ह्रुदया मध्ये घर बांधु या,अशा घराला दार कशाला?
लेखनविषय:
जन्म कसा आणि कुठे घ्यायचा,
हातामध्ये नसे आपुल्या,
ह्रुदयामध्ये घर बाम्धु या,
अशा घराला दार कशाला?
कोण धर्म आणि जात कोणती,
हाती काहीच नसे आपुल्या,
ह्रुदयामध्ये घर बांधु या,
अशा घराला दार कशाला?
जातिभेद अन धर्म विसरुया,
साथ देउ या सुखदुखःला,
ह्रुदयामध्ये घर बांधु या,
अशा घराला दार कशाला?
जिव्हाळ्याचा गाव असावा,
राग आणि रोष कशाला,
ह्रुदयामध्ये घर बांधु या,
अशा घराला दार कशाला?
परस्पराना समजुन घेऊ,
वाद आणि तक्रार कशाला,
ह्रुदयामध्ये घर बांधु या,
अशा घराला दार कशाला?
प्रेम दयेचा वसा घेउ या,
देवू आसरा दु:खी जिवाला,
ह्रुदयामध्ये घर बांधु या,
अशा घराला दार कशाला?
वाचने
2125
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
हॄदयाचे शनी शिंगणापूर करुया.
In reply to हॄदयाचे शनी शिंगणापूर करुया. by भिंगरी
ROFL
(No subject)
हा हा हा....
स्वर्ग नगरी....
In reply to स्वर्ग नगरी.... by प्रभाकर पेठकर
सुंदर.
जन्म कसा आणि कुठे घ्यायचा,
ह्रुदय हे असं दिसतं. त्यात घर
.