आदल्या रात्री उत्सव साजरा करताना अनवधानाने, जोशात किंवा धुंदीत काही खबरदारी घ्यायची राहून गेली तर त्यातून काही अनपेक्षित, अनावश्यक असे घडू नये म्हणून बाजारात 'The morning after pill' मिळते. सुजाण आणि समंजस लोक ती घेतात..
पण दहा दिवस दणक्यात उत्सव साजरा केल्यावर आणि दहाव्या रात्री त्याचा कर्णकर्कश परिपाक मोठ्या धामधुमीत केल्यानंतर अकराव्या सकाळी त्याच्या परिणामांची तमा न बाळगता आपण आपल्या कामाला लागतो. किंबहुना आपल्या जल्लोशी उत्सवाचे काही दुष्परिणाम असू शकतील हे आपल्या गावीही नसते..
But all is not lost....
आज मुंबईच्या चौपाट्यांवर जाऊन स्वच्छता मोहीम राबवणा-या लोकांना, त्यांच्या विचारप्रक्रियेला, त्यांच्या कृतीशीलतेला, त्यांच्या सद्भावनेला माझा आत्यंतिक मानाचा मुजरा !
त्या महासागराने साभार परत केलेले आपल्या उत्तुंग, भव्य, दिमाखदार, 'राजे'शाही पापांचे ढिगारे उचलण्याचे काम ही मंडळी करत आहेत.
त्यात कदाचित काही विद्यार्थी जबरदस्तीने कार्यकर्ते म्हणून ओढले गेले असतील आणि अनिच्छेने किंवा चरफडतही ते हे काम करत असतील.. पण मोठे झाल्यावर योग्यायोग्यतेचे निकष लावण्याएवढे समंजस आणि सुजाण नागरिक ते या कामातून नक्कीच झालेले असतील.. त्यांनाही आजच प्रणाम!
पुण्यात मानाचे गणपती असतात. त्यांच्या क्रमांकानुसारच त्यांची मिरवणूक निघते. पण ते सगळे मानाचे गणपती देखील या कार्यकर्त्यांना पहिल्या क्रमांकाचा मान देतील.. त्यांची मिरवणूक निघत नसली तरीही..!
All is not lost म्हणताना आणखी एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो. मुंबईत आता खास विसर्जनासाठी artificial ponds तयार करतात. गेल्या वर्षी अश्या ponds मधे सुमारे 22000 मूर्तींचे विसर्जन झाले. या वर्षी तो आकडा काकणभर जास्तच असेल. या बाबतची सजगता आणि मान्यता वाढतीये ही आनंदाची बाब..!
वाचने
5101
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
बर्याच दिवसांनी दिसलात !!
नक्कीच !
In reply to बर्याच दिवसांनी दिसलात !! by सूड
+१
In reply to बर्याच दिवसांनी दिसलात !! by सूड
सार्वजनिक उत्सव (गणेशोत्सव,
+१
In reply to सार्वजनिक उत्सव (गणेशोत्सव, by काळा पहाड
खाज..
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नवीन दिसतांय म्हणून सांगतो,
In reply to खाज.. by निखळानंद
>>सार्वजनिक उत्सव (गणेशोत्सव,
In reply to सार्वजनिक उत्सव (गणेशोत्सव, by काळा पहाड
इत्यादी कामं (जबरदस्तीनं)
In reply to >>सार्वजनिक उत्सव (गणेशोत्सव, by सूड
बर मग?
In reply to इत्यादी कामं (जबरदस्तीनं) by विजुभाऊ
घ्या हो.......
कोन बंद करायची भाषा करणार? कमाईच साधन हाये
चांगले उपक्रम
@१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी
In reply to चांगले उपक्रम by पैसा
आणि झुंडीने जाणार्या
In reply to चांगले उपक्रम by पैसा
आणि झुंडीने जाणार्या
In reply to आणि झुंडीने जाणार्या by मराठी_माणूस
खूप आवडलाय....