माझे स्वयंपाकाचे प्रयोग
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
1) कोल्हापुरी चिकन मसाला.
रविवार निवांत बारा वाजेपर्यंत लोळून कंटाळा आला. मग मध्येच चिकन खायची हुक्की आली.
मनात आले की आज सुट्टी आहे तर हॉटेल मध्ये जाण्यापेक्षा स्वतःच बणवुया . लगेचच बाजारातून सगळे समान घेऊन आलो. जसे की चिकन, सुहना मसाला, कोथिंबीर, कांदे, तीळ, ओले खोबरे ई. आज काहीही झाले तरी झणझणीत चिकन बनवायचे आणि मिपावर पाककृती टाकून प्रतिसादांचा पाऊस पाडायचा असे मनात ठरवून मी स्वयंपाक घराकडे वळलो. चिकन बनवण्यासाठी जे काही मसल्याचे वाटण करतात ते करत असताना त्यात ओले खोबरे घालावे लागते.. मी मुद्दाम थोडे जास्त खोबरे घातले... म्हणले पाहुया जरा नवीन प्रयोग करून.
जेव्हा चिकन शिजवून त्यात लाल तिखट घालायची वेळ आली तेव्हा त्यात अंदाजे 2 चमचे लाल तिखट घातले. पण चिकनला लाल तरी किंवा कट (कोल्हापूर वाल्यांना माहिती असेल) आला नाही.. पुन्हा अजुन 2 चमचे लाल तिखट टाकले.. तरी तेच. काही केल्या चिकन चा रंग म्हणावा तसा लाल होत नवता. शेवटी अजुन 2-3 चमचे लाल तिखट टाकले. आणि मग लाल रांग पाहायला मिळाल्याचे समाधान झाले. मी मनातल्या मनात हुश् केले. आणि थोडा वेळ गॅस चालू ठेवून बाहेर गेलो.
10 मिनीटनंतर एकदम लाल आणि तिखट आणि झणझणीत चिकन खायला मिळणार म्हणून एकदम खुशीत होतो.
चिकन चा पहिला घास खाल्ला...... आणि किचन कडे धावत जावे लागले.. कारण काय.???? अहो ते इतखे तिखट झाले होते की साखरेचा डबा शोधेपर्यंत जीभ पूर्ण जाळून जायची बाकी होती...!!!!! अजुन 2-3 घास जरी ते चिकन खाल्ले असते ना तरी दिवसभर टॉयलेट मध्येच राहावे लागले असते... माझी 2 तसांची मेहनत फुकट गेली. :( शेवटी थोडा विचार (आय टी वाल्यांच्या भाषेत रूट कॉज अनॅलिसिस )केल्यावर कळले की आपण नवीन प्रयोग करण्याच्या नादात ओले खोबरे अगदीच जास्त टाकले होते.. त्यामुळे लाल तिखट टाकल्यावर चिकन ला लाल रांग येत नव्हता. आणि चिकन ला रंग आणण्याच्या नादात आपण खूप च जास्त लाल तिखट टाकले होते
2) कांदा भजी
एकदा नाइट शिफ्ट सपवून घरी आल्यावर जाम भूक लागली होती. घरी काहीच शिल्लक नव्हते. सगळ्यात सोप्पा आणि पटकन होणारा पदार्थ म्हणून मी कांदा भजी कार्याचा विचार डोक्यात आला. आणि मग काय….. कांदे पटापट चिरुन बेसन पीठ वागेरे... ते सगळे काही करून कढई मध्ये भजी सोडल्या... मस्त खमंग वास येत होता.
तेवढ्यात मला ऑफीस मधून एक महत्वाचा फोन आला. फोनवर बोलत असताना भाजी करपुन जाऊ नयेत म्हणून मी गॅस बंद केला. आणि फोन वर बोलायला लागलो. बोलता बोलता 15-20 मिनिटे कधी होऊन गेली ते कळलेच नाही. बोलणे संपल्यावर स्वयंपाक घरात जाउन पाहतो तो काय....!! भजी टुम्म फुगलेल्या. कढईतले सगळे तेल गायब. मी आ वासून फक्त पाहातच राहिलो. भज्यांचे वड्यात रुपांतर झाले होते. शेवटी चमचा घेतला आणि त्याने दाबून दाबून सगळे तेल बाहेर काढले. परंतु काहीच उपयोग नाही झाला. भजी आता खाण्याच्या लायकीच्या राहिल्या नव्हत्या. मी फक्त त्या खमंग वासानेच थोडे पोट भरले आणि राहिलेले पोट भरण्यासाठी चिरमुरे आणि फारसाण यांचे डबे शोधू लागलो. :)
अजूनही बरेच किस्से आहेत. पण हे दोन मात्र नेहमी आठवतात. आता स्वयंपाकघर आणि माझी क्वचितच भेट होते. कारण तिथे राज्य करणार्या व्यक्तीने नुकतीच माझ्या आयुष्यात एण्ट्री केली आहे. त्यामूळे आता फक्त हॉल मधे बसून " अग ऐकतेस का... आज पाऊस खूप छान पडतोय. मस्त पैकी कांदाभजी आणि चहा करशील का? " :)
तुमच्या कडे देखील आसेच काही गमतीशीर किस्से आसतील तर जरूर सांगा.
प्रतिक्रिया
सध्याच ब्राझील वास्तव्यात
आयला....
लुलु नाही का तिक्डे?
माझे दोन (अप)प्रयोग!
>>>>तिथे राज्य करणार्या
हा हा. अभिनंदन हो! लग्न
बाप्पु मी अगदी सिरियसली
साखर वापरून पहा.
हाहा!
नका हो जखमेवर मीठ चोळू....
हम्म....