सायकलींग... (भाग १)
उत्तरायण साठी झालेली पुणे ते बडोदा ट्रीप मनाप्रमाणे पार पडल्यामुळे २०१४ सालाची सुरूवात झकास झाली होती.
ऑक्टोबर - नोव्हेंबर २०१३ पासूनच माझी गुजरात ट्रीपची तयारी सुरू होती तेथून परत येतानाच "आता पुढे काय..?" असा प्रश्नही डोकावत होता. त्या ट्रीपचा हँगओव्हर उतरण्यात दोनेक आठवडे गेले दरम्यान भीमाशंकर / गिरवली वगैरे भटकंती झाली. या दरम्यानच एकदा सायकलींग सुरू करावे असा विचार डोक्यात आला.
काही मित्रांचा सल्ला घेतल्यानंतर "उत्साहात सायकलींग सुरू करणारे पुढे कितपत नियमीत सायकलींग करतात हा विचार कर." असा सल्ला सगळीकडून मिळाला (थोडक्यात म्हणजे, "तुझे हे वेड किती दिवस टिकेल सांगता येत नाही..!!")
सायकलींग करायचे म्हणजे नक्की काय करायचे हे मलाही नेमके स्पष्ट नव्हते. सायकल चालवायची, ओके. पण कुठे..? किती लांब चालवणे शक्य होईल..? सायकल कोणती घ्यावी? कोणत्या प्रकारची घ्यावी? वगैरे प्रश्नही होतेच. माहिती काढण्यास सुरूवात केल्यानंतर अनेक ठिकाणच्या अनेक सल्ल्यांमुळे गोंधळ आणखी वाढला. शेवटी या मुद्द्यावर आणखी जास्त वेळ न घालवता सर्वप्रथम एक सायकल विकत घेवून चालवायला सुरू करू आणि बाकीचे नंतर बघू असा विचार केला व सायकल विकत घेण्याच्या दृष्टीने शोधाशोध सुरू केली. अनेक शोरूम्स आणि दुकानांना भेट दिल्यानंतर "फँटम सी रॉक" हे मॉडेल पसंत पडले. आता ही सायकल विकत घ्यायची असे ठरल्यानंतर दिलीप या मित्राने या पूर्वीही मिळालेला सल्ला आणखी एकदा दिला, "आधी एक सेकंड हँड सायकल घे.. चालव आणि जर नियमीत सायकलींग केलेस तरच नवीन घे." आता सेकंड हँड सायकल कुठून आणायची असा प्रश्न उभा राहण्याआधीच त्याने त्याची स्वत:ची माळ्यावर पडलेली सायकल दाखवली व आपण दुरुस्त करून घेवू अशीही ऑफर दिली.
त्या सायकलचे प्रथमदर्शन फारसे उत्साहवर्धक नव्हते. सायकल अक्षरश: धूळ खात पडली होती.
लहान टायर साईझ (२४"), गिअर्स नाहीत आणि सीटही नाही..! पण त्या सायकलवर दिलीपने १९९० साली (होय १९९० साली..!!) चिंचवड ते गोवा ट्रीप केली होती. __/\__
दुरुस्त करून घेतल्यानंतर ही सायकल अशी चकाचक झाली.
उत्साहात सायकल हातात घेतल्यानंतर पहिली राईड केली - चिंचवड ते धायरी. (सायकल घरी आणण्यासाठी!) त्यानंतर नियमीतपणे या सायकलने खडकवासला मार्गे डोणजे किंवा डेक्कन, विकांतादरम्यान जास्त भटकणे, नियमीतपणे अंतर वाढवणे असे सुरू केले. ट्रेकींगसह बाकी सर्व उद्योगांना विश्रांती दिली व आठवड्यातून किमान दोन / तीनदा २० ते ३० किमी अंतर कापणे सुरू केले.
ही सायकल चालवताना अनेक गोष्टी लक्षात आल्या - चढ आल्यानंतर प्रमाणापेक्षा जास्त दम लागणे, सायकलचा स्पीड वाढवता न येणे, साध्या उतारावरही पेडल्सची क्षमता संपणे वगैरे वगैरे. आता कोणत्या प्रकारची सायकल घ्यावी याच्या संकल्पना स्पष्ट होत होत्या. सायकलला गिअर्स असणे गरजेचे आहे, टायर साईझ मोठा हवा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सायकल वजनाला हलकी हवी, या दृष्टीने चांगल्या सायकलचा शोध सुरू झाला.
या दरम्यान वैभव नामक आणखी एका मित्राची पीअरलेस कंपनीची सायकल माझ्या ताब्यात आली. सेंट्रल सस्पेंन्शन, १८ गिअर्स आणि कमी वजन वगैरे हव्या त्या गोष्टी होत्याच.
पीअरलेस सायकल
या सायकलने डोणजे - अतकरवाडी (सिंहगड पायथा), कात्रज नवीन बोगद्यातून खेड शिवापूर वगैरे नवीन रूट धुंडाळणे सुरू केले. इतर माहिती काढताना आपला पिंगू सायकल चालवतो हे कळाले व त्याचे डोके खाणे सुरू केले. पहिली लांबची राईड केली ती पिंगू आणि मायबोली ग्रूपसोबत पुणे ते कामशेत. (२७ एप्रिल २०१४)
पिंगू, केदार दिक्षीत, केदार जोशी, अमित, किरण ही मंडळी सोबत होती.
केदार जोशी माझ्या सायकलवर बसला आणि पुढच्या क्षणाला सायकलचे नामकरण झाले होते. "र ण गा डा" :D
मी त्याची बर्गमाऊंट कंपनीची सायकल चालवली आणि माझ्या सायकलचे नवीन नाव रणगाडा का आहे हे नीऽऽऽट समजले. ती सायकल एकदम हलकी होती आणि आपण जितकी शक्ती पेडलींग मध्ये लावतो तितकीच शक्ती रस्त्यावर लागू पडत होती. माझ्या सायकलप्रमाणे "पावर लास" वगैरे भानगडीच नव्हत्या, आणि गिअर्स अत्यंत स्मूथ होते. टिपीकल भाषेत सांगायची तर "मख्खन" होती ती सायकल. याउलट रणगाड्यावरून ९० किमी अंतर कापणे भरपूर थकवणारे होते.
यानंतर अचानकच एकदा अमितसोबत पुणे सातारा हे ११० किमी अंतर सायकलने पार केले. सातारा राईड खर्या अर्थाने पहिली लांबवर केलेली राईड होती. सोबत एक बर्गमाऊंट कंपनीची हायब्रीड आणि श्नेल कंपनीची MTB अशा सायकल्स होत्या. टेललाईट पडणे, सायकल पंक्चर होणे, उन्हामुळे शरीरातले पाण्याचे प्रमाण कमी होणे, प्रचंड थकवा येणे वगैरे प्रकारांचा व्यवस्थीत अनुभव घेत आम्ही संध्याकाळी सातार्याला पोहोचलो.
परतताना मी एकटाच श्नेल MTB घेवून आलो. थोडे अंतर सायकल चालवत आणि थोडे अंतर एखाद्या गाडीत सायकल टाकून असे पार केले.
सायकल कशी घ्यावी याहीपेक्षा कशी नसावी याचे अनेक धडे हळूहळू मिळत होते. सायकल संदर्भात आतापर्यंत मिळवलेली माहिती निरूपयोगी असल्याचे लक्षात आले होते आणि इम्पोर्टेड साईकल्सची माहिती मिळवण्यास सुरूवात केली.
इम्पोर्टेड सायकलच कशाला लागते..?
अरे सायकलच्या वजनाने असा किती फरक पडणार आहे..?
मी सायकलमध्ये ३० / ३५ हजार रूपये घालवणार नाहीये.
कशाला पण..?? - ही ठीक आहे की..
ही सगळी माझीच मते मुकाट गिळून इम्पोर्टेड सायकलचा शोध घेण्यास सुरूवात केली. गिअर्स, शिफ्टर्स, शिमानो अॅसेरा, अॅडजेस्टेबल स्टेम, वगैरे नवीन नवीन संकल्पना कानावर पडत होत्या आणि मी त्याची माहिती काढत होतो.
...शेवटी मे महिन्यात हिय्या केला व इम्पोर्टेड सायकल घेतली.
मेरीडा क्रॉसवे १५.
मोठा टायर साईझ - २८", फ्रंट सस्पेंशन, सीटखाली एक सस्पेंशन, २४ गिअर्स (शिमानो अॅसेरा), वजन फक्त १३ किलो आणि चालायला एकदम स्मूथ.. एकदम मख्खन..!!
या सायकलवरची पहिली राईड होती - पुणे ते महाबळेश्वर.
रोहित आणि किरण - हायवेवर..
वाई कडे..
पसरणी घाटात - पिंगू आणि किरण
महाबळेश्वरला पो हो च लो ..!!!!!
किरण, मी, पिंगू, अमित, रोहित.
पुणे महाबळेश्वर राईड ही आमच्या पुढच्या अत्यंत महत्वाकांक्षी अशा "पुणे-गणपतीपुळे" राईडची पूर्वतयारी होती. कारण पुढच्याच वीकांताला आम्ही पुणे-माणगांव-श्रीवर्धन मार्गे संपूर्ण समुद्रकिनार्यावरच्या रूटने गणपतीपुळे गाठणार होतो.
प्रमाणाबाहेर यशस्वी झालेल्या महाबळेश्वर राईडमुळे सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्याच मूडमध्ये आम्ही पुणे गणपतीपुळे राईड सुरू केली.. मात्र पहिल्याच दिवशी तीन अपघात झाल्याने आम्ही दुसर्या दिवशी पुण्याला परतण्याचा निर्णय घेतला.
पहिला अपघात अत्यंत विचित्र पद्धतीने झाला. आम्ही एका पुलावरती थांबून पराठे वगैरे खादाडी सुरू असताना किरणची सायकल वार्यामुळे चक्क पुलावरून खाली पडली. सुदैवाने सायकलला काहीही झाले नव्हते.
दुसरा अपघात - पिंगूचा. सायकलचा ब्रेक न लागल्याने त्याची सायकल त्याच्यासह कोसळली व दोघांनाही थोडेफार खरचटले.
तिसरा अपघात माझाच झाला. ताम्हिणी घाटाचा उतार सुरू झाल्यानंतर वेगाचा अंदाज आला नाही आणि एका वळणावरती सायकल कंट्रोल न झाल्याने मी रस्त्याशेजारच्या काचा आणि दगड असलेल्या खोल खड्ड्यात सूर मारला..
वरील ब्रेकमार्क दिसत आहेत त्या मार्गाने मी गेलो पण रस्त्याने उजवीकडे वळण घेतले होते. ;)
सुदैवाने मला व सायकललाही खूप जास्त लागले नव्हते. मात्र गॉगल फुटला होता व सायकल हेल्मेटला क्रॅक गेला होता.
एवढं झाल्यावर मात्र सर्वांनी माणगांव मार्गे इंदापूर गाठले व दुसर्या दिवशी सर्वजण पुण्याला परतलो.
या अपघाताने बर्यापैकी शॉक बसला होता... तीनेक आठवडे पूर्ण बरे होण्यात गेले आणि पुन्हा नव्या जोमाने सायकलींग सुरू केले.
सिंहगड पायथा हा आवडीचा रूट होताच. आणखीही अनेक मार्ग सायकलने पार करण्यास सुरूवात केली.
पुणे-खेड शिवापूर-कोंढणपूर-सिंहगड घाट-पुणे (७० किमी)
पुणे - वारजे - पानशेत - डोणजे - पुणे (७० किमी)
पुणे - पानशेत - कादवे घाट - वेल्हे - पाबे घाट - डोणजे - पुणे (८० किमी)
पुणे - बोपदेव घाट - सासवड - पुरंदर पायथा - पुणे (९० किमी)
एव्हाना पावसाळाही सुरू झाला होता.. वीकांत आणि अनेकदा रोजच सायकलींग सुरू होते.
पावसाळ्यातले काही फटू..
कादवे घाट.. (या फटूमध्ये डावीकडे माझी सायकल दिसत आहे.. आणखी एक रायडर सापडतो आहे का..?)
कादवे खिंड
ताम्हिणी घाट
३१ ऑगस्टला झालेल्या शिरवळ राईड दरम्यान सुधाकरने आणखी एका आव्हानात्मक गोष्टीबद्दल सांगितले...
(क्रमशः)

वाचने
48610
वाचनखूण
प्रतिक्रिया
72
वा! सायकल बहाद्दर!
झक्कास. :)...
मान गये जनाब
पुणे - बोपदेव घाट - सासवड -
In reply to पुणे - बोपदेव घाट - सासवड - by सुहास..
खरं आहे.. बोपदेव घाट आणि पाबे
वा!
मस्तच.
मस्त लेख...
मस्त !!
मी आपली सायकल टांगून ठेवली
मोदकभाव - वेलकम ब्याक आणि लईच
जबरा.
बापरे!! एव्हढा सगळा उपद्व्याप
In reply to बापरे!! एव्हढा सगळा उपद्व्याप by स्पंदना
(No subject)

हो आणि उगा तंगड वगैरे तुटलं
In reply to बापरे!! एव्हढा सगळा उपद्व्याप by स्पंदना
(No subject)
In reply to बापरे!! एव्हढा सगळा उपद्व्याप by स्पंदना
स्मार्टफोन
अरे वा!
In reply to अरे वा! by पैसा
फारसे नाही. वजन राखून आहे.
मोदकराव बरेच दिवसानी बोर्डावर
In reply to मोदकराव बरेच दिवसानी बोर्डावर by ज्ञानोबाचे पैजार
सायकल कुठे ठेवता
In reply to सायकल कुठे ठेवता by श्रीरंग_जोशी
ते स्वतः दिवसभर सायकलवर असतात
In reply to सायकल कुठे ठेवता by श्रीरंग_जोशी
नळ स्टॉपला टेलिफोन
खरं सांगायचं तर तू सायकल
मोदकरावांचे पुन्हा एकदा
In reply to मोदकरावांचे पुन्हा एकदा by धन्या
+१
In reply to +१ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
+१११
In reply to +१११ by नाखु
काकानु.... कस्काय.?
In reply to काकानु.... कस्काय.? by मोदक
मी जिवंत आहे !
सलाम!
मनोज,
वेलकम ब्याक मोदक. सायकलगाथा
आजच हा लेख वाचला. आणि नेल्सन
+१०००
मस्त रे
छान!!
In reply to छान!! by बाळ सप्रे
BRM
मादक... स्वारी स्वारी मोदक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Alibaba's record IPO covered entire deal in 2 days: Sourcesभारी आहेस. __/\__
उत्तम !
सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद.
'सायकल छंद' आवडला. पुढील
मस्त लेख!!
In reply to मस्त लेख!! by सूड
आणि हो,
बघतंय हां मी....
शुभेच्छा. ध्यास घेउन
मोदक यांच्याकडून प्रेरणा
In reply to मोदक यांच्याकडून प्रेरणा by खटपट्या
मोदक यांच्याकडून प्रेरणा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बोलक्या पोपटांचे राजकारणIn reply to मोदक यांच्याकडून प्रेरणा by मदनबाण
माझ्या हिकड घेतलीय ! तुमच्या
In reply to माझ्या हिकड घेतलीय ! तुमच्या by खटपट्या
(No subject)
In reply to (No subject) by मोदक
(No subject)
In reply to (No subject) by मोदक
(No subject)
तुमच्याकडुन प्रेरणा घेऊन
In reply to तुमच्याकडुन प्रेरणा घेऊन by कॅप्टन जॅक स्पॅरो
अभिनंदन..!!!
अभिनंदन..!!!
धन्य
राम्राम मंडळी,
सही रे.... एकदम किडा सोडलास
सायकलिंग वर लेखमाला पाहून
In reply to सायकलिंग वर लेखमाला पाहून by विअर्ड विक्स
धन्यवाद.. डेकॅथलॉन ला नेहमी
माझ्या डोक्यात हे खुळ आलय हे
आमचं सायकल पुराण...
सध्या तरी माझ्या घोड्याची
सुरु केल सायकलिंग …
In reply to सुरु केल सायकलिंग … by अनिरुद्ध.वैद्य
अभिनंदन!!!!
In reply to अभिनंदन!!!! by मोदक
:)
बादवे - फोटो मलाच दिसत
In reply to बादवे - फोटो मलाच दिसत by मोदक
फोटो दिसतं नाहीत धाग्यामधले.
In reply to बादवे - फोटो मलाच दिसत by मोदक
माझाही गणेशा झालाय
In reply to माझाही गणेशा झालाय by श्रीरंग_जोशी
नाय वो... काहीही बदलले नाहीये
मस्तच !
मस्त पोस्ट.... अनुभव जोरदार
फोटो अपडेटवले आहेत.. दिसत