क्रिकेट शौकिनांच्या देवावर घाणेरडे आरोप?
गेली १९ वर्षे सातत्याने क्रिकेटचे नवनवे विक्रम करणारा , क्रिकेट शौकिनांच्या गळ्यातला ताईत असलेला सचिन तेंडुलकर घमेंडी आणि खोटारडा आहे , असं कोणी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का ? मुळात कोणी असं बोलेल तरी का त्याच्याबद्दल ? तर हो , सचिन घमेंडी आणि खोटारडा असल्याचे त्याच्यावर आरोप करण्यात आले आहेत आणि हा आरोप करणाराही कोणी भलता सलता नाहीये. हा महानुभव आहे सचिन विरुद्ध अनेक सामने खेळलेला ऑस्ट्रेलियाचा माजी विकेट किपर अॅडम ग्रिलक्रिस्ट.
गिलख्रिस्टच्या आत्मचरित्रात त्याने सचिनविषय़ी लिहिताना तो खोटारडा असल्याचे म्हटले आहे. या सांगण्याला संदर्भ आहे तो मागच्या दौ-यात झालेल्या हरभजन आणि सायमंडसच्या वादाचा. गिलक्रिस्टच्या मते , अँड्र्यू सायमंडस आणि भज्जी यांच्यात झालेल्या भांडणात भज्जी दोषी होता. मात्र , सचिनने खोटी साक्ष दिली. तो पहिल्यांदा खरे बोलत होता , मात्र नंतर त्याने विधाने बदलली आणि तो खोटं बोलला. इतकेच लिहून गिलक्रिस्ट थांबला नाही. त्याच्या मते , सचिन फक्त खोटारडा नाही तर घमेंडीही आहे. याबाबत आपल्या आत्मचरित्रात गिलक्रिस्ट म्हणतो की , टीम हरल्यानंतर सचिन कधी विरोधी टीमशी हातमिळवणीही करत नाही.
गिलक्रिस्टच्या या मुक्ताफळांबाबत सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त होत आहे. त्याच्या या लिखाणाबाबात बीसीसीआयचे सदस्य राजीव शुक्ल यांनीही तीव्र नाराजी दर्शवली आहे. सचिनसारख्या मोठ्या खेळाडूवर असे आरोप करण्यापूर्वी त्याने विचार करायला हवा होता , असा आक्षेप त्यांनी घेतला आहे.
जाहीर
भुंकु द्या. . .
धोंडोपंत आणि सुक्या यांच्याशी पुर्णपणे सहमत
गेट वेल सून गीली !!
गिल्ली ला सद् बूद्धी दे
गिल्ली ने
पण आता