सायकलींग करताना..
सायकलींगच्या धाग्यावर मिळालेला प्रतिसाद आणि मिपाकरांचा उत्साह बघुन ट्रेक करताना.. सारखीच हा धागा काढायची कल्पना सुचली.
"काहीतरी वेगळे" या कल्पनेवरून माझी सायकलींगची सुरूवात झाली. सायकलची निवड आणि पुढची प्रगती त्या धाग्यात आली आहेच. या धाग्यात आपण सायकलींग करताना घ्यावयाची काळजी आणि इतर माहितीची देवाणघेवाण करू.
महत्वाचे - पुढील सर्व माहिती भारतात वापरल्या जाणार्या हौशी सायकलींगच्या अनुषंगाने दिली आहे. रेसींग सायकल किंवा अतीप्रगत सायकलसाठीची माहिती वेगळी असू शकते.
मी निष्णात सायकलपटू नाही. त्यामुळे एखादी माहिती बरोबर नसेल तर बिन्धास्त सांगा. मलाही नवीन शिकायला मिळेल.
**********************************************************************************************
सायकलचे प्रमुख भाग-
ही सायकल मुख्यतः कसरतीचे प्रयोग आणि प्रदर्शनीय कार्यक्रमांमध्ये करामती करण्यासाठी वापरतात. (मी हायब्रीड सायकलवर कसरतीचे प्रयोग करून आपटल्याने या सायकलच्या वाटेस गेलो नाही ;) )
ही रेसींग सायकल म्हणून आपल्याला परिचित आहे. वजनाला एकदम हलकी, सायकलचा एकंदर आकार आणि बसण्याची व्यवस्था एरोडायनामिक्स विचारात घेवून तयार केलेले असतात. हवेचे कमीतकमी घर्षण, विशिष्ट प्रकारचे गुळगुळीत टायर त्यामुळे ही सायकल अत्यंत वेगवान असते.
या सायकलचा आकार विचित्र दिसत असला तरी ही सायकल बसल्यानंतर खूप आरामदायी असते.
(या सायकलची मला फारशी माहिती नाही)
MTB सायकल ही खाचखळग्यांच्या रस्त्यावरून आणि अत्यंत खराब रस्त्यांवरून जाण्यासाठी उपयोगी पडते.
दणकट फ्रेम, जाऽऽड; मोठे व मजबूत टायर्स, टायरवर असलेली भरपूर नक्षी आणि वजनाला बर्यापैकी जड असलेली ही सायकल खूप मजबूत असते. टायरची जाडी, मजबुती आणि नक्षीमुळे ही सायकल रस्त्यावरती व्यवस्थीत पकड घेते. ही सायकल चिखल, वाळू किंवा खडीवरून सहजासहजी घसरत नाही.
ही सायकल जड असल्याने ती चालवण्यासाठी जास्त श्रम घ्यावे लागतात.
आपण मुख्यतः शहरात किंवा ठीकठाक डांबरी रस्त्यावरून सायकल चालवणार असल्यास ही सायकल योग्य ठरते. चांगल्या कंपनीची हायब्रीड सायकल असेल तर थोडा खराब रस्त्यावरही सायकलला काही फरक पडत नाही. (येथे खराब रस्ता = डांबराचा स्पर्शही न झालेला मातीचा रस्ता किंवा भरपूर खड्डे असलेला रस्ता असेही गृहीत धरले तरी हरकत नाही.)
मोठे टायर्स (२८ इंच), कमी जाड आणि टायरवर कमी नक्षी असल्याने ही सायकल रस्त्यावरून वेगाने जाते आणि जास्त श्रम करावे लागत नाहीत.
जाडीला कमी आणि थोडे नाजूक टायर्स असल्याने ही सायकल लगेचच पंक्चर होते. अगदी दुमडलेल्या स्टेपलर पिन मुळे सुद्धा आमच्या ग्रूपमधली एक सायकल पंक्चर झालेली आहे..!
आणखी सायकलचे प्रकार असल्यास मला माहिती नाहीत. युनीसायकल वगैरे चालवण्यात किती लोक्स उत्साही असतील माहिती नाही. ;)
सायकलमध्ये गिअर्स दोन ठिकाणी असतात मागच्या चाकांजवळ आणि पेडल्स जवळ. मागच्या चाकांजवळ ६ ते ९ आणि पुढे शक्यतो ३ गिअर व्हील असतात ज्यावरून चेन फिरते. २४ गिअर्सची सायकल म्हणजे चाकांजवळ ८ आणि पेडल्स जवळ ३ गिअर्स असलेली सायकल.
सायकलची सर्वसाधारण गुणवत्ता ठरवताना किती गिअर्स आहेत आणि कोणत्या प्रतीचे आहेत या गोष्टी अत्यंत महत्वाच्या ठरतात.
गिअर्स हे मुख्यतः शिमानो कंपनीचे असतात.
सायकलच्या मध्यमश्रेणीमध्ये शिमानो टर्नी, अल्टस, अॅसेरा, अॅलिव्हिओ आणि ड्योरे ही गिअरच्या प्रकारांची नावे आहेत. गुणवत्तेनुसार टर्नी हे सर्वात खालचे तर ड्योरे हे सर्वात वरचे गिअर्स आहेत. याहूनही अद्ययावत गिअर्स असतात परंतु त्या सायकलची किंमत दीड ते दोन लाखांच्या घरात जाते.
सायकलची किंमत ठरताना सायकलची कंपनी, फ्रेमचे मटेरीयल, गिअरचा प्रकार, सोबत असणार्या सोयी (सस्पेन्शन, डिस्क ब्रेक्स, अॅडजेस्टेबल स्टेम) वगैरे गोष्टी महत्वाच्या ठरतात.
सर्वसाधारणपणे चांगल्या सायकलसाठी किमान २० हजारांची गुंतवणूक करावी लागते. अॅक्सेसरीज आपण घेण्यानुसार असतात त्यासाठी पाच-सहा हजार रूपये वेगळे लागतात.
सायकल चालवताना हेल्मेट वापरणे अत्यंत आवश्यक असते. दुचाकी वापरताना हेल्मेट जितके आवश्यक आहे तितकेच सायकल चालवतानाही हेल्मेट गरजेचे असते. हे हेल्मेट हाय ग्रेड थर्मोकॉलचे असते. वरील फोटोमध्ये जो निळा पॅच दिसतो आहे तो पॅच आणि बाजूची काळी पट्टी यांमुळे हेल्मेट घातल्यानंतर आपल्या डोक्याभोवती एक रिंग तयार होते ती रिंग घट्ट / सैल करण्याची सोय असते. हेल्मेट घट्ट बसल्यानंतर लाल क्लिप असलेला पट्टा हनुवटीखाली घेवून हेल्मेट पक्के बसवावे.
हेल्मेट निवडताना त्याची पुढची गोल बाजू आपल्या चेहर्याच्या किमान दोन इंच पुढे यावी. नाकाच्याही पुढे; त्यामुळे चुकून अपघात झालाच तर पहिला आघात हेल्मेटवर होतो आणि चेहरा बचावतो.
मी कोकणवारी करताना सायकलवरून पडलो त्यावेळी मी ताम्हिणी घाट उतरण्यास सुरूवात केली होती आणि सायकल बर्यापैकी वेगात होती. मी अक्षरशः पाण्यात सूर मारतो तसा दगड आणि काचांमध्ये सूर मारला होता. आघात इतक्या जोरात झाला होता की माझ्या हेल्मेटला तडे गेले, पण मला फक्त चेहर्याला खरचटले आणि हाताला मुका मार लागला. त्यामुळे हेल्मेट वापरावेच अशी आग्रहाची विनंती - स्वानुभवावरून. ;)
सायकलींग हेल्मेट किमान १ हजार रूपयांना मिळते.
२) लाईट्स
रात्रीचे सायकलींग करणार असाल तर उत्तम प्रकाश देणारे लाईट्स गरजेचे असतात. रस्त्याकडेला पडलेले काटे, टोकदार फांद्या, काचा किंवा खिळे न दिसल्याने अपघात / पंक्चर होतात.
चांगला आणि प्रखर प्रकाश देणारे लाईट्स थोडे महाग असतात - ३,५००/- ते ४,०००/- रूपये. आमच्या सायकल ग्रूपमधल्या सर्वांनी असे लाईट्स भारताबाहेरून मागवले आहेत. मी अजून रात्रीचे सायकलींग सुरू केले नाहीये.
सायकलला टेललाईट्स असणे गरजेचे असते कारण 'समोर एक सायकल आहे' हे मागच्या गाड्यांना लवकर दिसणे खूप महत्वाचे असते. त्यामुळे स्वत:च्या सुरक्षीततेसाठी टेललाईट्स गरजेचे असतात.
माझे दोन ब्रॅंडेड टेललाईट्स अनवधानाने पडल्यामुळे मी चायनीज लाईट्स वापरतो. रू. १००/- ;)
३) सायकलींग शॉर्ट्स
जर आपण दूरवर किंवा जास्त वेळ सलग सायकलींग करणार असाल (एक ते दीड तासांपेक्षा जास्त) तर वरील प्रकारची सायकलींग शॉर्ट्स वापरणे हितावह असते.
या शॉर्ट्सचे कापड वेगळ्या प्रकारचे असते (Breathable) आणि शरिराला एकदम चिकटून बसणारे फिटींग असल्याने सायकल चालवताना पायांच्या हालचालींमध्ये सहजता येते. या शॉर्ट्सला आतून एक कुशन / जेलची सीट जोडलेली असते त्यामुळे सायकलची सीट टोचत नाही आणि सायकलवर बसल्यानंतर आपल्याला सुयोग्य आधार मिळतो. आपण किती वेळ सायकलींग करणार त्यानुसार शॉर्ट्स वापरावी. ८ तास सायकलींग करणार असल्यास ८ तासांची किंवा जास्ती वेळाची शॉर्ट्स वापरावी. कमी प्रतीची वापरल्यास त्रास होवू शकतो.
शॉर्टस् ची किंमत १०००/- ते ३०००/- रू. असते.
४) जेल सीट
जेल सीट ही सुध्हा सायकल चालवताना शरिराला योग्य आधार मिळावी म्हणून वापरावयाची असते.
सायकलींग शॉर्ट्स असताना जेल सीट वापरावी की वापरू नयेत असे दोन प्रवाद आहेत. आपण आपल्याला सोयीस्कर असेल तो पर्याय निवडावा.
मी शॉर्ट्स आणि जेलसीट दोन्ही वापरतो.
जेलसीट पाण्यात भिजू देवू नये, हे कापड पाणी शोषून घेते. किंमत ६००/- ते ८००/-
५) ग्लोव्हज
सायकलींग ग्लोव्हज वापरणे हातांना आरामदायक असते. या ग्लोव्हजमध्ये जे पॅचेस दिसत आहेत ते जेल पॅचेस आहेत ते पॅचेस आपल्या तळव्याला बसणारे हादरे कमी करतात. अर्धेच ग्लोव्हज असल्याने हाताचा घाम जास्तवेळ टिकत नाही. वरील फोटोमध्ये उजव्या अंगठ्याला लागून दिसणारी काळी पट्टी टर्कीशच्या टॉवेलसारख्या मटेरीयलची आहे. अगदी छोटी दिसत असली तरी घाम पुसायला एकदम उपयोगी पडते. किंमत ८००/- रू.
६) एर्गो ग्रीप -
थोडीशी चिकन लेगपीस सारखी दिसणारी ही ग्रीप तळव्याच्या "हार्ट एरीया"ला, हाताच्या Carpals नामक हाडांना आणि आजूबाजूच्या स्नायूंना सपोर्ट करते. मी दोन तीन महिने गोल ग्रीप वापरून नंतर या प्रकारची ग्रीप बसवली. ही अत्यंत आरामदायी ग्रीप असते. किंमत - कंपनीनुसार - ६००/- ते १८००/- रू.
७) बॉटल होल्डर / बॉटल केज
सायकलींग करताना पाणी पिणे अत्यंत आवश्यक आते. शरीरातली पाण्याची पातळी खालावली तर त्याचे गंभीर परिणाम होवू शकतात. सायकल चालवताना पाणी पिण्यासाठी दरवेळी थांबणे शक्य नसते त्यामुळे सायकलला बॉटल होल्डर बसवून घ्यावेत. सायकलला बॉटल होल्डर बसवण्यासाठी दोन ठरलेल्या जागा असतात. तितके पाणी पुरेसे असते. एखाद्या थांब्या दरम्यान पाणी पुन्हा भरून घ्यावे. किंमत १००/- रू.
८) पंक्चर किट
सायकल पंक्चरली की सायकल चालवण्याच्या उत्साहावर पाणी पडते आणि अनेकदा पंक्चर काढण्याचा आळस केल्यानेही सायकल घराबाहेर निघत नाही. एक पंक्चर किट सोबत ठेवावे. पंक्चर किट मध्ये टायर उघडण्यासाठी दोन बोथट स्क्रू-ड्रायव्हरसारखी पाती, रबर पॅच, रबर चिटकवण्यासाठी लागणारे जेल आणि एक पॉलीश पेपर इतके साहित्य आवश्यक असते. एक पोर्टेबल पंपही घ्यावा. हलके आणि हायड्रॉलीक तत्वावर चालणारे हवेचे पंप सहज उपलब्ध आहेत आणि त्यांचे हँडल सोडवता येत असल्याने सहज सोबत ठेवता येतात.
पंप - २००/- रू आणि संपूर्ण पंक्चर किट १०० रू पर्यंत येते.
९) अॅलन की सेट / स्क्रू ड्रायव्हर सेट / स्वीस नाईफ
बहुतेक सर्व आधुनीक सायकल्सना साधे / स्टार स्क्रू आणि नट बोल्टची जोडणी नसते. अॅलन की ने उघडता येणारे सर्व स्क्रू असतात. आपल्या सायकलच्या प्रकारानुसार उपयोगी असा अॅलन की सेट / स्क्रू ड्रायव्हर सेट सोबत ठेवावा. एक वेगळा स्वीस नाईफही जवळ बाळगावा. हे सेट हार्डवेअरच्या दुकानात मिळतात. किंमत - कंपनीनुसार २५०/- रू. ते कितीही..
१०) वेगवेगळे पाऊच
सायकलच्या आकाराच्या आणि प्रकाराला अनुसरून वेगवेगळे पाऊच मिळतात. आपल्याला योग्य वाटेल असा पाऊच घ्यावा. मोबाईल, गोळ्या चॉकलेट्स आणि नेहमी लागणार्या वस्तू लगेच हाताला येतील अशा पद्धतीने ठेवण्यासाठी हे पाऊच उपयोगी पडतात.
इतके सगळे वापरण्याची आवश्यकता आहे का..?? या प्रश्नाचे उत्तर मला देता येणार नाही. मात्र आपण आपली व सायकलची योग्य काळजी घेतल्याने सायकलींग हा एक सुखद अनुभव ठरतो आणि "उद्या सायकलींग करायचे आहे!" ही भावना टिकून राहते.
**********************************************************
हा धागा इंटरॅक्टीव्ह स्वरूपाचा असावा अशी अपेक्षा आहे. नवीन सूचनांचे स्वागत आहे!
या सूचना खूप जास्ती झाल्या असे वाटण्याची शक्यता आहे - जितक्या उपयोगी वाटतील तितक्या घ्याव्यात. ;)
सर्व छायाचित्रे अंतर्जालावरून - साभार.

(समाप्त.)
सायकलची निवड.
आपण कोणत्या प्रकारच्या रस्त्यावर सायकल चालवणार आहोत आणि का चालवणार आहोत; एखादी रेस, इव्हेंट की स्वान्तसुखाय; त्यानुसार सायकलचा प्रकार ठरवावा. सायकलमध्ये मुख्यतः चार प्रकार असतातBMX सायकल
ही सायकल मुख्यतः कसरतीचे प्रयोग आणि प्रदर्शनीय कार्यक्रमांमध्ये करामती करण्यासाठी वापरतात. (मी हायब्रीड सायकलवर कसरतीचे प्रयोग करून आपटल्याने या सायकलच्या वाटेस गेलो नाही ;) )
रोडबाईक
ही रेसींग सायकल म्हणून आपल्याला परिचित आहे. वजनाला एकदम हलकी, सायकलचा एकंदर आकार आणि बसण्याची व्यवस्था एरोडायनामिक्स विचारात घेवून तयार केलेले असतात. हवेचे कमीतकमी घर्षण, विशिष्ट प्रकारचे गुळगुळीत टायर त्यामुळे ही सायकल अत्यंत वेगवान असते.
या सायकलचा आकार विचित्र दिसत असला तरी ही सायकल बसल्यानंतर खूप आरामदायी असते.
(या सायकलची मला फारशी माहिती नाही)
MTB सायकल
MTB सायकल ही खाचखळग्यांच्या रस्त्यावरून आणि अत्यंत खराब रस्त्यांवरून जाण्यासाठी उपयोगी पडते.
दणकट फ्रेम, जाऽऽड; मोठे व मजबूत टायर्स, टायरवर असलेली भरपूर नक्षी आणि वजनाला बर्यापैकी जड असलेली ही सायकल खूप मजबूत असते. टायरची जाडी, मजबुती आणि नक्षीमुळे ही सायकल रस्त्यावरती व्यवस्थीत पकड घेते. ही सायकल चिखल, वाळू किंवा खडीवरून सहजासहजी घसरत नाही.
ही सायकल जड असल्याने ती चालवण्यासाठी जास्त श्रम घ्यावे लागतात.
हायब्रीड सायकल
आपण मुख्यतः शहरात किंवा ठीकठाक डांबरी रस्त्यावरून सायकल चालवणार असल्यास ही सायकल योग्य ठरते. चांगल्या कंपनीची हायब्रीड सायकल असेल तर थोडा खराब रस्त्यावरही सायकलला काही फरक पडत नाही. (येथे खराब रस्ता = डांबराचा स्पर्शही न झालेला मातीचा रस्ता किंवा भरपूर खड्डे असलेला रस्ता असेही गृहीत धरले तरी हरकत नाही.)
मोठे टायर्स (२८ इंच), कमी जाड आणि टायरवर कमी नक्षी असल्याने ही सायकल रस्त्यावरून वेगाने जाते आणि जास्त श्रम करावे लागत नाहीत.
जाडीला कमी आणि थोडे नाजूक टायर्स असल्याने ही सायकल लगेचच पंक्चर होते. अगदी दुमडलेल्या स्टेपलर पिन मुळे सुद्धा आमच्या ग्रूपमधली एक सायकल पंक्चर झालेली आहे..!
आणखी सायकलचे प्रकार असल्यास मला माहिती नाहीत. युनीसायकल वगैरे चालवण्यात किती लोक्स उत्साही असतील माहिती नाही. ;)
सायकलचे गिअर्स,
सायकलमध्ये गिअर्स दोन ठिकाणी असतात मागच्या चाकांजवळ आणि पेडल्स जवळ. मागच्या चाकांजवळ ६ ते ९ आणि पुढे शक्यतो ३ गिअर व्हील असतात ज्यावरून चेन फिरते. २४ गिअर्सची सायकल म्हणजे चाकांजवळ ८ आणि पेडल्स जवळ ३ गिअर्स असलेली सायकल.
सायकलची सर्वसाधारण गुणवत्ता ठरवताना किती गिअर्स आहेत आणि कोणत्या प्रतीचे आहेत या गोष्टी अत्यंत महत्वाच्या ठरतात.
गिअर्स हे मुख्यतः शिमानो कंपनीचे असतात.
सायकलच्या मध्यमश्रेणीमध्ये शिमानो टर्नी, अल्टस, अॅसेरा, अॅलिव्हिओ आणि ड्योरे ही गिअरच्या प्रकारांची नावे आहेत. गुणवत्तेनुसार टर्नी हे सर्वात खालचे तर ड्योरे हे सर्वात वरचे गिअर्स आहेत. याहूनही अद्ययावत गिअर्स असतात परंतु त्या सायकलची किंमत दीड ते दोन लाखांच्या घरात जाते.
सायकलची किंमत ठरताना सायकलची कंपनी, फ्रेमचे मटेरीयल, गिअरचा प्रकार, सोबत असणार्या सोयी (सस्पेन्शन, डिस्क ब्रेक्स, अॅडजेस्टेबल स्टेम) वगैरे गोष्टी महत्वाच्या ठरतात.
सर्वसाधारणपणे चांगल्या सायकलसाठी किमान २० हजारांची गुंतवणूक करावी लागते. अॅक्सेसरीज आपण घेण्यानुसार असतात त्यासाठी पाच-सहा हजार रूपये वेगळे लागतात.
सायकल घेताना काय काळजी घ्यावी.
१) सायकल घेताना सर्वप्रथम आपल्याला सोयीस्कर आणि आपल्या गरजेला योग्य असलेला सायकलचा प्रकार ठरवावा. २) गिअर्स कोणत्या प्रकारचे आणि किती हवेत तेही ठरवावेत. उदा. १-८ या गिअरच्या गुणोत्तराने आपण साधारणपणे ४० अंशाचा चढही आरामात चढू शकतो त्यामुळे आपण जर नेहमी भरपूर चढउताराच्या रस्त्यावरून / कोकणामध्ये सायकल चालवणार असल्यास जास्ती गिअर्स असावेत. ३) शहरां किंवा गावांमध्ये / डांबरी रस्त्यावर सायकलचा वापर होणार असेल तर हायब्रीड सायकल सर्वोत्तम ठरते. अन्यथा MTB सायकलचा पर्याय निवडण्यास हरकत नाही. ४) आपल्याला सोयीची आणि व्यवस्थीत अशा मापाची सायकल फ्रेम निवडावी. चुकीच्या फ्रेमची सायकल दीर्घकाळ वापरली तर शरीरावर अनावश्यक ताण येवून खांदे आणि पाठीला दुखापत होवू शकते. ५) आपण ज्या वेगाने जातो त्या वेगाला डिस्क ब्रेकची आवश्यकता नसते त्यामुळे शक्यतो डिस्क ब्रेक टाळावेत. ६) सायकलचे सर्विसींग कोठे करून मिळणार आहे त्याची नीट चौकशी करावी व तेथले मेकॅनीक सायकलचे तज्ञ असावेत. ७) घरी सायकल ठेवण्यासाठी सुयोग्य जागा आहे का..? नसल्यास तशी सोय करून घ्यावी. सायकल ठेवण्याची उत्तम जागा म्हणजे आपल्या घराची गॅलरी; अन्यथा पार्किंगमध्ये एखाद्या गाडीला साखळीने बांधून ठेवावी. तेही शक्य नसेल तर पार्किंगमधील एखाद्या कॉलमला हूक ठोकून घ्यावा व साखळी त्यातून ओवून घ्यावी. ८) बाहेर फिरतानाही सायकल नजरेआड होवून देवू नये. सायकल खूप पटकन चोरीला जाते. माझ्या सायकलींगच्या (आहे तितक्या) अनुभवावरून सायकल कशी नसावी याचे काही ठोकताळे तयार झाले आहेत. १) सायकल खूप जड नसावी. डबल चिमटा, कॅरीयरवाल्या सायकल आपल्याला अकारण दमवतात. २) सायकल खूप लहान (२४" टायर) साईझची शक्यतो नसावी. ३) चुकीच्या आकाराच्या फ्रेमची सायकल कधीही चालवू नये. ४) मध्ये सस्पेंशन स्प्रिंग असलेल्या प्रकारची सायकल शक्यतो टाळावी. या सायकलच्या उभ्या सस्पेंशन मुळे आपण सायकल चालवताना सीटवर बसल्यामुळे Vertical Force तयार होतो आणि सायकल रस्त्याला समांतर जात असताना जो वेग पकडलेला असतो त्या वेगाला हा Vertical Force लक्षणीयरीत्या कमी करतो. उदा.
सायकल चालवताना लागणारी आयुधे (अॅक्सेसरीज ;) )
सायकलींगसाठी लागणार्या आवश्यक त्या सर्व अॅक्सेसरीज वापराव्यात असे माझे आग्रही मत आहे. या अॅक्सेसरीजमुळे सायकल चालवताना अनावश्यक ताण येवून वेदना होणे / दुखापत होणे वगैरे प्रकार न होता सायकलींग हा एक सुखद अनुभव ठरतो. १) सायकलींग हेल्मेट -
सायकल चालवताना हेल्मेट वापरणे अत्यंत आवश्यक असते. दुचाकी वापरताना हेल्मेट जितके आवश्यक आहे तितकेच सायकल चालवतानाही हेल्मेट गरजेचे असते. हे हेल्मेट हाय ग्रेड थर्मोकॉलचे असते. वरील फोटोमध्ये जो निळा पॅच दिसतो आहे तो पॅच आणि बाजूची काळी पट्टी यांमुळे हेल्मेट घातल्यानंतर आपल्या डोक्याभोवती एक रिंग तयार होते ती रिंग घट्ट / सैल करण्याची सोय असते. हेल्मेट घट्ट बसल्यानंतर लाल क्लिप असलेला पट्टा हनुवटीखाली घेवून हेल्मेट पक्के बसवावे.
हेल्मेट निवडताना त्याची पुढची गोल बाजू आपल्या चेहर्याच्या किमान दोन इंच पुढे यावी. नाकाच्याही पुढे; त्यामुळे चुकून अपघात झालाच तर पहिला आघात हेल्मेटवर होतो आणि चेहरा बचावतो.
मी कोकणवारी करताना सायकलवरून पडलो त्यावेळी मी ताम्हिणी घाट उतरण्यास सुरूवात केली होती आणि सायकल बर्यापैकी वेगात होती. मी अक्षरशः पाण्यात सूर मारतो तसा दगड आणि काचांमध्ये सूर मारला होता. आघात इतक्या जोरात झाला होता की माझ्या हेल्मेटला तडे गेले, पण मला फक्त चेहर्याला खरचटले आणि हाताला मुका मार लागला. त्यामुळे हेल्मेट वापरावेच अशी आग्रहाची विनंती - स्वानुभवावरून. ;)
सायकलींग हेल्मेट किमान १ हजार रूपयांना मिळते.
२) लाईट्स
रात्रीचे सायकलींग करणार असाल तर उत्तम प्रकाश देणारे लाईट्स गरजेचे असतात. रस्त्याकडेला पडलेले काटे, टोकदार फांद्या, काचा किंवा खिळे न दिसल्याने अपघात / पंक्चर होतात.
चांगला आणि प्रखर प्रकाश देणारे लाईट्स थोडे महाग असतात - ३,५००/- ते ४,०००/- रूपये. आमच्या सायकल ग्रूपमधल्या सर्वांनी असे लाईट्स भारताबाहेरून मागवले आहेत. मी अजून रात्रीचे सायकलींग सुरू केले नाहीये.
सायकलला टेललाईट्स असणे गरजेचे असते कारण 'समोर एक सायकल आहे' हे मागच्या गाड्यांना लवकर दिसणे खूप महत्वाचे असते. त्यामुळे स्वत:च्या सुरक्षीततेसाठी टेललाईट्स गरजेचे असतात.
माझे दोन ब्रॅंडेड टेललाईट्स अनवधानाने पडल्यामुळे मी चायनीज लाईट्स वापरतो. रू. १००/- ;)
३) सायकलींग शॉर्ट्स
जर आपण दूरवर किंवा जास्त वेळ सलग सायकलींग करणार असाल (एक ते दीड तासांपेक्षा जास्त) तर वरील प्रकारची सायकलींग शॉर्ट्स वापरणे हितावह असते.
या शॉर्ट्सचे कापड वेगळ्या प्रकारचे असते (Breathable) आणि शरिराला एकदम चिकटून बसणारे फिटींग असल्याने सायकल चालवताना पायांच्या हालचालींमध्ये सहजता येते. या शॉर्ट्सला आतून एक कुशन / जेलची सीट जोडलेली असते त्यामुळे सायकलची सीट टोचत नाही आणि सायकलवर बसल्यानंतर आपल्याला सुयोग्य आधार मिळतो. आपण किती वेळ सायकलींग करणार त्यानुसार शॉर्ट्स वापरावी. ८ तास सायकलींग करणार असल्यास ८ तासांची किंवा जास्ती वेळाची शॉर्ट्स वापरावी. कमी प्रतीची वापरल्यास त्रास होवू शकतो.
शॉर्टस् ची किंमत १०००/- ते ३०००/- रू. असते.
४) जेल सीट
जेल सीट ही सुध्हा सायकल चालवताना शरिराला योग्य आधार मिळावी म्हणून वापरावयाची असते.
सायकलींग शॉर्ट्स असताना जेल सीट वापरावी की वापरू नयेत असे दोन प्रवाद आहेत. आपण आपल्याला सोयीस्कर असेल तो पर्याय निवडावा.
मी शॉर्ट्स आणि जेलसीट दोन्ही वापरतो.
जेलसीट पाण्यात भिजू देवू नये, हे कापड पाणी शोषून घेते. किंमत ६००/- ते ८००/-
५) ग्लोव्हज
सायकलींग ग्लोव्हज वापरणे हातांना आरामदायक असते. या ग्लोव्हजमध्ये जे पॅचेस दिसत आहेत ते जेल पॅचेस आहेत ते पॅचेस आपल्या तळव्याला बसणारे हादरे कमी करतात. अर्धेच ग्लोव्हज असल्याने हाताचा घाम जास्तवेळ टिकत नाही. वरील फोटोमध्ये उजव्या अंगठ्याला लागून दिसणारी काळी पट्टी टर्कीशच्या टॉवेलसारख्या मटेरीयलची आहे. अगदी छोटी दिसत असली तरी घाम पुसायला एकदम उपयोगी पडते. किंमत ८००/- रू.
६) एर्गो ग्रीप -
थोडीशी चिकन लेगपीस सारखी दिसणारी ही ग्रीप तळव्याच्या "हार्ट एरीया"ला, हाताच्या Carpals नामक हाडांना आणि आजूबाजूच्या स्नायूंना सपोर्ट करते. मी दोन तीन महिने गोल ग्रीप वापरून नंतर या प्रकारची ग्रीप बसवली. ही अत्यंत आरामदायी ग्रीप असते. किंमत - कंपनीनुसार - ६००/- ते १८००/- रू.
७) बॉटल होल्डर / बॉटल केज
सायकलींग करताना पाणी पिणे अत्यंत आवश्यक आते. शरीरातली पाण्याची पातळी खालावली तर त्याचे गंभीर परिणाम होवू शकतात. सायकल चालवताना पाणी पिण्यासाठी दरवेळी थांबणे शक्य नसते त्यामुळे सायकलला बॉटल होल्डर बसवून घ्यावेत. सायकलला बॉटल होल्डर बसवण्यासाठी दोन ठरलेल्या जागा असतात. तितके पाणी पुरेसे असते. एखाद्या थांब्या दरम्यान पाणी पुन्हा भरून घ्यावे. किंमत १००/- रू.
८) पंक्चर किट
सायकल पंक्चरली की सायकल चालवण्याच्या उत्साहावर पाणी पडते आणि अनेकदा पंक्चर काढण्याचा आळस केल्यानेही सायकल घराबाहेर निघत नाही. एक पंक्चर किट सोबत ठेवावे. पंक्चर किट मध्ये टायर उघडण्यासाठी दोन बोथट स्क्रू-ड्रायव्हरसारखी पाती, रबर पॅच, रबर चिटकवण्यासाठी लागणारे जेल आणि एक पॉलीश पेपर इतके साहित्य आवश्यक असते. एक पोर्टेबल पंपही घ्यावा. हलके आणि हायड्रॉलीक तत्वावर चालणारे हवेचे पंप सहज उपलब्ध आहेत आणि त्यांचे हँडल सोडवता येत असल्याने सहज सोबत ठेवता येतात.
पंप - २००/- रू आणि संपूर्ण पंक्चर किट १०० रू पर्यंत येते.
९) अॅलन की सेट / स्क्रू ड्रायव्हर सेट / स्वीस नाईफ
बहुतेक सर्व आधुनीक सायकल्सना साधे / स्टार स्क्रू आणि नट बोल्टची जोडणी नसते. अॅलन की ने उघडता येणारे सर्व स्क्रू असतात. आपल्या सायकलच्या प्रकारानुसार उपयोगी असा अॅलन की सेट / स्क्रू ड्रायव्हर सेट सोबत ठेवावा. एक वेगळा स्वीस नाईफही जवळ बाळगावा. हे सेट हार्डवेअरच्या दुकानात मिळतात. किंमत - कंपनीनुसार २५०/- रू. ते कितीही..
१०) वेगवेगळे पाऊच
सायकलच्या आकाराच्या आणि प्रकाराला अनुसरून वेगवेगळे पाऊच मिळतात. आपल्याला योग्य वाटेल असा पाऊच घ्यावा. मोबाईल, गोळ्या चॉकलेट्स आणि नेहमी लागणार्या वस्तू लगेच हाताला येतील अशा पद्धतीने ठेवण्यासाठी हे पाऊच उपयोगी पडतात.
इतके सगळे वापरण्याची आवश्यकता आहे का..?? या प्रश्नाचे उत्तर मला देता येणार नाही. मात्र आपण आपली व सायकलची योग्य काळजी घेतल्याने सायकलींग हा एक सुखद अनुभव ठरतो आणि "उद्या सायकलींग करायचे आहे!" ही भावना टिकून राहते.
सायकल चालवताना घ्यावयाची काळजी / काही सुचना..
१) वेग आणि संतुलन सायकल चालताना नेहमी रस्ता आणि रहदारीच्या अंदाजाने योग्य वेगामध्ये सायकल चालवावी. शहरातून सायकल चालवताना अचानक वळणारी वाहने किंवा बागेत फिरल्यासारखे फिरणारे पादचारी यांची काळजी घ्यावी. सायकलची फ्रेम चाके वगैरे दणकट असली तरी मोटारसायकल धडकली तर मोडतोड होते. त्यामुळे सायकलची काळजी करतच सायकल चालवावी. २) थांबलेल्या गाड्या थांबलेल्या गाड्यांच्या बाबतीत अचानक दार उघडण्याचा धोका असतो. त्याची काळजी घ्यावी. थोडे अंतर राखूनच सायकल चालवावी. ३) आहार / पाणी दूरवरचे सायकलींग करताना आहाराची योग्य काळजी घ्यावी. खूप तिखट, मसालेदार, जळजळीत पदार्थ किंवा मिसळ, तर्री सारख्या गोष्टी शक्यतो टाळाव्यात. इडली किंवा पोहे ब्येष्ट. जेवणानंतर थोडा वेळ विश्रांती घ्यावी - किमान ३० मिनीटे. जेवण झाल्याझाल्या लगेचच सायकलवर स्वार होवू नये. ४) सोबत घ्यावयाचे सामान सायकल राईडला निघताना पंक्चर किट, पंप, पाणी सोबत असावे. सोबतच्या वस्तू एखाद्या सॅकमध्ये नीट भरलेल्या असाव्यात म्हणजे फक्त सायकलींगवर लक्ष केंद्रीत करता येते. ५) सॅक / बॅगपॅक सायकलींग करताना कमीतकमी वजन वागवायचे असल्याने सायकलींगसाठी वापरावयाची सॅक शक्य तितकी हलकी असावी. सॅकचे सर्व पट्टे नीट बांधलेले असावेत आणि सॅकचा कोणताही भाग सायकल चालू असताना चाकात अडकणार नाही याची काळजी घ्यावी. सॅक भरताना, नेहमी लागण्यार्या वस्तू, क्वचित लागणार्या वस्तू अशी विभागणी करावी व त्यानुसार सॅक भरावी. न लागणार्या वस्तू. उदा ड्रायव्हींग लायसन्स, सोबत नेवू नयेत. पैसे, एखादे डेबीट आणि क्रेडीट कार्ड वगैरे जवळ बाळगावे. ६) लाईट आणि रिफ्लेक्टर्स लाईट आणि रिफ्लेक्टर्स आपल्या सुरक्षिततेसाठीच असतात. ते नियमीतपणे वापरावेत. पेडलला असलेले रिफ्लेक्टर्स नेहमी स्वच्छ ठेवावेत. ७) गॉगल्स सायकलींग करताना गॉगल्सचा वापर आवर्जून करावा. खूप वेळ उन्हात सायकलींग करताना डोळ्यांवर भरपूर ताण येतो. आपापल्या सवयीनुसार काळजी घ्यावी. उन्हातील सायकलींग मुळे शरीरही भरपूर काळे पडते (टॅन होते) त्याची काळजी करणार्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. ८) अनोळखी सायकलस्वार आपल्याला अनोळखी सायकलस्वार दिसल्यास एखादी साधी गोष्ट "हात उंचावणे" किंवा "चीअर अप" करणे खूप सोपे असते. तितके केले तरी दोघांचाही उत्साह नक्की वाढेल. हा धागा वाचणार्या वाहनचालकांना नम्र विनंती. वाहन चालवताना तुम्हाला एखादा सायकलस्वार दिसला तर त्याला नक्की प्रोत्साहन द्या. अगदी थांबून अभिनंदन करण्याची गरज नाही परंतु हात उंचावण्यासारखी एखादी कृती समोरच्याला सुखावून जावू शकते.
**********************************************************
हा धागा इंटरॅक्टीव्ह स्वरूपाचा असावा अशी अपेक्षा आहे. नवीन सूचनांचे स्वागत आहे!
या सूचना खूप जास्ती झाल्या असे वाटण्याची शक्यता आहे - जितक्या उपयोगी वाटतील तितक्या घ्याव्यात. ;)
सर्व छायाचित्रे अंतर्जालावरून - साभार.
**********************************************************
(समाप्त.)
वाचने
80301
वाचनखूण
प्रतिक्रिया
89
मस्त माहिती.
In reply to मस्त माहिती. by कवितानागेश
अरेरे, किती ती मी पयली
सलाम !
भारी
वाटच पहात होतो.
In reply to वाटच पहात होतो. by आदूबाळ
त्या सायकल्स "लीजर बाईक्स
In reply to त्या सायकल्स "लीजर बाईक्स by मोदक
'रोडस्टर बाइक' नावाने शोधले
मोदक गुर्जी एम.टी.बी.
In reply to मोदक गुर्जी एम.टी.बी. by कॅप्टन जॅक स्पॅरो
हिरो किंवा क्रॉस कंपनीची ८५००
In reply to मोदक गुर्जी एम.टी.बी. by कॅप्टन जॅक स्पॅरो
चांगली घ्यायला जाल तर ३० च्या
In reply to चांगली घ्यायला जाल तर ३० च्या by शैलेन्द्र
ह्या दुव्यातली किंमत वाचुन
In reply to ह्या दुव्यातली किंमत वाचुन by कॅप्टन जॅक स्पॅरो
तशा याहूनही जास्त किमतीच्या
मस्त माहीती..
In reply to मस्त माहीती.. by शैलेन्द्र
तुमच्या सायकलच्या रीअर व्ह्यु
In reply to तुमच्या सायकलच्या रीअर व्ह्यु by मोदक
नक्की पाठवतो.. बेसिकली कारमधे
In reply to नक्की पाठवतो.. बेसिकली कारमधे by शैलेन्द्र
दंडावर ऐवजी कोपरावर किंवा
मस्त धागा रे मोदका!!!!! लय
मला ताठ बसून रिलॅक्स्ड मध्ये
In reply to मला ताठ बसून रिलॅक्स्ड मध्ये by बॅटमॅन
तुम्ही हाय्ब्रीड/MTB बाईक
In reply to मला ताठ बसून रिलॅक्स्ड मध्ये by बॅटमॅन
हायब्रीड \ MTB सायकलचा आकार
In reply to हायब्रीड \ MTB सायकलचा आकार by मोदक
वा रे मोदका. एकदा नक्की येईन,
उपयुक्त सूचना. आवडल्या.
चांगला माहितीपुर्ण लेख. आवडला
व्यासंग म्हणतात तो हाच असावा.
हे घ्या अजून एक प्रक्रारhttp:
कधी काळी सायकलिंग करायचा
जबरदस्त माहिती...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हिंदी-चिनी.. नेमके काय?In reply to जबरदस्त माहिती... by मदनबाण
गिअर बदलताना पॅडल मारणे
In reply to जबरदस्त माहिती... by मदनबाण
गीअर बदलताना पायडल मारावाच
In reply to गीअर बदलताना पायडल मारावाच by शैलेन्द्र
@ बाळ सप्रे / शैलेन्द्र
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Arjuna... Arjuna... ;) { Aai (ஏய்) Tamil Movie }In reply to जबरदस्त माहिती... by मदनबाण
सायकलचे गियर मोटारसायकलच्या
माझी दणकट रोडबाईक आहे आणि
In reply to माझी दणकट रोडबाईक आहे आणि by पिंगू
अरे पिंगू त्या धाग्यातला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हिंदी-चिनी.. नेमके काय?In reply to अरे पिंगू त्या धाग्यातला by मदनबाण
काय राव. चेहरा लवकरच विसरला
मोदकराव,
In reply to मोदकराव, by ज्ञानोबाचे पैजार
ब्रेकचे रबर बरोब्बर रिमला
In reply to मोदकराव, by ज्ञानोबाचे पैजार
सायकलचे मॉडेल कोणते आहे?
उपयुक्त लेख. एकूणच तुमच्या
In reply to उपयुक्त लेख. एकूणच तुमच्या by विअर्ड विक्स
धन्यवाद...!
आता माझी एक शंका...
In reply to आता माझी एक शंका... by मोदक
जेल सीट वापरु नये या मताचा मी
In reply to आता माझी एक शंका... by मोदक
सायकलची सीट थोडी तिरपी बसवून
In reply to आता माझी एक शंका... by मोदक
पॅडेड शॉर्ट घालाल तर जेल सीट
In reply to पॅडेड शॉर्ट घालाल तर जेल सीट by शैलेन्द्र
ह्म्म... प्रयत्न करतो.
In reply to ह्म्म... प्रयत्न करतो. by मोदक
मी एक साधी शॉर्ट घेतलीये,
In reply to मी एक साधी शॉर्ट घेतलीये, by शैलेन्द्र
रोड ७०० मिळाली नाही म्हणून
In reply to आता माझी एक शंका... by मोदक
सीट कव्हर एक साईज छोटे बसवून
मस्त धागा!
छान माहिती. अजून घर ते ऑफिस
धन्यवाद...
हायला आम्ही कधी सायकली विषयी
थोडास्साच पाठदुखीसारखा त्रास
In reply to थोडास्साच पाठदुखीसारखा त्रास by टवाळ कार्टा
कॉलींग डॉक्टर खरे...
बादवे.... पुण्यातल्या
कोणा मिपाकरांकडे जूनी वापरात
मस्त लेख...
थोडा विरंगुळा हवाच जीवनात!
उपयुक्त माहिती मोदकराव.
गियरच्या एका प्रकारात जिथे
In reply to गियरच्या एका प्रकारात जिथे by llपुण्याचे पेशवेll
हब गीअर्स..?
In reply to हब गीअर्स..? by मोदक
हम्म
बुलेटिंग करताना असा धागा कधी
Mahiti kharach khup chan ahe.
मदत
In reply to मदत by लई भारी
माँट्रा फडके हौदाजवळ किंवा
In reply to माँट्रा फडके हौदाजवळ किंवा by मोदक
धन्यवाद!
In reply to मदत by लई भारी
बोडके सायकल फालतू दुकान आहे..
इथले पण फोटो अपडेट केले आहेत.
माझ्याकडे ट्रेक ची 4300 D
In reply to माझ्याकडे ट्रेक ची 4300 D by संदीप डांगे
मागच्या महिन्यात मला सायकल
In reply to मागच्या महिन्यात मला सायकल by मोदक
तुम्ही आत्ता चालवताय तीच
In reply to तुम्ही आत्ता चालवताय तीच by संदीप डांगे
ही सायकल घेवून दगडातून जाताना
In reply to ही सायकल घेवून दगडातून जाताना by मोदक
दुसरी घ्या! ;))
In reply to दुसरी घ्या! ;)) by संदीप डांगे
ही पण आहे हो.. फक्त वापरली
In reply to ही पण आहे हो.. फक्त वापरली by मोदक
Wow!!
सायकल
सायकल
सायकल
सायकल
In reply to सायकल by भ ट क्या खे ड वा ला
आपल्या हायब्रीड सायकलला दोन
जेल पॅंट ..
In reply to जेल पॅंट .. by भ ट क्या खे ड वा ला
बरोबर आहे. चांगली जेल वाली
माझ्या मते सायकल शॉर्ट किंवा
In reply to माझ्या मते सायकल शॉर्ट किंवा by अप्पा जोगळेकर
>>माझ्या मते सायकल शॉर्ट
कोणती घ्यावी
सायकलिंग साठी शूज कोणते
जल्ला या फोटोंचं काहीतरी करा
'Lectro essentia tx', 'Lectro
आता वाकडला सुद्धा हायवे लगत