क्षितीज चांदणी......
लेखनविषय:
फिरुनी उगवली पुन्हा लाजरी
चांदणी ती क्षितीजावरी …
डोळे तिचे भिरभिर अवघे
शोधी साजणा दूर नभी ….
सैरभैर निळ्या नयनी तिच्या
तो येण्याचे भास खेळती ….
क्षणात हसरी क्षणात बावरी
तिच्या चेहर्याचे रंग बदलती ….
हळूच लपलेला ढगा आडूनी
चांद हासला खट्याळ परी ….
लपंडाव प्रीतीचा अबोल
आभास गोड अंतरंगी ….
चंद्राच्या चांदण्यात मग
अवघी रात्र न्हाऊन निघाली ….
थरथरनाऱ्या ओठांपरी
चांदणीही शहारून गेली ….
प्रेमात आकंठ बुडुनी रात्र मग
अवघा रंग निळा झाला ….
चंदेरी झालर स्वप्नांची लेऊन
गंध श्वासात मिसळूनी गेला ….
वाचने
1595
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
छान लिहिलय.
In reply to छान लिहिलय. by कवितानागेश
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by माझं आभाळ
मिपावर स्वागत आहे
In reply to मिपावर स्वागत आहे by एस
हो...