मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मोठा माणूस जन्मत: मोठा असतो???

विवेकपटाईत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मोठा माणूस जन्मत: मोठा असतो. त्याला मोठे व्हावेच लागते. आईच्या गर्भात असतानाच त्याला पुढे भविष्यात तो मोठा होणार याची जाणीव असते. बालपणी अन्य कार्ट्यांंप्रमाणे हातवारे करत माकडाप्रमाणे तो उड्या मारत नाही. कधी मोठ्यांच्या नकला करत खदाखदा हसत नाही. कधी आपल्या बहिणीची शेपटी ओढून तिला त्रास देत नाही. भविष्यात आपण उदा: मोठे कवी किंवा लेखक बनणार असू तर आपले जीवन लोकांसमोर आदर्श राहिले पाहिजे म्हणून तो कधीच खोड्या करीत नाही. बालपणापासूनच सदैव धीर गंभीर चेहरा करून वावरणे त्याच्या नशिबी. भविष्यात त्याच्या लेखनावर चिंतन करणाऱ्या चिंतातूर अति शहाण्यांना शब्दांचा कीस काढून किंवा शीर्षासन करून अर्थ लावण्याची पाळी येऊ नये म्हणून काही बोलण्याआधी प्रत्येक वाक्याच्या प्रत्येक शब्दाचे चिंतन मनन करूनच आपल्या मुखातून शब्द बाहेर फेकीत असे. लिहितानाही तोलून-मोलून लिहित असे. त्याला माहित असते, त्याने गमंत म्हणून ही काही हलंक-फुलंक लिहील, उदा: माझा शेजारचा पोरगा, सावळा ग बाई. कान्हा सारखा, खोडकर ग बाई. काळीज त्याचे, काळेकुट्ट ग बाई. लबाडाने माझे, सर्वस्व लुटले ग बाई. माझी मी आता, राहिले ना ग बाई. तर भविष्यातले समीक्षक यातून ही अध्यात्म इत्यादी शोधून काढतील. म्हणून तो असले हलके-फुलके लेखन बालपणापासूनच करीत नाही. खंरच मोठे लोक बालपणा पासून असे वागले आहेत का? खंर म्हणाल तर कुठला ही मोठा माणूस बालपणा पासून मोठा होत नसतो. तो ही सामन्यांसारखाच असतो. महात्मा गांधी चष्मा आणि काठी सहित जन्मले नव्हते. जीवनाच्या दीर्घ प्रवासानंतर त्यांना हे स्वरूप प्राप्त झाले. एका सामान्य घरातला खोडकर आणि चहा विकणारा आज देशाचा पंतप्रधान झाला आहे. भविष्यातल्या राजनीतिक समीक्षकाने त्यांचे बालपण वेगळ्या चष्म्याने पाहू नये म्हणजे मिळविले. नदीला समुद्राचे स्वरूप प्राप्त करण्यासाठी हजारो मैलाचा प्रवास करावा लागतो, पर्वत, घाटी, मैदान आणि समुद्राला मिळताना प्रत्येक टप्प्यात तिचे स्वरूप वेगळे असते. त्याच प्रमाणे कवी असो वा लेखक त्यांना ही या प्रवासातून जावे लागते. त्यांच्या प्रत्येक लेखनातून समुद्रा सारखा धीर-गंभीरता शोधण्याचा प्रयत्न मूर्खपणाच. टवाळा आवडे विनोद या धर्तीवर ते ही हलंक-फुलंक, विनोदी लिहू शकतात. असो.

वाचने 2266 वाचनखूण प्रतिक्रिया 4

काउबॉय Wed, 09/17/2014 - 19:42
तरही तुम्ही मोठा माणूस आणि जन्मापासूनच ज्याला देवी शक्ती लाभली आहे अशी श्रध्दा असणारे व्यक्तिमत्व यांच्यातिल फरक चर्चेत वाचकाना करता येऊ नये यासाठी जे दांडके घातले आहे ते सुरेखच म्हणावेसे वाटते.

विवेकपटाईत गुरुवार, 09/18/2014 - 13:06
strong>जन्मत: दैवी शक्ती असलेला माणूस मी तरी बघितलेला नाही. मृत्यू लोकात देवाला सुद्धा माणसा सारखे जगावे लागते. आपल्या कुठल्या ही ऋषी मुनींंजवळ दैविक शक्ती नव्हती अपितु तपस्चर्येचे बळ तपस्चर्या म्हणजे काय तर आत्ताचेच उदाहरण: गेल्या ३ वर्षांपासून बाबा रामदेव २०१४ सत्ता परिवर्तन होणार असे म्हणत होते ( गेल्या तीन वर्षांत ते रोज सकाळी आस्था चेनेल वर तेंव्हाच्या सरकार विरुद्ध प्रचार करत होते इतकेच नव्हे तर २ ते ३ हजार सभेत किती तरी कोटी लोकांशी प्रत्यक्ष संवाद ही साधला सकाळी 5 ते रात्री १२ पर्यंत याच कामात गुंतलेले होते.) पुढे काही शे वर्षांनी कुणी म्हणेल बाबांनी श्राप दिला आणि सत्ता गेली. तसेच श्रीरामचंद्रना समुद्राने रस्ता नाही दिला तर झाडे, दगड, वेली इत्यादी सहाय्याने त्यांनी पूल बांधला. पण आपण म्हणतो समुद्राने घाबरून श्रीरामाला रस्ता दिला. समस्त आदिम जनजाती मग त्या वानर असो वा शबर सर्वाना एकत्र करून रावणाच्या साम्राज्या विरुद्ध उभे केले आणि जनतेच्या सहाय्याने युद्ध जिंकले. दैवी शक्ती नव्हे तर सामान्य दलित, वनवासी जनतेची शक्ती श्रीरामांच्या मागे होती. समर्थ लोकांजवळ दैवी शक्ती आहे असे लोक म्हणतात त्यात काही ही तथ्य नसते. कुणी म्हणत असेल कि त्याच्यात दैवी शक्ती आहे, तर तो नक्कीच ढोंगी आहे.

In reply to by विवेकपटाईत

काउबॉय गुरुवार, 09/18/2014 - 13:23
बाकी तुमचे चालुदे मुद्देसुद संयमाने व व्यवस्थितपणे आपला मुद्दा मांडायची सवय मी विपश्यना केल्या पासून मोडली गेली असल्याने. इथेच थांबतो.

संचित गुरुवार, 09/18/2014 - 16:19
बाकी मिपावर कोणताही धागा मोदी विरोधक\समर्थक, आस्तिक\नास्तिक या काठ्याकुताशिवाय पूर्ण होत नाही.