र्य आणि ऱ्य हे दोन्ही वेगवेगळे आहेत का ? तर उत्तर होकारार्थी आहे. उदाहरणार्थ इथे मिपावर टाईप होतोय तो पहिला र्य आहे.
हे दोन्ही साध्या डोळ्यांनी सर्वसाधारणपणे सारखेच दिसतात तर वेगळे ओळखायचे कसे ? न्याहाळकाच्या (ब्राऊजरच्या) कंट्रोल F मध्ये यातला एक एक र्य आणि ऱ्य वेगळा वेगळा घेऊन शोध घ्या, दोन्ही र्य एकमेकांना शोधात ओळखत नाहीत हे दिसून येईल.
फरक ओळखण्याचा दुसरा मार्ग बॅकस्पेस ची कळ वापरून य डिलीट करणे, येथी र्य मधील य डिलीट केल्या नंतर र् एवढेच चिन्ह उरते. ऱ्य च्या य ला बॅकस्पेस ने डिलीट केल्यावर ऱ् उरतो म्हणजेच पहिला र्य र् + य वापरून निर्मीत केला जातो आणि दुसरा ऱ्य ऱ् आणि य यांच्या संधी जोडाक्षराने साधला जातो. अर्थात हि टेक्नीकॅलिटी आहे. महत्वाचा प्रश्न हा र्य बरोबर कि हा ऱ्य बरोबर हाच आहे.
*अगदी असाच प्रॉब्लेम इतर कोणत्या अक्षरास आहे का ? र्ह आणि ऱ्ह मध्ये सुद्धा आहे.
* साध्या डोळ्यांनी फरक पडत नसेल तर कोणता अधिक बरोबर हा उपद्व्याप कशा साठी ?
पहिले आणि सर्वात महत्वाच कारण गूगल आणि इतरही शोधयंत्रात एखाद्या शब्दाचा शोध घेताना काही शोध न दाखवले जाण्याचा संभव आहे. आणि असे शोध दाखवले जात नाहीएत हे सर्वसामान्यपणे सर्वसामान्य व्यक्तीस सहज लक्षातही येत नाही पण एखाद्या व्यक्तीचा एखादा शोध यंत्रातील महत्वाचा शोध योग्य माहिती हाताशी न मिळाल्या मुळे अर्धवट राहू शकतो.
दुसरे कारण काय टाईप केल्यावर कोणत अक्षर दिसाव याच्या प्रमाणी करणाच आहे. आत्तापर्यंत टायपींग संबधीत प्रमाणीकरणाच्या प्रश्नाकडे सर्वसाधारण पणे डोळे झाक करत आलो आहोत पण हि उदासीनता खरेच योग्य आहे का ? बहुतांश लोक कमीत कमी पण उत्कृष्ट टायपींग पद्धती वापरत असतील तर टायपींगचा वेग वाढणे सुलभता साधणे इत्यादी फायदे होऊ शकतात.
तिसरे मराठी विकिपीडिया विक्शनरी शब्दकोश इत्यादी प्रकल्पात वेगवेगळी टाईपींग पद्धती वापरणार्यांकडून होणारी द्विरुक्ती टाळून शोध/माहिती घेणार्या वाचकाच्या हाती योग्य लेख सुलभतेने उपलब्ध करणे
*मिपा वरील र्य कसा टंकला जातो = Ry वापरून
*हा दुसरा ऱ्य कसा टंकला जातो = ऱ् + य
असेच काही प्रश्न अॅ च्या संदर्भाने आहेत पण ते स्वतंत्र धाग्यातून मांडेन.
वाचने
12382
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
काही शब्दांची अडचणच आहे.
हृ साठी hRu
In reply to काही शब्दांची अडचणच आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आभार.
In reply to हृ साठी hRu by श्रीरंग_जोशी
संगणकावरील देवनागरी टंकनामधील समस्या.
कसं काय ?
In reply to संगणकावरील देवनागरी टंकनामधील समस्या. by एस
स्वॅप्स आणि बिरुटे सर नेमक समजल नाही :(
In reply to कसं काय ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मलाही कल्ल नाय.
In reply to स्वॅप्स आणि बिरुटे सर नेमक समजल नाही :( by माहितगार
माझ्या प्रतिसादाचा खुलासा
In reply to मलाही कल्ल नाय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा जो अर्धा र आहे तो
In reply to माझ्या प्रतिसादाचा खुलासा by एस
तेथील सर्व प्रतिसाद वाचले
In reply to हा जो अर्धा र आहे तो by माहितगार
है शाबास!
In reply to माझ्या प्रतिसादाचा खुलासा by एस
:-))
In reply to है शाबास! by पैसा
अॅ हे अक्षरही एॅ ....
ऱ्य आणि ऱ्ह हे दोन्ही चुकीचेच आहेत.
तुम्ही माझा वरील प्रतिसाद आणि
In reply to ऱ्य आणि ऱ्ह हे दोन्ही चुकीचेच आहेत. by गावरान