Skip to main content

जागावाटपाची अजून एक युक्ती : नो मॅन्स लँड

लेखक हाडक्या यांनी सोमवार, 22/09/2014 04:35 या दिवशी प्रकाशित केले.
जशा निवडणुका जाहीर झाल्यात तशा सगळ्याच युती आघाडीमध्ये गदारोळ सुरु झालाय. सगळ्यांनाच जास्त जागा हव्यात. अजून नवीन आलेल्या घटक पक्षांना द्यायला राज्यातल्या जागा कमी पडू लागल्यात. आता यावर तोडगा काही लवकर दिसत नाही आहे आणि जर स्वबळावर लढायचे तर सगळ्यांचीच गोची होणार आहे कारण तेवढी ताकद कोणाचीच नाही. आता चर्चेच्या फेर्‍या आणि त्याला कंटाळलेले सगळेच (छोटे घटक पक्ष, माध्यमे आणि त्यांच्यामुळे जनता) याला उपाय काय असे विचारू लागलेत. असाच एक सुचलेला हा उपाय: जर आपण युतीचा विचार केला तर त्यांच्याकडे २८८ जागा आहेत लढवायला आणि ते १८ जागा देणार आहेत छोट्या घटक पक्षांना. मग आता उरलेल्या २७० जागांच्याबद्दल घोळ चाललाय. भाजपाला पण अर्ध्या जागा (१३५) आणि शिवसेनेला पण अर्ध्या अर्ध्याहून अधिक जागा(उ.दा. १६०) पाहिजेत. आता यासाठीच जर युती तुटणार असेल तर दोघांना पण खूप नुकसान झेलावे लागेल मग त्यापेक्षा दोघांनी पण आपल्या कमीत कमी अनिश्चित जागांचा आकडा पुढे मांडावा. उ.दा. इथे भाजपाला १३५ हव्या आहेत म्हणजे उरल्या १३५. पण शिवसेनेला १६० हव्या आहेत म्हणजे भाजपासाठी उरल्या ११०. म्हणजे भाजपला २५ जागा अशा हव्या आहेत की ज्या शिवसेनेलापण हव्या आहेत आणि या कळीच्या वादाच्या जागा आहेत. मग यासाठी एवढा दंगा आणि एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा या जागा आणि त्यांची संख्या ठरवून दोघांनीपण त्यांना 'नो मॅन्स लँड' म्हणून जाहीर कराव्यात, म्हणजे युतीतील हे दोन पक्ष या जागा स्वबळावर लढवतील आणि जो जिंकेल त्याची ती जागा म्हणून आपोआपच शिक्का लागेल. जर दोघेही हरले तर प्रश्नच यायला नको. उरलेल्या निश्चित जागा जाहीर करून या 'नो मॅन्स लँड' जागांवर चर्चा करून ठरवाव्यात कोणत्या ते. हाच नियम आघाडीपण ठरवू शकते. म्हणजे मग युती आघाडी पण अबाधित आणि लोकांना स्वबळावर केलेली लढाई बघायला मिळाल्याचे पण समाधान. बाकी जय महाराष्ट्र..!! (अवांतर : या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ते राज ठाकरेंचे गाडे कशात अडकले हे काही कळायला मार्ग नाही. उमेदवार सापडत नाहीत की काय कळायला मार्ग नाही.)

वाचने 35548
प्रतिक्रिया 69

प्रतिक्रिया

In reply to by नानासाहेब नेफळे

वा वा नानासाहेब, आमच्या पहिल्या वहिल्या धाग्याला तुमचे (हात) पाय लागले.. धागा धन्य झाला म्हणायचा. ;)

या मुद्द्यावरून जे चर्चेचे गुर्‍हाळ गेले अनेक दिवस सुरू आहे त्यामुळे दोन्ही पक्षांचे निवडणुकीत नुकसान होण्याची शक्यता वाढत चालली आहे. भाजप नेते म्हणत आहेत की आजवर सेनेने कधीच न जिंकलेल्या ५९ जागा व भाजपने कधीच न जिंकलेल्या १९ जागा यांच्याबद्दल पुनर्विचार केला पाहिजे. (केवळ अदलाबदल करून त्या जिंकल्या जातील या दाव्याचा अर्थ युतीमध्ये दोन्ही पक्ष एकदिलाने काम करीत नाहीत असे माझे मत आहेत). तर या ७८ जागांवर किंवा यापैकी जितक्यांवर दोन्ही पक्षांचे एकमत होईल (तोवर कदाचित उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस निघून गेलेला असेल) तेथे तुम्ही सुचवल्या प्रमाणे मैत्रिपूर्ण लढती करणे इष्ट राहील. यापूर्वी अनेक लोकसभा निवडणुकांमध्ये सेनेने महाराष्ट्राबाहेर भाजपविरुद्ध उमेदवार उभे करून मैत्रिपूर्ण लढती लढल्या आहेत. भाजपने हाच मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या वेळी काढला असता तर आता सेनेला त्यावर एवढा आक्षेप घेता आला नसता. अवांतर - ज्येष्ठ पत्रकार श्री भाऊ तोरसेकर यांनी या घडामोडींवर केलेले आवर्जून वाचण्यासारखे आहे.

या मुद्द्यावरून जे चर्चेचे गुर्‍हाळ गेले अनेक दिवस सुरू आहे त्यामुळे दोन्ही पक्षांचे निवडणुकीत नुकसान होण्याची शक्यता वाढत चालली आहे. भाजप नेते म्हणत आहेत की आजवर सेनेने कधीच न जिंकलेल्या ५९ जागा व भाजपने कधीच न जिंकलेल्या १९ जागा यांच्याबद्दल पुनर्विचार केला पाहिजे. (केवळ अदलाबदल करून त्या जिंकल्या जातील या दाव्याचा अर्थ युतीमध्ये दोन्ही पक्ष एकदिलाने काम करीत नाहीत असे माझे मत आहेत). तर या ७८ जागांवर किंवा यापैकी जितक्यांवर दोन्ही पक्षांचे एकमत होईल (तोवर कदाचित उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस निघून गेलेला असेल) तेथे तुम्ही सुचवल्या प्रमाणे मैत्रिपूर्ण लढती करणे इष्ट राहील. यापूर्वी अनेक लोकसभा निवडणुकांमध्ये सेनेने महाराष्ट्राबाहेर भाजपविरुद्ध उमेदवार उभे करून मैत्रिपूर्ण लढती लढल्या आहेत. भाजपने हाच मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या वेळी काढला असता तर आता सेनेला त्यावर एवढा आक्षेप घेता आला नसता. अवांतर - ज्येष्ठ पत्रकार श्री भाऊ तोरसेकर यांनी या घडामोडींवर केलेले आवर्जून वाचण्यासारखे आहे.

सत्तेच्या लोण्याचा गोळा मिळण्याआधीच या दोन बोक्यांची भांडणं सुरु झाली ,ह्यांच्याकडे म्हणे व्हिजन आहे. दहा पाच जागांसाठी भांडणारे स्वार्थी लोक काय राज्य सांभाळणार!

In reply to by नानासाहेब नेफळे

आघाडीचे बोके पण अशीचं नखं काढुन बसली आहेत. त्यावर नाना किंवा माईंचं मत ऐकायला आवडेल.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अहो नखे काढून उपयोग काय. त्यांची सगळी भिस्त युतीच्या निर्णयावरच आहे. :-) वैयक्तीक रित्या मला तरी उद्धव मुख्यमंत्री म्हणून पटत नाहीत. तुलनेने फडणवीस झालेच तर तावडे बरे वाटतात.सेनेला याची नक्कि कल्पना असायला पाहीजे की लोकसभेचे मत सेनेला नाही मोदींना होते. मोदीं ऐवजी तिथे अडवाणी असते तर तिथे पण २००९ च झाले असते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

हे म्हणजे शिवसेनेला स्वाभिमानाची तमा असेल तर आम्हालाही असे म्हटल्यासारखे आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

(भाजप जरी सक्षम पर्याय वाटत असला तरी) महाराष्ट्रातील सर्वच पक्षांची ही गोची आहे की एकाकडेही प्रभावशील असे (मोदी सारखे म्हणू हवे तर) नेतृत्व नाही. त्यामुळे सगळाच खुजा नेत्यांचा सावळ गोंधळ माजलाय असे वाटतेय..

हाडक्यासाहेब उत्तम उपाय सुचवलात हा उपाय काही लोकांच्या ध्यानी आला होता पण युती तोडण्याची कार्यकर्त्यांची इच्छाच आहे. कारण कितीही छोटे असेल

In reply to by आशु जोग

हाडक्यासाहेब आम्ही आदरच राखला आहे...

या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ते राज ठाकरेंचे गाडे कशात अडकले हे काही कळायला मार्ग नाही.
युती तुटते की नाही हे कळेपर्यंत गप्प बसण्यातच त्यांचा शहाणपणा आहे आणि तो ते निभावत आहेत... सध्या या पाचही पक्षांमध्ये सगळ्यात परिपक्व तेच वागत आहेत!!!!

In reply to by पिवळा डांबिस

असं खरंच तुम्हाला वाटतं ? का बुवा ? अजून उमेदवार पण निश्चित नाहीत आणि यात कुठली परिपक्वता ?

In reply to by अस्वस्थामा

अजून उमेदवार पण निश्चित नाहीत आणि यात कुठली परिपक्वता ?
असं खरंच वाटतं तुम्हाला? मग अधिक चिंतन करा.... :)

In reply to by पिवळा डांबिस

राज ठाकरे या पाचही पक्षांमध्ये सगळ्यात परिपक्व वागत आहेत हा एक मोठा भ्रम आहे. पण गमतीची गोष्ट अशी की ते गेली ७ वर्षे असा भ्रम निर्माण करण्यात कायम यशस्वी झाले आहेत. लोकांना अजूनही वाटते की हा माणूस काहितरी करु शकेल. मात्र बोलबच्च्न देण्यापलीकडे अजून काही केलेले नाहीये हे ही तितकेच खरे.

In reply to by धर्मराजमुटके

विरोधी पक्ष हा बोलबच्चनपणा आणि आंदोलनेच करू शकतो. त्याच्या हातात सत्ता दिल्याशिवाय तो काही बदल घडवून आणू शकत नाही. एकीकडे त्याच्या सभांना विक्रमी गर्दी करायची आनि मतं मात्र दुसर्‍याला द्यायची हा दांभिकपणा महाराष्ट्रीय मतदारांनी सोडायला हवा. जर त्याला एकदा संधी देऊनही त्याच्या हातुन काही विकास घडला नाही तर त्याच्यावर टीका करणं ठीक आहे. परंतु ते न करता, आणि इतर चारही पक्ष हे नालायक आहेत हे माहित असता, त्याला निकालात काढणं हे बरोबर आहे काय?

In reply to by पिवळा डांबिस

शितावरुन भाताची परीक्षा करतात. महाराष्ट्रातल्या नाशिक मनपाची सत्ता दिली ना ? तिथे काय सुधारणा आहेत ? विकासाचा अहवाल विचारला की दुसर्‍यांना ६० वर्षे विचारला नाही तर मला अडीच वर्षात कसा विचारता असे उत्तर देणे योग्य आहे काय ? मान्य आहे की विकास दिसायला वेळ लागतो. पण तशी इच्छाशक्ती तरी दिसते काय ? किंवा विकासाच्या मार्गावर एक पाऊल पुढे पडते आहे असे वाटते काय ? असेल तर प्लीज सांगा.

In reply to by धर्मराजमुटके

महाराष्ट्रातल्या नाशिक मनपाची सत्ता दिली ना ? तिथे काय सुधारणा आहेत ?
मनसेनं सत्ता घेतली तेंव्हा नाशिक मनपा ला किति कर्ज होतं? आज किती कर्ज आहे? ते कर्ज कुणी फेडलं? आणि आता तिथे **खाऊ भाजपाने जे केलं त्याचं काय करायचं?
विकासाचा अहवाल विचारला की दुसर्‍यांना ६० वर्षे विचारला नाही तर मला अडीच वर्षात कसा विचारता असे उत्तर देणे योग्य आहे काय ?
पूर्ण योग्य आहे. त्यांना त्यांची टर्म पुरी करु द्या, मग विचारा... हेच त्यांचंही सांगणं आहे. त्यात काय चुकलं? महाराष्त्रात कॉन्ग्रेस- राष्ट्रवादीची आणि मुंबई पालिकेत शिवसेनेची अनेक दशके सत्ता असतांना फक्त मनसेलाच त्यांच्या उण्यापुर्‍या दोन-अडीच वर्षांच्या सत्तेनंतर हा प्रश्न विचारण्याचा अगोचरेपणा जर केला गेला तर दुसरं कोणंतं उत्तर अपेक्षित आहे?
मान्य आहे की विकास दिसायला वेळ लागतो.
धन्यवाद
पण तशी इच्छाशक्ती तरी दिसते काय ? किंवा विकासाच्या मार्गावर एक पाऊल पुढे पडते आहे असे वाटते काय ?
दिसतंय, नाशिकमध्ये तरी दिसतंय, एक उदा> गोदापार्क प्रकल्प.
असेल तर प्लीज सांगा.
वर सांगितलंच. राजचा प्रॉब्लेम हा आहे की आज त्याच्यापाशी आपल्या भूमिका, आपलं काम बोंबलून सांगणारं मटा, सामना किंवा सकाळसारखं मुखपत्र नाही. ज्यादिवशी त्याला हे पटेल आणि तो जर याविषयी काही उपाययोजना करेल तो सुदिन!!! पण त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या मतदारांनाही हे सांगण्म आहे की बाबांनो ही संधि आहे. यावेळेस जर तुम्ही मिडीयाच्या दिशाभूलीला बळी पडून जर या चार उर्वरीत पक्षांना मत दिलंत, देऊ शकता कारण ही लोकशाही आहे, पण मग राज्याचा विअकास होत नाही हे रडगाणं गायचा तुम्हाला काहीही हक्क नाही.... आमेन.

In reply to by पिवळा डांबिस

पिडां, तुमच्या भावनेशी सहमत.. पण राज ठाकरेंची बाजू घेताना त्यांच्या उणीवांकडेही दुर्लक्ष करता कामा नये.. या उणीवा किंवा चुकीचे निर्णयच त्यांच्या मार्गात अडसर बनणार आहेत असे वाटते. उ.दा. १. निल-प्रत अगदी अंतिम नाही तरी पण एक ड्राफ्ट म्हणून जाहीर केली असती तर तिचा असा जोक झाला नसता. ग्राहकाच्या दृष्टीने पाहिल्यास कोणी कधीच अंतिम निल-प्रत येईपर्यंत वाट पहायला तयार असतो. आधी ड्राफ्ट यावा, काम चाललेय हे कळावे, अजून मते यावीत आणि ब्लु-प्रिंट सुधारत जावी असा विचार का नाही होत ? २. राज ठाकरेंची एकाधिकारशाही आहे. दुसरा नेता नाही ना कोणत्या विभागात नवे नेतृत्व अथवा संघटना आहे. मग कशाच्या जीवावर लोकांनी अजून विश्वास टाकावा ? ३. बहुतेक ठिकठिकाणचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे गावाला सोडलेले वळू, अगदी गुंड लोक आहेत. इथे सगळे पदाधिकारी कमरेला बंदूक आणि गळ्यात वजनदार अशा माळा घालून फिरत असतात. अशावेळी सामान्य पोरं पण मनसेच्या जवळ फिरकायला मागत नाहीत. बाकी मतदार तर राहुच द्यात. या प्रतिमेत बदल करणे राज ठाकरेंची जबाबदारी नाही का ? ४. इतर गोष्टी जसे की मुखपत्र वगैरे मान्य पण आजच्या काळात ते सोशल मिडिया वगैरे तर वापरु शकतात ना ? त्यांची वेब्साईट २०१० नंतर नीट अपडेट झालेली नाहीये. लोकांना मग उदासीनताच दिसते ना. ५. या वेळेस स्वतःचे धोरण खंबीरपणे आखून राजने त्याचा वेगळेपणा दाखवायची संधी गमावली. आता युती पण होणार, आघाडीपण होणार आणि त्या सगळ्या गोंधळात राज ठाकरे स्वतःला वेगळॅ म्हणून कसे दाखवता येईल. भाजपशी युती करण्याची वाट पाहणारा म्हणून बरेच जण या दिरंगाईला पहात आहेत. एकेकाळी राज ठाकरेंकडे एक सक्षम पर्याय म्हणून पहात होतो. आज त्याबाबत सध्यातरी सांशक आहे. बाकी उम्मीद पर तो दुनिया टिकी है.

In reply to by हाडक्या

सहमत. राज ठाकरेंनी बराच भ्रमनिरास केला आहे. त्यांच्याकडून खूप खूप अपेक्षा होत्या. ते जर कंबर कसून प्रामाणिकपणे कामाला लागले (इतरांच्या नकला सोडून ठोस, दिसेल असे कार्य सुरु केले) तर अजूनही मतदारांमध्ये नवे चैतन्य निर्माण करू शकतात. हि निवडणूक नाही जमली तरी भविष्यात ते कांही सकारात्मक बदल घडवू शकतील.

In reply to by हाडक्या

तुम्ही उल्लेखलेल्या काही उणीवा आणि काही चुकीचे निर्णय हे आहेत. त्याबद्दल दुर्लक्ष करू नयेच. याबद्दल सहमत आहे.

In reply to by हाडक्या

तुम्ही उल्लेखलेल्या काही उणीवा आणि काही चुकीचे निर्णय हे आहेत. त्याबद्दल दुर्लक्ष करू नयेच. याबद्दल सहमत आहे.

In reply to by पिवळा डांबिस

नाशिक मधे काय केले हे तेथिल नगरिकांना विचारा , खरे उत्तर मिळेल

In reply to by धर्मराजमुटके

महाराष्ट्राचा विकासाच हवा असेलतर एकट्या पृथ्विराजाना सत्ता देवून बघा. तुम्हाला नक्कीच हे पटणार नाही पण राज्यात उरलेला एकमेव चांगला आणि उच्च शिक्षित नेता म्हणता येईल. कोणता का पक्ष असेल, आपला विकास झाल्याशी मतलब. मोदींना पण शिंगावर घेऊन शकेल एवढी हिम्मत आहे. अजित/शरद पवारांना सहज गार केलंय...गुंतवणूक इतरांपेक्षा जास्तच आणलीये...पटलं तर घ्या...तुम्ही सोडून देणार आहात हे माहीतच आहे

In reply to by पुतळाचैतन्याचा

या सगळ्या गोंधळात हे मान्य करायला हवे की (राणे वगळता) काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाणांनी अजून तरी बर्‍यापैकी प्रगल्भता दाखवली आहे. कुठे आततायी वक्तव्ये नाहीत की जास्त आवाज नाही. संकटात असताना हीच 'प्रगल्भता' काँग्रेसला तारून नेत असावी बहुतेक. पृथ्वीराज चव्हाण यांना घरच्याच लोकांचा फार उपद्रव आहे असे वाटते.. आणि मग काम करून दंगा होण्यापेक्षा ते गप्प बसणे स्वीकारत असावेत. ;)
एकमेव चांगला आणि उच्च शिक्षित नेता म्हणता येईल.
अर्थात हे 'चांगला आणि उच्च शिक्षित' इथपतच मान्य. तसे इथे खूपजण आहेत. 'नेता' म्हणून त्यांना काही गुण देता येणार नाहीत. 'कार्यकर्ता' (म्हणजे कार्य करणारा) म्हणून देखील शून्यच मिळेल त्यांना. काँग्रेसचा नाईट वॉचमन आहेत ते. परत जर चुकून सत्ता आलीच तर सगळे सध्या डोके गाडून बसलेले काँग्रेसी साप आणि भलामोठ्ठा नारायणी अजगर आहेच मग.. ;)

In reply to by हाडक्या

नेता म्हणवून घ्यायला काय केले पाहिजे...ग्राम-पंचायती पासून लोकसभे पर्यंत जी निवडणूक लागेल तिथे सभा घेत सुटणे आणि केवळ निवडणुकीच्या राजकारणातून "जनाधार" मिळवणे का? नेता या गोष्टीचा संबंध नेतृत्व गुणांशी आहे असे मला वाटते... सभ्य लोकांना कोणी नेता म्हणेना झालाय...अशा प्रकारे पृथ्विराजना "अंडर-एस्टिमेट" करायची चूक करून अजित पवारांनी हात पोळून घेतले..तेव्हा ते नेते नाहीयेत अस मला तरी अजिबात वाटत नाही...अगदी खरे नेते हल्ली तसेही कमीच आहेत...त्या मानानी हे कमी नाहीत.नाईट वोचमन आहेत आणि ६ महिन्यात दिल्ली ला जातील असेल अनेकांना वाटले होते पण तसे झाले नाही.

In reply to by पुतळाचैतन्याचा

या सगळ्या गोंधळात हे मान्य करायला हवे की (राणे वगळता) काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाणांनी अजून तरी बर्‍यापैकी प्रगल्भता दाखवली आहे. कुठे आततायी वक्तव्ये नाहीत की जास्त आवाज नाही. संकटात असताना हीच 'प्रगल्भता' काँग्रेसला तारून नेत असावी बहुतेक. पृथ्वीराज चव्हाण यांना घरच्याच लोकांचा फार उपद्रव आहे असे वाटते.. आणि मग काम करून दंगा होण्यापेक्षा ते गप्प बसणे स्वीकारत असावेत. ;)
एकमेव चांगला आणि उच्च शिक्षित नेता म्हणता येईल.
अर्थात हे 'चांगला आणि उच्च शिक्षित' इथपतच मान्य. तसे इथे खूपजण आहेत. 'नेता' म्हणून त्यांना काही गुण देता येणार नाहीत. 'कार्यकर्ता' (म्हणजे कार्य करणारा) म्हणून देखील शून्यच मिळेल त्यांना. काँग्रेसचा नाईट वॉचमन आहेत ते. परत जर चुकून सत्ता आलीच तर सगळे सध्या डोके गाडून बसलेले काँग्रेसी साप आणि भलामोठ्ठा नारायणी अजगर आहेच मग.. ;)

In reply to by पिवळा डांबिस

पायलट बेसिस वर त्यांना नाशिक मध्ये सत्ता दिलीच होती की. तिथे इतकी घाण करुन ठेवली की लोकं शिव्या घालतात मनसेला. अश्या पक्षाच्या हातात आख्या राज्याच्या नाड्या कश्या द्यायच्या?

In reply to by मृत्युन्जय

आता म्हातारपणामुळे पुन्हापुन्हा टंकणं नाही जमत हो!! :)

In reply to by धर्मराजमुटके

+११११११ ४-५ वर्षे होउन सुध्धा अजुन ब्लु-प्रिंट येतेच आहे

In reply to by टवाळ कार्टा

महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू=प्रिंट आहे ना ती? मग महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांच्या आधी आल्याशी कारण, काय!!!

In reply to by पिवळा डांबिस

ती मागच्या वेळी येणार होती ना?? तेव्हा नविन होते म्हणुन १३ तरी निवडून आले...त्यांनी काय दिवे लावले?? आधी १३ ना घेउन काही करुन दाखवले असते तर कदाचीत अख्खा महाराष्ट्र देण्याच्याबाबत बोलले तर ठीक होते

In reply to by टवाळ कार्टा

ठीक आहे, तुमची इच्छा! मी तरी आणखी काय सांगणार? एकाद्या साध्या बिझनेसची ब्लू-प्रिंट तयार करायची तर किति परिश्रम आणि किती काळ जातो हे मला माहिती आहे... इथे तर एका प्रचंड राज्याच्या विकासाची ब्ल्यू-प्रिंट तयार करायची आहे... नसेल तुम्हाला धीर निघत तर द्या दुसर्‍यांना मत. उद्या ती ब्ल्यू-प्रिंट प्रकाशित केल्यावरही सगळी यच्चयावत मराठी जनता मनसेला एकगठ्ठा मतदान करणार आहे असं थोडीच आहे? प्रत्येकाचे हितसंबंध गुंतलेले असतात.... सगळा समस्त मराठी माणूस हा प्रचलित राज्यव्यवस्था मोडून विकासासाठी कंबर कसून उभा राहील हे मानणं देखील बालिशपणाचंच आहे की!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

@पिवळा डांबिस,तुम्हाला खरच असे वाटते का कि ब्लु प्रिंटनुसार राज्यात कामे होतील? असे जर वाटत असेल तर आपण फारच भाबडे आहात. ज्याने टोलचे आंदोलन मध्येच सोडून दिले ,परप्रांतियांचा प्रश्न लावुन धरता आला नाही ,राज्यात ब्लुप्रिंटवर काम करत राहण्याऐवजी स्टँण्डप कॉमेडीत ज्याने वेळ घालवला, असे लोक ब्लुप्रिंटबरहुकुम काम करतील याची षष्प शक्यता नाही. आपल्या माहितीसाठी सांगतो ,पुण्याचा विकास आराखडा १९८६ ला मंजूर झाला ,त्याची अंमलबजावणी २०१३ला सुरु झाली. मुळ आराखड्यातल्या रिकाम्या जमीनी जिथे पार्क वगैरेचे आरक्षण आहे तिथे आता टोलेजंग इमारती आहेत ,आता बोला!

In reply to by नानासाहेब नेफळे

नानासाहेब नेफळे किंवा अन्य कुणी, आम्ही सामान्य तुम्हांला काय शहाणपण सांगणार? तेंव्हा,
नसेल तुम्हाला धीर निघत तर द्या दुसर्‍यांना मत. उद्या ती ब्ल्यू-प्रिंट प्रकाशित केल्यावरही सगळी यच्चयावत मराठी जनता मनसेला एकगठ्ठा मतदान करणार आहे असं थोडीच आहे? प्रत्येकाचे हितसंबंध गुंतलेले असतात.... सगळा समस्त मराठी माणूस हा प्रचलित राज्यव्यवस्था मोडून विकासासाठी कंबर कसून उभा राहील हे मानणं देखील बालिशपणाचंच आहे की!!!!
उद्या दादासाहेब पवार जरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तरी माझं व्यक्तिशः काहीच नुकसान होणार नाहिये. पण आपल्या मराठी लोकांसाठी आतडं तुटतं म्हणून हे सगळं पांढर्‍यावर काळं करायचं, इतकंच! जर महाराष्ट्राचा विकास साधायचा असेल तर फक्त महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राचाच विचार करणारा, वरती हायकमांड नसणारा, स्वतःच्या कन्व्हिक्शनसाठी काकांचाही रोष ओढ्वुन घेणारा आणि हिंदुत्ववाद वगैरे महाराष्ट्रासाठी निरर्थक कल्पनांत न वावरणारा, केंद्रातल्या मोदींबरोबर विकासाची नस साधू शकणारा असा हा एकच नेता सध्या दिसतोय. दुसरा दिसला तर लगेच तुलना सुरू करीन. पण तोपर्यंत तरी यालाच पाठिंबा!! :)

In reply to by पिवळा डांबिस

तेच कि! गुजरातमध्ये जाऊन महाराष्ट्राची आणि मराठी लोकांची मापे काढून आला. शेजारच्या घरात पंचपक्वान्न शिजते म्हणून तिथे जाऊन" आमच्या घरात आम्हाला फक्त मीठ भाकरीच मिळते" असे रडगाणे गाणार्याने स्वाभिमान गहाण टाकलेला असतो.

In reply to by नानासाहेब नेफळे

तुम्ही म्हणा तुम्हाला काय अद्वातद्वा म्हणायचंय ते! बट आय अ‍ॅम नॉट टेकिंग दॅट बेट!!!! :)

In reply to by नानासाहेब नेफळे

ज्याने टोलचे आंदोलन मध्येच सोडून दिले ,परप्रांतियांचा प्रश्न लावुन धरता आला नाही ,राज्यात ब्लुप्रिंटवर काम करत राहण्याऐवजी स्टँण्डप कॉमेडीत ज्याने वेळ घालवला, असे लोक ब्लुप्रिंटबरहुकुम काम करतील याची षष्प शक्यता नाही. व्होडाफोनचा मुंबई सोडली की रोमींग चार्ज सुरु होतो.अगदी अंबरनाथला सुद्धा. त्यावरही राजने आवाज उठवला होता. पण ते रोमींग चार्जेस आजही चालु आहेत बॉ. मलाही वाटायचे हा माणुन भारी आहे काय तरी काम करेल. मी मागच्याच आठवड्यात नाशीकला चक्कर मारली आहे. आपले मितभाषी आहेत ना त्यांच्याकडे. त्यांनी सांगीतले की पुढच्या कुंभमेळ्यासाठी नाशिकला बराच मोठा निधी मिळाला आहे. मला तर वाटते की राष्ट्रवादीला बरोबर घेतले ते ह्याच लोण्याच्या गोळ्यासाठी. असा माझा आपला अंदाज हा. माझं तर मत असं आहे की कोणीही भले करावे महाराष्ट्राचे आपले काहीही म्हणणे नाही. पण असं काही होईल याची मलातरी शक्यता वाट्त नाही. त्यामुळे जनतेने आपल्याला जमेल तेवढे आनी तसे स्वतःचे भले करावे. बाकी बाहेरचे माहीत नाही पण मुंबईत "नवा काळ" ने राजला बरेच उचलुन धरले होते सुरवातीला. पण नंतर त्यांचाही भरोसा नाही राहीला असे वाटते.

In reply to by विलासराव

बाकी शिवसेनेबद्द्ल काय लिहावे. मी आनी आपले रामदासकाका बरोबर असताना एका परप्रांतीयाला रामदास काकांंनी त्याच्या चुकीबद्दल झाडला. तर तो दोन मिनीटात एका व्यक्तीला घेउन आला ज्याने आम्हाला जवळपास धमकावलेच. तो कुठलातरी शिवसेनेचा शाखाध्यक्ष होता.मग काकांनीही त्याला योग्य शब्दात समज दिल्यावर तो नॉर्मलवर आला. दुसरे मी गिरगावात रहात असताना एक व्यक्ती माझ्याच रुमच्या खीडकीतुन मी माझ्या भाचीबरोबर स्काईअपवरुन बोलत असताना पहात उभा राहीला . जवळपास २० मिनीटे राती १०:३० ला. मग त्याने माझ्या भावाला ओरडून सांगीतले की खिडकी बंद कर म्हणुन . माझी पाठ खिडकीकडे असल्याने मला हे माहीत नव्हते. तो ओरडल्यावर मी बाहेर जाउन विचारले की का रे बाबा का ओरडतोस? तर तो संगणकाकडे बोट दाखवुन संस्कृतीबद्दल बोलायला लागला. मग मी त्याला म्हणालो की रात्रीचे १०:४० झालेत , तू माझ्या घरात डोकावतो आहेस गेली २५ मिनिटे. तुझ्या तोंडाला अम्रुताचा वासही येतोय तेण्व्हा घरी जा शांतपणे झोप ,सकाळी उठुन आंघोळ कर, चहा नाश्टा घे ,पुजा करत असशील तर कर आन मग परत अम्रूत न पिता तुझे ओळखपत्र घेउन ये मग बघु संस्कृतीचे. त्यावर त्याने आवाज वाढवला, त्याला मदतनीसही येउन मिळाला. मग माझाही आवाज वाढला परीणामी आजुबाजुचे २-३ लोक दरवाजा उघडून बाहेर आले. मग त्यांनी पडती बाजु घेतली पण सगळ्यांना ऐकु जाईल अशा आवाजात म्हणाले ईथेच रहातोस ना? पाहुन घेउ. मग मीही त्याला तशाच आवाजात उत्तर दिले की आजपर्यंत परत कोणी आलेले नाही. पण जर तु कधी आलासच तर मग दरवाजा बंद असला चुकुन तर दरवाजा वाजव. तो उघडेल याची खात्री बाळग. पण तसाच परत जाउ नकोस. अर्थातच ते परत काही आले नाहीत. पण मला दुसर्या दिवशी सकाळी समजले की तो गिरगावचा सेनेचा शाखाध्यक्ष आहे. आनी नंतरच्या निवडणुकीत तो नगरसेवकही झालाय.

In reply to by टवाळ कार्टा

मनसेच्या 'ब्लू प्रिंट'ला अखेर मुहूर्त यावेळी तरी राजसाहेब शब्दाला जागतील अशी आशा करतो. बघू काय म्हणताहेत ते.

In reply to by शिद

ज्यांना मनसेची ब्लूप्रिंट वाचायची असेल त्याना ती खालील लिंकवर उपलब्ध आहे... http://mnsblueprint.org/index.html वाचावी, विचार करावा आणि मग आपलं मत बनवावं. बाकी आता धमाल येणारे!!!!!

In reply to by शिद

ब्लू प्रिंट पाहिली.. अगदी उत्तम मुद्देसूद आराखडा मांडला आहे. इतर पक्षांनी आदर्श घ्यावा असा सोपा साध्या शब्दात आहे. प्रश्न असा आहे की हे कागदावरचे प्रत्यक्षात आणायला काय करणार. ? एक साधा प्रश्न आहे की उ.दा. सातार्‍यातील एका मतदारसंघात या वेळेस एका खंडणीखोरास ति़किट दिले, आता तो पुढे जाऊन या आदर्श अशा लोकोपयोगी कामांवर काम करेल हे कसे मानावे ?

In reply to by हाडक्या

हाडक्याजी, ब्लूप्रिंट वाचलीत ना? मग जर पटली असेल तर मनसेचा प्रचार करायच्या कामाला लागा!!! पटली नसेल तर तुमचा लाडका जो पक्ष आहे त्याचा प्रचार सुरू करा... उगीच, "कागदावरचे प्रत्यक्ष आणायला काय करणार? अमक्याला तमक्याच मतदारसंघात का उभा करणार? उद्या जर निवडून आले तर ढमक्यालाच फलाणं खातं का देणार?" असला मक्षिकापात कशाला करावा? ज्यांनी ती इतकी सविस्तर ब्लूप्रिंट मांडली ते महाराष्ट्रासाठी काहीतरी चांगलं करतील असा विश्वास वाटत असेल तर या त्यांच्याबरोबर. अन्यथा द्या सोडून... काय? :)

In reply to by पिवळा डांबिस

अन्यथा द्या सोडून... काय? Smile सोडुन दिलं. क्काय्य्य्य्य?? कारण दुसरे काही सध्यातरी करता येण्यासारखे नाही.

In reply to by पिवळा डांबिस

"कागदावरचे प्रत्यक्ष आणायला काय करणार? अमक्याला तमक्याच मतदारसंघात का उभा करणार? उद्या जर निवडून आले तर ढमक्यालाच फलाणं खातं का देणार?" असला मक्षिकापात कशाला करावा?
अहो राजे, मनसे बद्दल आपुलकी वाटते म्हणून हे टंकनश्रम चाललेत ना. (त्याने काही होणार नाही हे ठाऊक असलं तरी). ब्लु-प्रिंट बद्दल एक वेगळा धागा सुरु झालाय तरी पण. मी जो मुद्दा मांडलाय तो जी स्वप्ने दाखवली आहेत या ब्लू प्रिंट्मध्ये त्यात आणि वस्तुस्थितीच किती फरक आहे तो होता. जे लोक या ब्लु-प्रिंटला घेऊन मते मागायला येणार आहेत त्यांना ती काय आहे हे तरी कितपत समजत असेल ही शंकाच.
ज्यांनी ती इतकी सविस्तर ब्लूप्रिंट मांडली ते महाराष्ट्रासाठी काहीतरी चांगलं करतील असा विश्वास वाटत असेल तर या त्यांच्याबरोबर.
समजा मी तुम्ही म्हणताय तसे विचार केला आणि मत द्यायचे ठरवले तरी पण माझ्या पंचक्रोशीतले मनसेचे उमेदवार कोण आहेत? एक बंदूक घेऊन दिवसा ढवळ्या खंडणी वसूल करत फिरणारा, एक सुपारी घेऊन खून वगैरे करणारा, एक तडिपार (हे सगळे सातारा जिल्ह्यातले सांगतोय बाकी शितावरून भाताची परि़क्षा म्हणु हवं तर). आता मी यांना मत देऊ इच्छित नाही, मी यांचा प्रचार करु इच्छित नाही. मी माझ्या नातेवाईक,मित्रमंडळींनईक्य लोकांना मत द्या असे सांगू इच्छित नाही. अशा वेळी तुमचा शेवटचा सल्ला बरा..
अन्यथा द्या सोडून...
दिले सोडून.!! करा नवनिर्माण च्यायला..

काही ठिकाणी असे अलाउ केले तर बाकी ठिकाणीही बंडखोरी होईल.

In reply to by आदूबाळ

गूगलून जेवढे 'Nash equilibrium ' बद्दल कळाले त्यावरुन तरी म्हणता येईल की 'नाही', फक्त या क्षणी सर्वांना 'कमीत कमी नुकसान' यासाठी ह्या उपायाचा विचार व्हायला काही हरकत नसावी. @पोटे, बंडखोरी रोखण्याचा उपाय मण म्हणू शकता ना याला ?

दोघांनीही स्वतंत्रपणे लढावे हेच उत्तम. आपल्यामुळे भाजप महाराष्ट्रात वाढला हा शिवसेनेचा स्वतःविषयी एक गोड गैरसमज आहे. १९८६ मध्ये युती होईपर्यंत शिवसेनेला मुम्बई-ठाण्याच्या बाहेर कोणीही ओळखत नव्हते. १९६६ साली स्थापन झाल्यानंतर आपला पहिला आमदार निवडून आणायला शिवसेनेला तब्बल १९ वर्षे लागली होती. १९८६ पर्यंत शिवसेनेला अवघा १ आमदार निवडून आणता आला होता व तो सुद्धा तब्बल १९ वर्षांनी आणि तो सुद्धा मुम्बईमध्ये. या उलट १९८० मध्ये स्थापन झाल्यावर भाजपने अवघ्या दीड महिन्यात भाजपने महाराष्ट्राच्या विविध भागात आपले १२ आमदार निवडून आणले होते. १९८५ मध्ये सुद्धा जेव्हा शिवसेनेचा पहिला आमदार निवडून आला तेव्हा भाजपचे १६ आमदार निवडून आले होते. १९९० मध्ये युती झाल्यावर शिवसेनेच्या आमदारांची संख्या १ वरून ५२ वर गेली तर भाजप १६ वरून ४२ वर पोहोचला. जे नवीन ७७ आमदार निवडून आले त्यातले ५१ शिवसेनेचे व २६ भाजपचे होते. शिवसेनेला भाजपमुळे भाजपच्या तुलनेत दुप्पट फायदा झाला हे उघड आहे. २००९ मध्ये सुद्धा १६९ जागा लढवून सेनेला फक्त ४४ जिंकता आल्या (फक्त २६.०३ टक्के) तर भाजपला ११९ लढवून ४६ जिंकता आल्या (३८.६५ टक्के). सुरवातीपासूनच महाराष्ट्रात शिवसेनेच्या तुलनेत भाजपला जास्त जनाधार आहे. भाजपने शिवसेनेपुढे नमते न घेता आपल्या अटींवरच युती करावी.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी, with all due respect, आपले मत आपल्यालाच पक्षपाती वातत नाही का?
या उलट १९८० मध्ये स्थापन झाल्यावर भाजपने अवघ्या दीड महिन्यात भाजपने महाराष्ट्राच्या विविध भागात आपले १२ आमदार निवडून आणले होते. १९८५ मध्ये सुद्धा जेव्हा शिवसेनेचा पहिला आमदार निवडून आला तेव्हा भाजपचे १६ आमदार निवडून आले होते.
जर एवढी ताकद होती तर मग १६९/११९ हे सूत्र भाजपाने का स्वीकारले असावे असा प्रश्न पडत नाही का इथे?
भाजपने शिवसेनेपुढे नमते न घेता आपल्या अटींवरच युती करावी.
हे जरी वादाकरता मान्य केले तरी लोकसभेच्या निकालांमुळे भाजपा जास्त आवाज चढवत आहे असे नाही का ? मग इतकी वर्षे गप्प बसलेले आता आवाज करायला लागल्यावर शिवसेना याला स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न करील तर त्यात नवल ते काय ?

In reply to by हाडक्या

>>> जर एवढी ताकद होती तर मग १६९/११९ हे सूत्र भाजपाने का स्वीकारले असावे असा प्रश्न पडत नाही का इथे? गरजवंताला अक्कल नसते. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत धूळधाण उडाल्यावर वाजपेयींकडून अडवाणींकडे सूत्रे आली. भाजप निव्वळ स्वतःच्या बळावर वाढणार नाही. त्यासाठी इतर काँग्रेसविरोधी पक्षांची मदत लागेल हे त्यांनी ओळखून स्थानिक पक्षांबरोबर युती करण्याची गरज ओळखली. याच गरजेतून १९८६ मध्ये सेना-भाजप युती आकाराला आली. महाराष्ट्रात त्यावेळी काँग्रेसविरोधात फक्त जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष व शेकाप, शिवसेना इ. किरकोळ काही जिल्ह्यांपुरते मर्यादीत असेलेले पक्ष होते. तत्कालीन जनता पक्षात फक्त समाजवादी शिल्लक होते ज्यांचा काँग्रेसपेक्षा भाजपला जास्त विरोध होता. त्यामुळे सेना हाच युतीसाठी एकमेव पक्ष शिल्लक होता. मुम्बई-ठाण्याबाहेर कधीही अस्तित्व नसलेल्या सेनेने ही संधी पटकावून भाजपच्या मदतीने स्वतःचा विस्तार केला व पुढील निवडणुकात दांडगाई करून भाजपच्या हक्काच्या अनेक जागा स्वतःच्या ताब्यात घेतल्या (उदा. पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ इ.). स्वतःच्या वृद्धीसाठी भाजपला तडजोड करावी लागली. अगदी २००९ मध्ये सुद्धा शिवसेनेने भाजपचा हक्काचा गुहागर मतदारसंघ हिरकावून घेतला. स्वत:च्या गरजेसाठी १६९-११९ ही तडजोड मान्य केली. जोपर्यंत भाजप सत्तेबाहेर होता तोपर्यंत भाजपने सेनेची मुजोरी सहन केली. आता भाजप केंद्रात सत्तेत आहे व तिथे शिवसेनेच्या टेकूची गरज नाही. दुसरीकडे राज ठाकरे, राणे, नांदगावकर इ. महत्त्वाचे नेते सोडून गेल्यामुळे आपण दुर्बल झालो आहोत हेच सेनेला मान्य नाही. २००९ मध्ये भाजपपेक्षा जास्त जागा लढून भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्याने या नेत्यांनी सेनेचे किती नुकसान केले आहे हे दिसून आले होते. आता थोरले ठाकरे सुद्धा नाहीत. त्यामुळे सेना अजूनच दुर्बल झाली आहे. तरीसुद्धा मुजोरी कायम आहे. भाजपला स्वबळावर शिवसेनेपेक्षा कितीतरी जास्त जागा मिळण्याची खात्री आहे. त्यांचे अंतर्गत सर्वेक्षण व इतर काही वाहिन्यांचे सर्वेक्षण हेच सांगतात. त्यामुळे आता भाजप ऐकणार नाही. आज माघार घेतली तर भविष्यात कायमच तुच्छ वागणूक मिळेल याची भाजपला खात्री आहे. स्वतःचा जनाधार जास्त असताना व केंद्रात गरज नसताना शिवसेनेची मुजोरी भाजप ऐकून घेणार नाही. एका झाडाखाली दुसरे झाड वाढत नाही. त्यामुळे भाजपने वेगळे होऊन स्वबळावर निवडणुक लढावी. कदाचित यावेळी सत्ता मिळणार नाही. परंतु शिवसेनेच्या जोखडातून कायमची मुक्ती मिळेल. शिवसेनेच्या अटी मान्य करून जरी सत्ता मिळाली तरी कायमच शिवसेनेच्या ओंजळीने प्यावे लागेल. त्यामुळे स्वतंत्र लढावे हे उत्तम. >>> हे जरी वादाकरता मान्य केले तरी लोकसभेच्या निकालांमुळे भाजपा जास्त आवाज चढवत आहे असे नाही का ? मग इतकी वर्षे गप्प बसलेले आता आवाज करायला लागल्यावर शिवसेना याला स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न करील तर त्यात नवल ते काय ? शिवसेनेची आता गरज उरलेली नाही. त्यामुळे भाजप आता मागील अपमानांचा वचपा काढणारच आणि शिवसेना इतक्या वर्षांच्या सवयीमुळे भाजपला चेपायला बघणारच. शिवसेनेला १९८० मध्येही महाराष्ट्रात भाजपपेक्षा कमी जनाधार होता आणि २०१४ मध्ये तसेच आहे. पण आता काळ बदलला आहे. आता भाजपला केंद्रात निर्विवाद बहुमत आहे. भाजप अजून ५ वर्षे वाट पाहू शकतो. पण शिवसेनेने भाजपची साथ सोडली तर उद्धव ठाकर्‍यांचा नितीशकुमार होईल हे नक्की. शिवसेना म्हणजे अद्रमुक, द्रमुक, तेदे किंवा बिजद नव्हे, ज्यांनी स्वबळावर अनेकदा सत्ता मिळविली आहे. ते पक्ष राष्ट्रीय पक्षांना स्वतःच्या अटींवर नाचवू शकतात. शिवसेनेने शहाणपणाने वागून भाजप अजूनही १३० जागांवर तडजोडीला तयार आहे ते मान्य करून पुढे जावे. नाहीतर नितीशकुमारांसारखे अस्तित्व संपून जाऊन हाती भोपळा येईल. कदाचित स्वतंत्र लढल्यावर भाजपला सत्ता मिळविता येणार नाही. पण शिवसेनाही स्वबळावर २५-३० च्या पुढे जाणार नाही. भाजप अजून ५ वर्षे थांबू शकतो. भाजपच्या दृष्टीने महाराष्ट्र हे इतर अनेक राज्यांसारखे एक राज्य आहे. पण शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर कोठेही पुसटसे सुद्धा अस्तित्व नाही आणि महाराष्ट्रात सुद्धा भाजपच्या मदतीशिवाय सेनेचे चालू शकत नाही. भाजपशी युती तोडल्यावर २०१७ मध्ये शिवसेनेला मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली इ. महापालिका सुद्धा गमवाव्या लागतील व पुढील काही वर्षातच शिवसेना अस्तित्वहीन होईल.

In reply to by श्रीगुरुजी

शिवसेनेने शहाणपणाने वागून भाजप अजूनही १३० जागांवर तडजोडीला तयार आहे ते मान्य करून पुढे जावे. नाहीतर नितीशकुमारांसारखे अस्तित्व संपून जाऊन हाती भोपळा येईल.
वरती भाऊ तोरसेकर यांचा ब्लॉग टाकलाय.. जरी त्यांच्याशी पूर्णतः सहमत नसलो तरी पण तुमचे 'शिव्सेनेचा नितीश कुमार होईल' हे मत आणि त्यांचे अगदी वत्यास असे 'भाजपचा नितीश कुमार होईल' हे मत ते पण बरोबर वाटतेय ना..
मुम्बई-ठाण्याबाहेर कधीही अस्तित्व नसलेल्या सेनेने ही संधी पटकावून भाजपच्या मदतीने स्वतःचा विस्तार केला व पुढील निवडणुकात दांडगाई करून भाजपच्या हक्काच्या अनेक जागा स्वतःच्या ताब्यात घेतल्या (उदा. पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ इ.). स्वतःच्या वृद्धीसाठी भाजपला तडजोड करावी लागली. अगदी २००९ मध्ये सुद्धा शिवसेनेने भाजपचा हक्काचा गुहागर मतदारसंघ हिरकावून घेतला. स्वत:च्या गरजेसाठी १६९-११९ ही तडजोड मान्य केली
तुम्ही भाजपचे समर्थक म्हणून तुम्हाला हहाच्प्रश्न विचारावासा वाटतोय.. या तडजोडी का स्वीकाराव्या ? गुहागरची तडजोड स्वीकारून काय फायदा झाला. जागा पण गेली आणि चांगले कार्य करणारा माणूस पण गेला ना.?
भाजप अजून ५ वर्षे थांबू शकतो. भाजपच्या दृष्टीने महाराष्ट्र हे इतर अनेक राज्यांसारखे एक राज्य आहे.
हाच त्यांचा कच्चा दुवा पण म्हणू शकता ना की ते लोकांना 'आपल्या राज्यासाठी झटणारे' असे वाटणार नाहीत यामुळे. तसेच ते थांबू शकतात हा चुकीचा भ्रम झाला. इथले निकाल त्यांना इतर ठिकाणी परिणाम करु शकतात. आत्ता कुठे सुरुवात आहे भौ. भाजपबद्दल सहानुभुती आहे पण त्यांचीही वाटचाल कुठेतरी 'काँग्रेसी' होत चाललेली आहे असे वाटते. ते होऊ नये.

In reply to by हाडक्या

>>> वरती भाऊ तोरसेकर यांचा ब्लॉग टाकलाय.. जरी त्यांच्याशी पूर्णतः सहमत नसलो तरी पण तुमचे 'शिव्सेनेचा नितीश कुमार होईल' हे मत आणि त्यांचे अगदी वत्यास असे 'भाजपचा नितीश कुमार होईल' हे मत ते पण बरोबर वाटतेय ना.. जो आपल्या खर्‍या ताकदीपेक्षा स्वतःला जास्त ताकदवान समजतो आणि जो दुसर्‍याच्या ताकदीला कमी लेखून त्याचा उपमर्द करतो, त्याचाच नितीशकुमार होतो. महाराष्ट्रात सुरवातीपासूनच शिवसेनेच्या तुलनेत भाजपची ताकद जास्त होती हे मी वर दाखवून दिले आहे. हे १९८० मध्ये सत्य होते आणि २००९ मध्ये त्याची पुनर्प्रचिती आली. त्याचवेळी शिवसेनेने वारंवार भाजपला कमी लेखले. त्यामुळे जर नितीशकुमार होणार असेल तर तो शिवसेनेचाच होईल, भाजपचा नव्हे. >>> हाच त्यांचा कच्चा दुवा पण म्हणू शकता ना की ते लोकांना 'आपल्या राज्यासाठी झटणारे' असे वाटणार नाहीत यामुळे. तसेच ते थांबू शकतात हा चुकीचा भ्रम झाला. इथले निकाल त्यांना इतर ठिकाणी परिणाम करु शकतात. आत्ता कुठे सुरुवात आहे भौ. याच न्यायाने तसं काँग्रेसबद्दलही वाटू शकतं. पण जनता तसा विचार करत नाही. आपण मराठी माणसांसाठी लढतो असा शिवसेनेचा भ्रम आहे. परंतु महाराष्ट्रातील जनतेचा या दाव्यावर कधीच विश्वास नव्हता. अन्यथा १९६६ पासून ४८ वर्षात किमान एकदा तरी महाराष्ट्रातील जनतेने शिवसेनेला सत्ता दिली असती. तामिळनाडूतील द्रमुक/अद्रमुक हे तामिळींचेच पक्ष आहेत यावर तामिळ जनतेचा विश्वास आहे, त्यामुळे एकदा नव्हे तर अनेकदा राष्ट्रीय पक्षांना डावलून तेथील जनतेने त्यांना स्वबळावर निर्विवाद बहुमत दिले आहे. बिजद, तेदे इ. प्रादेशिक पक्षांनी देखील अनेकदा स्वबळावर बहुमत मिळविले आहे. शिवसेनेला ते कधीही जमले नाही. कारण शिवसेना हा मराठी लोकांसाठीचा पक्ष आहे यावर बहुतेकांचा विश्वास नाही ('मराठी', 'मराठी' असा नारा लावून प्रत्यक्षात अनेक अमराठी लोकांना शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार केल्याचे लोकांना समजते, मुम्बई महापालिकेची अनेक कंत्राटे अमराठी व्यक्तींना जातात हेही जनता समजून आहे.). किंबहुना महाराष्ट्रातील कोणताही पक्ष फक्त मराठी लोकांच्या हितासाठी आहे यावर जनतेचा विश्वास नाही. याउलट शिवसेना अमराठी लोकांच्या विरोधात आहे यावर मात्र बहुतेकांचे एकमत आहे. शिवसेना मुम्बईत स्वतंत्र लढली तर मुम्बईतील गुजराती, उत्तर भारतीय वा इतर अमराठी जनता शिवसेनेला मते देणार नाही. केवळ भाजपबरोबर असल्याने आजपर्यंत शिवसेनेला या लोकांची मते मिळाली. पण स्वबळावर मते मिळणार नाहीत. याउलट मराठी मते ही शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी इ. सर्व पक्षात विभागली जातात. त्यामुळे भाजपबरोबर राहणे यावरच शिवसेनेचे अस्तित्व टिकून राहील. ज्या क्षणी शिवसेना एकटी लढेल, त्याच क्षणी शिवसेनेचा नितीशकुमार होईल. >>> भाजपबद्दल सहानुभुती आहे पण त्यांचीही वाटचाल कुठेतरी 'काँग्रेसी' होत चाललेली आहे असे वाटते. ते होऊ नये. सहमत

In reply to by श्रीगुरुजी

असं असेल तर मग भाजपने तोडावी युती.. कशाला ते पदती बाजू घेऊन जू वागवायचं ते. ताकद असताना देखील कमी जागा घेऊन लढणारा शहाणा कसा म्हणायचा ? स्वबळावर न लढण्याच्या भुमिकेच्या पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण कुठेतरी विसंगत वाटतेय. तुम्ही कदाचित तेवढा तटस्थ विचार करणार नाही पण भाजपचे स्थानिक नेतृत्व मुंडे-महाजन गेल्यापासून अगदीच मिळमिळीत वाटतेय. देवेंद्रला प्रमोट केले जातेय असे दिसतेय पण इतरांचे काय ? किमान आदर वाटावा असा एक जण तरी आहे काय ? (दुसर्‍या बाजूला आहे का? असा प्रश्न याचे उत्तर नव्हे)

In reply to by श्रीगुरुजी

"खामोश गुर्जी-! " उधोजी राजे वाघाची नक्क्ल करीत गुर्गुरले. "तुम्ही आमच्या पक्षाला काय शू शेणा समजला काय? खबरदार ! काही सत्य सांगाल तर ! मायभवानीची आन घून सांगतो. १५१ पयकी १५२ जागा जि़कणार त्याशिवाय चैन पडणार नाही आम्हाला.. कोण आहे रे तिकडे ? या गुर्जीला आमच्या समोरून आताच्या आता घेऊन जा कसे ! "

उत्तम विचार, ताबडतोब मातोश्रीला कळवा अमोल केळकर

In reply to by अमोल केळकर

कोणाच्या मातोश्रीला ? आमच्या मतोश्रीस कालच ऐकवून झाले आहे. बाकीच्यांनी आपापल्या मातोश्रीस कळवावे हवे असेल तर.. *lol*

अजून एक उपाय आहे. राष्ट्रवादी, खान्ग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे, रिपाई यांनी २८८ जागा वाटून घ्याव्यात आणि शरद मामांना मुख्यमंत्री करावे. मंत्रीमंडळ सुद्धा वाटून घ्यावे. एकमेका सहाय्य करू, अवघे खाऊ कुरण.

In reply to by खटपट्या

हा हा हा.. हा सगळ्यात भारी उपाय आहे. तो आठवले तिकडे ठेवलेल्या बाईसारखा वागतोय.. शरद पवारांचा फोन आलाय म्हणून सांगतोय. तुम्ही नाही तर रा. कॉ बरोबर जाईन म्हणे. अरे काय जनाची नाय तर मनाची तरी..

'पोपट मेला आहे, शिवसेना-भाजप युती तुटली आहे', या चर्चेतली हवाच आज युतीच्या नेत्यांनी काढून टाकली आहे. शिवसेना-भाजप ही देशातील सर्वात जुनी युती कायम आहे आणि कायम राहील, अशी ग्वाही खुद्द शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभेच्या महासंग्रामात शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांची महायुती एकसाथ उतरणार असल्याचं निश्चित झालं आहे.
मटाची बातमी. हम तो ये पैलेईच बोला था.

युती संपुष्टात आल्यावर सेनेचा प्रथम शत्रू काँग्रेस-राष्ट्रवादी-मनसे नसून भाजप झाला आहे. उद्धव ठाकर्‍यांच्या कालच्या भाषणावरून त्याची प्रचीती आली. 'मला भाजपवर टीका करायची नाही' असे म्हणत ९० टक्के भाषण भाजपवरील टीकेने भरले होते. 'सामना'तील बहुतेक बातम्यात भाजपला शिव्या दिलेल्या असतात. महाराष्ट्राने ह्याला गाडले, त्याचा कोथळा बाहेर काढला, अमुकची बोटे तोडली, तमुकचे मस्तवाल हत्ती कापून काढले, आमचे वाघ यँव करतील, आमच्या डरकाळीने सर्वजण घाबरतील असली कंटाळवाणी भाषा सेना किती दिवस वापरणार आहे खुदा जाने.

In reply to by श्रीगुरुजी

महाराष्ट्राने ह्याला गाडले, त्याचा कोथळा बाहेर काढला, अमुकची बोटे तोडली, तमुकचे मस्तवाल हत्ती कापून काढले, आमचे वाघ यँव करतील, आमच्या डरकाळीने सर्वजण घाबरतील असली कंटाळवाणी भाषा सेना किती दिवस वापरणार आहे खुदा जाने.
या बाबत सहमत.. अशी भाषा वापरून नक्की काय साध्य होते कोण जाणे.

In reply to by हाडक्या

इतके दिवस भाजपा आणि मित्रपक्षांच्या गळ्यातगळे घालून फिरताना शिवसेनेला त्यांच्यात काही दोष दिसले नाहीत आणि आता युती तुटल्यावर लगेचच काटे टोचायला लागले वाटतं. भंपकपणा सगळा.