मोग~याचा गजरा .....
गोष्ट जुनी आहे
लुधियाना ला "हीरो मॅजेस्टिक लिमिटेड" नावाची सायकल.. मोटर सायकल ला लागणारे स्पेअर पार्ट्स बनवणारी अग्रगण कंपनी आहे..
आमच्या युनिट ला त्यांच्या प्रॉडक्ट साठी गेजस बनवण्याची तगडी ऑर्डर असायची..
कंपनी कडे अडीच ३ लाखाची बिले थकली होती..तसेच लुधियाना ला एक लोकल ट्रेडर पण होता त्याच्या बिलाची वसुली पण करायची होती..म्हणून लुधियाना ला जाण्याचे मी ठरवले.
नेमकी त्याच वेळी हिच्या ब्यांकेस २-३ दिवसाची सुटी आली होती आणखीनं रजा टाकून हि म्हणाली "मी पण येणार"
मी होकार दिल्यावर ति पण खूश झाली व लुधियानाचे काम झाले की दिल्ली ला जाऊ असे सुचवू लागली.
मला वसुलीचे टेन्शन होते त्या मुळे वसुली झाली तर जाऊ नाहीतर "सवेरेवाली गाडी से पुना...असे सांगितले.
लुधियानाला आल्यावर "धंटाघर " परिसरातील एका चांगल्या हॉटेल मध्ये उतरलो..
दुस~या दिवशी स्नान ..चकाचक दाढी करून मी १० च्या सुमारास कामासाठी बाहेर पडलो..
कारखाना हॉटेल पासून ५-६ की.मी दूर होता..रिक्शांनी पोहोचलो..
नमस्कार चमत्कार झाले अन मी बिलाची लिस्ट पर्चेस च्या ऑफिसरला दिली..
मग ति अकाउंट्स नंतर फायनास मधे फिरु लागली.
शेवटी ३-३.३० च्या सुमारास चेक तयार झाल पण साईनिंग ऍथॉरिटी जागेवर नव्हती..ति आला अन एकदाचा चेक हातात पडला अन मी मनात हुश्श केले..
४ च्या सुमारास एक नवी ऑर्डर हातात घेऊन सर्वांची आभार मानत कारखाना सोडला..
तिथून तडक ट्रेडर कडे आलो..तास भर वेळ घालवल्यावर दहा हजाराची कॅश हातात पडली ..चोराची लंगोटी..
५.३० वाजून गेले होते..ट्रेडर च्या दुकानातून हिला फोन केला व म्हटले काम मनासारखे झाले आहे..तयार राहा बाहेर जायचे फिरायला म्हणून..
हॉटेल वर येताना एक फुलाचे दुकान लागले तिथून मस्त ३ मोग~याचे गजरे खरेदी केले..
हॉटेल वर येतायेता ६-६.१५ वाजुन गेले होते..मी रुम वर गेलो हि नट्टा पट्टा करून तयार होतीच..
आल्याआल्या तिच्या हातात रक्कम व चेक दिला व फ्रेश होण्यास बाथरूम मध्ये गेलो.
बाहेर आल्यावर हिला सांगितले "तुला गजरे आणले आहेत" गजरे पाहिल्यावर ति पण खूश झाली..
तयार झाल्यावर हिला म्हटले "मी काउंटर वर जरा चौकशी करतो..तू रूम आवरून लॉक लावून ये" व निघालो..
खाली काउंटर वर मॅनेजर कडे कोणते चांगले हॉटेल जेवण्या साठी इत्यादी विचारत असताना हि गजरे माळत जिना उतरत होती..
व मॅनेजर माझ्या बोलण्याकडे लक्ष न देता हिच्या कडे बघत होता..
मी टेबलावर टकटक केले अन माझ्या कडे लक्ष वेधले..हि पण सोफ्यावर जाऊन पेपर चाळत बसली..
मात्र मॅन्येजर तिच्या कडे बघत होता..
मी नजरेनेच "काय? असे विचारले..
त्या वर तो म्हणाला"सर जी आपको एक बोलू तो चलेगा?"
मी मान डोलवताच ..तो म्हणाला" मॅडम जी को गजरा उतारनेको बोलिये मी मानेनेच "क्यु" असे विचारताच तो म्हणाला सरजी..ईधर का रिवाज है कि अच्छ्यी घरकि औरते गजरा नही सजाती... "वोह टाईप" की औरते गजरा सजाकर घुमती है"
मी हिच्या कडे आलो अन तिला कानात सांगितले की गजरा काढ..कारण ऐकताच हिने गजरा काढला व पर्स मध्ये ठेवला.
बाहेर आल्यावर आम्ही दोघेजण ब~याच वेळ हसत होतो..
दक्षिणे कडे बंगळूर.चेन्नईला गेले की पार शाळकरी मुली ते ६०-६५ वर्षाच्या आज्या डोक्यात गजरे घालून मिरवत असतात..आणी हरयाणा लुधियाणा त हा प्रकार..किती विविधता आहे भारतात ....
याद्या
4730
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
छान अनुभव !!
हाहाहा
तरीच....सरदार गुडघी असतात ते उगीच नाही.
शीख समुदायांबाबत जोक्स नको
In reply to तरीच....सरदार गुडघी असतात ते उगीच नाही. by रवीराज
क्षमस्व
In reply to शीख समुदायांबाबत जोक्स नको by प्रणित
आणि हे सरदार
In reply to तरीच....सरदार गुडघी असतात ते उगीच नाही. by रवीराज
हा संस्कृतीचा परीणाम आहे.
भारतातील कोणत्या संस्कुतीत
In reply to हा संस्कृतीचा परीणाम आहे. by विजुभाऊ
सहमत. अख्ख्या भारतात सर्वांत
In reply to हा संस्कृतीचा परीणाम आहे. by विजुभाऊ
उत्तर भारतीय विषेशतः एन सी आर
In reply to सहमत. अख्ख्या भारतात सर्वांत by बॅटमॅन
लैच.
In reply to उत्तर भारतीय विषेशतः एन सी आर by विजुभाऊ
खास.
हो हो शीवाय ह्या वाक्याचा अर्थ कळला नाहि
In reply to खास. by प्रभाकर पेठकर
गोव्यात
मस्त
लेखाचे बदलेले शिषेक, लेखातला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!बिल वसुलीचं उपाख्यान काही
काका किस्से भारी आहेत.
मोगरा
या अविकाकांना लय ईट्रेस्ट