✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सत्याचा जय...

ड
डॉ सुहास म्हात्रे यांनी
गुरुवार, 09/04/2014 - 15:44  ·  लेख
लेख
पूर्वपिठिका: नुकतेच मिपावरच्या एका धाग्यावरच्या डॉ सुबोध खरे यांच्या प्रतिसादात खालील वाक्य वाचले... शेवटी काय माणूस चांगला असणे आणी आयुष्यात यशस्वी होणे या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नाही. या वाक्यात सांगीतलेल्या शंभर नंबरी सत्याविरुद्ध समाजात काही वेळेस जाणीवपूर्वक तर इतर काही वेळेस अजाणतेपणाने विचार पसरवला जात असतो आणि त्यामुळे समाजावर किती अनिष्ट परिणाम होतो याबद्दल लिहायचे बरेच दिवस मनात होतेच. पण, डॉ खरेंच्या प्रतिसादाने हातातले काम बाजूला ठेऊन आजच त्यावर खालील विचार लिहायला भाग पाडले, याबद्दल त्यांचे खास धन्यवाद ! ============================================ "नेहमीच सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतो."; "गरिबीची भाकरी श्रीमंतीच्या लाडूपेक्षा गोड असते."; "लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी."; "लबाडी केल्याशिवाय धन अथवा यश मिळत नाही" वगैरे, वगैरे, वगैरे... अशी काल्पनिक, फसवी आणि भोंदू विधाने सर्वसामान्य माणसातल्या भोळसट कवीमनाला भुरळ घालतात. डोळे उघडे ठेवून आजूबाजूला पाहिले तर त्यातला फोलपणा दिसायला फार वेळ लागत नाही. दुर्दैवाने भावनेच्या पुरात वाहून जाणार्‍या माणसाला सर्वसाधारणपणे डोळे उघडे ठेऊन बघणे जरासे कठीणच जाते. सर्वात वाईट गोष्ट ही की बर्‍याच वेळेस अशी विधाने आपले अपयश झाकण्यासाठी एक उत्तम पळवाट म्हणून सोईची वाटतात... अश्या फसव्या फुंकरीने मूळ आजारावर (अपयश) उपाय तर होत नाहीच पण तो अधिकच बळावतो (यशासाठी प्रयत्न करण्याऐवजी अपयशाचे समर्थन करून स्वतःचेच मानसिक खच्चिकरण करण्याची वृत्ती बळावते). जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम परखडपणे सत्याला सामोरे जायची (ब्रूटल ऑनेस्टी) आणि वस्तूस्थितीकडे डोळे उघडे ठेऊन बघण्याची (लॉजिकल थिंकिंग) सवय अंगीकारली पाहिजे. मग त्यावरून झालेल्या बोधाने जो निर्णय पटेल तो ज्याचा त्याने घ्यावा... मात्र जर चुकीचा निर्णय घेतला तर त्याच्या परिणामांची तयारी ठेवावी... त्या परिणामांची जबाबदारी झटकून टाकायला काल्पनिक समजूतींचा आधार घ्यायची घातक सवय सोडून देणे आवश्यक आहे. कोणीतरी म्हटले आहेच ना की, "यश म्हणजे अपयशाचा अभाव नाही तर अपयशातून उठून, अंग झटकून, परिस्थितीचा सामना करून तिच्यावर विजय मिळवणे आहे." म्हणूनच सुरुवातीला दिलेल्या किंवा तत्सम फसव्या वाक्यांऐवजी खालील परखड सत्य स्विकारल्यास "मानसिक खरेपणा" आणि "ऐहीक यश" या दोन्हींची शक्य तेवढी "नैतीक सांगड" घालणे शक्य होईल: १. नेहमी सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतो. नेहमी सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतोच असे नाही. परिश्रम घेतल्याविना असे काही झाल्यास तो योगायोग समजावा. याचा अर्थ विजयासाठी असत्याने वागायला पाहिजे असा अजिबात नाही तर असत्याचा पराभव करण्यासाठी लागणारी अक्कलहुशारी आणि ताकद बाळगणे जरूर आहे असा आहे. सितेला पळवून नेल्यावर पश्चाताप झाला म्हणून रावणाने तिला सन्मानाने परत पाठवले नव्हते. रामाला रावणाबरोबरचे युध्द जिंकूनच सत्याचा विजय सिद्ध करावा लागला होता. २. गरिबीची भाकरी श्रीमंतीच्या लाडूपेक्षा गोड असते. हा चलाख श्रीमंतांनी गरीबाला कायम गरीब ठेवण्यासाठी आणि त्याच्या जीवावर स्वतः कायम श्रीमंत राहण्यासाठी पसरवलेली खोटी कल्पना आहे. या खोडलेल्या विधानाचा मानसिक सुखांशी ओढून ताणून संबंध लाउन (वडाची साल पिंपळाला लाउन) आर्थिक अपयशाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला जातो. सत्य हे आहे की लाडू हा नेहमीच भाकरीपेक्षा गोड असतो आणि श्रीमंती ही नेहमीच गरिबीपेक्षा जास्त सुखकारक जीवन शक्य करते. मात्र ऐहीक सुख समाधानकारक पद्धतीने भोगण्यासाठी, "जर तो पैसा सरळ मार्गाने मिळवलेला असला तर" खूप मदत होते. पैशाबद्दल सत्य असे आहे की त्याला ऋण/नकारार्थी (negative) मुल्य आहे. म्हणजे थोडक्यात असे "तो नसला तर नक्कीच दु:खदायक असतो, पण असला तर सुखदायक होईलच असे नाही." मात्र पैसा योग्य मार्गाने मिळवलेला असला तर त्याचे फायदे उपभोगताना न्युनगंड / पकडले जाण्याच्या भितीचा अभाव तरी नक्की राहील. ३. लुळीपांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी. हे एक भंपक विधान आहे. लुळेपांगळेपणा-धडधाकटपणा आणि श्रीमंती-गरिबी यांचा अर्थाअर्थी अथवा सरळ-सरळ काहीच संबंध नाही. सत्य हे आहे की, या जगात अनेक लुळेपांगळे गरीब आहेत आणि धडधाकट श्रीमंत आहेत. शिवाय अनेक पंगु श्रीमंत त्याच्या श्रीमंतीमुळे उत्तम/बरे जीवन जगत आहेत आणि त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त प्रमाणात असलेले धडधाकट गरीब हालाखीचे जीवन जगत आहेत. वैध मार्गाने कमावलेली सधनता तुम्हाला अश्या अनेक सुखकारक गोष्टी मिळवून देऊ शकते, ज्यांची गरीब स्वप्नेही बघू शकत नाही. ४. "लबाडी केल्याशिवाय धन अथवा यश मिळत नाही" हे सुद्धा वरच्या भोंदू वाक्यांइतकेच... किंबहुना त्यांच्यापेक्षा जरा जास्तच... भोंदू वाक्य आहे. जगात असत्य, अनिती वगैरेचा मार्ग पकडून धन आणि यश कमावणारे अनेक लोक आहेत पण त्याबरोबरच सत्य आणि नीतिच्या मार्गावर चालून सधन आणि यशस्वी झालेले लोकही कमी नाहीत. मात्र आपण दुसर्‍याची परिस्थिती पडताळून पाहत असताना वापरलेले सधनतेचे आणि यशाचे निकष आपले नसून त्या व्यक्तीचे असायला हवे; स्वतःबद्दल पडताळणी करायची असेल तेव्हाच स्वतःचे निकष वापरणे योग्य होईल; इतके तारतम्य ठेवणे जरूर आहे. कारण सधनतेची आणि यशाची व्याख्या माणसागणीक वेगळी असू शकते. वर केवळ चारच वाक्ये उदाहरणाखातर दिली आहेत. जरा आजूबाजूला पाहिले तर अशी अनेक भंपक वाक्ये "चलाख लोक स्वत:च्या फायद्यासाठी" किंवा "स्वघोषित विचारवंत चार टाळ्या कमवायला" वापरताना दिसतील. या आणि अश्या इतर वाक्यांना केवळ निरर्थक अथवा फोल म्हणून सोडण्यात अर्थ नाही. सक्रिय प्रयत्नांनी त्यांना कचर्‍याचा डबा दाखवणे आवश्यक आहे... कारण अपयश मागे सारून सतत स्वतःच्या बळावर प्रामाणिक प्रयत्न करून सधन व सुखी होण्याचा प्रयत्न करायला उत्साहीत करण्याऐवजी अशी वाक्ये अपयशाचे भ्रामक समर्थन करत समाजाला पंगू करण्याचे काम करत असतात... सशक्त, विचारी आणि शहाणा समाज बनण्याच्या वाटेत अश्या अंधश्रद्धा फार मोठा अडथळा बनून उभ्या आहेत.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
मत

प्रतिक्रिया द्या
55448 वाचन

💬 प्रतिसाद (218)

प्रतिक्रिया

अर्थाचा विपर्यास करून कै च्या कै लेख लिहिलेला वाटला!

संजय क्षीरसागर
Sat, 09/13/2014 - 21:53 नवीन
एका वाक्यात सारांश! आणि विपर्यास होण्याचं कारण म्हणजे जेते इतिहास लिहीतात ही गोष्टच लक्षात घेतली नाही! त्यामुळे `जे जिंकले ते प्रामाणिक' असं ठरवून, (सत्याचा) संघर्षाशिवाय विजय नाही हा निष्कर्ष काढला. ती चूक लक्षात आणून दिल्यावर मला विचारलेला पहिला प्रश्न संपला! मग `तुम्हाला इतके प्रतिसाद का द्यावे लागतात?' या प्रश्नाचं उत्तर द्या असा घोषा लावला. आणि त्यावरनं काय सिद्ध करायचं तर `सत्याचा आपोआप विजय होत नाही!' (संपादित)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

@माऊ ताई - तुम्ही दिलेल्या

प्रसाद१९७१
Tue, 09/09/2014 - 19:06 नवीन
@माऊ ताई - तुम्ही दिलेल्या उदाहरणाच्या अगदी उलटी उदा बघण्यात आली आहेत. ८० च्या दशकात इंपाला सारखी गाडी घरात आणि नोकरचाकर असताना अजिबात न बिघडलेली आणि आयुष्यात भरपुर कष्ट केलेली ( ते कष्ट भाकरी मिळवण्यासाठी नव्हते, २-४ कोटीची गाडी मिळवण्यासाठी असतील ) २ व्यक्तीमत्व बघितली आहेत. या उलट गरीब मुले सुद्धा थोडे पैसे आल्यावर माजलेली आणि गर्भश्रीमंताचा आव आणणारी बघितली आहेत. तो त्या त्या माणसाचा गुणधर्म.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

होय. तशीही उदाहरणं पाहण्यात

कवितानागेश
Tue, 09/09/2014 - 19:18 नवीन
होय. तशीही उदाहरणं पाहण्यात आहेत. पण मूळात आपल्यातली कमतरता ओळखून त्यातून मार्ग काढावा का? आणि कसा काय काढता येइल? याबद्दल चर्चा सुरु आहे. काही श्रीमन्त लोक त्यांच्यापेक्षा श्रीमन्तांकडे बघून पुढे जायचा मार्ग काढतात. काही लोक आहे त्यात 'गर्भश्रीमंताचा आव' आणतात. किंवा क्वचित 'समाधानी' असल्याचे नाटक करतात. पण ते स्वत्;ला फसवणं आहे हे ओळखत नाहीत..... त्याबद्दलच मूळ चर्चा आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

पुर्वी मिपावर धाग्याचा

मृत्युन्जय
Tue, 09/09/2014 - 17:20 नवीन
पुर्वी मिपावर धाग्याचा ट्यार्पी वाढवण्यासाठी सुपार्‍या दिल्या घेतल्या जायच्या. सध्याचा रेट काय आहे?
  • Log in or register to post comments

ही काय भानगड आहे

विटेकर
Tue, 09/09/2014 - 17:49 नवीन
नवीन आलेले प्रतिसाद " नवीन " असे लाल लेबल लावून का दिसत नाहीत या धाग्यावर ? संबन्धित अधिकारी इकडे लक्ष देतील काय ?
  • Log in or register to post comments

टोळांना खाऊ घालू नका

पैसा
Tue, 09/09/2014 - 18:52 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

आपला एकच सल्ला

काउबॉय
गुरुवार, 09/11/2014 - 22:25 नवीन
48 laws of Power रोंबर्ट ग्रीन Marathi अनुवाद सत्ता Shailaja madam वाचा सगळी हरामखोरी काउन्टर हरामखोरी नो फिलोसोफी प्रैक्टिकल ओनली कोळुन प्याल
  • Log in or register to post comments

२००!

बॅटमॅन
Mon, 09/15/2014 - 18:19 नवीन
२००!
  • Log in or register to post comments

वा, वा ! अनेकांच्या धाग्याला

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 09/15/2014 - 18:39 नवीन
वा, वा ! अनेकांच्या धाग्याला पंख लावण्याच्या अनेक मोहिमांनंतर आणि संमंच्या अनेकदा अनेक प्रतिसाद उडविण्याच्या/इकडून तिकडे नेण्याच्या अथक प्रयत्नांनंतरही धाग्याने व्दिशतक गाठले, हे पाहून ग्लब्लून आले ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

द्विशतकी धाग्याबद्दल अभिनंदन!

बॅटमॅन
Mon, 09/15/2014 - 18:51 नवीन
द्विशतकी धाग्याबद्दल अभिनंदन! काही विशिष्ट विषय मिपावर काढले की "शतक-द्विशतक होणार 'निछ्छित'" या सत्याचा मात्र नेहमीच जय होतो बरे का ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

द्विशतकी धाग्यावरच्या किमान

प्यारे१
Mon, 09/15/2014 - 18:38 नवीन
द्विशतकी धाग्यावरच्या किमान शतकी भागीदारीसाठी एक्का काका नि सरांचं हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

पण निष्कर्ष काय?

कवितानागेश
Mon, 09/15/2014 - 22:20 नवीन
पण निष्कर्ष काय? मी काय करायचं सत्यासाठी?? ;)
  • Log in or register to post comments

खरं सांगू?

पैसा
Mon, 09/15/2014 - 22:22 नवीन
एक्का हातात ठेवा, आणि छेक्के पंजे टाकून द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

.

कवितानागेश
Mon, 09/15/2014 - 22:30 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

एक्का हातात ठेवा, आणि छेक्के

विलासराव
Mon, 09/15/2014 - 22:47 नवीन
एक्का हातात ठेवा, आणि छेक्के पंजे टाकून द्या. हे अर्धसत्य आहे . पुर्ण सत्य हवे असेल तर शेवटी का होईना एक्काही टाकावाच लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अहो, त्याना सत्त्या हव्या

हाडक्या
Tue, 09/16/2014 - 21:10 नवीन
अहो, त्याना सत्त्या हव्या असतील तर, त्यासाठी छक्क्या-पंज्यांचा उपयोग नाहीच ना.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

मजा आली राव.

अर्धवटराव
गुरुवार, 09/18/2014 - 02:07 नवीन
सत्याचा विजय काय, प्रामाणिकपणाचं आध्यात्म काय, त्यातच नितीमत्ता थयमान घालतेय... ओहोहोहो. विजय ना सत्याचा होतो ना असत्याचा... विजय/पराजय होतो सामर्थ्याचा. हे सत्य-असत्य मंडळी उगाच मधेमधे लुडबुड करतात ;) पण एक आपल्याला पटतं हां... अंतीम विजय सत्याचाच होतो असं का म्हटल्या जातं? आपापलं सामर्थ्य घेऊन सत्य-असत्य दोघेही आमने सामने येतात. पण सत्य असत्याच्या एक पाऊल पुढे असतं. असत्याचा आधारच मुळी सत्याचा नकार असतो. सत्य इन फर्स्ट प्लेस येतें आणि मग त्याला नाकारणारणं असत्य. त्यामुळे निर्णायक क्षणी सत्याला फायनल घाव घालायची संधी मिळते व युद्ध तात्पुरतं संपतं. अवांतरः सत्य, असत्य, विजय, पराजय, प्रामाणीक/अप्रामणिकपणा, मनाची एकसंघता वगैरे हे सर्व मनाचे खेळ आहेत. त्यापलिकडे काहि नाहि. अति अवांतरः अंमळ उशीरच झाला धागा उघडायला (एका अत्यंत आदरणीय मिपावृंदाने हा धागा अवश्य चाळायचा सल्ला दिला त्याबद्दल आभारी आहे :) ) . तिकडे तो रामायण धागा रिड ओन्ली झाला त्यामुळे टंकनश्रम वाचल्याची प्रामाणीक हळहळ वाटली :( पण त्या धाग्यात इतक्या वेळा "राम" वाचायला मिळाल्यामुळे धागाकर्त्याचे आणि प्रतिसादकांचे आभार मानावे तेव्हढे कमिच. रामरायाला किती चिंता आमची. येन केन प्रकारेण रामनामाचे घास भरवतोच :)
  • Log in or register to post comments

काय ठरलं शेवटी?

प्यारे१
गुरुवार, 09/18/2014 - 13:41 नवीन
काय ठरलं शेवटी? सत्या २०१४ अ‍ॅवॉर्ड कुणाला देणार शेवटी (म्हणजे २०१५ मध्ये ) -हा धागा २०१५ पर्यंत चालेलच अशी 'खात्री' असलेला :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा