Skip to main content

घातक स्युडोमार्ग

लेखक ऋषिकेश यांनी बुधवार, 27/08/2014 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
"बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले?" माय फुट! मी कसाही वागेन नी काहिहि बोलेन! शिवाय माझी पावले कोणी वंदावी अशी माझी इच्छाच कुठाय? आणि असली तरीही हा नियम मी का म्हणून मानावा? आणि तसंही मी अगदी बोलल्याप्रमाणे वागल्यावरही माझी पावले वंदतीलच लोकं याचीही खात्री नाहिच्चे! ========= "साला स्युडोलिबरल" त्याने आणखी एक शिवी हासडली. हा स्युडो शब्द इतका व्हेग आहे की त्याच्याशी संग केल्यावर होणारी प्रसुती ही कोणालाही कोणत्याही पातळीवर नेऊ शकते. स्युडोलिबरल, स्युडोसेक्युलर, स्युडोयंव नी स्युडोत्यंव! महात्मा गांधींपासून ते डॉ आंबेडकरांपर्यंत आणि पंडीत नेहरूंपासून ते मनमोहनसिंगांपर्यंत कोणालाही काहीही विचार न करता क्षणात झाडून टाकायला हे "स्युडो" हत्यार मंडळींच्या हातात आलं आहे. विचाराचा प्रतिकार करू न शकणारी लोकं मग व्यक्तीच्या वागण्यावर घसरतात आणि मग त्याचं वागणं तसं नव्हतं ना? त्याचं वागणं असं होतं ना? मग काय बाता करता? अरेच्या! त्याचे विचार चुक आहेत की नाहीत ते बोला! हवं तर त्या माणसाला दुटप्पी म्हणा दुतोंडी म्हणा पण तरीही तो विचारांचा प्रतिवाद नाहिच्चे! त्या व्यक्तीच्या विचारांचा प्रतिवाद हा विचारांनी करण्याची धमक नसलेले विचारषंढ लोक मग त्या व्यक्तीलाच झाडून टाकायला हा 'स्युडोमार्ग' अवलंबतात. व्यक्तीलाच झाडून टाकलं की विचारांचा प्रश्नच येत नाही, ना रहेगा बांस... माझ्यामते कोणताही समाज पुढे यायला - बदलत रहायला - परंपरा नावाच्या चिखलाला दूर सारू शकणारी पुरोगामी मंडळी अत्यावश्यक असतात. पुरोगाम्यांचे (मग ते वैयक्तिक जीवनात तसे वागु शकत असोत वा नसोत ते इथे गैरलागू आहे) किंबहुना पुरोगामी विचारांचे कोणत्याही प्रगती इच्छिणार्‍या समाजात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण त्या त्याच व्यक्ती असतात ज्या परंपरेने चालत आहे, संस्कारांमुळे गरजेचे आहे असल्या भुलथापांच्या पलिकडे जाऊन तर्काला, बुद्धीला जे पटेल त्यावर आपले मत बनवतात. प्रत्येकवेळी परिस्थितीमुळे, काही भावनिक कारणांमुळे कधी कायद्याच्या भितीमुळे किंवा कधी कायदा मोडायची प्रत्यक्ष धमक नसल्याने असेल ते तसे वागु शकतीलच असे नाही, पण त्यांनी दिलेला विचार हा समाजाला पुढेच घेऊन जात असतो. पुरोगाम्यांचा आवाज दाबल्यावर, त्या व्यक्तींना आउटराईट रिजेक्ट केल्यावर भुतकाळात अडकलेल्या रादर रुतलेल्या आणि लोकांच्या निव्वळ अस्मितांना चुचकारत नेतृत्त्व करू पाहणार्‍या परंपरावाद्यांच्या हातात नेतृत्त्व गेलं की देशाचा, समाजाचा फक्त पाकिस्तान होऊ शकतो इतके लक्षात घेतले तरी पुरेसे आहे. पुरोगामी, लिबरल म्हणजे काही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नाही किंवा विशिष्ट काळाचीही नाही. एखादी गोष्ट निव्वळ चालत आली आहे, किंवा "हे करून कुणाचं वैट झालंय का?" किंवा "आमच्या पिढ्यान पिढ्या असं वागत आल्या आहेत" किंवा "आपल्या धर्मात, जातीत, 'लोकांत' हे असंच चालतं" असली कारणं आपली मते बनवायला पुरेशी न वाटणार्‍या कोणत्याही व्यक्तीला मी पुरोगामी म्हणेन. पुरोगामी किंवा अभिजन वर्ग हा मुठभर उच्चजातीतील किंवा उच्चभ्रुंचा अट्टाहास आहे किंवा त्यांची नाटकं आहेत, हि प्रतिमा उभी करणे हा मला देशद्रोह वाटतो. या अभिजन वर्गाचे अस्तित्त्वच नसेल तर समाज पुढे जाईलच कसा? समाजाला साचु न देता सतत पुढे खेचत रहायचे अतिशय महत्त्वाचे कार्य हा अभिजन वर्ग करत असतो. आजवर त्यांच्या कृतीवर असंख्यवेळा टिका झाली आहे. होत असते. आणि ती होणारच कारण ते "स्टेटस कूओ" भेदत असतात त्याला विरोध हा अध्याहृत असतो. मात्र भारतात आजवर सुदैवाने हा विरोध विचारांना व कृतीला झाला आहे. त्या व्यक्तीला मात्र समाजात आदरच मिळत आला आहे. ज्योतिबांसारख्या व्यक्तीला मोठा विरोध झाला पण तो त्यांच्या कार्याला व विचारांना झाला. त्यांना अडवण्यात आले, त्यासाठी अनेक गोष्टी केल्या गेल्या पण समाजाने ज्योतिबांना शेवटी गौरवलेच. त्यांना आउटराईट रिजेक्ट केले नाही. त्यांना होणारा विरोध हा त्यांना "ग्राह्य" ठरवल्यानंतरची स्टेज आहे. आता लगेच प्रतिवाद येईल की ज्योतिबांना आदर दिला गेला नाही तो त्यांनी त्यांच्या कृतीतून मिळवला आहे. अर्थातच! तुमच्या बोलण्याला यशस्वी कृतीची जोड असेल तर त्याचा परिणाम अधिक होतो हे मान्यच आहे! पण म्हणून तुलनेने कमी कृती करू शकणार्‍या / इच्छिणार्‍या किंवा वेगळ्या प्रकारे/माध्यमांतून समाजप्रबोधन घडवू पाहणार्‍या आगरकर व/वा गोखल्यांसारख्यांच्या विचारांचे महत्त्व अजिबात कमी होत नाही. कोणत्याही समाजाला नवे विचार, नवी दिशा हवी असेल, समाज प्रवाही हवा असेल तर चाकोरी मोडणार्‍या नव्या विचारांची समाजाला आत्यंतिक गरज असते. स्युडो लिबरल, स्युडोसेक्युलर, विचारजंत, हस्तीदंती मनोर्‍यातील मूर्ख अश्या शब्दांनी हल्ली अनेकदा व्यक्तीला दूर केले जाते. त्यांचे काही विचार कित्येकदा पूर्णपणे चुकीचेही असतील पण ते त्यांना मांडु देण्यासाठी पोषक वातावरण ठेवणे ही आपली जबाबदारीच नाही तर अत्यावश्यक कर्तव्य आहे. आततायी वाटणार्‍या विचारांकडे दुर्लक्ष करा किंवा त्यांचा प्रतिवाद करा मात्र त्या व्यक्तीला रिजेक्ट करून, कायमचे अग्राह्य ठरवून त्याच्याकडून येणार्‍या/येऊ शकणार्‍या किंवा आधीच आलेल्या इतर विषयांवरच्या संभाव्य महत्त्वाच्या विचारांनाही तुम्ही घाऊकपणे दूर लोटता आहात. बदलत्या आर्थिक परिस्थितीने आणलेल्या वेगाबरोरच भारतात हा होऊ घातलेला नवा बदल आता सामान्य लोकांमध्ये खूप वेगात रूजतो आहे याची खंत अतिशय बोचरी आहे. या मुक्तचिंतनावरही येणार्‍या प्रतिसादांची पूर्ण कल्पना आहे. त्यावर मी प्रतिवाद करेनच, प्रतिसाद देईनच असे नाही. मात्र त्यात येणार्‍या विचारांवर पूर्ण व आदरपूर्वक विचार करेन इतके मात्र नक्की! बरेच दिवस साचले होते, एकहाती, एकटाकी टंकले आहे. प्रमाणलेखनदोष पदरात घ्याल अशी आशा!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 13290
प्रतिक्रिया 89

प्रतिक्रिया

In reply to by प्यारे१

लै प्रगल्भ होत चाललाय हा प्यारे.... पण वर तुला नक्की 'हितकर' म्हणायचय की 'सोयीस्कर' म्हणायचय ते कळलं नाही.

In reply to by धन्या

सुरुवात अशी आहे, "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले?" माय फुट! मी कसाही वागेन नी काहिहि बोलेन! शिवाय माझी पावले कोणी वंदावी अशी माझी इच्छाच कुठाय? आणि असली तरीही हा नियम मी का म्हणून मानावा? आणि तसंही मी अगदी बोलल्याप्रमाणे वागल्यावरही माझी पावले वंदतीलच लोकं याचीही खात्री नाहिच्चे!> हे मराठीतच आहे. आणि चर्चा त्याबद्दलच आहे. मांडलेल्या विचारांप्रमाणे वागावं की नाही, वागता येतं की नाही, स्वतःला जमलं नाही तरीही इतरांना ढकलता येतं का इ. इ.

In reply to by पैसा

ज्यांना विचारच करू दिला जात नाही त्यांचं काय? विचार आणि कृतीचा परस्परसंबंध असतोच असे कित्येकदा नसते. किंबहुना अविचारे कृती करण्याची आणि ह्याच वेडेपणाला महाजनपंथ मानून चालण्याची सध्या जी जबरदस्त लाट आली आहे तिचं सर्वात मोठं वैशिष्ट्य कदाचित हेच असावं की अशी लाट लोकांना विचार करण्याची संधीच देत नाही. विचार मांडणे ही तर धारिष्ट्याची बाब झाली.

In reply to by पैसा

विचारांचा अभाव म्हणजे अंतिम मुक्तीच साधली की हो या लोकांनी ! त्यांचं आपण मर्त्य मानव काय करू शकणार ?! :) ---(विचार न करता बोलण्याचे स्किल मिळवण्याच्या खटपटीत आजपर्यंत सतत अयशस्वी झालेला) इए

खालील संवाद वाचुन मला मी पुरोगामी/स्युडो/प्रतीगामी/किंवा अजुन काही आहे का? हेच मला जाणुन घ्यायचय. बाकी जग बदलवुन टा़कणारा अजुन जन्माला यायचाय असे आमचे मत. ज्याने त्याने आपले आपल्यापुरते जग बदलावे. कोणीही विदा मागु नये.नसेलच तर कुठुन देउ? मी विपश्यना का करावी याचे (Score: 1) विलासराव पुण्य: 2 मी विपश्यना का करावी याचे उत्तर मला कळले नाही. तुम्ही प्रतिसाद दिलाय त्याबद्द्ल धन्यवाद. त्यात एकही दोष मला तरी दिसत नाही त्यात. प्रत्येक मताशी सहमत.अभ्यास करुन दिलाय यात वाद नाही. खरच मी माझा प्रतिसाद पुन्हा वाचला.माझा आनी अने़कांचा अनुभव आहे असाच त्यातुन अर्थ निघतो आहे. हा माझा दोष. माझा आनी अने़कांचा (पुर्ण जगाचा का असेना) अनुभव आहे म्हनुन कोनीही (एकाही मनुष्याने) विपश्यना का करावी हा अगदी रास्त प्रश्न आहे. मनुष्यप्राण्यात राग,लोभ,काम, क्रोध. मद,मत्सर्,मोह, माया (षढरिपु)असतात. ते कसे उत्पन्न होतात, मनुष्यप्राण्याला प्रभावीत करतात आनी त्याचा त्याला त्रास होतो रोजचे जीवन जगताना. हे सर्व कसे होते याचा कार्यकारणभाव जानुन घेउन त्यापासुन आपल्याला होणार्या त्रासापासुन(दु:ख्खापासुन) सुटका करुन घेणे यासाठी विपश्यना विद्या शिकावी लागते. हे विपश्यना का करावी याचे उत्तर आहे. मी विपश्यना का करावी याचेही हेच उत्तर आहे पण ते त्या व्यक्तीला पटल्यास. जो कोणी राग,लोभ,काम, क्रोध. मद,मत्सर्,मोह, माया (षढरिपु) यांनी प्रभावीत होउन त्रासात (दु:खात) पडत नाही त्यांच्यासाठी विपश्यनेची गरजच नाही. साध्य साध्य झालेल्या व्यक्तिसाठी साधनेची गरज(प्रयोजनच) नाही. मनुष्यप्राण्यात राग,लोभ,काम, क्रोध. मद,मत्सर्,मोह, माया (षढरिपु)असतात. ते कसे उत्पन्न होतात, मनुष्यप्राण्याला प्रभावीत करतात आनी त्याचा त्याला त्रास होतो रोजचे जीवन जगताना. हे ज्याचे त्याने ठरवावे लागते. हेच नेमके काचे (कुणाच्याही) उत्तर आहे. त्रासात पडल्याने जो(महत्वाचा असा काळ्/वेळ) वेळ वाया जातो त्यामुळे. त्यासंदर्भातील हे तुमचे वाक्यः आयुष्यात काय फायदा होईल आणि जर फायदा होत असेल तर माझ्या घालवलेल्या वेळेपेक्षा/कष्टापेक्षा अधिक फायद्याचा आहे का? हा माझ्यासाठी तरी खरा कळीचा मुद्दा आहे. हे एक महत्वाचे कारण झाले. जीवन कसे जगावे हे ही त्यामुळे आपल्याला कळते. घाईने मत बनवु नका की जीवन कसे जगावे दुसर्याकडुन शिकण्याची काय गरज? मी लिहीतोय त्यावर. लवकरच टाकतो मुळ लेखात तेही साधनेचे प्रमुख अंग आहे. त्याशिवाय विपश्यना करुच शकत नाही. प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा किंवा सदस्यनोंदणी करा. Mon, 18/08/2014 - 00:15 | जो कोणी राग,लोभ,काम, क्रोध. (Score: 1) ऋषिकेश पुण्य: 2 जो कोणी राग,लोभ,काम, क्रोध. मद,मत्सर्,मोह, माया (षढरिपु) यांनी प्रभावीत होउन त्रासात (दु:खात) पडत नाही त्यांच्यासाठी विपश्यनेची गरजच नाही. साध्य साध्य झालेल्या व्यक्तिसाठी साधनेची गरज(प्रयोजनच) नाही. आभार्! एकूण चर्चा रोचक आहे. मुळात मला या षड्रीपुंचा त्याग करायचाच नाहिये, कारण या गोष्टींचा जो काही कमी-अधिक प्रमाणातील मिलाफ आहे तो मी आहे. याच्या पल्याड गेलो तर मी मीच उरणार नाही. सध्याचा मी जसा आहे तसा मला प्यारा आहे. त्यामुळे जे काही सुख-दु:ख वाट्याला येते तो ही आयुष्याचा भागच आहे. ते टाळायचे कशाला? असो. जर हे विपश्यना करायचे कारण असेल तर मलाही विपश्यनेची गरज नाही असे सहज म्हणता यावे. प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा किंवा सदस्यनोंदणी करा. - ऋ ------- कल्पनेतल्या धूपदीपांनी जिथे देव खूष होतो तिथे कल्पनेतल्या सज्जनपणाने माणसाने तृप्त राहायला काय हरकत आहे? -- पु.ल. Mon, 18/08/2014 - 00:28 | आभार्! एकूण चर्चा रोचक (Score: 1) विलासराव पुण्य: 2 आभार्! एकूण चर्चा रोचक आहे. मुळात मला या षड्रीपुंचा त्याग करायचाच नाहिये, कारण या गोष्टींचा जो काही कमी-अधिक प्रमाणातील मिलाफ आहे तो मी आहे. याच्या पल्याड गेलो तर मी मीच उरणार नाही. सध्याचा मी जसा आहे तसा मला प्यारा आहे. हेच अध्यात्माचं सार आहे. हीच ती मुक्ती मी पासुन.अर्थातच निर्णय ज्याचा त्याने घ्ययचाय. हे वरती नमुद केलेलच आहे. त्यामुळे जे काही सुख-दु:ख वाट्याला येते तो ही आयुष्याचा भागच आहे. ते टाळायचे कशाला? असो. जर हे विपश्यना करायचे कारण असेल तर मलाही विपश्यनेची गरज नाही असे सहज म्हणता यावे. तुमचा निर्णय योग्यच आहे .

ज्यांचे लोक ऐकतात, ज्यांना मान आहे, ज्यांच्याबद्दल विश्वास आहे अशा सामाजिक क्रांती घडवणार्‍या विचारवंतांचे उअदाहरण घ्यायचं झालं तर एक ठळक नाव डोळ्यासमोर येतं ते ज्ञानोबा माउलीचं. त्यांना 'माउली' म्हणावं, इतका विश्वास जन्सामान्यांना त्यांच्याबद्दल वाततो. कारण त्यांची वृत्ती आणि त्यांची भाषा. त्यांनी कुठेही आता मी तुम्हा यडपटांना जरा शहाणपणा शिकवतो, असा आविर्भाव आणला नाही. अर्थातच तो तसा कधीच नव्हता, म्हणूनच आला नाही. ते श्रोत्यांना उद्द्येशून जे लिहितात ते फार गोड आणि लाघवी आर्जव आहे. तसच त्यांना जे काही सांगायचंय त्या संपूर्ण विवेचनात 'मला आत्यंतिक आनंदाचा ठेवा मिळाला आहे, आणि तो मला सर्वांसोबत वाटून घ्यायचा आहे' हाच भाव सतत आहे. जेंव्हा हा असा 'शेअरिंग' चा भाव असतो, तेंव्हाच समोरची व्यक्ती/ समाज लक्ष देउन , निदान समोरचा माणूस काय सांगतोय ते ऐकतो. त्यावर विचार करतो. अर्थात, हा सोज्वळ भाव खरोखरच मनात असल्याशिवाय शब्दात उतरु शकणार नाही. शिवाय त्यांना जे काही सांगायचं होतं ते त्यांनी अत्यंत सोप्या, मधुर आणि जनसामान्यांच्या भाषेत सांगितलं. त्यामुळे ते विचार समजणं सोपं गेलं. (डिसक्लेमरः ज्ञानेश्वर क्रान्तिकारक नव्हते, असा कुणाचा समज असल्यास त्तो त्यांचा त्यांनी निस्तरावा..) समाजात बदल घडवू शकणार्‍या व्यक्तीचं दुसरे उदाहरण म्हणजे बाबा आमटे. त्यांनी सरळ कृतीनीच सुरुवात केली. जर ते फक्त ' कुष्ठरोग बरा होउ शकतो होऽऽऽऽ' असं सांगत, प्रेझेन्टेशन्स देत फिरले असते, तर काहीही झालं नसतं. पण त्यांच्या कृतीशीलतेमुळेच आज त्यांच्याबद्दल प्रत्येकाच्याच मनात अत्यंत आदर आहे. बाबा स्वतःदेखिल कृती न करण्याची अनेक कारणं देउ शकले असते... पण त्यांच्यातली समाज बदलण्याची खरी तळमळ हेच त्यांचे बळ ठरली. यावरुन तरी स्पष्ट दिसतं की शेवटी कृतीच महत्त्वाची. (वरचाच डिस्क्लेमर पुन्हा. )

ओके.. कृतीला बाजूला ठेऊन फक्त विचार स्विकारार्ह आहेत का नाहीत हे कसं ठरवायच? याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन करता?

ज्याला काही बदल हवे आहेत त्याच्यामध्ये : अ) बदलांसंबंधीचे विचार व्यक्त करण्याचा धीटपणा असला तर तो ते बोलून अथवा लिहून सांगेल आ) ते बदल प्रत्यक्षात आणण्याची धमक असली तर तो त्यासाठी आवश्यक कृती करेल... कृती कशी अथवा किती करेल हे त्याच्या लोकांना समजावून सांगण्याच्या हुशारीवर आणि पद्धतीवर अवलंबून असेल आणि त्या बदलांचे लक्ष असलेल्या लोकांना ते बदल मान्य होणार की नाही आणि मान्य झालेच तर किती प्रमाणात ते लोकांच्या आचरणात येतील हे खालील खालील गोष्टींवर अवलंबून असेल : अ) नवीन बदलांमुळे ज्यांचे हितसंबंध दुखावले जातील अश्या विरोधकांची ताकद, हुशारी आणि त्यांची विरोधाची पद्धती आ) समाजातली त्या वेळेची परिस्थिती... विशेषतः बदलांचे लक्ष असलेल्या लोकांमध्ये तो बदल स्वीकारण्याचा इच्छेची तीव्रता महत्त्वाचे : या जगामध्ये बदल हीच एकुलती एक स्थिर गोष्ट आहे... आणि त्याबरोबर बदलाच्या क्रियेला विरोध ही प्रतिक्रिया होतेच होते. वर सांगितलेल्या दोन प्रतिस्पर्धी लोकांमध्ये जगाच्या सुरुवातीपासून रस्सीखेच चालू आहे आणि ती जगाच्या अंतापर्यंत अशीच चालू राहणार आहे. जेव्हा ज्याचे पारडे वरचढ होईल (जेव्हा लोकांना बदल अनुसरणे न अनुसरण्यापेक्षा जास्त सोयीचे वाटेल) तेव्हा तो जिंकेल. लक्षात ठेवण्याजोग्या काही मुख्य गोष्टी : १. सर्वमान्यपणे लेखी नियम असलेल्या आणि ते पाळले जात असणार्‍या खेळातले नियम मोडले गेल्यास योग्य त्या अधिकार्‍याकडे दाद मागता येते. पण जीवनांत / परिस्थितीत बदल घडवायचा असल्यास असे शक्य नसते. कारण तेथे तर असलेले नियम बदलून नवीन नियम अस्तित्वात आणण्यासाठीचा संघर्ष सुरू करायचा असतो... त्यामुळे अश्या परिस्थितीत वर सांगितलेले रस्सीखेचीचे नियम लागू होतात. २. प्रत्येकाने आपला संघर्ष आपण स्वत: करायचा असतो. नवीन बदलांमुळे होणारे फायदे ज्यांना अजून नीट समजले नाहीत किंवा बदलांमुळे ज्यांचे हितसंबंध दुखावले जाणार आहेत त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा करणे फारसे हुशारीचे नाही. किंबहुना या दोन्ही विरोधी गटांच्या बरोबर रस्सीखेच करून त्यात वरचढ होण्याची इच्छा किंवा ताकद असल्याशिवाय कोणत्याही बदलांचे दिवस येत नाहीत... मग ते बदल कितीही क्रांतीकारी असले तरी. ३. दुसर्‍याचे विचार नीट समजवून घेण्याबद्दल किती अपेक्षा करावी हे स्थल-काल-व्यक्तीसापेक्ष असते. एका देशात सर्वमान्यतेने वर्जित असलेली गोष्ट दुसर्‍या देशात "चलता है" असू शकते. ४. तेव्हा बदल अपेक्षित असेल आणि धमक असेल तर बदलाच्या दिशेने योग्य कारवाई सुरू करणेच योग्य... फक्त तक्रार करणे केवळ अरण्यरुदन ठरेल. ५. काही थोडे लोक आपल्या मनाप्रमाणे परिस्थितीत बदल घडवून आणतात, इतर लोक परिस्थितीनुसार स्वत:त बदल घडवून आणतात... आणि या दुसर्‍या गटातील बहुतेक लोकांना सद्य व्यवस्थेबद्दल कळत-नकळत तक्रार करण्यामध्ये खूप मजा वाटते असे दिसते !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सारांशात्मक प्रतिसाद आवडला. आभार!
प्रत्येकाने आपला संघर्ष आपण स्वत: करायचा असतो. नवीन बदलांमुळे होणारे फायदे ज्यांना अजून नीट समजले नाहीत किंवा बदलांमुळे ज्यांचे हितसंबंध दुखावले जाणार आहेत त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा करणे फारसे हुशारीचे नाही. किंबहुना या दोन्ही विरोधी गटांच्या बरोबर रस्सीखेच करून त्यात वरचढ होण्याची इच्छा किंवा ताकद असल्याशिवाय कोणत्याही बदलांचे दिवस येत नाहीत... मग ते बदल कितीही क्रांतीकारी असले तरी.
हे पटले!

की परिवर्तनाची गरज कोणाला वाटते? आणि परिवर्तनाची दिशा समाजातील कोणता वर्ग ठरवतो? सामाजिक परिवर्तन हा लोकशाहीचा गाभा आहे. त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून बहुसंख्य समाजाचे लक्ष केवळ सत्ता प्राप्ती हेच असते. प्रत्येक सामाजिक गटाला "आपला माणूस" सत्तेवर आलेला पहायचा असतो. कारण "इतर सगळे" परके आहेत ही जाणीव कळत नकळत रुजत असते. ही जिथे परिस्थिती आहे तिथे कसली बोडक्याची वैचारिक सहिष्णुता असणार? दर पाच वर्षांनी निव्वळ सरकार बदलणे म्हणजे दारूच्या बाटलीवरचे लेबल बदलण्यासारखे आहे. निव्वळ लेबल बदलून दारूचे गंगाजळ होत नाही. त्यासाठी मुळात बाटलीतली दारू बदलून गंगाजळ भरण्याची मानसिकता निर्माण व्हावी लागते. लोकशाहीचे गोडवे गाणाऱ्या व्यवस्थेत देखील जनतेला झुंडशाही महत्वाची वाटत असेल तर कर्ते सुधारक आणि इतर पुरोगामी विचारवंत ह्यांच्या कार्याने समाजात खरोखरच किती परिवर्तन / प्रबोधन घडवून आणले हा संशोधनाचा विषय ठरावा. थोडक्यात म्हणजे नेतृत्व किती पुरोगामी / प्रतिगामी आहे याने जनतेला *ट्याचा फरक पडत नाही. त्यांच्या विचारांची / कार्याची उपयुक्तता काय आहे या निकषावरच त्यांची महानता ठरवली जाते. जोपर्यंत त्यांना स्वत:च्या तात्कालिक लाभासाठी वापरून घेणे शक्य असेल तोपर्यंतच त्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या होतात. स्वत:च्या अस्तित्वाची लाज वाटल्याखेरीज मूलभूत परिवर्तन घडणे शक्य नसते. आपल्या विचारांचे आणि कृत्यांचे प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष समर्थन करण्याचे कोणतेच पर्याय ज्यावेळी समाजाच्या मानसिकतेत उरणार नाहीत, त्याचवेळी बदल स्वीकारण्याची मानसिकता तयार होऊ शकेल.

In reply to by अवतार

परिवर्तनाची गरज कोणाला वाटते?> खरं तर आपल्याला इतरांच्या परिवर्तनाची गरज वाटते आणि इतरांना आपल्या! :) आणि जोपर्यंत त्यांना स्वत:च्या तात्कालिक लाभासाठी वापरून घेणे शक्य असेल तोपर्यंतच त्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या होतात. > हेच सगळ्या व्यक्तींचे आणि तत्त्वांचे होत असते.

In reply to by कवितानागेश

परिवर्तन हे देखील "आपल्याला हवे तसेच" घडले पाहिजे यावर सर्वच परिवर्तनवाद्यांचा भर असतो. आणि एकदा तसे परिवर्तन घडले की मग कोणतेच परिवर्तन घडू नये हेच "परिवर्तनवाद्यांचे" ध्येय असते. :)

वेळ मिळाताच एकेकाला उत्तरे देतो.
चून चून के मारूंगा, बच के रहना, बाब्बौ...|

In reply to by होकाका

चून चून के मारूंगा
लहानपणी आमचा येक भाऊ हाच ड्वायलॉक बोबडेपणे 'चुल चुल के मारूंगा' असा म्हणत असे ते आठवले.