मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा: एकत्रित प्रवेशिका

संपादक मंडळ · · मिपा कलादालन
सदस्यांना सर्व छायाचित्रे एकत्र पाहून क्रमवारी ठरवता यावी म्हणून हा धागा काढत आहोत. आजपासून २ तारखेपर्यंत सदस्य आपली मते या धाग्यावर नोंदवू शकतात. काही जणांना जर आपले मत इथे प्रकट व्हायला नको असेल तर ते संपादक मंडळाला व्यनि करून इथे तशी नोंद करू शकतात. दोन्ही प्रकारे आलेली सर्व मते मोजून नंतर निकाल जाहीर करण्यात येईल. मते देताना सदस्यांनी इतर तपशील लिहिण्याची गरज नाही. चित्रांचे अनुक्रमांक दिले तरी पुरे. म्हणजे: माझे मत १) १ - स्पा चित्र १ २) २६ - वेल्लाभट चित्र २ ३) ४९ - समर्पक चित्र ३ (हे फक्त उदाहरण म्हणून दिले आहे.) स्पर्धकांंची नावे लिहिण्यात किंवा इतर काही चूक झाली असेल तर कृपया निदर्शनास आणून द्यावी ही विनंती. धन्यवाद आणि शुभेच्छा! ------------------------------------------------------- १) स्पा चित्र १ fgf २) स्पा चित्र २ fgf ३) स्पा चित्र ३ fgf ४) वल्ली चित्र १ a ५) वल्ली चित्र २ a ६) वल्ली चित्र ३ a ७) श्रीरंग_जोशी चित्र १ a ८) श्रीरंग_जोशी चित्र २ a ९) श्रीरंग_जोशी चित्र ३ a १०) ज्ञानोबाचे पैजार चित्र १ a ११) ज्ञानोबाचे पैजार चित्र २ a १२) ज्ञानोबाचे पैजार चित्र ३ a १३) आतिवास चित्र १ a १४) आतिवास चित्र २ a १५) आतिवास चित्र ३ a १६) चिंतामणी चित्र १ a १७) चिंतामणी चित्र २ a १८) चिंतामणी चित्र ३ a १९) विलासराव चित्र १ a २०) विलासराव चित्र २ a २१) विलासराव चित्र ३ a २२) मीता चित्र १ a २३) मीता चित्र २ a २४) kohalea चित्र १ a २५) वेल्लाभट चित्र १ a २६) वेल्लाभट चित्र २ a २७) वेल्लाभट चित्र ३ a २८) स्वैर चित्र १ a २९) स्वैर चित्र २ a ३०) स्वैर चित्र ३ a ३१) बोका चित्र १ a ३२) sagarparadkar चित्र १ a ३३) sagarparadkar चित्र २ a ३४) sagarparadkar चित्र ३ a ३५) इस्पीकचा एक्का चित्र १ a ३६) इस्पीकचा एक्का चित्र २ a ३७) इस्पीकचा एक्का चित्र ३ a ३८) किल्लेदार चित्र १ a ३९) किल्लेदार चित्र २ a ४०) किल्लेदार चित्र ३ a ४१) nishant चित्र १ a ४२) nishant चित्र २ a ४३) nishant चित्र ३ a ४४) बाळ सप्रे चित्र १ a ४५) बाळ सप्रे चित्र २ a ४६) बाळ सप्रे चित्र ३ a ४७) समर्पक चित्र १ a ४८) समर्पक चित्र २ a ४९) समर्पक चित्र ३ a ५०) बोका चित्र २ a ५१) सानिकास्वप्निल चित्र १ a ५२) सानिकास्वप्निल चित्र २ a ५३) सानिकास्वप्निल चित्र ३ a ५४) जातवेद चित्र १ a ५५) जातवेद चित्र २ a ५६) जातवेद चित्र ३ a ५७) खेडूत चित्र १ a ५८) खेडूत चित्र २ a ५९) खेडूत चित्र ३ a ६०) मदनबाण चित्र १ a ६१) मदनबाण चित्र २ a ६२) मदनबाण चित्र ३ a ६३) चित्रगुप्त चित्र १ a ६४) चित्रगुप्त चित्र २ a ६५) चित्रगुप्तचित्र ३ a ६६) सर्वसाक्षी चित्र १ a ६७) सर्वसाक्षी चित्र २ a ६८) सर्वसाक्षी चित्र ३ a ६९) जुइ चित्र १ a ७०) जुइ चित्र २ a ७१) जुइ चित्र ३ a ७२) प्रशांत चित्र १ a ७३) प्रशांत चित्र २ a ७४) chintu८३ चित्र १ a ७५) chintu८३ चित्र २ a ७६) chintu८३ चित्र ३ a ७७) सुहास झेले चित्र १ a ७८) सुहास झेले चित्र २ a ७९) सुहास झेले चित्र ३ a

वाचने 11926 वाचनखूण प्रतिक्रिया 54

मदनबाण Wed, 08/27/2014 - 21:03
•मत # १ - ३६ - इस्पीकचा एक्का यांचे {२. चीन मधिल लेशान येथिल बसलेल्या बुद्धाचे शिल्प{} •मत # २ - ४९ - समर्पक यांचे {३ स्थापत्यविशेषः रामेश्वरला जाताना समुद्रावरील हा सेतू.} •मत # ३ - ३१ - बोका यांचे {१ हुमायून चा मकबरा }

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गाढव कायद्याचा शहाणा अर्थ

सूड Wed, 08/27/2014 - 21:57
१) २४ - kohalea चित्र १ २) ६३ - चित्रगुप्त चित्र १ ३) ३८ - किल्लेदार चित्र १

पैसा Wed, 08/27/2014 - 22:15
मत देताना प्लीज चित्राला दिलेले क्रमांक पण लिहा. म्हणजे आम्हाला शोधायला सोपे जाईल. धन्यवाद!

सुहास झेले Wed, 08/27/2014 - 22:34
सर्वप्रथम संपादकांचे आभार... हे सगळे फोटो एकत्र करणे लई जिकरीचे होते. तुम्ही डोक्याला ताप देऊन, आमच्या डोक्याचा ताप वाचवलात :) माझे मत १. २४) kohalea चित्र १ २. ४९) समर्पक चित्र ३ ३. ५) वल्ली चित्र २ सर्वांना शुभेच्छा :)

मुक्त विहारि Wed, 08/27/2014 - 23:20
त्यामुळे मी डोळे मिटून स्क्रोलिंग केले. १. ३६ - इस्पिकचा एक्का (२ क्रमांकाचे) २. ७३ - प्रशांत (२ क्रमांकाचे) ३. ७८ - सुहास झेले (२ क्रमांकाचे) माझ्या कडून नकळत बर्‍याच जणांवर अन्याय झाला असेल, तर त्याबद्दल क्षमस्व.

राघवेंद्र Wed, 08/27/2014 - 23:31
४९) समर्पक चित्र ३ २९) स्वैर चित्र २ ३) स्पा चित्र ३ सं. मं. चे आभार आणि सर्वांना शुभेच्छा !!!

पैसा Wed, 08/27/2014 - 23:37
http://www.misalpav.com/node/28571
त्यानंतर ७ दिवसपर्यंत सगळे मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय या धाग्यावर प्रकाशित केला जाईल.
http://www.misalpav.com/comment/604092#comment-604092
सर्व सदस्यांनी त्यानंतर ७ दिवसपर्यंत म्हणजे २ तारखेपर्यंत आपल्या आवडीच्या चित्रांना क्रमांक १ २ ३ असे द्यायचे आहेत. सर्वात शेवट सर्व मार्क्स एकत्रित करून निकाल जाहीर केला जाईल. पहिल्या नंबराला अर्थातच जास्त वेटेज असेल. दुसर्‍या आणि तिसर्‍या नंबराला त्याप्रमाणे कमी.
सदस्यांनी अनुक्रमांक द्यायचे आहेत मार्क्स नाही. याहून सोप्या भाषेत कसं सांगायचं ब्वा?

संजय क्षीरसागर गुरुवार, 08/28/2014 - 00:02
वेगळा धागा काढून रनींग नंबर दिल्याबद्दल मंडळाचे आभार! ३८) किल्लेदार चित्र १ : १ ला क्रमांक ६३) चित्रगुप्त चित्र १ : २ रा क्रमांक ५६) जातवेद चित्र ३ : ३ रा क्रमांक

खटपट्या गुरुवार, 08/28/2014 - 00:40
१) ४८) समर्पक चित्र २ - (पैराशुट मधून उडताना घेतले आहे) २) ५७) खेडूत चित्र १ ३) ७८) सुहास झेले चित्र २ सर्वच चित्र सुरेख आहेत. त्यामुळे बाकी स्पर्धकांची क्षमा मागतो.

अनुप कोहळे गुरुवार, 08/28/2014 - 02:28
सर्व चित्रे उत्तम आहेत. माझे मत हे. १) वल्ली चित्र ३ - हे एक खिळवुन ठेवणारे चित्र आहे. उभे खांब आणि तिरप्या रेषा चित्र interesting बनवतात. २) सानिकास्वप्निल चित्र १ - ह्या चित्रात foreground आणि background चा छान समतोल साधला आहे. ३) जातवेद चित्र १ - ताजमाहालाचे perfect exposure साधले आहे.

प्रचेतस गुरुवार, 08/28/2014 - 08:33
मानवी स्थापत्य चित्र म्हणजे नुकतीच फोटोग्राफीची कला असे नसून छायाचित्रात स्थापत्यकाराचे कौशल्यही दिसून आले पाहिजे असे मला वाटते. या दृष्टीने पाहता मला आवडलेले तीन फोटो पुढीलप्रमाणे १. (४९) समर्पक चित्र ३ २. (३१) बोका चित्र १ ३. (६८) सर्वसाक्षी चित्र ३ व्यक्तिशः मला सर्वाधिक आवडलेले छायाचित्र जातवेद यांचे 'ताजमहाल' हे आहे. पण हे चित्र अतिपरिचीत (too generic) असल्याने मला त्यास वरच्या यादित स्थान देता आलेले नाही. किल्लेदार यांची छायाचित्रे (२ व ३) उत्कृष्ट असूनही केवळ कलर टोन बदलल्यामुळे त्यांचे मूळ स्वरूप बदलेले गेले त्यामुळेही त्यांना वरील यादीत स्थान देता आले नाही. बाकी इतर सर्वच स्पर्धकांनी काढलेली छायाचित्रे खूप छान आहेत.

In reply to by प्रचेतस

संजय क्षीरसागर गुरुवार, 08/28/2014 - 14:40
वल्लीश्री, मला वाटतं फोटोग्राफीच्या स्पर्धेत केवळ फोटोग्राफरच कौशल्य जोखायचं आहे. त्यानं कलाविषय कसा हाताळलायं ते महत्त्वाचं. उदा. गौतम राजाध्यक्ष उत्तम फोटोग्राफर होते कारण त्यांनी काढलेल्या फोटोतली प्रत्येक व्यक्ती देखणीच दिसायची! ताजमहाल तोच आहे, फोटोग्राफरनं त्यात `नव्यानं काय पाहिलं' ते महत्त्वाचं. आणि प्रोसेसिंग किंवा रॉ यामधे मला फायनल इफेक्ट महत्त्वाचा वाटतो. एक फार इंटरेस्टींग अँगल आहे. जेव्हा फोटोग्राफी आली तेव्हा चित्रकला संपली असं सगळ्यांना वाटायला लागलं होतं. पण तसं झालं नाही कारण जे फोटोत येऊ शकत नाही ते चित्रकार कल्पनेतून साकार करतो. नाऊ इट इट इज अदर वे, जी फोटोग्राफी पेंटींगच्या जवळ जाते ती उत्तम समजली जाते!

एस गुरुवार, 08/28/2014 - 18:24
स्थापत्यछायाचित्रणात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपली विषयवस्तू अगदी न कंटाळता आणि न हलता तिथे उभी असते. त्यामुळे छायाचित्रकार ही आपला शॉट नीट प्लॅन करू शकते, संभाव्य चुका टाळू शकते आणि पुन:पुन्हा वेगवेगळ्या प्रकाशयोजनेत, हवामानात, दिवसा, रात्री त्याच वास्तूचे चित्रण करू शकते.
चांगल्या स्थापत्यछायाचित्राची काही वैशिष्ट्ये थोडक्यात अशी सांगता येतील. एक म्हणजे डिस्टॉर्शन किंवा प्रतिमाभ्रंश नको. http://misalpav.com/comment/587183#comment-587183 ह्या वल्लींच्या लेखात मी विपर्यासभ्रंश याबद्दल थोडी माहिती दिली होती. दुसरे म्हणजे रंगअचूकता. म्हणजे तुम्ही जर एखाद्या क्लायंटसाठी त्यांच्या इमारतीची प्रतिमा घेत असाल तर त्यात टोनल अ‍ॅक्युरसी महत्त्वाची मानली जाते. तीन - डायनॅमिक रेंज. यात पूर्ण प्रतिमेच्या लो आणि हाय व्हॅल्यूंच्या आवाक्याचे डिटेलिंग महत्त्वाचे असते. चार - पर्स्पेक्टिव. म्हणजे समांतर रेषा ह्या समांतर दिसणे - न दिसणे. अर्थात् यावर खूप नियंत्रण नेहमीच ठेवता येत नाही. त्यासाठी व्ह्यू कॅमेरा, टिल्ट्-शिफ्ट लेन्स, मोनोरेल आणि बेलोज इत्यादी बरेच अत्यंत महागडे साहित्य वापरावे लागते ज्यांची किंमत महागातल्या महाग डीएसएलआरपेक्षा कितीतरी जास्त असू शकते. आणि वरील चारही गोष्टी साधण्यासाठी शक्यतो आर्किटेक्चरल फोटोग्राफीमध्ये लार्ज फॉरमॅट किंवा मीडिअम फॉरमॅट कॅमेरे वापरले जातात. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक संवेदकांऐवजी फिल्मचा वापर श्रेयस्कर ठरतो.
छायाचित्र काढताना तुम्ही वाइड अ‍ॅन्गल लेन्स वापरून स्थापत्याचा जास्तीत जास्त भाग चौकटीत कैद करायचा असतो. त्यासाठी मग क्रॉप डीएसएलआर वापरून फारसा फायदा नाही. कारण कुठलीही लेन्स ही ४५ ते ५५ मिमी ह्या नाभीय अंतराला जास्तीत जास्त विपर्यांशभ्रंश-मुक्त प्रतिमा देऊ शकते. म्हणून अशा लेन्सला केवळ लार्ज फॉरमॅटसारखा मोठ्यात मोठा संवेदक हा दीर्घातला दीर्घ विशालकोन विपर्यांशभ्रंश न आणता देऊ शकतो. जर विपर्यांशभ्रंश नियंत्रित करता येत नसेल तर प्रतिमासंस्करणात (पोस्टप्रोसेसिंगमध्ये) DxO Optics सारखे सॉफ्टवेअर वापरून प्रतिमेतल्या रेषा समांतर करून घ्याव्या लागतात. तेही करता येत नसेल तर विपर्यांशभ्रंशाचाच कलात्मक वापर करून प्रतिमा वेगवेगळ्या कोनातून घेऊन पहावी लागते. इथे मग स्थापत्यछायाचित्रणाचा उद्देश हा ऑफिशिअल डॉक्युमेंटिंग नसून सौंदर्यदृष्टी असा बदलतो. हे विशेष महत्त्वाचे.
त्याशिवायही सुस्पष्टता, योग्य उद्भासन, योग्य रचनाविचार, कुरव (नॉइज) नियंत्रण ह्या नेहमीच्या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या ह्याही प्रकारात असतात. तुम्ही कॅमेरा कुठे आणि कसा धरला आहे ह्यावर रचनाविचारातून प्रेक्षकांच्यापर्यंत काय पोहोचते आहे हे ठरते. त्यामुळे योग्य कॉम्पोजिशन साधले पाहिजे.
आता वळूयात या स्पर्धेकडे. "उदा. धरणे, झोपडी, स्मशाने, घाट, पूल, मंदिरे, रस्ते , बोगदे, दळणवळणाचे मार्ग (मेट्रो, मोनो इ.) स्थापत्य म्हणजे फक्त इमारत असे मानले जाऊ नये म्हणून." असे गवि म्हणाले खरे पण तसे फारसे फोटो काही आले नाहीत. यातील जेवढ्या प्रतिमा मला व्यक्तिशः आवडल्या किंवा ज्यांचा उल्लेख करावासा वाटला त्यांचे थंबनेल घेऊन रसग्रहण करणार आहे. हे मतदान किंवा स्पर्धेचा निकाल नाही. केवळ माझ्या नजरेतून जे जाणवले ते लिहीत आहे. मी स्पर्धेचा परीक्षक नाही. प्रत्येक मिपासदस्य मतदान करू शकतो हे संपादकांनी स्पष्ट केलेच आहे. त्याचबरोबर मी स्वतः खूप वाईट छायाचित्रकार आहे आणि मला खाली दिलेल्यांपेक्षा जास्त चांगली छायाचित्रे खचितच घेता आली नसती असेही आधीच नमूद करून ठेवतोय. कुणाला आवडले नसल्यास कृपया क्षमा करावी अथवा माझ्या छायाचित्राबद्दल काही लिहू नका असा व्यनि केला तरी चालेल. इतरही छायाचित्रे चांगलीच आहेत. उल्लेख केला नाही म्हणून चिडू नका! :-)
दीपमाळ - सिद्धेश्वर कुरोली - स्पा
     स्पा यांच्या दीपमाळेकडे पाहून सर्वात आधी त्यांच्या रचनाविचाराला दाद द्यावीशी वाटते. प्रकाश नेमका कुठून येतोय आणि त्याची तीव्रता किती आहे ह्याचाही त्यांनी चांगला उपयोग करून घेतला आहे. तिरकस सावल्यांमुळे डावीकडे निमुळत्या होत गेलेल्या दीपमाळेच्या स्तंभाला आणि दगडी खुंट्यांच्या रांगांना मस्त संतुलित केले आहे. तीच बाब दोरखंडासारख्या भासणार्‍या कडेची. फिल्म कॅमेरा नसल्याने डायनॅमिक रेंज कमी पडतेय हे लगेच जाणवतेय. दगडाचा पोत आणि घाटदारपणा मस्त पकडला गेलाय. सुस्पष्टता किंचित अजून सुधारता आली असती. उद्भासन (एक्स्पोजर) छान साधले आहे.

वेरूळच्या कैलास लेण्यातील प्रदक्षिणापथ - वल्ली
     वल्लींच्याही प्रदक्षिणापथाच्या प्रतिमेतील रचनाविचार चांगला आहे. त्यात नावीन्य नसले तरी बर्‍यापैकी पर्स्पेक्टिव कंट्रोल साधला गेला आहे (50mm मुळे). तसेच कुठलाही विपर्यांसभ्रंश (डिस्टॉर्शन) फारसा जाणवत नाही. दोन्ही बाजूंचे पाषाणस्तंभ हे प्रेक्षकाच्या दृष्टीला थेट शेवटच्या भिंतीकडे घेऊन जातात. तिथली मूर्ती आणि तिच्या खालच्या बाजूवर जास्त प्रकाश पडलेला नसणे हे या चित्राला वेगळाच परिणाम साधून देतात. मधल्या भागातील आणि दोन्ही बाजूंच्या खांबांवरील गडदपणा हा छताच्या पांढुरक्या खडकामुळे मस्त संतुलित झालाय.

कात्रज सिंहगड ट्रेक करताना रात्री दोन वाजता लागणारे एक मंदिर - ज्ञानोबाचे पैजार
     पैजारबुवांचे हे छायाचित्र मी मुद्दाम घेतले आहे कारण त्यात शब्दश: मानवी स्थापत्यकौशल्याची आदिम बीजे आहेत. दगड एकमेकांवर रचून उभे केलेले भिंती व गवत यांची रचना मानवाला गुहेतून 'घर' नावाच्या जागेत घेऊन आली. अशाच घरट्यात त्याने त्याच्या श्रद्धांचीही स्थापना केली. किंबहुना आपल्याला जशी निवार्‍याची जागा लागते तशी या शक्तींनाही लागत असावी असं त्याला वाटलं असावं हे सगळं परिदृश्य मनासमोर उभं राहिलं हे ह्या छायाचित्राला पाहून. छायाचित्रणाच्या दृष्टीने यात बाकी काही खास नाही. पण तुमच्या कल्पनेचं आणि आवर्जून अशा जागेला कॅमेर्‍यात कैद केल्याबद्दल कौतुक.

अमेरीकेतील Idaho राज्यातील Snake नदी वरील पूल - kohalea
     अशा छायाचित्रांमध्ये रचनाविचारही तितकाच परिणामकारक वाटला पाहिजे. पुलाची सावली आणि प्रत्यक्ष पूल हे चित्रातील मध्यभागी जिथे घेऊन जातात तो सगळा दृष्टीचा प्रवास अजून थेटपणे दर्शवता येऊ शकला असता. कदाचित पुलाच्या दुसर्‍या बाजूने जिकडून पुलावर प्रकाश येतो आहे ती बाजू या छायाचित्रासाठी जास्त योग्य ठरली असती असे वाटले. क्षितिज किंचित जास्त समांतर असायला हवे होते. तसेच दोनतृतियांशच्या नियमात हा रचनाविचार निश्चितच बसवता आला असता. पुलाची कमान आणि तिची भव्यता पकडता आली असती. 14mm लेन्समुळे विपर्यांसभ्रंश (Barrel distortion) आलाय हे लगेच जाणवतेय. प्रतिमेचे बलस्थान हे त्यातील HDR परिणाम आणि उत्तम वैधम्र्य (Contrast).

हुमायून चा मकबरा - बोका
     
बोका यांच्या हुमायूँच्या मकबर्‍याचे छायाचित्रात पर्स्पेक्टिव नियंत्रित करता येत नसेल तर त्यातूनही चांगली रचना कशी करायची हे दिसून येते. चित्रात जास्त वैधम्र्य नाही. पण निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर विटकरी रंगातील इमारत छान दिसतेय. प्रतिमासंस्करणात (पोस्टप्रोसेसिंग) मध्ये निळाईला जास्त अचूक टोन द्यायला हवी होती म्हणजे इमारतीचा कॉन्ट्रास्ट उठून दिसला असता असे वाटले.
चीन मधिल लेशान येथिल बसलेल्या बुद्धाचे शिल्प - इस्पीकचा एक्का
     बुद्धाच्या मूर्तीचे डोके आकाशाच्या पार्श्वभूमीवर येईल असे घेतले असते तर त्याचा वेगळाच परिणाम दिसून आला असता. प्रतिमेतील वैधम्र्य अजून वाढवले तर खडकांचा विशिष्ट रंग आणि त्यावरील हिरवाई याने वेगळाच शांतपणा अनुभवता आला असता. प्रतिमेत सुस्पष्टता कमी आहे. उजव्या कोपर्‍यातील खालची छत्री क्लोन करून काढता आली असती. रचनाविचारामध्ये बुद्धमूर्तीचा कोन आणि डावीकडील माणसांची रांग यामुळे तिची भव्यता अजून जाणवते. यात एकूणच मानवी प्रयत्नांमागील कष्ट तुम्ही अचूक टिपले आहेत.

इसा खान टोम्ब … दिल्ली - किल्लेदार
     किल्लेदारांच्या प्रतिमा छानच असतात. ह्या प्रतिमेसाठी सेपियाऐवजी कृष्णधवल रंगसंगती जास्त योग्य ठरली असती. किंवा अगदी रंगीत प्रतिमेतही हिरवाईने छान पूरक (कॉम्प्लिमेंटरी) परिणाम साधला असता. प्रतिमेतील क्षितिज किंचित डावीकडे झुकले आहे. उजव्या कोपर्‍यातील झाडाची फांदी आणि पृष्ठभूमीतील सावलीचा गर्दपणा चित्राची चौकट छान पेलत आहे. उजवीकडील इमारतीचा भव्यपणा शेजारील डावीकडील प्रवेशद्वार आणि मागची नारळाची झाडे यामुळे जास्तच खुलून दिसत आहे. पोस्टस्टॅम्पसारखा एकूण परिणाम आहे. चित्रातील वैधम्र्य आणि टोनल रेंज उल्लेखनीय. डावीकडील निगेटिव स्पेस न जाणवण्यासाठी काय करता आले असते याचा विचार करतोय.

Krakow market hall, Poland - nishant
     निशांत यांनी दीर्घ उद्भासनाचा (लाँग एक्स्पोजर) वापर कल्पकतेने केलाय. राजेशाही थाट सांगणारी प्रकाशयोजना आहे. प्रत्यक्ष इमारत चित्रातील इतर बाबींमुळे तितकीशी मनावर ठसत नाही. त्यासाठी इमारतीवरील आकाशाचा भाग काढून टाकायला नको होता असे वाटले. इमारत अगदी मध्यभागी घेण्याऐवजी किंचित उजवीकडे ठेऊन तिरपा होत जाणारा पर्स्पेक्टिव तिकडे निगेटिव स्पेस ठेऊन जास्त अधोरेखित करता आला असता.

चॅपेल् ऑन द रॉक् - समर्पक
     समर्पक यांची तिन्ही छायाचित्रे आवडली. यातील ह्या चॅपेलच्या प्रतिमेत पिवळी फोर्ड मस्टँग फारच खुलून दिसतेय. पण हा फोटो जुन्या चॅपेलचा न वाटता फोर्ड गाडीचा जास्त वाटतोय. त्यामुळे स्थापत्यछायाचित्र म्हणता येणार नाही. चर्चच्या इमारतीचे वैधम्र्य जास्त असायला हवे होते. गाडीचा पिवळेपणा टिपण्यासाठी चर्चकडे किंचित दुर्लक्ष झाले आहे. पिवळ्या रंगाच्या जितक्या रंगछटा मानवी डोळा पाहू शकतो त्याच्या एक टक्काही कुठल्याच कॅमेर्‍याचा कुठलाच विद्युत संवेदक टिपू शकत नाही हे 'कलर स्पेस' चे मूलभूत तत्त्व पुन्हा जाणवून देणारी ही प्रतिमा.

गर्द झाडीतला बंगला - समर्पक
     केवळ आणि केवळ पर्स्पेक्टिव... मी अशी स्थापत्य प्रकारातली छायाचित्रे फारशी पाहिली नाहीयेत म्हणून जरा जास्तच आवडले. प्रतिमाही अगदीच वरून ९० अंशातून घेतली नाहीये. झाडांचा ऋतूबदल सुरू होत असताना रंगबहार आणि उत्तुंगता ही इमारतीला छान कॉम्प्लिमेंट करते. त्यातून ही इमारत बांधणार्‍याची कल्पकता दिसतेच आणि आजूबाजूच्या पर्यावरणाचा आभासही उत्तम साधला आहे. पॅराग्लाइडिंग करतानाही प्रतिमा खूपच सुस्पष्ट आली आहे.

रामेश्वरला जाताना समुद्रावरील सेतू - समर्पक
     गोल्डन रूल ऑफ टू-थर्डस्, अचूक वैधम्र्य, क्षितिजाच्या आडव्या रेषेला कापत जाणारी पुलाची तिरपी बांधणी, सगळंच अगदी मस्त. पुलाच्या पाण्यावरील सावलीनेही हा परिणाम अधिक गडद केला आहे. समुद्राच्या पाण्याचा आणि आकाशाचा वेगवेगळा निळेपणा मस्त टिपला आहे. कुठेही कृत्रिम वाटत नाही.

ताज महाल, आग्रा - जातवेद
     जातवेद यांच्या ताजमहालाच्या छायाचित्राचा साधेपणा ताजमहालाच्या साधेपणाला पूरक ठरला आहे. चित्रचौकटीला दोन्ही बाजूंचे मनोरे मस्त तोलून धरताहेत. पण अजून थोडीशी जागा दोन्ही बाजूंना सोडली असती तर जास्त चांगले दिसले असते. पर्स्पेक्टिव कंट्रोल प्रतिमासंस्करणात दुरुस्त करायला हवा होता. म्हणजे मनोरे समांतर वाटले असते. ताजमहालाची अशी छायाचित्रे ही नितळ मोकळ्या निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर जास्त चांगली येतात. त्यात कॉन्ट्रास्ट जास्त मिळतो आणि घुमटाची गोलाई, संगमरवरी दगडाची शुभ्र रंगछटा जास्त खुलून दिसते.

पॅरिस मधील सीन नदीचे एक दृष्य - चित्रगुप्त
     ह्या प्रतिमेचा प्रकार स्थापत्यापेक्षा सिटीस्केप ह्या लॅण्डस्केपच्या उपप्रकाराला जास्त जवळ जाणारा आहे. ढगाळ आकाश, डावीकडील इमारतीवरील सूर्यप्रकाश, उजवीकडील पूल आणि इतर इमारतींमुळे त्या भागातील गडद सावल्यांचा साधलेला समतोल, फांद्यांमुळे लाभलेली बंदिस्त चौकट हे सर्वच एकूण प्रतिमेला खुलवणारे. यामधून छायाचित्रकाराची सौंदर्यदृष्टी तर दिसतेच, त्याचबरोबर एखाद्या सुंदर शहराचा वा ठिकाणाचा सुंदरपणा अजून खुलवून कसा दाखवायचा ह्याचेही उत्तम उदाहरण सापडते.

इब्राहीम रोजा , बिजापूर - किल्लेदार
     इसा खान टोम्बबद्दल जे म्हटले होते त्यातील बहुतांशी बाबी ह्याही छायाचित्राला लागू पडतात. ढगांचा काळेपांढरेपणा अगदी योग्य जागी आला आहे. इमारतीचा घुमट आणि मनोरे आकाशात घुसणारे उत्तुंग आणि भव्य वाटताहेत. त्रिस्तरीय रचनाही त्यामधील कमानींचा गडदपणा प्रतिमेत टिपला गेल्यामुळे जास्त खुलून दिसतेय. उजवीकडील दगडांच्या कमानी आणि डावीकडील झाडांच्या कमानी, दोन्ही एकमेकींना पूरक. मागील नारळांच्या झाडांमुळे पार्श्वभूमी आणि फुलांच्या ताटव्यामुळे पृष्ठभूमी लाभलेली ही प्रतिमा रचनाविचाराच्या दृष्टीनेही वाखाणण्याजोगी. विशेषतः पृष्ठभूमीचा साधेपणा इमारतीच्या भव्यतेला साजेसा. रचनाविचारात उजवीकडील जागा किंचित जास्त कातरली गेलीय असे वाटले. पण मग त्यामुळे चौकट खूपच आडवी वाटली असती हेही लक्षात घेण्याजोगे.

राजपुतांचा मानबिंदु असलेल्या चितोडगढ येथील विजयस्तंभ - सर्वसाक्षी
     विजयस्तंभाच्या ह्या छायाचित्रात सर्वप्रथम नजरेत भरते ते त्याचे चौकटीतील मध्यभागी नसणारे स्थान. वरून खाली येत फिकट होत जाणारा आकाशाचा गर्द निळेपणा आणि रखरखीत उन्हातही व्यवस्थित उद्भासित झालेला नक्षीदार स्तंभ खूपच कॉम्प्लिमेंटरी आहेत. दोन्ही बाजूंस असलेले वृक्ष, चित्रातील चिमुकली माणसे, वालुकाश्माचा विशिष्ट रंग, पुढील बाजूची भिंत आणि त्यामानाने छोटी इमारत या सगळ्या बाबी पूरक ठरतात. प्रकाशाची दिशा जिकडून आहे तिकडेच जास्त निगेटिव स्पेस सोडणे ही कल्पकता आवडली. येथील इतर काही छायाचित्रांमध्ये ही बाब प्रकर्षाने गाळली गेल्याचे दिसले. स्तंभ निमुळता होत गेलेला नाहीये कारण प्रतिमा उंचावरून घेता आली आहे. त्यामुळे सेन्सरचे प्रतल बरेचसे समांतर ठेवता आले आहे. याचा फायदा पर्स्पेक्टिव कंट्रोलमध्ये झाला आहे. भिंतींचा कोपरा ह्या मनोर्‍याला वेगळेच त्रिमितीय रूप प्राप्त करून देत आहे.

मातृमंदिर - जुइ
     मातृमंदिराची ही प्रतिमा छायाचित्रणाच्या दृष्टीने तितकीशी खास नाही. क्षितिज समांतर न ठेवल्यामुळे आणि केंद्रीत रचनेमुळे त्यात इंटरेस्टिंग असं फारसं काही जाणवत नाही. पण इमारतीच्या गोल चकत्या आणि त्यावरून परावर्तित होणारा तीव्र सूर्यप्रकाश यामुळे मूळचा सोनेरी रंग फारच खुलला आहे. वैधम्र्य आणि टोनल रेंज ठीकठाक आहेत. एकूणच यात बरेच काही करता आले असते असे वाटले.

इमारतीचा अंतर्भाग हाही स्थापत्यछायाचित्रणाच्या दृष्टीने महत्त्वाची विषयवस्तू असते, त्याचबरोबर त्यांचा त्या परिसराशी असलेला परस्परसंबंधही. वल्ली यांची अजिंठ्याची प्रकाशचित्रे, आतिवास यांचे गोवळकोंड्यातील इमारत, मीता यांचे फरीयाबाग-अहमदनगर, सुहास झेले यांचे वेरूळ - कैलाश मंदिर, वेल्लाभट यांचे अडालजची भव्य विहीर, मांगी-तुंगीच्या पायर्‍या, प्रशांत यांचे लेण्याचे छायाचित्र ही काही उल्लेखनीय उदाहरणे आणि त्यांचे छायाचित्र घेण्याचा विचार आवडला.
एकूणच या स्पर्धेत ज्या प्रकारे सर्वांनी हिरीरीने भाग घेतला आणि ज्या तोडीची छायाचित्रे सादर केलीत त्याबद्दल मिपाकर असण्याचा प्रचंड अभिमान वाटला. तुम्हां सर्वांकडून मला खूप काही शिकण्यासारखं आहे. धन्यवाद. मतदान व्यनिने पाठवले जाईल.
(वरील सर्व छायाचित्रांच्या लिंका ह्या मूळ छायाचित्रकारांच्याच ठेवल्या आहेत. त्यामुळे कॉपीराइटचा प्रश्न येणार नाही. मूळ छायाचित्र सोर्ससाइटवरून काढून टाकल्यास इथेही त्याचे थंबनेल दिसणार नाही.)

In reply to by एस

अनुप कोहळे गुरुवार, 08/28/2014 - 22:25
धन्यवाद स्वॅप्स. माझ्या चित्राचे रसग्रहण फारच छान केले आहे. हे चित्र संध्याकाळी घेतले आहे. पुलाच्या दुसर्‍या बाजुस जास्त जागा नसल्यामुळे पुर्वेकडुन चित्र घ्यावे लागले.जेणेकरुन संपुर्ण पुल एकाच फ्रेम मधे येईल. हि जागा एक दरी असल्यामुळे पुलाची सावली वाकडी तिकडी आली. बाकि सुचनांचा पुढील वेळी नक्की विचार करेन.

In reply to by अनुप कोहळे

एस Sun, 08/31/2014 - 14:22
मलाही तसे वाटलेच की हवे तसे छायाचित्र घेण्यासाठी कदाचित जागा उपलब्ध झाली नसावी. पुलाची सावली नव्हे, तर क्षितिजरेषा आणि पूल यांवरून बॅरल डिस्टॉर्शन आलेले स्पष्ट होत आहे. तुम्ही तुमच्या चौदा मिमीच्या लेन्सने विटांच्या भिंतीचे एखादे छायाचित्र घेऊन पहा. त्यावरून स्पष्ट होईल. इथे एचडीआर वापरण्याची कल्पकता आवडली. तुमची छायाचित्रे मिपावर आवर्जून टाकत रहा.

In reply to by एस

बहुगुणी Fri, 08/29/2014 - 09:43
स्वॅप्स, ज्या बारकाईने प्रकाशचित्रांकडे पाहून तुम्ही हे रसग्रहण लिहिलं आहे त्याला दाद द्यायलाच पाहिजे, आणि इतका सगळा सखोल अभ्यास असूनही अखेरीस "तुम्हां सर्वांकडून मला खूप काही शिकण्यासारखं आहे" असं म्हणण्यातली विनम्रता खूप आवडली!

१. ७६) chintu८३ चित्र ३ - यातला मानवी भाग मला सगळ्यात जास्त भावला. ही 'कलाकृती' कशी तयार झाली याचा इतिहास कलेचं लोकशाहीकरण करणारा म्हणून आकर्षक वाटला. त्यातही चिंटू यांनी चित्रात घेतलेली खिडकी, डाव्या बाजूला त्याला बॅलन्स करणारा झेंडा आणि एक लोगो(?) हा भाग आवडला. २. ५०) बोका चित्र २ - यातून चटकन आठवणारी एशरची चित्रं आणि त्यातला भौमितिक भाग आकर्षक वाटला. ३. ११) ज्ञानोबाचे पैजार चित्र २ -यातल्या जाळ्यांमुळे हे चित्र आवडलं. विस्तीर्ण रस्ता आणि बघणाऱ्यांना मात्र पिंजऱ्यात अडकवलं आहे असा आभास आवडला. सानिकास्वप्निल यांचं चित्र क्र १ कृष्णधवल बघायला मला आवडेल. झाडांच्या हिरव्या रंगामुळे लक्ष पुलाकडे न जाता झाडांकडे जातंय.

रेवती Fri, 08/29/2014 - 03:21
२४) चित्र क्र. १ ४१) चित्र १ २६) चित्र २ अवघड आहे अशी मतं देणं, तेही आपल्याला त्याच्या ५० टक्केही चांगले फोटू काढता येत नसताना!

Keanu Fri, 08/29/2014 - 09:30
२४) kohalea चित्र १ - HDR चांगलं जमलं आहे. ४०) किल्लेदार चित्र ३ - Composition आवडलं ४९) समर्पक चित्र ३ - लिडींग लाईन्स (Leading Lines) नियमाचा चांगला उपयोग.

या स्पर्धेसाठी संपादकांचे अनेक आभार. त्यानिमित्ताने उत्तमोत्तम छायाचित्रे बघायला मिळाली. सर्वांचीच छायाचित्रे आवडली. ३ छायाचित्रे निवडणे हे कठीण काम आहे. १. - ४८) समर्पक चित्र २ २. - ५६) जातवेद चित्र ३ ३. - ३१) बोका चित्र १

तुषार काळभोर Sat, 08/30/2014 - 11:01
क्र.१) -> ४) वल्ली चित्र १ क्र.२) -> २५) वेल्लाभट चित्र १ क्र.३) -> ४७) समर्पक चित्र १ (हे कदाचित लई भारी स्थापत्य नसेल, पण पाहिल्या पहिल्या हे असं काहीतरी 'आपलं' असावं असं वाटून गेलं- बाकीच्या गोष्टी कितीही उच्च स्थापत्य कलाकॄती असल्या तरी त्या 'आपल्या' नाही होऊ शकत.)

नाखु Sat, 08/30/2014 - 12:05
क्र.१===६८) सर्वसाक्षी चित्र ३ क्र.२===६) वल्ली चित्र ३ क्र.३===४९) समर्पक -३ यानिमित्त सर्वांचे सुरेख चित्र्-मेजवानी बद्दल आभार. नेमस्त वाचक्-प्रेक्षक ना.खु.

प्रभाकर पेठकर Sat, 08/30/2014 - 12:47
स्वॅप्ससारख्या जाणकार माणसाने छायाचित्रांचे मुल्यमापन केल्यावर माझ्यासारखा, काठावर उभा राहून पोहण्याची नुसती स्वप्न बघणारा, माणूस काय लिहीणार? तरी पण मला 'आवडलेली', जाणकाराच्या दृष्टीतून उत्कृष्ट म्हणत नाही, खालील प्रमाणे.. १) २६ - वेल्लाभट चित्र क्रमांक २ २) ३६ - इस्पिकचा एक्का चित्र क्रमांक २ ३) ४२ - निशांत चित्र क्रमा़ंक २ आणि उत्तेजनार्थ) ३२ - सागर पराडकर चित्र क्रमांक १ संपादक मंडळाला एक सुचवणी स्पर्धेमध्ये निवड करणार्‍यांना स्पर्धकांची नांवे माहित असता कामा नयेत. मतदान गुप्त असावे (तशी व्यनीची व्यवस्था होतीच.) स्वॅप्स ह्यांचा ह्या विषयावरील लेख स्पर्धेच्या निकालानंतर वेगळा यायला हवा होता. ह्या लेखाच्या सुरुवातीला जे उदाहरण दिले आहे... माझे मत १) १ - स्पा चित्र १ २) २६ - वेल्लाभट चित्र २ ३) ४९ - समर्पक चित्र ३ ह्यात स्पर्धकांची नांवे वापरली आहेत ती न वापरता.. १) सूची क्रमांक २) सूची क्रमांक ३) सूची क्रमांक अशी असायला हवी होती. स्पर्धेसाठी चित्रे ठेवतानाही छायाचित्रकारांची नांवे न देता फक्त छायाचित्रांचे क्रमांक द्यायला हवे होते आणि निवडही नुसत्या क्रमांकावरच व्हायला हवी होती. असो. पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा.

In reply to by प्रभाकर पेठकर

एस Sun, 08/31/2014 - 14:24
स्पर्धेमध्ये निवड करणार्‍यांना स्पर्धकांची नांवे माहित असता कामा नयेत. मतदान गुप्त असावे (तशी व्यनीची व्यवस्था होतीच.) स्पर्धेसाठी चित्रे ठेवतानाही छायाचित्रकारांची नांवे न देता फक्त छायाचित्रांचे क्रमांक द्यायला हवे होते आणि निवडही नुसत्या क्रमांकावरच व्हायला हवी होती.
प्रपेंच्या या सूचनेला माझे पूर्ण अनुमोदन आहे.

In reply to by एस

विशेषतः टोपणनाव वापरात असेल तर सदस्यनाम आणि चित्र एकत्र पाहण्याने काही पॅटर्न्स डोक्यात तयार होतात. त्याचा फायदा चित्राचा अर्थ समजून घेण्यात होतो. याशिवाय दुय्यम महत्त्वाचं कारण म्हणजे संपादक मंडळाचं काम यामुळे फारच वाढेल. बहुतांश सदस्य, सदस्यनाम न पाहता चित्रं निवडतात; आणि चित्रं निवडणारे बरेच लोक असतील - जे आत्ताच दिसतंय - तर मग सदस्यांशी असणाऱ्या संपर्कामुळे चित्र आवडण्याची शक्यता बरीच कमी होते. तरीही पाच-सात स्पर्धांनंतर इतरांचे फोटोही चांगले असूनही त्याच त्याच लोकांना मतं मिळत आहेत, असं वाटलं तर ही सूचना अंमलात आणता येईल.

शिद Sat, 08/30/2014 - 16:54
४८) समर्पक चित्र २ ७८) सुहास झेले चित्र २ (ह्या फोटोत भगवा झेंडा असता तर चार चांद लागले असते) २४) kohalea चित्र १

अनन्न्या Sat, 08/30/2014 - 19:30
१) वल्ली चित्र ३ - ३ २) बोका चित्र १ - ३१ ३) समर्पक चित्र ३ - ४९ खरं तर हे ठरवणं म्हणजे अवघद काम आहे, पण आपल्या मताला किंमत आहे तर मतदान करायलाच हवं

किसन शिंदे Sun, 08/31/2014 - 14:54
पहिला क्रमांक : ३६ - इस्पिकचा एक्का यांचे चित्र २ दुसरा क्रमांक : १ - स्पाचे चित्र १ तिसरा क्रमांक : ६ - वल्लीचे चित्र ३ बाकी जातवेद यांचा ताजमहल, किल्लेदारांचे तिनही फोटो, kohalea यांचेही फोटो विशेष आवडले.

पैसा Sun, 08/31/2014 - 17:38
सं मं ला व्यनि करत आहे, कारण सर्वच चित्रे खूप छान आली आहेत. खरे तर डावे उजवे करणे फारच कठीण आहे. फरक अगदी 'उन्नीस-बीस' म्हणावा असा. आणि माझ्या वैयक्तिक आवडीवर अवलंबून राहून क्रमांक दिले तर ज्यांना क्रमांक दिले नाहीत त्या इतरांना वाईट वाटण्याची शक्यता आहे. स्वॅप्सचे रसग्रहण आवडले. मात्र मी क्रमांक देताना माझ्या मनावर अवलंबून राहूनच दिले आहेत. कधी कधी टेक्निकली पर्फेक्ट कृतीपेक्षा थोडी कमी तंत्रशुद्ध पण अंतःस्फूर्तीने केलेली कृती पण जास्त परिणामकाऱक वाटू शकते.

चौकटराजा Mon, 09/01/2014 - 09:03
मला जवळ जवळ ६० टक्के फोटो आवडले. स्वॅप यानी म्हटल्या प्रमाणे विषय महत्वाचा धरून फ्रेम करणे , जास्तीत जास्त मूळ रंगांचे नीट्स पुनर्लेखन, डायनामिक रेंज असलेला टोन कंट्रोल हे तीन निकष आपल्या चित्रात आहेत का हे ज्याचे त्याने ठरवावे .हे तीनही निकष फोटोशॉप वापरल्याने आणता येतात पण त्याला मर्यादा आहेत. व त्यात अतिरिक्त मदत घेतल्याची टोचणी ही आहे. माझ्याकडे असलेल्या फोटोत हे गुण मला दिसले नाहीत. म्हणून मी भाग घेतला नाही. पण इथे भाग घेतल्याबद्द्ल वल्ली, किल्लेदार, समर्पक, स्पा, चित्रगुप्त व निशांत यांचे अभिनंदन करतो.

पिलीयन रायडर Tue, 09/02/2014 - 09:57
मला छायाचित्रणातलं काहीही कळत नाही.. म्हणुन सरळ स्क्रोल करत खाली आले आणि सदस्यनाम न पहाता जे फोटो आवडत गेले त्यातले ३ निवडले आहे.. क्षणात मनात जे भरले ते शक्यतो निवडले.. आणि स्पर्धा छायाचित्रणासाठी असल्याने कशाचे चित्र आहे ह्या पेक्षा कसे काढले आहे ह्यावर निवड केली.. १. ४० - किल्लेदार - चित्र ३ २. ४१ - निशांत - चित्र १ ३. ३६ - इस्पिक एक्का - चित्र २ बाकी आवडलेल्या चित्रांची यादी फार मोठी आहे.. स्पर्धा तोडीस तोड होणार हे नक्की.. ही स्पर्धा दर महिन्याला घ्यावी.. किमान पहाण्यासाठी तरी म्हणुन नुसती छायाचित्रे मागवावीत.. तेवढंच बसल्या जागी किती तरी नव्या गोष्टी कळाल्या ह्या निमित्ताने..!

मृत्युन्जय Tue, 09/02/2014 - 11:52
इतकी सुंदर चित्रे आहेत की केवळ ३ चित्रांची निवड करणे केवळ अशक्य आहे (कुठल्याही दूरचित्रवाणी वाहिनीवरच्या कुठल्याही स्पर्धात्मक परीक्षेचे हे अपेक्षित टाळ्याखाऊ वाक्य असले तरीही येथे खरे आहे.). पहिले चित्र बघुन पुढे जावे तर तिथे अजुन सुंदर चित्र सापडले. त्यामुळे बराच वेळ निरीक्षण करुन काही छायाचित्रे शॉर्टलिस्ट केली. ती पुढीलप्रमाणे. मग यातुन एकेका चित्राचे स्पर्धेच्या अनुषंगाने (आणि मला नसलेल्या छायाचित्रणाच्या आणि स्थापत्यशास्त्राच्या ज्ञानाच्या आधाराने) रसग्रहण केले आणि खालील निष्कर्ष मांडले: १. स्पा - दीपमाळ - मंदिरांची किंवा पुराणकालीन वास्तुंची छायाचित्रे योग्य प्रकाशात काढली तर खुपच सुंदर अनूभूती देतात, स्पावड्याचे छायाचित्र या कसोटीवर पुरेपुर उतरले आहे ६ वल्ली - लेणी - छायाचित्राचा योग्य कोन आणि सुस्प्ष्टता यामुळे हे चित्र खुपच उठावदार वाटते १९ - विलासराव - स्तूप - प्रथमदर्शेनी हे चित्र मनाचा उठाव घेते. पण एकुणच हे छायाचित्र परत बघता खुप सरधोपट वाटते. छान आहे. पण इतर छायाचित्रांच्या तुलनेत खुप उठावदार नाही ठरत २४ - अनूप - पूल - एक अतिशय सुंदर छायाचित्र. उन सावलीचा खेळ, प्रकाशयोजना आणि स्थापत्य तिन्ही उत्तम टिपले आहे. २६ - वेल्लाभट - किल्ल्याचा मार्ग - छायाचित्रातल फोकस अतिशय उत्तम जमला आहे. मार्गाची बाह्यरेखा अचूकरीत्य टीपली आहे त्यामुळे हे छायाचित्र उत्तम मार्कांनी पास २९ - स्वैर चित्र - युरोपातील शहराचे विहंगम दृष्य - चित्र सुरेख आहे. पण ते निसर्गचित्र वाटते. स्थापत्य छायाचित्रण नाही वाटत ३२ - सागर पराडकर - निसर्गाच्या पार्श्वभूमीवरील घरे - हे ही चित्र वरीनप्रमाणेच. यात स्थापत्यकला उठुन येत नाही तर मागच्या निसर्गामुळे हे छायाचित्र नेत्रदीपक वाटते ३४ - सागर पराडकर - नाट्यगृह - उत्तम जमले आहे. प्रकाशयोजना, फोकस आणि कव्हरेज सगळे उत्तम. पण छायाचित्रात आलेल्या व्यक्तींमुळे थोडा रसभंग होतो ३७ - इस्पीक एक्का - एक उंच इमारत - मस्त आहे. उंचावरुन घेतल्यामुळे सुंदर खोली टिपता आली आहे. पण डाव्या बाजूला काचेवरुन किरण परावर्तित झाल्याने दृष्य धूसर झाले आहे. छायाचित्रात इतर ठिकाणी न दिसणारी काच दिसत आहे. त्यामुळे छायाचित्र थोडे उणे ठरते ३८ - किल्लेदार - मस्जिद सदृष्य इमारत - रंगरचना, फोकस, पार्श्वभूमी सर्वच उत्तम. फोटो सुरेख. पण का कुणास ठाऊक पिक्सेल्स गंडल्यासारखे वाटतात किंवा तसा फील येतो. हा उणेपणा वाटल्याने थोडे कमी पडते ४१ - निशांत - मुंबईतील घुमटाकार इमारतींसारखी इमारत - सुरेख रंग पकडले आहेत. इमारतही उत्तम. नाव ठेवण्यासारखे छायाचित्रात काहिच नाही. पण उत्कृष्ट छायाचित्रांच्या मांदियाळीत हे चित्र बिचारे मागे पडते ४२ - निशांत - सुरेख प्रकाशयोजनेत न्हाउन निघालेली इमारत - अजुन एक सुंदर छायाचित्र. वाइड अँगलच्या ऐवजी आभाळाची पार्श्वभूमी जास्त टिपली असती तर अजुन छान वाटले असते. ४४ - बाळ सप्रे - समुद्राच्या पार्श्वभूमीवरील मंदिर - खुप सुंदर छायाचित्र. चित्रात वातावरण कैद झाल्यासारखे वाटते. पण चित्रात मंदिराच्या भिंतीचे बारकावे नाही नीट टिपले गेलेले. किंवा कदाचित छायाचित्रात येउच शकत नसतील. त्यामुळे पहिल्या तिनात घेत नाही याला. ४६ - बाळ सप्रे - सुरेख मंदिर - अजुन एक सुरेख छायाचित्र. छायाचित्रणाला आवश्यक असलेल्या हवामानात घेतले गेले आहे. एकत्रित परिणाम खुप सुंदर आणि आकर्षक पण फायनल इंप्रेशन सर्वोत्तमाकडे नेत नाही ४७ - समर्पक - घर + कार - एक खुप सुंदर छायाचित्र. पण नक्की घराचे आहे की कारचे हे कळेना. घर _ कार या क्याटेगरीत कदाचित पारितोषिक मिळवुन जाइल ४८ - समर्पक - उंचाव्रुन घेतलेले एका प्रशस्त बंगल्याचे छायाचित्र - खुप सुंदर छायाचित्र. फक्त असे वाटत राहते की यात छायाचित्रणापेक्षा हेलिकॉप्टर किंवा तत्सम उंचीवरुन घेतल्याचा परिणाम जाणवतो आहे. शेवटच्या तिघात नक्की स्थान मिळवु शकेल असे. ५१ - सानिका स्वप्निल - पूल - अतिशय सुंदर. इमारत आणि निसर्ग यांचा सुरेख संगम. शिवाय प्रकाशयोजना अप्रतिम. फ्रेम करुन लावावे असे छायाचित्र. पण पूल अतिशय साधासा आहे. एकुण थीम मध्ये पूलाच्या साधेपणामुळे हे छायाचित्र पहिल्या तिनात घेतले तर तो स्थापत्यकलेवर अन्याय होइल. ५६ - जातवेद - ताजमहाल - छायाचित्र सुंदर. पण ताजमहालचे कुठलेही छायाचित्र सुंदरच येइल ना. म्हणजे १० चित्रे घेतल्यास १- २ वाईट येतीलही. पण चांगले चित्र मिळाले नाही असे होणार नाही. म्हणुन फक्त .... ७२ - प्रशांत लेणी - सुंदर छायाचित्र. पण अंतिम शिल्पावर फोकस आणी डिटेलिंग कमी पडले. वरील विश्लेषणानंतर खालील ५ चित्रे निवडली: १. १ स्पा - दीपमाळ – २. ६ वल्ली - लेणी – ३. २४ - अनूप - पूल – ४. २६ - वेल्लाभट - किल्ल्याचा मार्ग - ५. ४८ - समर्पक - उंचाव्रुन घेतलेले एका प्रशस्त बंगल्याचे छायाचित्र - खुप विचारांती मोठ्या कष्टाने समर्पक आणी स्पावड्याचे चित्र बाजुला काढले आणि फायनल ३ नंबर असे ठरवले प्रथम क्रमांक - २४ - अनूप - पूल – द्वितीय क्रमांक - २६ - वेल्लाभट - किल्ल्याचा मार्ग तृतीय क्रमांक - ६ वल्ली - लेणी मला छायाचित्रणकलेतील देखील काही कळत नाही आणि स्थापत्यकलेतीलही. पण ही ३ चित्रे मनाला भावली. जसे संगीतातले काही कळत नसूनही काही गाणी/ भजने कानांना भावतात तसेच. वरील विश्लेषणात बर्‍याच चूका असु शकतील त्याबद्दल संबंधितांनी मोठ्या मनाने माफ करावे. सर्वच छायाचित्रे खुप सुंदर आहेत (सर्व ७२)