matathi chitrapat pahawa ki nahi ?
याचा या
In reply to जगदम्ब जगदम्ब जगदम्ब !!!!!! matathi chitrapat pahawa ki nahi ? by रविशामु
जेट चे .........................................