सेव द डील्स डॉट इन
इशारा: फसव्या साईट्स बद्दल सावध करण्यासाठी हा धागा लेखकाने काढला आहे. वाचक सूज्ञ आहेतच. या धाग्यातील उल्लेख केलेल्या साईट्स वर जाऊन कोणीही फसू नये.)
**************** आज मला एक ईमेल आलाय, त्यात लिहिले आहे..... फक्त ५०/- रुपयात १७००/-किमतीचे व्हावुचर! आणि तेही कोणत्याही रेस्टॉरंट मध्ये चालणारे!! व्वा! चक्क १६५०/-चा फायदा!! किती मजा येईल नाही? विशेष म्हणजे कोणत्याही रेस्टॉरंट मध्ये चालणारे व्हावुचर देणार्याचे किती सारे कनेक्शन्स असतील नाही? म्ह्टले कोण असेल हा, ह्या घोर कलियुगात इतका फायदा करुन देणारा? अशा या दानशुर कर्णाची अवश्य भेट घेतलीच पाहीजे, असे मनात ठरवून त्याचे नाव व पत्ता शोधु लागलो. वेब साईट आहे www.savethedeals.in सेव द डील्स डॉट इन आणि साईट बनवणारा आहे Eviano Digital S.L.U. अरेच्चा! S.L.U. अशी कोणत्या प्रकारची कंपनी असते? Eviano Digital S.L.U. चा जरा अजून शोध घेतला तर... या शोधात Wrong deal and money deduction आणि Cheating असे नको ते शब्द दिसायला लागलेत. पुढे जावून कंझुमर कंप्लेंट्च्या लिंक मध्ये बर्याच जणांची फसवणुक झाल्याचे लिहीले आहे. Fraud Site extorting money from people, But unlike other website, this one does not show how much its going to deduct and neither did it ask for OTP. Transactions without OTP are fraudulent. Viola Wickman सारखे विदेशी लोकही फसले आहेत! anbujeev लिहितात ALWAYS use virtual credit cards for phishy websites for safe play. देवच जाणे खरे खोटे काय आहे, पण या दानशुर कर्णाची अवश्य भेट घेतलीच पाहीजे, आणि त्यासाठी हवा आहे त्याचा पत्ता! **************इशारा: फसव्या साईट्स बद्दल सावध करण्यासाठी हा धागा लेखकाने काढला आहे. वाचक सूज्ञ आहेतच. या धाग्यातील उल्लेख केलेल्या साईट्स वर जाऊन कोणीही फसू नये.
वाचने
6019
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
स्पैम गार्ड ओन असेल
जागरुकता हवी....
In reply to जागरुकता हवी.... by तुषार काळभोर
अरेच्चा, असे कसे झाले?
अर्थशास्त्राचा पहिला नियम
In reply to अर्थशास्त्राचा पहिला नियम by सुबोध खरे
अर्थशास्त्राचा पहिला नियम
In reply to अर्थशास्त्राचा पहिला नियम by विजुभाऊ
मालक, पैसा उत्पादीत केला तर
In reply to मालक, पैसा उत्पादीत केला तर by काळा पहाड
दादागिरी करता आली की
SLU म्हणजे स्पेनमधली सिंगल