Skip to main content

"अखेर सेना-भाजप युती तुटली?" .........

लेखक पगला गजोधर यांनी शुक्रवार, 19/09/2014 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
"अखेर सेना-भाजप युती तुटली?" अश्या आशयाची बातमी मटा च्या वेबसाईट झळकली आहे, थोडक्यात खालीलप्रमाणे मजकूर आहे. "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी सुमारे २५ वर्षांपूर्वी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ज्या युतीची मुहूर्तमेढ रोवली होती, ती शिवसेना-भाजप युती तुटल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजतं. पुढच्या महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या महासंग्रामात हे दोन्ही पक्ष स्वबळावर रणांगणात उतरणार आहेत. चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याऐवजी हा गुंता वाढतच गेला, नेत्यांचे 'इगो' आड येत गेले, कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत गेल्या आणि या खेचाखेचीचं पर्यवसान युती तुटण्यात झालं. सेना-भाजपची २५ वर्षांपासूनची दोस्ती तुटल्याच्या बातमीनं राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे." आता खरंच जर असे झाले तर ? (कल्पना करा), राजकीय समीकरण कसे कसे असेल ? * सर्व पक्ष अपने दमपे * (भा ज प + म न से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) वि (कॉ + राकॉ + इ ) वि (शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) *(भा ज प + राकॉ ) वि (कॉ (शि से बरोबर छुपी युती )) वि (शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) * किंवा दुसरे काही पर्मुटेशन कॉम्बीनेशन

वाचने 35818
प्रतिक्रिया 186

प्रतिक्रिया

:)

युती तुटली हे एका अर्थाने चांगलेच झाले . आता शिवसेना भाजप दोघांनाही आपापली औकात कळेल निवडणुक हरल्यावर दोघेही होश मधे येतील ! शिवाय निवडणुक जिंकल्यावर आपल्या त्या निमित्तने का होईना पण राहुल बाबा चे दर्शन होईल , बरेच दिवस काही ओरीजीनल कॉमेडी ऐकली नाही राव ! बाकी आता पवार साहेब अन राजसाहेब ह्या दुफळीचा फायदा कसा उठराजसाहेब्पाहणे औत्सुक्याचे ठरेल :)

In reply to by प्रसाद गोडबोले

आता राष्ट्र्वादीचे आमदार निवडणुकीनंतर लाली, लिपस्टीक लावुन उभे राहणार आणि जो जास्त पैसे देइल त्याच्याबरोबर जाणार काँग्रेस असो, भाजपा असो नाहीतर सेना.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

शिवसेना आणि इंदिरा काँग्रेस युती होती १९७९ साली ! तेंव्हा सेनावाले ओठाला काय लावुन बसले होते?

मित्रान्नो, आता खरंच जर असे झाले तर ? (कल्पना करा), राजकीय समीकरण कसे कसे असेल ? १ सर्व पक्ष अपने दमपे २ (भा ज प + म न से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) विरुद्ध (कॉ + राकॉ + इ ) विरुद्ध (शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) ३ (भा ज प + राकॉ ) विरुद्ध (कॉ (शि से बरोबर छुपी युती )) विरुद्ध (शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) ४. किंवा दुसरे काही पर्मुटेशन कॉम्बीनेशन

मित्रान्नो, आता खरंच जर असे झाले तर ? (कल्पना करा), राजकीय समीकरण कसे कसे असेल ? १ सर्व पक्ष अपने दमपे २ (भा ज प + म न से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) विरुद्ध (कॉ + राकॉ + इ ) विरुद्ध (शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) ३ (भा ज प + राकॉ ) विरुद्ध (कॉ (शि से बरोबर छुपी युती )) विरुद्ध (शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) ४. किंवा दुसरे काही पर्मुटेशन कॉम्बीनेशन

मिपावर आम्ही नेहमीच एक पालूपद लावत असतो. आपली लोकशाही ही एक भंपक प्रक्रिया आहे. आतापर्यंत १२० कोटी लोकांपकी एकानेही आम्हाला " पक्ष" या शब्दाची व्याख्या नेमकी कोणत्या कायद्यात वा कोणत्या घटनेत सांगितलेली आहे हे इसकटून सांगितलेले नाही. लोकांचे मत हे आपल्या निवडणूक प्रक्रियेत फार फसवे आहे. त्याचे नीट प्रतिबिंब ना कायदा बनविताना होते ना सरकार बनविताना. कोण्त्याही विषयावर सार्वमत घेण्याची तर भारतात पद्धतच नाही. ते घेतले तर अल्पसंख्याकांचे राजकारण कसे खेळता येणार अशी अडचण असू शकेल. म्हणून कार्यकर्ता व राजकारणी यांची एक लुटारू जमात आपण १९५० साली जन्माला घातली आहे. पाच वर्षातून फक्त एकदा मत द्यायचे ते ही प्रमाणशीर महत्व नसलेले. यापलिकडे भारतीय जनतेच्या हातात आहे काय ? सत्तेच्या व्यापाराचा हा नंगा नाच वी द पीपल ऑफ इंडियाने सुरू केला आहे आणि त्याचे परिणाम आपणच भोगणार आहोत.

युती तुटेल असे वाटत नाही..... तुटलीच तर सेनेला जास्त फायदा होऊ शकतो. भाजपाकडे महाराष्ट्रासाठी कोणताही चेहरा नाही. गोपीनाथ मुंडेंची कमतरता तर भासणार...

युती तुटली ? ती होणार ....निवडणुकांच्या आधी असो वा नंतर ....महाराष्ट्र कुणा ही एका पक्षाला मिळणार नाही हे धाग्यातला प्रतिसादातुनच दिसतय ...प्रश्न आहे की किंगमेकर कोण होणार :)

अजुनही प्रश्नचिन्ह आहे!! पक्की बातमी नाही. पण मोदीलाटेच्या जोरावर मिळालेल्या यशाबद्दल सेनेने कृतज्ञता दाखवायला हवी. कमी जागा आल्या तरी मीच मुख्यमंत्री हा उद्धव ठाकरेंचा पवित्रा योग्य नाही.

मान्य पण पण भाजपाकडे तरी कुठे आहे मुख्यमंत्र्यासाठी योग्य उमेदवार ?? तावडे अभ्यासु आहेत ..आणि फडविसांना विदर्भाच्या पलीकडे जग आहे की नाही ते माहीत नाही ..बाकी तर पोर टोरंच आहे ...

तोफा डागायला एकेक बुरुज वाढला प्रत्येक पक्षाकडे पण सामान्य माणसाकडे कांदे बटाटे तुरडाळ ठेवायला साधे कपाट नाही तिजोरी कुठून आणणार?

मुंबईची ताकद काय ? इंग्रज काळापासून मुंबई बेट आणि आताची मुंबई हि भारताची आर्थिक राजधानी आहे आणि तिला हे रूप द्यायला हजारो उद्यमशील लोकांचा हातभार आहे. हि मुंबई मराठी माणसाच्या हातात राहावी म्हणून संयुक्त महाराष्टाच्या आंदोलनात अनेक लोक हुतात्मा झालेत हि मुंबई शिवसेनेच्या ताब्यात राहावी ह्यासाठी आणि आपल दिल्लीदरबारी राजकारण अबाधित राहावं म्हणून वसंतराव नाईक , वसंतदादा पाटील ते शरद पवार सर्वांनी हस्ते परहस्ते मदत केलेली आहे हा सगळा इतिहास झाला आता मुंबईच भविष्य काय आहे ? लोकांना वाटतंय कि मुंबईवर भाजपला सत्ता हवीय , पण कोणत्या भाजपला ? फडणवीस ,तावडे, खडसेंच्या भाजपला कि मोदी शहांच्या भाजपला ? मोदींना शहाना मुंबई मुळात नकोच आहे , त्यांना शिवसेनेचं खच्चीकरण करायचं आहे आणि देशाच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात ठेवायच्या आहेत. मित्र पक्ष असला तरी त्याच खच्चीकरण करून आपली ताकत वाढवण हे प्रत्येकच धोरण असतच आणि त्यालाच राजकारण म्हणतात . कालपरवाची मोदींची पावलं त्याच दिशेने पडतात आहेत. चीनचे प्रधानमंत्री दिल्ली मुंबई सोडून आधी अहमदाबादमध्ये येतात , सामंजस्य करार करतात तोही गुजरात सरकारबरोबर ? चीन बरोबर गुजरातच्या प्रधानमंत्र्यांनी जे करार केलेत आणि ज्या पद्धतीने सगळ्या योजना गुजरातमध्ये नेल्या जात आहेत ते पाहता त्यांचा उद्देश स्पष्ट आहे. मुंबईत असणारे गुजराती फक्त पैशाशी बांधील आहेत त्यांना बाकी काही घेण देण नाही मराठी अस्मिता आणि मुंबईशी असणारी भावनिक बांधिलकी ह्या गोष्टी आपल्या मराठी माणसाच्या आहेत गुज्जुना त्याच्याशी काही कर्तव्य नाही. उद्या जर मोठे उद्योग व्यवसाय , जसे हिऱ्याचा व्यापार गुजरातमध्ये जाणार आहे तस उद्या अहमदाबादजवळ जर स्मार्ट सिटी वसवली आणि उद्योगांना पाठबळ दिल तर हि आर्थिक राजधानी तिकड सरकायला वेळ लागणार नाही मुंबई शेअर बाजारचा आत्मा पैसा आहे , जर तिकड तितक्याच ताकदीचा शेअर बाजार उभा राहिला तर मग तो हि प्रश्न सुटेल व्यापारी लोकांना काय कुठेही धंदा करायचा आहेच आणि जागतिकीकरणाच्या जमान्यात कुठेही बसून तुम्ही जगात व्यवहार करू शकता आणि एकदा मुंबईच आर्थिक महत्व कमी झाल कि शिवसेनेचं कंबरडे मोडलच म्हणून समजा कारण शिवसेनेच्या राजकारणच आर्थिक स्त्रोत मुंबई आहे हे उघड आहे मग खुशाल शिवसेना मुंबई आमची म्हणून बोंब मारू देत , आर्थिकदृष्ट्या महत्व कमी झालेलं आणि पायाभूत सुविधांवर पडणारा जास्तीचा ताण सहन करताना मरायला टेकलेल हे शहर शिवसेनेच्या ताब्यात असण म्हणजे ओसाड गावची पाटीलकी दिल्यासारखं आहे. एकदा आर्थिक नाड्या आवळल्या कि शिवसेना खच्ची करण अजून सोप होईल तेव्हा मुंबई गुजरातमध्ये जाणार म्हणून आवई उठवण्यात काही अर्थ नाही आणि शहा मोदींना त्यात रसही नाही मराठी माणसाचा विरोध पत्करून हा उद्योग करण्यापेक्षा गुजरातमध्ये प्रतीमुंबई उभी करून आर्थिक राजधानी म्हणून अहमदाबाद किंवा एखाद नाव शहर पुढे आणायला त्यांना जास्त सोप जाईल मुंबईकर आणि शिवसेना ,, सावधान .. गाठ अत्यंत धूर्त आणि भावनाशुन्य लोकांशी आहे . श्रेय- आनन्द शितोळे (फेबु वरुन साभार) एक वेगळा मुद्दा. आप आपलि मत ताडुन बघा

In reply to by पिंपातला उंदीर

प्रतिसादातिल सगळं काही वादासाठी खरं मानलं तरी... मुंबईची अशीच किंबहुना यापेक्षा जास्त प्रगती (कारण मुंबई शतकभर अगोदरपासून व्यापारी शहर म्हणून प्रसिद्ध आहे) करायला कोणी आपले हात धरले होते/आहेत काय? "मुंबईची ताकद" म्हणून सुरुवात करायची आणि त्याच श्वासात "कोणी मुंबईचा गळा घोटतोय" असे म्हणायचे म्हणजे जरा जास्तच होतेय, नाही का ?! बलवानाने "दुसर्‍या कोणी मला अजून बलवान व्हायला मदत करायला पाहिजे" असे म्हणुन दुसर्‍याचे मिंधे राहण्यापेक्षा आपल्या प्रगतीचे प्रयत्न स्वतः करावे. म्हणजे असे दुसर्‍याच्या नावाने गळे काढायची गरज राहत नाही. निदान गेले काही दशके भारतातील सर्वात प्रगतिशील राज्य म्हणून शेखी मिरवणणार्‍या राज्यातिल नागरिकाच्या तोंडी वरचा सर्वच प्रतिसाद दवणिय (हा शब्द मिपाच्या सौजन्याने :) ) आणि अगतिक वाटतो आहे. एक अभिमानी मराठी माणूस म्हणून मला हे वाचून खरंच अत्यंत शरमेचे वाटले ! महाराष्ट्र आणि मराठी माणूस काही इतका रस्त्यावर पडलेला नाही. जरा बरे सुजाण आणि सत्शिल नेते फार मोठा फरक घडवून आणू शकतील. मात्र ते सुजाणपणे निवडणे मराठी माणसाच्याच हातात आहे. सरळ सरळ इतका कांगावा करण्याने बहुतेक हसेच होते... कारण इतरांना डोळे, कान व बुद्धी असते (हे कांगावा करण्याच्या भरात बहुतेक विसरले जाते :) ) ज्या देशांत "देशांतर्गत चढाओढ" आहे तेच देश इतर देशांशी चढाओढ करून जगात पुढे आलेले आहेत.

In reply to by पिंपातला उंदीर

बरय की मग. तेवढेच ते यु.पी. बिहारी भैय्ये तिकडे जातील. महराष्ट्रावरचा ताण कमी होईल. आणि एक पुणेकर असुनही मुंबईचं कौतुक करतोय आता. कुणीही कितीही काहीही केलं तरी मुंबईचं महत्त्व कमी होणार नाही. प्रती मुंबई गुजरातमधे उभी राहु शकेल पण तरीही मुंबई ती मुंबईच. एक म्हणजे मुंबईच्या अर्थकारणाचा आवाका लक्षात घेतला तर मुंबईमधला सेट व्यवसाय सोडुन गुजरातमधे नव्यानी व्यवसाय सुरु करण्याएवढे लोकं मुर्ख नाहीत. फार तर तिकडे शाखा सुरु करतील, तिकडुन कारभार चालवतील. पण आहे ती गुंतवणुक राहाणारच. हा अपप्रचार फक्त आणि फक्त द्वेशापोटी चालु आहे. (न.मो. फॅण)

द्या जर मोठे उद्योग व्यवसाय , जसे हिऱ्याचा व्यापार गुजरातमध्ये जाणार आहे तस उद्या अहमदाबादजवळ जर स्मार्ट सिटी वसवली आणि उद्योगांना पाठबळ दिल तर हि आर्थिक राजधानी तिकड सरकायला वेळ लागणार नाही
हे इकडे करायला कोणी थांबवलंय? मुम्बै सोडा साधा सातार्‍यातही एखादा उद्योग उभा करायचा झाला तर तेथले नेते उद्योजकांकडे बर्‍याच मागण्या करतात. इथे असलेले उद्योग दुसर्‍या प्रान्तात जातात त्याबद्दल कोणी जराही वाटून घेत नाही. प्रत्येक गावात एमआयडीसी ओसाड पडलेली दिसते. बंद पडलेल्या गिरण्या पुन्हा सुरू करायला महाराष्ट्र सरकारचे हात कोणी बांधलेले होते? अहमद नगरची कायनेटीक इंजीनियरिंग , सातार्‍याची महाराष्ट्र स्कूटर्स , हे कारखाने कित्येक वर्षे बंदच आहेत. क्षमता असूनही कोणतेच उत्पादन होत नाही. ही उदाहरणे बोलकी आहेत. कॉम्ग्रेस असो की इतर कोणी. नव्या गोष्टी / कारखाने उभ्या करायला नकोत आणि जर इतर राज्यानी सोयी सुविधा दिल्या तर मात्र इथले उद्योग इतरत्र नेले अशी ओरड करायला मोकळे. दिल्लीत भाजप मधे महाराष्ट्राचे खासदार आहेत की ते असे प्रयत्न का करीत नाहीत महाराष्ट्रात केवळ शिवसेनाच उद्योग आणते असा भ्रम जोपासला आहे. सेनेने इथे असे कोणते नवे उद्योग आणले यांची कोणी यादी देईल का?

In reply to by नानासाहेब नेफळे

आम्ही त्यांना फाट्यावर मारतो.. तरीही मुजरे घालणारे भरपूर आहेत आणि आमच्या नशीबी जी शिवाजी महाराजांच्या नावे (त्यांच्या नावाला न शोभणारी) राजेशाही आलेली आहे त्याला काहीही उपाय नाही म्हणून जास्तच हळहळ, बाकी काही नाही. तुम्ही परत तुमच्या वळणावर आलेले पाहून आनंद वाटला.. ;)

In reply to by विजुभाऊ

मराठी लोकांची उद्योग करायची लायकी नाही. हे लोक मजूर म्हणून सुद्धा काम करू शकत नाहीत. जिथे तिथे जातीयवादी आणि कंपूबाज गोष्टी करत असत्तात. जास्तीत जास्त हे लोक चहाची टपरी, वडापावची गाडी, लोकांना अडवणारे रिक्षावाले असली कामं करत फिरतात. आणि मग हा कसा बाहेरचा आहे, तो कसा भटजी-शेटजी पैकी आहे, तो कसा महाराष्ट्राला विकायला चाललाय आणि माझा जातिय्वादीपणा कसा चांगला आहे असल्या चर्चा करत बसतात. एक गंमत सांगतो. ईंटरव्ह्यू घेताना मुसलमान सुद्धा मराठी लोकांपेक्षा चांगली चमक दाखवतात.

In reply to by काळा पहाड

धाग्याला अपेक्षित हवा द्यायचा प्रयत्न आणि मराठी लोकांच्या बाबतीत प्रत्येक गोष्टीचं जनरलायजेशन पाहून अंमळ गम्मत वाटली.. नक्की तुम्ही मराठी आहात का ? असल्यास आणि नसल्यास या तुम्हीच दर्शवलेल्या स्थितीपेक्षा वेगळे काही घडावे यासाठी आपला छोटासा का होईना पण प्रयत्न जाणून घ्यायची इच्छा आहे. अन्यथा मराठी माणूस नुसता तोंडाची हवा दवडण्यात कुठेही कमी पडत नाही असेही म्हणू शकाल मग तुम्ही.

In reply to by हाडक्या

१. मी मराठीतच लिहितोय नाही का? पण मी पर्फॉर्मन्स ला प्राधान्य देतो आणि तिथं मराठी लोक बरेच कमी पडतात. मी गुप्ता बरोबर काम करतोय की पटेल बरोबर की सुब्रमण्यम बरोबर यात मला फरक पडत नाही. पण मराठी लोक कंपूबाजी करून काम न करण्याचा प्रयत्न करतात असा माझा अनुभव आहे. अर्थात हा महाराष्ट्रातला अनुभव आहे. तामिळ्नाडू मधे कदाचित तामिळ लोक्स ही तसंच करू शकत असावेत पण त्याच्याशी माझा संबंध नाही. २. मला या गोष्टीत कसलाही प्रयत्न करावा अशी माझी इच्छा नाही कारण त्यात माझा वेळ फुकट जातो. मी इतकं लिहिलय ते सुद्धा कामातून सवड काढून लिहितोय.

In reply to by काळा पहाड

मी इतकं लिहिलय ते सुद्धा कामातून सवड काढून लिहितोय नका हो एवढा त्रास घेऊ . महाराष्ट्र / मराठी माणस दबून जातील उपकाराच्या 'पहाड ' खाली

In reply to by पिंपातला उंदीर

दबणे, उपकार, त्रास घेणे, मोडेन पण वाकणार नाही, अस्मिता, सहन करणार नाही, रक्त उसळणे, प्रेमात 'पडणे'.. मराठी माणसांची शब्दावली टिपीकल असते ना?

In reply to by विजुभाऊ

नव्या गोष्टी / कारखाने उभ्या करायला नकोत आणि जर इतर राज्यानी सोयी सुविधा दिल्या तर मात्र इथले उद्योग इतरत्र नेले अशी ओरड करायला मोकळे. सहमत. मराठी माणसाची निष्क्रियता, शेरेबाजी आणि आळस माझ्या सारख्या लहानातलहान व्यावसायिकालाही जाणवतो.

In reply to by विजुभाऊ

पुण्याच्या आसपास च्या उद्योग वसाहतीत कॉ आणि रा़काँ च्या लोकांची खंडणीखोरी इतकी वाढली आहे की छोट्या उद्योजकाला धंदा करणे शक्यच नाही. मोठे उद्योजक थेट वरच पैसे पुरवतात आणि निभावुन नेतात, छोटे आणि मध्यम उद्योजक पार मेले आहेत ह्या गुंडगीरीने.

@विजुभाऊ तुमच्या प्रतिसादाशी सहमत . . वरचा मी दिलेला प्रतिसाद हा एक नवीन perception म्हणून फेबु वरून शेयर केला . पण त्या प्रतिसादातल्या bottomline शी मात्र मी सहमत आहे . मुंबईकर आणि शिवसेना ,, सावधान .. गाठ अत्यंत धूर्त आणि भावनाशुन्य लोकांशी आहे आमच परभणी शिवसेनेचा औरंगाबाद आणि मुंबई पेक्षा मोठा बालेकिल्ला . वर्षानु वर्ष सेनेचे आमदार आणि खासदार इथून सतत निवडून जात आहेत . पण शहराला ओरबाडून खाण्याशिवाय आणि लोकांना भडकावून दंगे करण्याशिवाय त्यांनी काहीही केल नाही . परभणी पुरत (आणि महाराष्टात अशी अनेक शहर आहेत ) बोलायचं झाल तर सेना निवडून नाही आली तर परभणी साठी चांगलाच होईल . Fingers crossed

पन मुंबईच्या श्रीमंतीचा मराठी माणसाला काय उपयोग झाला ? मराठी माणूस कष्टकरी तो कष्ट्करीच राहीला, पूर्वीही म्हणजे शिवसेनेच्या बहारीच्या काळात आणि त्यापूर्वी ही मुंबईवर अर्थिक वर्चस्व पारसी - गुजराती लोकांचेच होते आणि आहे. दक्षिण मुंबई परिसरात पूर्वी ही आणि आता किती मराठी माणसे आहेत ? दादर - गिरगावातील मराठी माणूस केव्हाच उपनगरात चालता झाला. गिरण्यांबरोबर मुंबईतला मराठी टक्का ही घसरला. मग आज ज्या स्वरुपात मुंबई आहे , ती नेमकी कुणाची आहे ? की मराठी राज्यकर्ते असले म्हणजे मुंबई मराठी होते ? आणि या मराठी राज्यकर्त्यांनी मुंबईचे मराठीपण ... मराठीपण जाऊ द्या , मुंबईपण टिकावे म्हणून काय केले? तुम्ही म्हणता तशी , मोदी - शहा अशी गुजराती जोड-गोळी काम करत असेल तर ती गुजरातच्या उत्कर्षासाठी करते आहे मुंबईच्या खच्चीकरणासाठी नाही . मुंबईचे शांघाय करण्यापासून मराठी राज्यकर्त्यांचे हात कोणी बांधले होते? दोन्हीकडे तर कॉन्ग्रेसचीच सत्ता होती. दुसर्‍याची पुसण्यापेक्षा , तुम्ही तुमची रेष मोठी ओढा ना ! आणि व्यक्तिश: मला आता गुजरात मध्ये मोदिना काही इन्ट्रेस्ट असेल असे वाटत नाही. तसे असते तर त्यांनी बडोड्याची जागा सोडून दिली नसती. ते आता वरच्या पातळीवर आहेत. चीन चे करार अहमदाबाद मध्ये झाले असतील तर त्यांचा गुजरात हा कंफर्ट झोन आहे इत्काच अर्थ आहे. मोदी काय आणि शहा काय , दोघे ही आता राष्ट्रिय पातळीवरचे नेते आहेत. युती बाबत - बाळासाहेब काय आणि प्रमोद महाजन काय ( विथ ड्यु रिस्पेक्ट टू बोथ ) , पक्के सत्तापिपासू होते आणि सत्तेसाठी वाट्टेल ते .. करायला तयार होते अश्यातून या कृत्रिम युतीचा जन्म झाला. या शिवसेनेच्या हट्टापायी नारायण राणे सारख्या नामचीन गुण्डाला मुख्यमंत्री मह्णून स्वीकारावे लागले ! दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांचे स्वभाव वेगवेगळे आहेत / होते. कितीदिवस मारुन - मुटकुन एकत्र राहणार ? अपयशाचे खापर एकमेकांच्या डोक्यावर फोडण्यापलिकडे तसेही युतीत फार सख्य राहीले नव्हते. बाळासाहेब - उद्धव - आदित्य ही वारसदारी भाजपच्या लोकांनी पसंद पडणारी नव्हतीच. मोदी- शहांनी ७५ वर्षावरील आप्ल्याच नेत्यांना घरी बसविले , ते ही घराणेशाही चालू देतील असे वाटत नव्हते , पूनम महाजनलाच कशी काय संधी दिली .. असा एखादा अपवाद असू शकेल ) शिवाय भाजपच्या मातृसंघटनेला शिवसेनेचे अजिबात प्रेम नव्हते / नाही. संघाची ताकद हवी असेल तर शिवसेनेला बाजूला सारायला हवे हा धोरणीपणा मोदी - शहा आणि तावडे - फडणवीस यांच्याकडे आहे. प्रमोद महाजन ष्टाईल, सेना-राष्ट्रवादी संस्कृतीने राजकारण करण्याकडे आता भाजपचा कल नाही असे दिसते.

In reply to by विटेकर

ते ही घराणेशाही चालू देतील असे वाटत नव्हते , पूनम महाजनलाच कशी काय संधी दिली .. असा एखादा अपवाद असू शकेल
प्रतिसादाशी सहमत. मुंबईची वाट लावण्याचे संपूर्ण श्रेय शिवसेनेचे आहे. निव्वळ राडासंस्कृती आणि भावनिक ब्लॅकमेलिंग या आधारावर इतकी वर्षे हा पक्ष टिकून आहे. पुढेही टिकेल. मात्र महाराष्ट्रापुरत्या भाजपामध्ये घराणेशाहीचा एखादा अपवाद नसून रक्षा खडसे, पूनम महाजन, पंकजा मुंडे, असे किमान तीन अपवाद माहिती आहेत. मागील निवडणुकीत हीना गावित हाही एक नवा अपवाद त्यांनी अंतर्भूत केला आहे असे दिसते.

In reply to by हाडक्या

हाडक्या काका एकदम बरोबर. तो पक्ष म्हणजे "पार्टी विथ डिफरन्स" आणि स्वयंसेवकांचा पक्ष आहे. ज्या सेनेचा घराणेशाहीला कडाडून विरोध होता त्या सेनेची सुरवातच घराणेशाहीतुन झाली आहे. प्रबोधनकार नसते तर सेनेला इतकी प्रसिद्धी मिळाली नसती. काँग्रेसला वरवर विरोध करताना मुम्बैतील कामगार चळवळ कोणी सम्पवली ते सगळेच जाणतात. उगाच नव्हे सेनेला त्यावेळेस "वसंतसेना" म्हणायचे. सेनेने इंदिरा गांधीना विरोध करतानाच आणिबाणीत काय वर्तन केले होते तो इतिहास काही पुसला गेलेला नाहिय्ये. राजीवगाम्धीना घराणेशाही मुळे नावे ठेवताना सेनेने अगोदर मुलगा आणि नंतर नातू असा प्रवास चालू ठेवलाय. वाजपेयींचे १३ दिवसांचे सरकार ज्या एका मतामुळे पडले त्यावेळेस सेनेचे १ खासदार सदनात अनुपस्थित होते. सेनाप्रमुखाना त्यानी नम्तर स्पष्टीकरण दिले होते. त्या खासदारावर सेनेकडून कोणतीच कारवाई झाली नाही. एन्रॉन समुद्रात बुडवायची गर्जना रीबेका मार्कंच्या भेटीनंतर कुठे आणि कशी बुडाली हे जनतेच्या विस्मरणात गेले असेल. पण त्यातले व्यवहार सर्वसामान्यानाही ओळखता येतील.

In reply to by विजुभाऊ

वाजपेयींचे १३ दिवसांचे सरकार ज्या एका मतामुळे पडले त्यावेळेस सेनेचे १ खासदार सदनात अनुपस्थित होते.
स्व. नरसिहरावांचे सरकार अविश्वास प्रस्तावाला सामोरे जात असताना सेनेचे तत्कालीन खासदार मोहन रावले अनुपस्थित राहीले होते हे वाचले होते.

In reply to by विजुभाऊ

बरोबर माहिती देत येत नसेल तर किमान चुकीची माहिती पसरवू नका. मोहन रावले हे नरसिम्हा राव सरकारच्या अविश्वासमता वेळी गैरहजर होते. वाजपेयी सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेने नेहमीच साथ दिली होती. वाजपेयी समता - ममता-जयललिता वगैरे मुले बेजार झाले होते तेव्हा आपल्या कोट्यातील मंत्रिपद कमी करून यांना द्या असे बाळासाहेबांनी वाजपेयींना सांगितले होते. १९९९ ला एक मताने सरकार पडले कारण ऐनवेळी जयललिता पलटल्या. शिवसेना आणि अकाली दल या दोघांनीच केंद्रात कायम भाजपला साथ दिली आहे.

ती पंचतंत्रातील गोष्ट आहे. एक बेडुक इतर बेडकाना संपवायला साप आणतो. शिवसेनेने साप आणला. आता साप त्यानाच खातोय

मित्रांनो, धाग्यात दिलेल्या ऑप्शनस मधील, ऑप्शन की ज्यात भा ज प आणि राष्ट्रवादी जर एकत्र आले (छुप्या वा उघड) रीतीने, तर राजकीय समीकरण काय असेल ? किंवा भा ज प आणि मनसे जर उघड रीतीने एकत्र आले, (सोबत राष्ट्रवादी छुप्या रीतीने), तर राजकीय समीकरण काय असेल ? किंवा शिवसेना व कॉंग्रेस (छुप्या रीतीने) एकत्र आले, तर राजकीय समीकरण काय असेल ?

In reply to by पगला गजोधर

भाजपा आणी राष्ट्रवादी एकत्र आले (म्हणजे राकॉला सत्तेत स्थान मिळाणार असेल तर) तर मी एकवेळ आयसिसला मत देइन पण या दोघांपैकी एकाला देणार नाही. असला भडभुंजेपणा भाजपा करणार असेल तर मी आजन्म काँग्रेस बरोबर जाइन. भाजपा आणि मनसेने युती केली तर भाजपा मनातुन उतरेल पण तरीही त्यालाच मत देइन. भाजपाने काँग्रेसशी निवडणूकपुर्व युती केली तर भाजपाने बौद्धिक दिवाळखोरी जाहिर केली आहे असे समजुन मी राहुल गांधी की जय असे १००१ वेळा लिहुन काढिन आणी मिपावर चिकटविन. शिवसेनेने काहिही केल्यास मला फरक पडत नाही पण त्यांनी राष्ट्रवादीशी युती केल्यास त्यांच्यासारखे मुर्ख तेच असतील. असो. १३० जागांवर समाधान मानुन भाजपा युती पुढे चालु ठेविल याबाबत सध्या तरी शंका नाही आहे. थोड्या वेळापुर्वी ही बातमी खरी वाटली होती. पण आत्ता त्यात दम नाही. भाजपाला सेनेबरोबरची युती तोडणे महागात पडेल कारण अजुन राज्यसभेत ते संख्याबळात कमी आहेत. सद्यपरिस्थितीत किमान जॉईंट सेशनमध्ये तरी त्यांना आघाडी आहे. सेना बाहेर पडल्यास ते ही अवघडच जाइल.

In reply to by प्रसाद गोडबोले

आयसिसचा दुसराही अजून एक लाँगफॉर्म आहे बरंका प्रगो ;) http://en.wikipedia.org/wiki/Institute_for_the_Secularisation_of_Islami…

In reply to by मृत्युन्जय

भाजपाने काँग्रेसशी निवडणूकपुर्व युती केली तर भाजपाने बौद्धिक दिवाळखोरी जाहिर केली आहे असे समजुन मी राहुल गांधी की जय असे १००१ वेळा लिहुन काढिन आणी मिपावर चिकटविन. आवडलं... फक्त जराशी कंजूशी झालीय... "१०००००००१ वेळा" असं लिहायला पाहिजे होतं, जास्त भारी वाटलं असतं. या निवडणूकीपुरते तरी तुम्ही सुरक्षित आहात ;)

काही झाले तरी पुढील सीएम शिवसेनेचा असेल.

कुठलाही पक्ष सत्तेवर येऊ दे, मुख्यमंत्री कोण होणार हे, आमचे लाडके नेते शरदचंद्रजी पवारजीच ठरवणार आहेत हे लक्षांत ठेवा.

In reply to by तिमा

मुख्यमंत्री कोण होणार हे, आमचे लाडके नेते शरदचंद्रजी पवारजीच ठरवणार आहेत हे लक्षांत ठेवा.
हो ना. केंद्रात पंतप्रधान ठरवायच्या अगोदर सुद्धा अश्शीच गोग्गोड चर्चा चालू होती. काय झाले हे सर्वाना ज्ञातच आहे. भिगवण चौकाच्या वार्डात कोणता उमेदवार उभा करायचे ठरवायचे कोणी याची देखील अश्शीच चर्चा होईल काही दिवसानी.

In reply to by नानासाहेब नेफळे

>>> इतका काँन्फीडन्स बरा नव्हे ,पोट निवडुकात काय झाले ठाऊक आहे ना? पोटनिवडणुकांच्या निकालाविषयी देशात प्रथमच इतकी गंभीर चर्चा सुरू आहे हे पाहून आश्चर्य वाटले. १९४७ नंतरच्या कोणत्याही पोटनिवडणुकीच्या निकालाची इतकी चर्चा झाली नसेल किंवा त्या निकालाच्या आधारे सुतावरून स्वर्ग गाठला नसेल. असो. जरा सविस्तर निकाल पाहू. मे २०१४ नंतर १०-१२ राज्यांमधील एकूण ४७-४८ विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणुक झाली. ३ लोकसभा मतदारसंघामध्ये पण पोटनिवडणुक झाली. काही राज्यात फक्त १-२ मतदारसंघात पोटनिवडणुक झाली तर ३ राज्यात ९-११ जागांवर पोटनिवडणुक झाली. त्यात म.प्र.मध्ये भाजपने ३ पैकी २ व काँग्रेसने १ जागा जिंकली. कर्नाटकमध्ये काँग्रेसने २ व भाजपने १ जिंकली. पंजाबमध्ये काँग्रेस १ आणि अकाली द्ल १, उत्तराखंडमध्ये काँग्रेस ३, प. बंगालमध्ये तृणमूल १, भाजप १ , आसाममध्ये काँग्रेस, भाजप व तिसरा पक्ष प्रत्येकी १, उ.प्र.मध्ये सप ८/भाजप ३, गुजरातमध्ये भाजप ६/काँग्रेस ३, बिहारमध्ये भाजप ४/राजद्+संजद्+काँग्रेस ६ अशी साधारण परिस्थिती होती. या निकालांवरून मोदी लाट ओसरली, मोदींविषयी जनतेचा भ्रमनिरास झाला, जनतेने मोदींना धडा शिकविला, काँग्रेस परत येत आहे, भाजप बॅकफूटवर, इ. मांडे खाणे सुरू झाले. लोकसभेच्या ३ जागांवर जैसे थे स्थिती राहिली. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर मे २०१४ प्रमाणेच मतदान झाले हे दिसून आले. जर मोदी लाट ओसरली असती तर भाजपला बडोद्याची जागा का मिळाली असती? तसेच काँग्रेसला तेलंगणातील जागा का मिळाली नाही? गंमत म्हणजे काँग्रेसने दिल्लीसकट अनेक शहरांमध्ये पोटनिवडणुकीतील निकालांचा विजयोत्सव साजरा केला. पोटनिवडणुकीत मिळालेल्या २-४ जागांचा देशभर जल्लोष करावा इतकी वाईट वेळ कॉंग्रेसवर आली आहे. बिहार विधानसभेत मे २०१४ मध्ये एकमेकांविरूद्ध लढलेल्या राजद, संजद व काँग्रेसने एकत्र निवडणुक लढल्याने भाजपविरोधातील मतविभागणी टळल्याने त्यांना १० पैकी ६ जागा मिळाल्या हे उघड आहे. या परिस्थितीतसुद्धा भाजपला ४ जागा मिळाल्या. सर्व विरोधी पक्ष एकत्र येणे व मतविभागणी टाळणे हा मोदींविरूद्ध कौल कसा होऊ शकतो? डिसेंबर २०१५ मध्ये बिहार विधानसभेच्या निवडणुकीत हे संधीसाधू पक्ष एकत्र येणार नाहीत हे स्पष्ट आहे. कारण एकूण २४३ पैकी राजद व जदयु काँग्रेसबरोबर युती करून प्रत्येकी फक्त १०० च्या आसपास जागा लढविणे व काँग्रेसला ४३ जागा सोडणे अशक्य आहे. दोन्ही पक्ष किमान १५० जागांचा आग्रह धरतील. त्यामुळे ही संधीसाधू युती फक्त या पोटनिवडणुकीसाठी होती. या निकालांचा व मोदींच्या कारभाराचा काहीही संबंध नाही. उ.प्र.मध्ये सप ने ११ पैकी ८ जागा जिंकल्या. काँग्रेसला भोपळा मिळाला. पण काँग्रेसवालेच जास्त उड्या मारताहेत. प्रत्यक्षात बसप आणि सप यांच्या छुपा समझोता होऊन बसपने आपले उमेदवार उभे केले नव्हते. त्यामुळे बसपला मिळणारी सर्व मुस्लिम मते व काही दलित मते सप कडे गेली व त्यातूनच सप ला ८ जागा मिळाल्या. मोदी कारभाराचा व या विजयाचा काहीही संबंध नाही. २०१७ मध्ये उ.प्र. च्या विधानसभा निवडणुकीत बसप पुन्हा एकदा सर्व जागा लढवेल व त्यामुळे या पोटनिवडणुकींच्या निकालाची पुनरावृत्ती होणार नाही. गुजरातमध्ये ९ पैकी ३ जागा गमाविल्या तरी ६ जिंकल्या आहेत. त्यामुळे मोदी लाट ओसरली या विधानात तथ्य नाही. इतर राज्यात १-२ जागाच असल्याने निवडणुक फक्त स्थानिक प्रश्नावरच लढली गेली. तिथेही मोदी लाटेचा काहीही संबंध नाही. एकंदरीत काही राज्यातील २-४ पोटनिवडणुकीच्या निकालावरून मोदींच्या जेमतेम १०० दिवसांच्या राजवटीविषयी भाकीत करणे हा मूर्खपणाचा कळस आहे.

In reply to by श्रीगुरुजी

गुजरातमध्ये ९ पैकी ३, राजस्थानात ४ पैकी ३ जागा काँग्रेसला मिळाल्यात, यावरुन काँग्रेस पुन्हा रीव्हाईव होतेय व मोदींची भरती आता ओहोटीला लागली आहे हेच सिद्ध होते.युपीत ७२ लोकसभा सीट जिंकणारे बीजेपी १०० दिवसात ११ विधानसभेपैकी फक्त २ जागा जिंकतात, यावरुन मोदी लाट संपुष्टात येत आहे हे स्पस्ट आहे. बसपाने उमेदवार दिले नाहीत, पण त्यांच्यापाठीमागे असलेला वोटर भाजपा ऐवजी सपाकडे वळला यातच मोदींचा पराभव आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

>>> यावरुन काँग्रेस पुन्हा रीव्हाईव होतेय व मोदींची भरती आता ओहोटीला लागली आहे हेच सिद्ध होते. हो का? उ.प्र. मधील विधानसभेच्या ११ जागांपैकी किती जागा काँग्रेसला मिळाल्या हो? आणि लोकसभेच्या ३ जागांवरील पोटनिवडणुकांमध्ये किती जागा काँग्रेसने पटकावल्या? काँग्रेस होतेय असा तुमचा भ्रम झालाय म्हणून विचारतोय. >>> बसपाने उमेदवार दिले नाहीत, पण त्यांच्यापाठीमागे असलेला वोटर भाजपा ऐवजी सपाकडे वळला यातच मोदींचा पराभव आहे. मुळात तो व्होटर बेस मे २०१४ मध्ये भाजपाकडे नव्हताच. त्यामुळे तो भाजपा ऐवजी सपाकडे वळला हे विधान असत्य आहे. सपा ला स्वतःची व बसपची अशी दुप्पट मते मिळाल्याने पोटनिवडणुकीत ८ जागा मिळाल्या हे लक्षात घ्या. त्याचबरोबर हेही लक्षात घ्या २०१७ मध्ये होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीत बसप पुन्हा एकदा सर्व ४०३ जागा लढवेल व त्यावेळी पुन्हा एकदा ही मते सप कडून बसप कडे येतील व भाजपविरोधी मतांचे पुन्हा एकदा विभाजन होईल. त्यामुळे मोदी लाट ओसरली, काँग्रेस रिव्हाईव्ह होतेय अशा गैरसमजूतीतून दूर व्हा.

In reply to by श्रीगुरुजी

बसपाच्या मतदारांनी भाजपऐवजी सपा हा ऑप्शन का निवडला ,जर मोदी विकासपुरुष आहेत, महागाई कमी करत आहेत, तर तिथे भाजपला मते मिळायला हवीत! मे मध्ये ती मते भाजपकडे गेली नाहीत हा दावा आपण कोणत्या आकडेवारीतून करत आहात? जरी मान्य केले तरी १०० दिवसाच्या प्रचंड यशस्वी मोदीसरकारचा तिथल्या सपा बसपाच्या वोटरवर काहीच परिणाम झाला नाही का ? याचे दोनच अर्थ आहेत, पोटनिवडणुकित मत देणारे एक दोन कोटी मतदार मुर्ख आहेत किंवा मोदी लोकांना विकासाच्या नावाखाली फसवत आहेत व लोकांच्या लक्षात ही फसवणुक आली आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

>>> बसपाच्या मतदारांनी भाजपऐवजी सपा हा ऑप्शन का निवडला ,जर मोदी विकासपुरुष आहेत, महागाई कमी करत आहेत, तर तिथे भाजपला मते मिळायला हवीत! मुळात बसपचे (आणि सप चे सुद्धा) मतदार विकास, सुशासन, योग्य प्रशासन या मुद्द्यांवर मतदान करतच नाहीत. जात आणि धर्म यांवरच ते मतदान करतात. त्यामुळे मोदी विकासपुरूष असले किंवा नसले, मोदींनी महागाई कमी केली का नाही या मुद्द्यांवर मतदान न करता ते आपल्या जात/धर्म विचारांवर आधारीत जो पक्ष योग्य वाटतो त्यालाच मतदान करतात. बसपच्या अनुपस्थितीत त्यांना सप आपलासा वाटला यात काहीच नवल नाही. मे २०१४ मध्ये त्यांची मते बसप आणि सप या दोघात विभागली गेली होती. बसपच्या अनुपस्थितीत ती सप कडे गेली आणि म्हणून सप ला जास्त जागा मिळाल्या.

In reply to by श्रीगुरुजी

बसपाचे मतदार जात बघून मतदान करतात याची काही आकडेवारी द्याल का? बसपाची एकही लोकसभा सीट लागली नाही याचा अर्थ सपा बसपा यांचा वोटर मोदींकडे वळला होता, परंतु १०० दिवसाच्या गुजरातधार्जिण्या मोदींचा कारभार बघुन पुन्हा माहेरी परतला,हे पोटनिवडणुकीत स्पष्ट होते. राज्यातही काँ राकाँच्या पारंपारिक मतदाराने भाजपला वोट दिले, परंतु आता त्यांनाही मोदीच्या फक्त तोंडाच्या वाफा दवडण्याच्या सवयीचा साक्षात्कार झाल्याने राज्यात पुन्हा आघाडीचे सरकार येण्याची शक्यता आहे.

In reply to by श्रीगुरुजी

युपीत काँग्रेस हारली हे मान्य, परंतु भाजप स्ट्राँगहोल्ड राज्यात तिला विधानसभेत चांगले मतदान झाले आहे व चांगल्या सीट मिळाल्या, याचा अर्थ मोदींचा करिष्मा कमी होत आहे व त्यांची लाट ओसरली असाच घेता येतो .देशभरातल्या मिडीयाचेही तेच विश्लेषन आहे, अगदी शिवसेनेनेही भाजपला लाट ओसल्याचे ठणकावून सांगितले आहे. ते काँग्रेस रिव्हाईव्हल बाजूला ठेवू ,पण मोदी लाट डीप्राईव्ह होत आहे हे तरी मान्य करा गुरुजी तुम्ही .

In reply to by नानासाहेब नेफळे

>>> युपीत काँग्रेस हारली हे मान्य, परंतु भाजप स्ट्राँगहोल्ड राज्यात तिला विधानसभेत चांगले मतदान झाले आहे व चांगल्या सीट मिळाल्या, याचा अर्थ मोदींचा करिष्मा कमी होत आहे व त्यांची लाट ओसरली असाच घेता येतो . या निवडणुका रा़ज्यात झाल्या. केंद्रात नव्हे. त्यामुळे मोदींचा इथे संबंधच नाही. मोदी तिकडे प्रचाराला फिरकले पण नव्हते. लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यात सर्व पक्षांनी आपापल्या जागा राखलेल्या आहेत. त्यामुळे लोकसभेसाठी मे २०१४ मध्ये जो कल होता तोच आज कायम आहे. प. बंगालमध्ये २ पैकी १ जागा भाजपने मिळविली. तुमच्या विचित्र तर्कशास्त्रानुसार याचा अर्थ तिथे मोदींची लाट आली आहे असा घ्यावा लागेल. >>> देशभरातल्या मिडीयाचेही तेच विश्लेषन आहे, अगदी शिवसेनेनेही भाजपला लाट ओसल्याचे ठणकावून सांगितले आहे. शिवसेना नेते काय बडबडतात यावर तुम्हीच विश्वास ठेवा. बर. खालीच बातमी वाचा आणि मोदी लाट परत आल्याचे कबूल करा. छत्तीसगड >>> ते काँग्रेस रिव्हाईव्हल बाजूला ठेवू ,पण मोदी लाट डीप्राईव्ह होत आहे हे तरी मान्य करा गुरुजी तुम्ही . कशावरून? सध्या मे २०१४ सारखीच जैसे थे परिस्थिती आहे. कोणाचेही रिव्हाईव्हल होत नाहीय्ये आणि कोणीही डीप्राईव्ह होत नाहीय्ये.

रोचक चर्चा ! @ नानासाहेब नेफळे : धाग्याचा ट्यार्पी वाढवायचा सद्या काय रेट आहे ?! ;) (प्रामाणिकपणे केलेली विचारणा जमल्यास हघ्या :) )

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एक्का साहेब.. तुमचे धागे असे पण पापुलर असतेत.. कशाला नानासाहेबांना सुपारी देताय.. तुमच्या धाग्यांवर आले म्हन्जे २००-३०० शिवाय थांबायचे नाहीत ते. बादवे, असे पण ते फक्त राजकारणाच्या धाग्यांचे स्पेशालिष्ट आहेत.. तुमी तसला धागा काडला म्हनजे त्यांना 'विसरु' नका म्हणजे झालं. ;)