Skip to main content

पाबे घाट

पाबे घाट

Published on गुरुवार, 18/09/2014 प्रकाशित मुखपृष्ठ




जीवन आणि मृत्यू

Rosemary Leaved Balsam - लाल तेरडा या फुलाच्या नावाबद्दल मी थोडा साशंक आहे. कृपया जाणकारांनी मदत करावी.

Smithia Hirsuta - कवला

Graham's groundsel - सोनकी






याद्या 163940
प्रतिक्रिया 39

फोटो High Resolution मध्ये पाहायच्या असतील तर त्यांना कृपया Right Click करून New Window किंवा New Tab मध्ये उघडा.

In reply to by सुहास..

धन्यवाद. :) अहो सांगितले ना ! पाबे घाटातल्या फोटो आहेत सगळ्या. तो तिसर्‍या क्रमांकाचा फोटो घाटाच्या मध्यावरून काढलाय. तिथे एक छोटेसे मंदिर आहे आणि शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला फलक आहे.

सुंदर छायाचित्रं. जुन्या आठवणी जागवल्या. पाबे घाटाबद्दल माझी एक आठवण आहे. नविनच गाडी घेतली होती. मी सपत्नीक रायगडला निघालो होतो. मस्त पाऊस पडत होता. रस्त्यात एक बाई झाडाच्या आडोशाला उभी होती. पत्नीच्या परवानगीनेच तिला विचारलं 'कुठे जायचंय? कुठे सोडू का?' तिला घाट उतरून खाली कुठल्याशा गावात जायचं होतं. 'बसा गाडीत' म्हणालो. बसल्यावर धन्यवाद वगैरे देऊन झाले. आणि मी घाटाची वळणे गिरवायला सुरुवात केली. इथे तिची टकळी सुरू झाली. 'लय डेंजर घाट आहे. गेल्याच आठवड्यात एक बाबा, चांगला पट्टीचा चालवणारा बरं का! असाच पाऊस होता. गेला नं खाली गडगडत. नवरा, बायकू आनी पोरगं तिघंही मेले त्या अपघातात.' मला हसू आलं. मनात आलं आपणही तिघेच आहोत. बायको घाबरली. नेहमीचीच सवय. 'हळू चालवा हो' दम मारत होती. मला जास्तच हसू आलं. 'हसू नका भाऊ! खोटं न्हाई सांगत. दरवर्षी हिते अपघात होत्यात, मानसं मरत्यात. लई वंगाळ हाए हा घाट.' तो पर्यंत आम्ही घाट उतरून खाली आलो होतो. 'कुठ सोडायचं तुम्हाला.' 'आँ! संपला का घाट. हितंच फुडं सोडा देवळा जवळ.' तिला त्या देवळाजवळ सोडल्यावर ती आधी देवळात गेली. देवाला नमस्कार वगैरे केला असणार सुखरूप पोहोचविल्याबद्दल.

In reply to by टवाळ कार्टा

ती सोबत आलेल्या मित्राची आहे. तिकडून आल्यापासून बंद पडलीये त्याची गाडी.:P माझी बापडी पॅशन प्लस होती.

In reply to by प्रभाकर पेठकर

रायगड ला जायला पाबे घाटात कसे गेलात? तुम्हाला राजगड म्हण्याचे आहे का? पाबे घाट पुण्याहून खानापूर मार्गे वेल्हे, राजगड, तोरणा इकडे जाताना लागतो

In reply to by सह्यमित्र

होय तसाच गेलो होतो, नकाशावर रस्ता शोधत शोधत. मस्त धुवाँधार पाऊस. सोबत बायको. कोथरूडहून रायगडला पोहोचायला ७ तास लागले होते. बट, फिकीर नॉट. रस्ता एन्जॉय करत करत गेलो होतो. वेल्ह्याहून भोरकडे वळून तिथून रायगड गाठला होता. येताना, मुळशी मार्गे रात्री उशीराने कोथरुडास परतलो. होतो. संपूर्ण वृत्तांत रायगड -१, रायगड - २ आणि रायगड - ३ इथे वाचायला मिळेल.

पाबे घाटात देव भेटला त्या बाईला. नांदेडीअन, या सर्व फोटोत हाय रेज मुळे फारच न्याय दिलात रानफुलांना. तिसरा फोटोतली कवला फुले कास पठारावर बरीच असतात. सोनकीचा पिवळा गालीचा आता सह्याद्रीच्या माळांवर पसरेल. जांभळा तेरडा वाटांवर आहेच. झकास.

सागळ्यांचे आभार. @ दिपकजी खूप फोटो काढल्यात हो, पण या त्यातल्या त्यात शेअर करण्यासारख्या वाटल्या.

गेल्या वर्षीच्या सप्टेंबरात अशीच अनप्लॅन्ड भटकंती केली होती पाबे घाटातून, जोडीला वल्ल्या, धन्या आणि सूड. :)

सुंदर आहेत सर्व फोटोज. इथे प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.

फोटो मध्ये दिसतोय तो तेरडाच आहे. आम्ही लहान असताना याच्या देठाने पाटी पुसायचो.

In reply to by प्रभाकर पेठकर

नक्कीच वापरली असणार. त्याशिवाय इतके चांगले छायाचित्र येणे अवघड आहे. कदाचित एनडी फिल्टर सुद्धा वापरलेला असावा.

In reply to by प्रचेतस

हॅंडहेल्ड आहे हा फोटो. ND फिल्टरसुद्धा नाहीये. श्वास रोखून धरायची टेक्निक बर्‍यापैकी जमायला लागली आहे आता. :)

In reply to by प्रभाकर पेठकर

हेच म्हणतो.

पाबे घाट अफलातूनच आहे. सिंहगडाच्या नावाने रुसुन बसलेल्या आमच्या एका मित्राला आम्ही पाबेघाटातून सिंहगड प्रदक्षिणा घडवली होती ते आठवलं. त्या प्रदक्षिणेची सांगताही सिंहगडावरच झाली होती खेड शिवापूरच्या दिशेने चढाई करुन.

In reply to by धन्या

त्या प्रसंगाला जवळपास वर्ष होत येईल आता....वाटेत राजगडाकडे जे काही वळून वळून बघणं चाललं होतं त्यामुळे मी जरा धास्तावलो होतो.

कवला आणि सोनकी केवळ अप्रतिम ! :) एक विनंती फोटो कंप्रेस करुन टाकलेत तर धागा पटकन उघडुन पाहता येतो, विशेषतः हापिसातुन ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kitni Haseen Zindagi... { Lucky Ali }

काय फोटो काढलेत राव, जबरदस्त. गदिमांनी म्हटलंय तसं, प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उक्तट! हा कॅमेरा कोणतायं?

सर्व फोटो मस्त आलेत. खास वाटलेले फोटो :- १. जीवन आणि मृत्यू २. Smithia Hirsuta - कवला ३. Graham's groundsel - सोनकी ४. झर्‍याचा फोटो. +१ . . . .