अभिनंदन मयुरेश. मुद्देसूद लिहिले आहेस.
हेच पत्र लोकसत्तेस, महाराष्ट्र टाइम्स (कि 'महाराष्ट्रकाळ?'), सकाळ इत्यादी वर्तमान पत्रांना पाठवावे. समस्त मराठी माणसांनी वाचले पाहिजे.
काल हेच पत्र घाशीराम कोतवालाने टाकले होते. तात्यांनी ते काढुन टाकले होते. परत कसे आले?
मयुरेशवैद्य : सदस्य कालावधी 29 मिनीटे 5 सेकंद???
---
आहे हे अस आहे.
मयुरेश आपले म्हणणे मला तंतोतंत पटते. विलासरावांसारखा मुख्यमंत्री मी कमीत कमी ऐकला नाही.
राज्य, कायदा आणि सुयवस्था असा काही प्रकार असतो बहुधा हेच त्यांना माहित नसावे. मुख्यमंत्र्यांचे पद हे पक्षीय राजकारणापेक्षा मोठे असते आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला काही वारसा आहे हेही सध्या त्यांना माहित नसावे.
कोणी एक राजकारण करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरतो, साध्या न्यायालयात नेण्यावर इतका हिंसाचार होतो, यात कोणाची थट्टा आहे हेच समजत नाही.
कोणताही पक्ष, शासन आणि जाणकार देशहित आणि देशाच्या समस्यावर बोलतांना दिसत नाही.
शिवाजीच्या वेळेस लोकशाही नव्हती हे खरे. पण चार / पाच मावळे एकत्र आले आणि कोणा मुसलमानाला मारत होते असेही ऐकले नाही. आजच्या राजकारणाने त्याही पेक्षा खालची पातळी गाठलेली आहे. परराज्याच्या नौकरीसाठी येणार्यांना मारहाण होते, शासन त्यात बघ्याची भूमिका घेते यात महाराष्ट्राचीच लाज जाते असे मला वाटते.
असो. आपले पत्र विलासरावजी वाचणार नाही आणि वाचले तरी त्यांना आपले मुद्दे पटणार नाहीच.
अजिबात लाज जात नाही. मुळात आता हे "लाजाणंच" आता आपण सोडलं पाहीजे. हिंन्दी मिडिआ इतक्या उन्मत्तपणे खोडारडेपणा करतो, त्याना नाही लाज वाटत ! लालु यादव ह्यापूढे महारष्ट्रात परी़क्षा घेणार नाही म्हणून सांगतो, त्यांना नाही लाज वाटतं ? आपण इतके वर्ष लाजतोच आहोत.
( शिवशाही कधीच संपली आहे ! सध्या यादवी आहे ! )
कलंत्री साहेब,
परराज्याच्या नौकरीसाठी येणार्यांना मारहाण होते, शासन त्यात बघ्याची भूमिका घेते यात महाराष्ट्राचीच लाज जाते असे मला वाटते.
मुळात परराज्यातील तरूण महाराष्ट्रात येऊन नोकर्या पकडतात आणि आपल्या मराठी मुलांना डावललं जातं ह्याबाबत शासनाने बघ्याची भूमिका घेऊ नये. महाराष्ट्राची लाज तिथे जाते.
मुंबईतल्या बहुतेक स्टेशनवरील स्टॉल्स हे 'गुप्ता', 'अग्रवाल' ह्यांचे आहेत तिथे 'कुळकर्णी' ,'पाटील', 'देशमु़ख' अशी नांवे दिसावीत असा प्रयत्न शासन करत नाही, तिथे महाराष्ट्राची लाज जाते.
महाराष्ट्रातील रोजगार निर्मितीत १०० टक्के वाटा महाराष्ट्रातील 'आपल्या मुलांना' मिळावा असे मुख्यमंत्र्यांना वाटत नाही, तिथे महाराष्ट्राची लाज जाते.
पक्षीय राजकारणासाठी, स्वतःची खुर्ची वाचविण्यासाठी, पक्ष श्रेष्ठींचे लांगुलचालन करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बिहारच्या लालूप्रसादांची छटपुजेची व्यवस्था आम्ही करू असे म्हणतात तेंव्हा कलंत्री साहेब......
महाराष्ट्राची लाज जाते हो, लाज जाते.
महाराष्ट्राची लाज घालवली तर आहेच पण ती देशमुख-पाटलांच्या निर्लज्ज पायचाट्या सरकाराने.
कलंत्री साहेब, आपण टाईम्स, बीबीसी यांच्या स्टायलीत लिहिलेत. तेही असेच करतात. भारतात काहीही घडले की त्यांना भारताल्या तथाकथित सेक्युलरांच्या प्रेमाचा उबाळा येतो. व जे काही प्रश्न निर्माण झालेत त्याचे खापर उजव्यांवर फोडून ते मोकळे होतात. कमालीचे साम्य वाटले तुमच्या आणि त्यांच्या लेखनात.... असो. विषयांतरा बद्दल क्षमस्व.
बाकी पंतंनी मुद्दे व्यवस्थित मांडलेत. त्यांच्यांशी १००% सहमत.
आपला,
(मर्हाटी) भास्कर
फक्त कलंत्री साहेब असे कोणते घृणास्पद कृत्य तुम्ही केले आहे ज्यामुळे तुम्हाला लाज वाटते? हक्कासाठी मराठी माणुस लढत आहे त्यात त्याला लाज वाटण्याचे काही कारण नाही. निदान तुम्हाला तरी लाज वाटु नये अशी अपेक्षा आहे.
वेताळ
श्री मयुरेश यांनी अतिशय बोलक पत्र लिहिल आहे. महाराष्ट्राच्या लोक भावना त्यातून अतिशय समर्पकपणे व्यक्त झालेल्या आहेत.
श्री शिवराज पाटील यांनी राज यांच्या भुमिके बद्दल जो खणखरपणे आवाज उठवला तसा त्यांनी अतिरेक्याबाबतीत ऊठवला पाहिजे होता हे तुमच म्हणण मला आजिबात पटलेल नाही.अतिरेक्यांशी चर्चा करुन प्रश्न सोडवायचा असतो, त्यांच्या वर कारवाई करुन नव्हे. ही तुम्हाला कस समजत नाही! महाराष्ट्राच्या अस्मिते साठी राजिनामा देणारे चिंतामणराव देशमूख कूठे आणि हे देशमूख कुठे!
बाकी राज यांची बदनामी कोणिही कीतिही करो त्या सर्वाना मी एवढेच सांगु इत्छितो..
तुमची तुम्ही करा आरास
तुमचे तुम्ही ओवाळा दिवे
तुमच्यात मी येवू कसा
बदनाम झंजावात मी.....!
(सुरेश भटांच्या ओळी)
मयुरेशच्या अनुमती नंतर मी हे पत्र त्यांच्या नावासहीत तीनशे लोकांना पाठवले.
उचललीस मूठ तू... धन्यवाद मयुरेश!
आपला,
(देशद्रोही सोनिया साम्राज्या विरुद्ध मुठ उचललेला) भास्कर
श्री भास्कर यांस,
आपण आपल्या नावा मागे लावलेले विशेषण हे मिपा धोरणा विरुद्ध आहे असे माला वाटते.
कोणालाही पुराव्याशिवाय देशद्रोही म्हणण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही.
क्षमस्व.
आपला आरंभशूर........... (|:
आपल्या प्रतिसादाला आम्ही प्रतिवाद करु शकतो. पण तुर्तास वेळ नाही. त्यामुळे संपादक मंडळाला वाटल्यास त्यांनी ते विषेशन उडवून लावावे.
जाता जाता... प्रतिवादाचे कच्चे मुद्दे...
१. महाराष्ट्र देशासाठी बलिदाने करत आला आहे. पण दिल्लीश्वरांनी नेहमी महाराष्ट्र विरोधी धोरण स्विकारलेले आहे. सध्या त्याचे नेतृत्व कोणाकडे आहे? महाराष्ट्र जर देशाचा कणा आहे तर महाराष्ट्राचा द्रोह करणार्यास काय म्हणावे?
२. संसदेवर हल्ला करणारा सरकारी दयेने जिवंत आहे मात्र "भारत माता की जय" म्हणनार्या नि:शस्त्र निदर्शकांवर गोळीबार करुन त्यांना मारले जाते (जम्मू, नागलँड, वगैरे). गोळीबाराचा हा आदेश सुद्धा दिला तो सरकारनेच ना? आणी ते सरकार चालवणारे रिमोट कोण? मग तो देशद्रोह नव्हे का?
३. देशाच्या आंतर्गत बाबतीत ढवळाढवळ करणार्या कोणा तिनपाट देशाच्या (व्हॅटिकन) कानपटात वाजवाचे सोडून त्यांना रेड कार्पेट देण्याच्या वल्गना करणारी देश विरोधक नव्हे का?
४. दूरदृष्टीच्या कटाचा भाग म्हणून परकीय मदतीने पद्धतशीरपणे देशाची डेमोग्राफी बदलवणार्या तसेच विरोधक देशभक्तांना ठार मारणार्या इव्हँजिलिस्टांच्या पाठीशी उभी राहून व पर्यायाने देशविभाजनाला चालना देणारी देशद्रोही नव्हे काय?
असो. तुर्तास तरी येवढेच. यातही जर काही अक्षेपार्ह वाटत असेल तर संपादकीय मंडळाने ते उडवावे ही नम्र विनंती.
विषयांतराबद्दल क्षमस्व.
आपला,
(निर्भिड) भास्कर
प्रतिक्रिया
सकाळीच हे
तरिहि पत्र
हे पत्र मी
मस्त...
पाठविले
काल हेच
तात्यांनी
कायदा आणि सुयवस्था
अजिबात लाज
महाराष्ट्र आणि परराज्य..
प्रभाकरपंताशी सहमत
असेच म्हणतो..
तात्यांच्या फर्मानामुळे जहाल मत व्यक्त करत नाही
विलासराव देशमूखांना खूले पत्र
३०० लोकांना पाठवले
(देशद्रो।ही सोनिया साम्रज्या विरूद्ध मुठ उचलेला) भास्कर
धोरणा विरुद्ध ?