
तवा पुलाव....पावभाजीच्या गाडिवर मिळणारा अजुन एक झटपट आणि चविष्ट पदार्थ. त्या भल्या मोठ्या तव्यावर पसरलेल्या भाजीमधलीच थोडि भाजी परत बटरवर परतुन त्यात शीजवलेला मोकळा भात मिक्स केला कि झाला तवा पुलाव!!!
ठण! ठण!! ठण!!! करीत मोठ्या कावीलथ्याने पुलाव तव्याच्या कडेवर आणतात आणि पटकन सार्विंग डिश मधे भरुन देतात. सोबत लिंबाची फोड आणि बारीक चीरलेला कच्चा कांदा. हाशहुश करत, मधेच कपाळावरील घाम टिपत (प्रचंड तापलेला तवा बाजुस असल्यामुळे) हा पुलाव खायला एक वेगळिच खुमारी येते. कॉलेज जीवनात तर हे तीन पदार्थ टॉप फेवरेट होते....पाव भाजी, सँडवीज (ग्रील्ड, साधं किंवा टोस्ट) आणि हा पुलाव....पोटभर शीवाय बजेटमधे!
चला भरपुर बोलुन झालं आता मुख्य पाकृ कडे वळुया.
साहित्यः
१. मोकळा शीजवलेला भात - २ बाउल
२. २ मध्यम चौकोनी चिरलेले कांदे
३. १ मध्यम चौकोनी चिरलेली हिरवी सिमला मिरची
४. बारीक चीरलेला टोमॅटो - १
५. फ्रोजन मटार - १ बाउल
६. एवरेस्ट पाव भाजी मसाला - २ चमचे (आपण आपल्या आवडिच्या ब्रँडचा घेउ शकता)
७. तिखट - पाव चमचा (आवडिप्रमाणे कमी/जास्त)
८. लसुण / सुख्या लाल मिरच्यांची पेस्ट - १ चमचा (खलबत्त्यातच कुटुन घ्या)
९. १/२ लिंबाचा रस
१०. बारीक चीरलेली कोथिंबीर
११. तेल - २ चमचे (बटर जळु नये म्हणुन)
१२. अमुल बटर क्युब्स - ३
१३. चवीनुसार मीठ
कृती:
१. तर मंद आचेवर नॉनस्टिक पॅन/कढई/तवा तापला कि अमुल बटर आणि तेल घालुन त्यात लसुण/लाल सुख्या मिरच्यांची पेस्ट घालुन परता

२. पेस्टचा कच्चा वास गेला कि अनुक्रमे चौकोनी चिरलेला कांदा/सिमला मिरची घालुन परता

३. कांदा/सिमला मिरची मउ झाली कि बारिक चीरलेला टॉमॅटो घालुन एक ५ मि. परता. टोमॅटो शीजुन एकजीव झाला कि फ्रोजन मटार घालुन परत एक ५ मि. परता

४. आता त्यात अनुक्रमे पाव भाजी मसाला, तिखट, लिंबाचा रस, थोडि कोथिंबीर आणि चविनुसार मीठ घालुन परता

५. मसाला छान परतला कि शीजवलेला भात घालुन हलक्या हाताने मिक्स करा

६. बारीक चीरलेली कोथींबीर पेरुन गरमा गरम तवा पुलाव सर्व करा
टिपा:
१. खरं तर हा पुलावच ईतका फ्लेवरफुल असतो कि त्यासोबत कुठल्याच रायत्याची गरज भासत नाहि पण अगदि हवचं असेल तर काकडि-कांद्याचं दह्यातलं रायतं करुन घ्या
२. तव्यावर पुलाव मिक्स केला कि लगेच सार्विन्ग बाउल/प्लेट मधे काढुन घ्या अन्यथा भाताची शीतं कडक होउन नावाप्रमाणेच
"कडक तवा पुलाव" म्हणुन पेश करावा लागेल :)
३. भात शक्यतो शीळा आणि त्यातुन फडफडीत असेल तर उत्तम. ताजा करुन पुलाव करणार असाल तर भात मोकळा शीजवुन घ्या (फ्राईड राइस ला शिजवतो त्या प्रमाणे)
अतिशय आवडता खाद्यप्रकार....
आजच करते!!
आवडता पदार्थ.
सोपा वाटतोय
एकही शित खाली पडू न देता
In reply to एकही शित खाली पडू न देता by गणपा
काय हो ?
In reply to काय हो ? by सस्नेह
काहुन कावली आहेस स्नेहातै!!!
मेस बंद झाल्यावर .. मंजे
आवडता प्रकार
माझा पावभाजीच्या गाडीवरील
माझा पावभाजीच्या गाडीवरील
'मला' फारसं आवडत नाही हे
आता थंडी पडणार गरमागरम चटकदार
मारतोस काय रे?
भारी प्रकरण दिसतय हो दिपकराव!
In reply to भारी प्रकरण दिसतय हो दिपकराव! by रेवती
अरेच्च्या का बरे फसला??
In reply to अरेच्च्या का बरे फसला?? by दिपक.कुवेत
धन्यवाद.
एकच नंबर !!
मी सगळे पदार्थ टिपून ठेवत आहे....
In reply to मी सगळे पदार्थ टिपून ठेवत आहे.... by मुक्त विहारि
अरे जरुर मुवि
In reply to अरे जरुर मुवि by दिपक.कुवेत
ह्याआआआआआआआआअ
In reply to ह्याआआआआआआआआअ by मुक्त विहारि
काय हा दुष्टपणा.लीस्ट काय
In reply to काय हा दुष्टपणा.लीस्ट काय by अजया
येवा बिंधास्त....
In reply to ह्याआआआआआआआआअ by मुक्त विहारि
मी पण मी पण...
In reply to मी पण मी पण... by टवाळ कार्टा
यावा की...
मस्तच!
आज करुन बघतो
अरे सोप्पा वाटतोय हा प्रकार,
In reply to अरे सोप्पा वाटतोय हा प्रकार, by उदय के'सागर
पाणी टाकू नका
In reply to पाणी टाकू नका by पैसा
धन्यवाद पैसातै!
In reply to धन्यवाद पैसातै! by उदय के'सागर
हो
In reply to हो by पैसा
अच्छा, पुन्हा एकदा धन्यवाद!
In reply to अच्छा, पुन्हा एकदा धन्यवाद! by उदय के'सागर
नमस्कार उदय
In reply to नमस्कार उदय by दिपक.कुवेत
फडफडित भात
In reply to नमस्कार उदय by दिपक.कुवेत
तांदूळ, पाणी, आंच, घट्ट झाकण आणि वेळ महत्त्वाची
In reply to तांदूळ, पाणी, आंच, घट्ट झाकण आणि वेळ महत्त्वाची by प्रभाकर पेठकर
धन्यवाद दिपक, आणि बरोबर आहे
आत्ताच करून बघितला. सर्वांना
सर्वांचे मनापासुन धन्यवाद
मस्त आवडता प्रकार.पण नेमक्या
मस्त!! पावभाजी फारशी आवडत
झक्कास
मस्त तवा पुलाव आजच केला.
जमला!
In reply to जमला! by बहुगुणी
अहो धन्यवाद कसले
मेरिकु मांगताच ये पुलाव !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टिम टिम टिंबाली... {बाप्पाचे कोळी गीत}In reply to मेरिकु मांगताच ये पुलाव ! by मदनबाण
दिपकराव कुवेतवाले.... आज मी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Koi Mil Gaya { Kuch Kuch Hota Hai } - Drum Cover by :- Nur Amira Syahiraतवा पुलाव :)
वॉव उदय फोटो फारच
दिपकभाव, बहुत आभार.
आयला झक्कास झालाय रे तवा
दिपकभौ,धन्यवाद्स!!मस्त झाला
आता...मी पण तवा...घ्यावाच
In reply to आता...मी पण तवा...घ्यावाच by अत्रुप्त आत्मा
आधी हात हातात घ्या :)
In reply to आधी हात हातात घ्या :) by दिपक.कुवेत
महाग.
In reply to आधी हात हातात घ्या :) by दिपक.कुवेत
@तवा आपसुकच येईल >>> दिपक शेठ
In reply to @तवा आपसुकच येईल >>> दिपक शेठ by अत्रुप्त आत्मा
तुमच्या तिकडे बघा ना कुणी
In reply to तुमच्या तिकडे बघा ना कुणी by प्रचेतस
असोच्च्च!
In reply to असोच्च्च! by अत्रुप्त आत्मा
(No subject)
In reply to (No subject) by प्रचेतस
वल्ली - Wed, 03/09/2014 - 18
In reply to @तवा आपसुकच येईल >>> दिपक शेठ by अत्रुप्त आत्मा
तुमच्या तिकडे बघा ना कुणी हिंदू-पुरोहिताशी.....
काय हर्कत नै