✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चोरी करावी, आत्महत्या करावी कि निर्लज्ज व्हावे?

स
संदीप डांगे यांनी
गुरुवार, 09/18/2014 - 17:57  ·  लेख
लेख
मागच्या एक वर्षापासून आर्थिक परिस्थिती फारच खालावली आहे. धंदा पण साफ बुडाला, डोक्यावर सुमारे ७-८ लाखाचे कर्ज आहे. देणेकरी नुसते उच्छाद मांडून आहेत. ज्यांचे कडून पैसे येणे आहेत ते ढिम्म आहेत. तोंड मिळवणी करता करता नाकीनऊ आले आहेत. ज्यांचे कडून पैसे घेतले त्यात मित्र आणि नातेवाईक सुद्धा आहेत. नवीन व्यवसाय पुरेसा येत नाही . जो येतो तो फारच तुटपुंजा आहे. अश्या परिस्थितीत कुठलीही फिलोसोफी डोक्यावरून जाते. जसे हे पण दिवस जातील, प्रयत्न करा यश मिळेल, संकटात खंबीर उभे रहा. आणि असेच बरेच. आजची परिस्थिती बघू जात सर्व कर्जे मिटायला २-३ वर्षे लागतील, पण कुणीच २-३ दिवस सुद्धा थांबायला तयार नाही. प्रत्येकाची स्वताची अडचण आहेच आणि पैश्याचे सोंग नाही आणता येत. तो जिथे लागतो तिथे लागतो. पैसे येण्याचे सर्व पारंपारिक मार्ग बंद आहेत. जसे बँक लोन, मित्र, इ. मी अजून निराश नाही. दोन मुले आहेत एक चार वर्षाचा आणि एक ३ महिन्याचा. या नव्या बाळाच्या आगमनावेळी जो काही भयंकर वैद्यकीय खर्च झाला त्यामुळे सगळे बजेट कोलमडले. आता खरच काय करावे असा प्रश्न आहे. चोरी करावी, कुटुंबासकट आत्महत्या कि सरळ निर्लज्ज व्हावे? आत्महत्या केल्यावर सगळ्यांच्या काय प्रतिक्रिया येतील ते माहिती आहेत. पैश्यासाठी जीव का दिला वैगेरे वैगेरे. पण जीव गेल्याशिवाय संबंधिताना घटनेचे गांभीर्य कळत नाही. तोपर्यंत त्यांना वाटेल मी खोटे बोलत आहे. माझेकडे पैसे असून द्यायची इच्छा नाही. पण खरेच असे काहीही नाही. मिपावर बरेच बुजुर्ग आणि जाणते आहेत. काही प्रक्टीकॅल सल्ला द्य. तत्वज्ञान नको. उपाशी पोटाला तत्वज्ञान म्हणजे आंधळ्या माणसाला आरसा. कृपया वरचे सगळे खरे आहे. चेष्टा करू नये. -------------------
इशारा १. लेखकाच्या भावना पोचल्या. मात्र सदस्यांनी कृपया सल्ले देताना आपल्या जबाबदारीवर द्यावेत, तसेच लेखकाने स्वतःच्या जबाबदारीवर अंमलात आणावेत. २. आत्महत्या हा कोणत्याही समस्येचा उपाय नाही आणि मिपा अशा कोणत्याही सल्ल्याला उत्तेजन देत नाही किंवा जबाबदार नाही. ३. या लिखाणावर अवलंबून राहून कोणतेही आर्थिक व्यवहार झाल्यास मिपा संस्थळ/चालक/मालक त्याला कोणत्याही प्रकारे जबाबदार नाहीत.
  • आत्महत्येच्या निर्लज्जपणाची चोरी - भाग १

Book traversal links for चोरी करावी, आत्महत्या करावी कि निर्लज्ज व्हावे?

  • आत्महत्येच्या निर्लज्जपणाची चोरी - भाग १ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
70390 वाचन

💬 प्रतिसाद (130)

प्रतिक्रिया

+१११.

प्यारे१
गुरुवार, 09/18/2014 - 21:36 नवीन
+१११. अवांतरः व्यवसायाबाबत पेठकर काकांनी (किंवा अनुभवी कुणीही) काही सल्ले द्यावेत. मुलभूत गोष्टी सगळीकडं त्याच असायला हव्यात असं वाटतंय. व्यवसायाच्या सुरुवातीपासून घ्यायची काळजी ते पुढचे 'टप्पे' पायरीप्रमाणंच व्हर्टीकल ग्राफ आणि काही काळानं स्टॅबिलिटी पुन्हा प्रगती पुन्हा आडवी रेघ असं काही असणं कसं आवश्यक असतं इ.इ.इ.
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

धीर सोडू नका

भिंगरी
गुरुवार, 09/18/2014 - 21:54 नवीन
मी स्वत। या समस्येतून गेलेली आहे आणि आत्ताही याच समस्येत आहे,पण सगळ्यांना स्पष्ट सांगितले आहे की पैसे नक्की देईन.त्यांनाही विश्वास आहे.पण माझे ज्यांच्याकडून यायचे आहेत तेही असेच सांगत आहे.त्यामुळे गुंता वाढला आहे.३/३ कामवाल्या ठेवणारी मी सर्व कामं हाताने करते पण इतरांना मदत करुन मानसिक समाधान मात्र मिळवते.

माझेही दोन शब्द

धर्मराजमुटके
गुरुवार, 09/18/2014 - 22:34 नवीन
माणसाने आपल्या करीयरची सुरुवात कमीतकमी २-३ वर्षे तरी नोकरी करावी. जरी तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तरी. शक्यतो छोट्या कंपनीमधे सुरुवात करावी म्हणजे सर्व प्रकारची कामे करण्याचा अनुभव येतो. स्वतःचा अनुभव सांगतो. ही साधारण १९९८-२००० सालची गोष्ट आहे. मी कॉलेज सोडल्यानंतर ग्राफीक्स डिजाईनिंग आणि डीटीपी, प्रिंटींगचा व्यवसाय सुरु केला. त्याअगोदर अनुभवासाठी नोकरी केलेली नव्हती. एक जुना ४८६ पीसी घेऊन सुरुवात केली आणी २ वर्षात २-३ संगणक, प्रिंटर असा चांगला सेटअप बनवला. मुळातच कोणतीही नवीन गोष्ट शिकण्याची आवड असल्यामुळे नवनवीन कला पटकन शिकत गेलो. पैसा फार चांगला मिळत होता अशातला भाग नाही पण भागात नाव कमविले. दुपारी दुकान बंद करुन घरी गेलो तरी गिर्‍हाईके दुकानासमोर लाईन लाऊन उभी असायची. कुणी पैसे नाही दिले तरी काम करुन द्यायचो कारण घरची जबाबदारी नव्हती. ३ वर्षानंतर दुकान बदलले आणि ग्रह फिरले. गिर्‍हाईक येईनासे झाले. पैसे थकले. १ लाख कर्ज झाले तरी लाजेस्तव दुकानात जाऊन बसायचो. नंतर देणेकरी छळायला लागल्यावर दुकानातून आणि घरुन गायब व्हायला लागलो. पुस्तक घेऊन सार्वजनिक उद्यानात दिवसेंदिवस वाचत बसायचे आणि रात्री घरी जायचो. ज्योतीषांच्या नादी लागलो. हात / चेहरा बघून भविष्य सांगणारा ते कुंडली वरुन भविष्य सांगणारा असे सर्व प्राणी बघीतले. मुंबईपासून पुण्यापर्यंत त्यांच्या मागे हिंडलो. कोणी आशा दाखविली तर कोणी तुला धंदयात यश नाही, तु नोकरीच कर असे सांगीतले. मात्र हे सर्व करत असतांना परमेश्वरावरील भाव कमी झाला नाही की व्यसने लागली नाहित. शेवटी वडीलांनी माझ्या अनुपस्थीत दुकानाला टाळे ठोकले. नसते उद्योग करण्यापेक्षा घरी बस. मी तुला पोसतो असे म्हणाले. त्या दरम्यान दुकानात एक मुलगी फोन करण्यासाठी यायची. तिच्या कंपनीत हार्डवेअर इंजीनिअरचा जॉब आहे, कोणी आहे का कामासाठी म्हणून विचारायची. मित्रांनी माझे नाव सुचविले. मी व्यवसाय करण्याआधी संगणक जुळणीचा चार दिवसांचा एक हॉबी कोर्स केला होता. व्यवसायासाठी जुना पीसी घेतल्यामुळे तो वारंवार बिघडायचा तेव्हा तो खोलायचा, जोडायचा, फॉर्म्याट करायचा आणि आवश्यक सॉफ्टवेअर टाकायची एवढेच माहित होते. एवढ्या अपुर्‍या शिदोरीवर उडी मारायचे ठरविले कारण दुसरा उपायच नव्हता. मुलाखतीसाठी चार पाच चकरा मारल्या पण दरवेळी म्यानेजर कामानिमित्ताने कुठेतरी गेलेला असायचा. शेवटी आपल्या नशीबात नोकरीदेखील नाही असे समजून निराश झालो. मग साधारण १०-१५ दिवसांनंतर त्याच कंपनीला तातडीची गरज पडल्यावर ती मुलगी मला शोधत शोधत आली आणी कसेही करुन आज मुलाखतीला चल म्हणाली. तसेच दाढी न करता, शर्ट इन न करता मुलाखतीला गेलो पण कंपनीला फारच गरज असल्यामुळे तातडीने सिलेक्शन झाले. पगार होता १८०० रुपये. नोकरीचे फिक्स झाल्यावर सगळ्या देणेकर्‍यांना भेटलो. खरी खरी परिस्थीती सांगीतली आणि तुमचा एक पण रुपया बुडणार नाही पण सगळे पैसे एकदम पण देता येणार नाहीत हे स्पष्ट केले. सगळ्यांनी सहकार्य केले आणि ४ वर्षात सगळे देणेकरी मिटवले. दरम्यान घरच्यांनी मला जवळजवळ फुकटच पोसले. नंतर लग्न केले, एक मुल झाले. मासीक रु. १८०० वरुन सुरुवात करुन रु. ५०,०००० पर्यंत पोहोचलो पण नोकरीत मन रमत नव्हते म्हणून परत २०११ ला नोकरी सोडून व्यवसाय सुरु केला. बायकोला पहिलेच सांगून ठेवले की नोकरी सोडतोय. धंदा चालेल न चालेल पण मला तेच करायचयं. घरी देणेकरी येऊ शकतील तर त्यांना सहन करावे लागेल. सुदैवाने तिने होकार दिला, त्रास सहन केला. अजूनही मधून मधून अतिशय वाईट दिवस येतात (कारण एकदा पैसे गुंतविले की २-३ महिन्यांनीच पैसे येतात.) पण आता सवय झालीय. आता नवे देणेकरी आहेत पण त्रास नाहीये. सध्या बर चाललयं. मात्र या सर्व दिवसांत एक गोष्ट शिकलो. लहानथोर सगळ्यांशी नम्रपणे वागलो. कोणालाही कठोर बोललो नाही. ज्याच्याकडून पैसे घ्यायचे त्यालाही नाही आणि द्यायचे त्यालाही नाही. शेवटी माणसे जोडणे हेच कामाला येते. पैसा दरवेळी कामाला येतोच असे नाही. हे सगळे सांगण्यामागे स्वतःची लाल करणे हा हेतू नाही. ती ऑलरेडी बर्‍याच कारणांमुळे लाल झालेली आहे. :) पण धीर सोडू नका आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तोंड चुकवू नका. प्रामाणिकपणाची कदर करणारे या जगात अजून पुष्कळ आहेत. मी तुमचा एक रुपया बुडविणार नाही असे सांगत चला. जर कबूल केलेल्या वेळेस पैसे नाहि देता आले तर त्यांना प्रत्यक्ष भेटा, फोन करा आणि कल्पना द्या. १०० च्या ऐवजी १० रु. देता आले तरी ते द्या. दिस जातील, दिस येतील भोग सरलं, सुख येईल ! आत्महत्या आणी चोरीचा विचार करु नका. आपल्यामागे आपल्या कुटुंबाचे काय हाल होतील याचा विचार करा. अशा निर्णयाने आपण त्यातून कदाचित सुटून जाऊ पण आपल्या माणसांच्या नजरेतून कायमचे उतरु हे लक्षात ठेवा.

_/\_

खटपट्या
Fri, 09/19/2014 - 01:13 नवीन
_/\_
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

+१०० प्रतिसादासाठी _/\_

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 09/19/2014 - 12:45 नवीन
+१०० प्रतिसादासाठी _/\_
↩ प्रतिसाद: खटपट्या

मुटके साहेबान्चा सांगणे अगदी

वैभव जाधव
Fri, 09/19/2014 - 16:05 नवीन
मुटके साहेबान्चा सांगणे अगदी परफेक्ट आहे. स्वता परिस्थितीतुन पार पडल्यामुळे त्यांच्या बोलण्याची खरी किंम्मत कळते. संदीपसाहेब बिल्कुल धीर सोडू नका. १००० माणसात एखादा आर्टिस्ट असतो. तुम्ही तर त्या कलेत एवढे शिकलेले अणि अनुभवि आहात. सगळे चांगले होईल बघा. त्यात इतक्या मिपाकरानि एवढा मनापासुन धिर दिलाय. त्यांचे सगळ्यांचे आभार माना. मिपाकर वेळेला धावून येतातच हे दिसले. जिओ मिपा.
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

+२००

सखी
Sat, 09/20/2014 - 00:48 नवीन
असेच म्हणते. मुटके आणि इ.एक्काकाकांचेही प्रतिसाद अतिशय आवडले. चांगले आणि वाईट दोन्ही दिवस खरचं कायम रहात नाहीत. तुम्ही नक्की यातुन बाहेर पडाल.
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

सल्ल्यांशी सहमत

आजानुकर्ण
गुरुवार, 09/18/2014 - 23:10 नवीन
आत्महत्येचा विचारही करु नका. तुमच्या बायकामुलांसाठी तेवढे धैर्य गोळा करुन ठेवा. आर्थिक अडचणींचा सामना केलेल्या सर्वांनाच पैशाचे सोंग आणता येत नाही याची जाणीव असते. पण खर्च कमी करुन टिकून राहण्याचे विविध मार्ग शोधा. गावी असताना बांधकाममजूर कम शेतमजूर असा माझा एक शेजारी तुमच्यासारख्याच परिस्थितीतून जात होता. कर्जदार दर आठवड्याला त्याच्या घरी येत. आम्हाला आमच्या घरातही शिवीगाळ व भांडणे नेहमी ऐकू येत असत. दुर्दैवाने त्याच्यावर चोरी करण्याइतकी वाईट परिस्थिती आली होती. अगदी कमी शिक्षण आणि मर्यादित स्किलसेटमुळे त्याला इतर काहीही करणे अशक्य होते. एका दिवाळीत त्याने आमच्या घरातही चोरीचा यशस्वी प्रयत्न केला होता. आज त्याचा थोरला मुलगा टीसीएसमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर आहे, धाकटा मुलगा गावात स्वतःचे क्लासेस घेतो. दोन्ही मुलांची स्वतःची घरे आहेत. चांगले दिवस नक्की येतील या आशेवर हे दिवस निभावून न्या. प्रामाणिकपणाने नंतर कर्जदारांचे पैसे चुकवा.
वर सर्वांनी अत्यंत सकारात्मक उपाय सुचवले आहेत. ते तुमच्यासाठीच नव्हे तर अडचणीत असणार्‍या इतरांसाठीही मोलाचे आहेत.
याच्याशी सहमत.

वर सगळ्यांनी लिहिलं आहे तसंच

कवितानागेश
गुरुवार, 09/18/2014 - 23:38 नवीन
वर सगळ्यांनी लिहिलं आहे तसंच सांगते... बहुतेक सगळेच अशा परिस्थितीतून गेले आहेत. कर्ज फेडण्यासाठी आधी दर महिन्याचा खर्च ठरवून तेवढे बाजूला काढायचे. उरलेले, भले ते १००० ते १०००० कितीही असुदेत, आधी महत्त्वचे कर्ज फेडायला वापरायचे. आम्ही दोनेक वर्षे याच पद्धतीनी वागून पुष्कळ कर्ज उतरवलेलं होतं. हातात नेमकेच पैसे शिल्लक असले की आपोआपच खर्चावर नियंत्रण येतं. शिवाय शक्य असेल तर सोने वगरै विकून बरचसं कर्ज उतरवता येइल. मात्र अगदी सिनेमात दाखवलय तसं दादासाहेब फाळकेंसारखं घरातल्या चीजवस्तू, भांडी पण विका असा सल्ला निश्चित देणार नाही. त्याची गरजही पडणार नाही. आताच्या काळात नोकरी लागली की झालं असं होत नाही. आणि स्वतंत्र व्यवसायात तर क्लायंट्कडून पैसे मिळ्णं फार कठीण जातं..... त्याचा नियम असा की ५०% अ‍ॅड्वान्स घेतल्याशिवाय कामाला हात लावायचा नाही. (मग निदान २५-३० % तरी हातात येतात) सुरुवातीला कठीण जाईल. पण जे जेन्युअन कस्टमर्स असतील, तेच येतिल आणि तुम्हाला पैसे बुडण्याचं फ्रस्ट्रेशन येणार नाही.

सल्ला देण्यास मी अपात्र..

चिगो
Fri, 09/19/2014 - 00:52 नवीन
सल्ला देण्यास मी अपात्र आहे. पण तरीही.. वर बर्‍याच जणांनी मनःपुर्वक आणि काहींनी अनुभवसिद्ध + मनःपुर्वक असे सल्ले दिलेयत, त्यांबद्दल विचार करा. आत्महत्या हा तर मार्ग असूच शकत नाही, कारण तुम्ही मार्ग बंद करण्याबद्दल / थांबण्याबद्दल विचार करताय. तेव्हा तो विचारही मनातून काढून टाका. चोरी करणे, हापण मार्ग अत्यंत अयोग्य आहे, कारण की तुम्ही कायद्यात तावडीत सापडाल. मला वाटतं की तुम्हाला मदत करणार्‍या बहुतांश लोकांचा तुमच्या चांगुलपणावर विश्वास असेल कींवा प्रयत्न केल्यास बसेलही. (काही लोक तुमच्या वाईट परीस्थितीमुळे जरा "जिटरी" झाले असतील. ते होणारच थोडंफार) पण जर तुम्ही गुन्हेगार ठरलात, तर तुमची सगळी गुडवील संपेल आणि ती परत कमावणं जवळपास अशक्य होईल.. आयुष्यात कधीच कुठलाच प्रॉब्लेम न होता यशस्वी होणारे खुप कमी लोक असतात. "ये भी दिन बदलेंगे" म्हणत जरा धीर धरा, कळ सोसा.. हाच कठीण काळ उद्या यशस्वी झाल्यावर तुमच्या अभिमानाची बाब असेल. आजचे धडपडीचे, संघर्षाचे दिवस तुमच्या आठवणींचा ठेवा होईल. फार नाही बोलत.. माझ्या आवडत्या ओळी आहेत, सुरेश भटांच्या.. त्या सांगतो. "आजचे अमुचे पराभव पचवतो आम्ही उद्यास्तव विजय तो कसला, उरावर जखम जो करणार नाही !!" वाटलं, तर व्यनि करा. काळजी घ्या..

वरील सर्वांशी सहमत !!

खटपट्या
Fri, 09/19/2014 - 01:12 नवीन
वरील सर्वांशी सहमत !! आज मिपाकर असल्याचा अभिमान वाटला !!

मी अनुभवाने बराच लहान आहे....

मुक्त विहारि
Fri, 09/19/2014 - 03:07 नवीन
तरी पण इतकेच सांगू शकतो की, आत्महत्या करायचा विचार पण मनांत आणू नका. दिस जातील, दिस येतील, भोग सरल, सूख येईल. माझे सल्ले. १. भरपूर वाचन करा. २. सवंगडी जोडा. हसा-खिदळा. ३. व्यायाम करा. ४. बायको-बरोबर मनसोक्त गप्पा मारा. ५. मुलांच्या बरोबर सिनेमा बघा. ६. बिंधास्त रहा.(मला कल्पना आहे, की ६व्वा सल्ला तुम्हाला आवडणार नाही, पण बिंधास्त रहा, म्हणजे तुम्ही कर्ज घेतले आहे.चोरी नाही केलेली किंवा फसवणूक पण केलेली नाही.धंद्यात खोट येणे हा गुन्हा नाही.ती एक शिकवण आहे,त्याचे तुम्ही पैसे मोजलेत, इतकाच फरक.पण ह्या तुमच्या शिक्षणाचा फायदा तुमच्या मुलांनाच होईल.) आणि ७. व्यसनांपासून दूर रहा. विशेषतः दारू पासून. लहान तोंडी मोठा घास घेतल्या बद्दल क्षमस्व. बादवे, पुण्यात रहात असाल तर आणि गुरुंवर विश्र्वास असेल तर, शंकर महाराजांच्या मठात जावून या.एक मानसिक समाधान मिळते. थोडी भर घालतो. तुमच्या पाशी काय आहे ते बघा आणि त्यातून काय उत्तम मार्ग काढता येईल ते बघा. आपल्या पेक्षा निर्लज्ज माणसे पण ह्या जगांत आहेत.आपण मध्यमवर्गीय आणि पापभीरू माणसे असल्याने, कर्जामुळे घाबरतो.

मन मोकळ करण्याकरिता मिपावर

स्पंदना
Fri, 09/19/2014 - 06:27 नवीन
मन मोकळ करण्याकरिता मिपावर यावं इतक मिपा आश्वस्त वाटलं हे खरच वाखाणण्याजोगं आहे. अन मिपाकर तुमच्या या विश्वासाला जागले देखील. वरील प्रतिसाद वाचुन जाणवले असेलच तुम्हाला की तुम्ही एकटेच नाही आहात अश्या परिस्थीतीतुन जाणारे. अन मदतीचे हात देखील आले आहेत समोर. अर्थात मदत घेताना ती तुम्हाला दुबळी वा पंगु बनवणार नाही हे सुद्धा पहा. स्वबळावर उभे करायला जे हात समोर येतील ते कणखर असतील. तुम्ही उल्लेख केला आहे म्हणुन विचारते काय कॉम्प्लिकेशन्स झाली होती बाळाच्या जन्माला? आता सगळ ठिक आहे ना? तुमची स्वतःची मनस्थीती इतकी ढासळलेली तर तुमच्या पत्निला ज्या दिव्यातुन शारिरीक्दृष्ट्या सुद्धा जावं लागल असेल त्यांची काय अवस्था असेल? तुम्हाला धिर हवाय ना? पहिला तिला धिर द्या. दोघे ,मिळुन खंबीर व्हा. पुढे हे वळण संपल कीया वेळी आपण दोघे एकत्र उभे राहिलो याचा अभिमान अन सार्थकता वाटेल. जाणार आहेत हे ही दिवस.

लढा आणि पुढे जा...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 09/19/2014 - 07:17 नवीन
मिपाकरांचे इतके उत्तम प्रतिसाद आले आहेत की आता काही सांगण्यासारखे नाही.खंबीरपणे परिस्थितीचा मुकाबला करा दिवस निघून जातील,आपल्याकडे स्किल आहे यशस्वीच व्हाल. शुभेच्छा. मिपाकर असल्याचा अभिमान वाटला. जियो मिपाकर जियो. -दिलीप बिरुटे

आत्महत्त्या किंवा चोरी करणं

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 09/19/2014 - 08:00 नवीन
आत्महत्त्या किंवा चोरी करणं हा पर्याय होऊ शकत नाही. आशावादी राहा. प्रयत्नांती परमेश्वर हे लक्षात ठेवा. १. सगळे अनावश्यक खर्च बंद करा. २. देणेकर्‍यांचे जसे पैसे देता येतील तसे देत चला. तुमची पैसे परत करायची ईच्छा आहे हे त्यांना दिसु देत. ३. व्य.नि. करतोय त्याला उत्तर नक्की द्या.

अतिशय छान प्रतिसाद दिले सर्वांनी

vikramaditya
Fri, 09/19/2014 - 08:08 नवीन
सगळेच मुद्दे कव्हर केले की मिपाकरांनी. ज्या उद्देशाने लेखकाने हा विषय मांडला त्याला न्याय मिळाला असे वाटते. वरील प्रतिसादांतील शब्दनशब्द लाख मोलाचा आहे. अनेक उत्तम विचार मांडले आहेत. शांतपणे ते वाचा. आता ह्या व्यवहारी सल्ल्यांवरुन स्वःताचा एक plan of action बनवावा आणि त्याप्रमाणे कार्य करावे. ह्यातुन बाहेर पडाल. अरे हो, आणि अश्या प्रसंगात आपले कोण आणि परके कोण ह्याची पण ओळख होते नाही का? आपल्या पाठीशी उभे राहिलेल्यांना विसरु नका. इतरांना ह्या पुढे थोडे लांबच ठेवा. "राह पकड तु एक चला चल, पा जायेगा मधुशाला." (अर्थात मधुशाले पासुन दूर राहण्याचा सल्ला पण वर आलाच आहे.) शुभेच्छा.

मुदत मागितल्यावर ती मिळाली तर

नितिन थत्ते
Fri, 09/19/2014 - 08:13 नवीन
मुदत मागितल्यावर ती मिळाली तर शक्य झाल्यास मुदतीआधी त्यांना पैसे द्या. त्यामुळे तुमच्यावरचा विश्वास वाढेल.

आणखी

नितिन थत्ते
Fri, 09/19/2014 - 08:14 नवीन
आणि हो.... नोकरी करणे शक्य असेल तर कराच. "छ्या.... नोकरी कसली करायची?" किंवा "नोकरी म्हणजे गुलामी" असल्या विचारांच्या आहारी जाऊ नका.

थोडे

vikramaditya
Fri, 09/19/2014 - 08:31 नवीन
विषयांतर करुन एक निरिक्षण नोंदवतो. काही समाजांमध्ये (प्रत्यक्ष माहिती आहे), अश्या अडचणीत सापडलेल्या व्यक्तीच्या मदती साठी समाजातील धनवान लोक पुढे येतात. प्रथम देणेक-यांना पेमेंट करुन टाकतात. त्यामुळे कर्जदार थोडा सेटल होतो. मग त्याला आपल्याच सर्कल मध्ये चार कामे मिळवुन देतात, आपली एखादी रिकामी जागा थोडा काळ वापरायला देतात. आणि लवकरात लवकर तो ते पैसे परत करतो. पुढे त्याने पैसे कमवले तर इतर अश्या अडचणीत सापडलेल्यांना (पण त्याच समाजातील) तोही मदत करतो. असे एक आर्थिक सेफ्टी नेट 'बरेचदा' त्यांना उपलब्ध असते. असो.

कंडिशन्स अप्लाय....

प्रभाकर पेठकर
Fri, 09/19/2014 - 08:41 नवीन
>>>>आणि लवकरात लवकर तो ते पैसे परत करतो. हे सगळ्यात महत्त्वाचे. पण आपल्याला अनुभव विपरित येतात. शिवाय पुन्हा त्याचा धंदा चालला पाहिजे. स्वतःची गुंतवणूक असताना जर एखादा नुकसान करून घेत असेल (जनरल बोलतो आहे. धागाकर्त्या बद्दल नाही) तर दुसर्‍याच्या पैशांची तो काळजी घेईलच असे नाही. असेही उदाहरण मी अगदी जवळून पाहिले आहे.
↩ प्रतिसाद: vikramaditya

बरोबर आहे. त्या

vikramaditya
Fri, 09/19/2014 - 09:01 नवीन
समाजाचा एक गुंतागुतीचा मेट्रीक्स असतो. नाती गोती फार जपली जातात. आर्थिक व्यवहारांवर बारकाइने लक्ष ठेवतात. दुस-याने पैसे फेडले म्हणुन मूळ कर्जदार उंडारायला मोकळा, हा प्रकार न होवु देता , ते त्याला "लाइनी'वर ठेवतात आणि आपले पैसे परत येतील ह्यासाठी लक्ष ठेवुन असतात. शेवटी बिसिनेस आणि पैसा त्यांच्या रक्तात आहे. मदत वगैरे ठीक आहे, पण पैसा त्यांचा देव आहे.
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

गुणदूर्गूण व्यक्तीसापेक्ष.

प्रभाकर पेठकर
Fri, 09/19/2014 - 09:18 नवीन
त्या समाजाचा एक गुंतागुतीचा मेट्रीक्स असतो. मला वाटतं हे 'समाजसापेक्ष' नसून 'व्यक्तीसापेक्ष' असतं. मलाही धंद्यात नुकसान होऊन मित्रांकडून कर्ज घ्यावं लागलं होतं. त्याकाळात बायको-मुलासह माझ्या कर्मचार्‍यांच्या सदनिकेतच एका खोलीत संसार करत होतो. पार्ट्या, दारू, सहली सगळं बंद केलं होतं आणि ज्याच्याकडून आर्थिक मदत घेतली होती त्या सर्वांची पै आणि पै फेडून टाकली नंतर वेगळं घर घेऊन कुटुंबासह तिथे राहावयास गेलो.
↩ प्रतिसाद: vikramaditya

पार्ट्या, दारू, सहली सगळं बंद

काळा पहाड
Fri, 09/19/2014 - 09:58 नवीन
पार्ट्या, दारू, सहली सगळं बंद केलं होतं
म्हणजे हे आता चालू आहे का? तसं असेल तर वाईटच.
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

आँ..

प्रभाकर पेठकर
Fri, 09/19/2014 - 14:18 नवीन
का बरं वाईट? दुसर्‍याच्या पैशात नाही करत. स्वतः दिवसाला १४ तास काम करून, स्वकमाईत, सर्व संसारीक जबाबदार्‍या पार पाडून करतो.
↩ प्रतिसाद: काळा पहाड

या..

नाखु
Fri, 09/19/2014 - 08:59 नवीन
परिस्थीतीतून सुयोग्य मार्ग मिळण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. चाकरमानी ना.खु.

नोकरी

नाव आडनाव
Fri, 09/19/2014 - 09:45 नवीन
milton@sidefx.co.in mitoons@gmail.com jjsophi@gmail.com माझी एक सहकारी आहे जेसी. तिच्या नवर्‍याची पुण्यात एक कंपनी आहे. जर तुम्हाला नोकरी करायला हरकत नसेल तर या एमेल आय डी वर तुमचा रेझुमे पाठवा. तुमच्या स्कीलचं / त्यासारखं काम तिथे आहे. मी तिच्या बरोबर बोललो आहे आणि तिला सरं सांगितलं आहे. तिच्या कंपनीत नसेल आता ओपनिन्ग तर तिचा नवरा त्याच्या ओळखिच्या बाकिच्या लोकांना फोरवर्ड करू शकतो. आणि शक्य असेल तर वर्क फ्रॉम होम साठि सुध्दा बघु शकतो. साहेब, मी बुजुर्ग नाहि. तुम्हि तुमच्या बद्दल लिहिलंय त्या वरून वाट्तय कि तुम्हि आणि मी थोड्याफार फरकाने एकाच वयाचे असु. मी दोन मुलिंचा बाप आहे. तुमचि मुलं रोज सन्ध्याकाळि तुमचि वाट बघत असतील. त्याना काय फरक पडतो तुमच्या कडे पैसा आहे कि नाहि. पण त्याना तुम्हि नसला तर मात्र मोठा फरक पडेल. तुमचा अनुभव बघता, तुम्हाला हे कर्ज फेडायला वर्स्ट केस मधे २-३ वर्षां पेक्षा जास्त लागणार नाहित. तुमच्या मुलांना (आणि तुमच्या घरी सगळ्यांना ) तुमचि गरज आहे. तुम्हि हा विचार केला नाहि असं नाहि. पण तो परत परत करा, म्हणजे दुसरं काहि डोक्यात येणार नाहि. जर शक्य असेल तर रेझुमे लगेच पाठवा.

थेट कामाचा सल्ला. तुमच्या

arunjoshi123
Fri, 09/19/2014 - 11:13 नवीन
थेट कामाचा सल्ला. तुमच्या प्रत्यक्ष आयुष्यातले लोक नशीबवान असणार. (मला हाच अभिमान व्यनिंतून अशीच मदत करणारांचा देखिल आहे.)
↩ प्रतिसाद: नाव आडनाव

साईड एफएक्स......

आसुड
Sat, 09/20/2014 - 15:33 नवीन
वर नमुदलेल्या पैकी साईड एफएक्सला थोडी ओळख आहे जमल्यास व्यनि धाडा. काम करुनच देईल.
↩ प्रतिसाद: नाव आडनाव

ये बात !!!

खटपट्या
Sun, 09/21/2014 - 00:44 नवीन
ये बात !!!
↩ प्रतिसाद: आसुड

मिल्टन (पहिला आय डी) साइड एफ

नाव आडनाव
Sun, 09/21/2014 - 10:18 नवीन
मिल्टन (पहिला आय डी) साइड एफ एक्स चे को-फाउंडर आहेत. तेहि शक्य तितकि मदत करतीलच.
↩ प्रतिसाद: आसुड

तुमच्या मुलांना अनाथ करायचा

काळा पहाड
Fri, 09/19/2014 - 10:02 नवीन
तुमच्या मुलांना अनाथ करायचा तुम्हाला काही एक अधिकार नाहिये.

तुमचा बिझनेस कोणता आहे ते

उगा काहितरीच
Fri, 09/19/2014 - 10:09 नवीन
तुमचा बिझनेस कोणता आहे ते सांगा म्हणजे त्या अनुषंगाने काही सुचत असल्यास फायदा होईल .

आवो वर लिवलंय तर त्यान्नी.

काळा पहाड
Fri, 09/19/2014 - 10:13 नवीन
आवो वर लिवलंय तर त्यान्नी.
माझ्याबद्दल व व्यवसायाबद्दल माहिती: मी एक B F A कमर्शिअल आर्टीस्ट असून १२ वर्षे कामाचा अनुभव आहे. क्रियेटीव डायरेक्टर म्हणून ग्राफिक आणि वेब मध्ये भरपूर काम केले आहे. २०११ पासून स्वत: फ़्रिलान्सर म्हणून काम सुरु केले. नंतर मुंबईहून नाशिक ला शिफ्ट झालो कारण आंतरजालीय संबंधामुळे तसा काही परिणाम होत नव्हता. माझे मुंबई, नाशिक, UK, दुबई ला बरेच ग्राहक आहेत.
उगा काहितरीच!
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

मिपाकारांचा प्रतिसाद आणि समंजसपणा बघून खरच भारावून गेलो.

संदीप डांगे
Fri, 09/19/2014 - 10:22 नवीन
मिपाकारांचा प्रतिसाद आणि समंजसपणा बघून खरच भारावून गेलो. खरच काहीही ओळखपाळख नसताना अनपेक्षितपणे आपण सगळ्यांनी ज्या आपुलकीने सल्ले दिले, मदतीचा हात पुढे केला ते बघून डोळ्यात पाणी आले. तुमचे प्रयत्न वय जाऊ देणार नाही. अशी परिस्थिती पूर्वी कधी न आल्यामुळे खूपच वैतागलो होतो. कुणाशी बोलत पण येत नवते. पुढे काय करता येईल याबद्दल काहीच कळत नव्हते. आता काही गोष्टी मी ठरवल्या आहेत. माझ्यावर हि स्थिती का आली आणि आताची नक्की आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक परिस्थिती काय आहे, मिपावरच का मांडले ह्याबद्दल सविस्तर लिहिणारच अहे. सगळ्यांचे व्यक्तिश: धन्यवाद पण द्यायचे आहेत. आपण सर्वानी गंभीरपणे हा विषय हाताळला ह्याबद्दल मनापासून धन्यवाद.

गांभिर्याचा सल्ला....

प्रभाकर पेठकर
Fri, 09/19/2014 - 10:24 नवीन
काय निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी कशी करणार आहात ह्याचे तपशिलवार विवेचन मिपावर दिल्यास भविष्यात इतरसद्सयांनाही फायदा होऊ शकेल. धन्यवाद.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

मिपाकरांनी आपुलकिने सल्ले

arunjoshi123
Fri, 09/19/2014 - 11:26 नवीन
मिपाकरांनी आपुलकिने सल्ले दिले हे कौतुकास्पद आहेच, पण आपण देखिल मिपाकरांशी आपले मनोगत शेअर केले हे कमी प्रांजळ नाही. तुमच्या अप्रोचमुळे या संस्थळाला एक नविन डायमेंशन मिळालं आहे. इथे असंही वातावरण आहे असं (एरवी बहुधा(केवळ तात्विक) वाद घालणार्‍या) सदस्यांना प्रथमच जाणवलं आहे.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

+१

इनिगोय
Fri, 09/19/2014 - 22:53 नवीन
+१ लाखमोलाची मनं आहेत इथे. सरळ मनाने मागितलेल्या मदतीला असे इतके हात निरपेक्षपणे पुढे होतात, हा अनुभव मिपाकर नेहमीच देतात. या धाग्यावरचे प्रतिसाद पाहून खरंच मिपावरचं प्रेम द्विगुणित झालं. संदीप, ही श्रीमंतीही आहेच की तुमच्याकडे. लवकरात लवकर या स्थितीतून बाहेर पडून असाच आणखी कोणालातरी आधार देण्याइतके सक्षम व्हा.. ही सदिच्छा.
↩ प्रतिसाद: arunjoshi123

या बदललेल्या तुमच्या

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 09/20/2014 - 01:37 नवीन
या बदललेल्या तुमच्या मनस्थितीने तुम्ही अर्धे काम फत्ते केले आहे ! नेट लावून धरा, उरलेले अर्धे नक्की पुरे कराल... आणि त्याने आलेला आत्मविश्वास तुम्हाला आयुष्यभर साथ देईल !! यशस्वी होण्यासाठी अनेकानेक शुभेच्छा !!!
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

हा धागा so called management

टवाळ कार्टा
Fri, 09/19/2014 - 10:29 नवीन
हा धागा so called management guru च्या motivational speeches पेक्शा १००० पट जास्त चांगला आहे

खरे आहे.

बबन ताम्बे
Fri, 09/19/2014 - 11:35 नवीन
माझा एक चुलत भाऊ पोटाची खळगी भरण्यासाठी २५ वर्षांपूर्वी एका ठिकाणी १०० रुपये पगारावर झेरॉक्स काढण्याचे काम करत होता. परिस्थितीशी प्रचंड झुंज घेत त्याने त्यावेळी M.Com.पुर्ण केले. आज तो एका चांगल्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर आहे. थोड्क्यात परीस्थिती माणसाला जिद्दी बनवते.
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

+१००००

अजया
Fri, 09/19/2014 - 10:51 नवीन
सहमत.एक मिपाकर म्हणून अभिमान वाटला हे सर्व प्रतिसाद वाचुन .अभिमान वाटला हे लिहायला मिळाल्याचा आनंदही. संदीपभाऊ,आगे बढो मिपा आपके साथ हैै।

वर सगळ्यांनी अनुभवाचे सल्ले

अंतरा आनंद
Fri, 09/19/2014 - 10:52 नवीन
वर सगळ्यांनी अनुभवाचे सल्ले दिले आहेत. त्यात दोनच add करते. (१) दिवसाकाठी तुमच्या मुलांबरोबर थोडा वेळ तरी आवर्जून खेळा. त्यावेळी समस्यांचा विचार करू नका. (२) तुमच्याकडे कला आहे. वेळ असला तर आठवड्याकाठी थोडा वेळ मुलांना शिकवण्यासाठी द्या . हल्ली पालक मुलांनी कुठल्या ना कुठल्या कलेशी तोंडोळख तरी करून घ्यावी या विचारांचे असतात. तुम्हाला ठराविक उत्पन्न मिळेलच आणि मुलं ही stress buster असतात. त्यांच्यात सकारात्मक उर्जा असते. त्यामुळे समस्या सोडवण्याचा मार्ग सापडेल. आता ह्या व्यवहारी सल्ल्यांवरुन स्वःताचा एक plan of action बनवावा आणि त्याप्रमाणे कार्य करावे. ह्यातुन बाहेर पडाल. हे ही. तुम्हाला तुमच्या सोनेरी भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा.

ग्रेट!

पैसा
Fri, 09/19/2014 - 13:00 नवीन
फुकटचे देण्यासाठी आमच्याकडे बरेच सल्ले असतात, पण अशा प्रसंगात अक्षरशः काट्याच्या टोकावर तोललेला बॅलन्स असताना सल्ला देणे सोपे काम नाही. सगळ्या मिपाकरांनी हे कठीण काम ज्या प्रकारे केलंय, आणि नुसते सल्ले देऊन थांबले नाहीत तर काम मिळवून देण्यासाठी मदतीचे हात पुढे झाले आहेत ते पाहून आज खरेच मिपाकर असल्याचा सार्थ अभिमान वाटला! संदीपभाऊ, जास्त काही सांगणार नाही, मात्र जे आयुष्य आपल्या इच्छेने या जगात आलं नाही ते संपवायचा काही अधिकार आपल्याला नसतो. आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेतच. मात्र तुमची लढाई तुम्हाला लढावी लागेल. कधी थकल्यासारखं वाटलं, तर जरूर इथे येऊन मन हलकं करा. मनापासून शुभेच्छा!

+१०००

सुबोध खरे
Fri, 09/19/2014 - 21:24 नवीन
+१०००
↩ प्रतिसाद: पैसा

कुठल्याही प्रकारचा

बॅटमॅन
Fri, 09/19/2014 - 13:00 नवीन
सल्ला देण्यास प्रचंड अपात्र आहे, त्यामुळे फक्त हा धागा अन प्रतिसाद वाचला हे सांगण्यासाठी हा प्रतिसाद. आज मिपाकर असल्याचा प्रचंड अभिमान वाटला.

+

प्रशांत
Fri, 09/19/2014 - 13:19 नवीन
+ वाचनखुण साठवली आहे
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अगदि अगदि

अत्रन्गि पाउस
Sat, 09/20/2014 - 11:57 नवीन
हेच म्हणतोय ....
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

+२

सुहास झेले
Sun, 09/21/2014 - 03:20 नवीन
ह्येच बोलतो.... काळजी घ्या !!
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अहो साहेब वरिल सर्वांनी खुप

प्रमोद देर्देकर
Fri, 09/19/2014 - 13:04 नवीन
अहो साहेब वरिल सर्वांनी खुप चांगले अनुभवाचे मार्गदर्शन देणारे प्रतिसाद लिहले आहेत. आता एक वही घेवुन हे सगळे सल्ले एकत्र करा किंवा याची प्रिन्ट घ्या आणि मला आता काय करायचे आहे त्याची एक यादी करा. पण कोणत्या ही परिस्थित अजिबात आत्महत्येचा विचार करुच नका. सकारात्मक जगा. तुमच्या पिल्लांना पोरकं करुन तुम्ही जाणार? त्यात त्यांचा काय हो दोष? आता सर्व मि.पा. करांना विनंती:- कितीही झालं तरी वरिल मार्गदर्शन हे आभासी आहे. म्हणुन जमल्यास त्या साहेबांना प्रत्यक्ष भेटुन त्यांना आत्महत्या करण्याचावाचुन परावृत्त करणासाठी एक अचानक कट्टा त्यांना मुंबई / पुणे येथे कुठे जमत असेल तर करुया का? मला वाटते कि प्रत्यक्ष भेटीगाठीने त्यांना खुप फायदा होईल. संदिपभावु तुमच्या पुढिल वाटचालीस शुभेच्छा.
!होय मी गर्वाने म्हणतो की मीही एक मि.पा कर आहे.!

होय मी गर्वाने म्हणतो की मीही

विजुभाऊ
Fri, 09/19/2014 - 14:47 नवीन
होय मी गर्वाने म्हणतो की मीही एक मि.पा कर आहे.!
यात असलेला " गर्व" हा शब्द मराठीत वेगळ्या अर्थाने वापरला जातो. उदा: गर्वाचे घर खाली......
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा