अमका सांगतो एक
तमक्याचे ठोकताळे दुसरेच
खमका करतो दावा छातीठोक
घडते प्रत्यक्षात वेगळेच
प्रारब्ध माझे अधर अनिश्चित
खडतर काळ प्रतीक्षेचा
नाही विचलीत मी अपराजित
प्रण मनात घोर तपस्येचा
फळतील माझे प्रयत्न भगीरथ
घेईन वेध भविष्याचा
शोध सुरुच सतत अविरत
सिद्धहस्त ज्योतिष्याचा
वाचने
3433
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान !
नक्कीच. तुमचा नंबर पैला.
In reply to छान ! by सस्नेह
.
शब्द लाख मोलाचे.
In reply to . by पोटे
धन्यवाद बहिणाबाईंची कविता शेअर केल्या बद्दल
In reply to . by पोटे
आवडली कविता.
+१
In reply to आवडली कविता. by प्रभाकर पेठकर
+२
In reply to +१ by बहुगुणी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टिम टिम टिंबाली... {बाप्पाचे कोळी गीत}कविता आवडली!
कविता आवडली.
मिपावर रुसून गेलेला एक जुना
छान आहे.
ही आमची क्षयझ.
In reply to छान आहे. by गवि
धन्यवाद