मला पडलेले काही अत्यंत गंभीर प्रश्न - भाग १
मला पडलेले काही अत्यंत गंभीर प्रश्न खालीलप्रमाणे (कृपया प्रामाणिक व खरीखुरी उत्तरे द्यावीत. कृपया प्रतिसाद गोडसे/गांधी/मोदी/सावरकर, धर्मनिरपेक्षता, काँग्रेस/भाजप, ब्राह्मण/अब्राह्मण इ. जहाल विषयांच्या वळचणीला नेऊ नये ही नम्र विनंती).
(१) घोडा व बैलाच्या तळपायांना खिळे मारून नाल ठोकले जातात. चालताना ते खिळे त्यांना बोचतात का? चालताना खिळ्यांमुळे त्यांच्या तळपायांना जखमा होतात का?
(२) संसदेच्या किंवा विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मंत्रीमंडळाने तयार केलेले भाषण राष्ट्रपती किंवा राज्यपाल वाचून दाखवितात. ते भाषण राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी स्वतः तयार केलेले नसूनसुद्धा 'राष्ट्रपतींनी भाषणात अमुक सांगितले', 'राज्यपालांनी भाषणात तमुक सांगितले' असे का म्हटले जाते?
(३) हिंदी चित्रपटाचे नाव सुरूवातीला हिंदीत, इंग्लिशमध्ये व नंतर उर्दु/अरेबिक मध्ये दाखविले जाते. हिंदी वगळता याच इतर २ भाषात नाव का दाखवितात? मल्याळम्, तेलगू, पंजाबी इ. सर्व भारतीय भाषांमध्ये नाव का दाखवित नाहीत?
(४) पूर्वीच्या गिअरच्या स्कूटर्सच्या गिअरची रचना जरा विचित्र असायची. पहिला गिअर टाकताना तो उलटा आपल्या दिशेने फिरवायला लागायचा. नंतर विरूद्ध दिशेने फिरविल्यानंतर न्यूट्रल गिअर व नंतर ओळीने दुसरा, तिसरा व चौथा गिअर असायचे. मोटारसायकलचे गिअर देखील असेच असतात. गिअर्सचा क्रम १-न्यूट्रल-२-३-४ असा असायचा. त्याऐवजी गिअर्सचा क्रम न्यूट्रल-१-२-३-४ असा व्यवस्थित क्रमाने का नव्हता?
(५) ताक किंवा दह्यामध्ये गूळ घालून खाऊ नये असे म्हणतात. ते वेगवेगळे खावेत असे सांगितले जात. यामागचे कारण काय असावे? दोन्ही वेगवेगळे खाल्ले तरी शेवटी पोटात दोन्ही पदार्थ एकत्र होतीलच. मग एकत्र का खाऊ नयेत?
(६) एखादा मुलगा/मुलगी खूप खर्चिक मागणी करायला लागला/ली तर पूर्वीची माणसे "तुझे चोचले पुरवायला आम्ही काही लॉर्ड फॉकलंड नाही लागून गेलो" असे उपहासात्मक उद्गार काढून ती मागणी धुडकावून लावत असत. फॉकलंड नावाचे अर्जेंटिना देशाच्या जवळ एक छोटे बेट आहे. पण हा लॉर्ड फॉकलंड कोण होता? तो खूप श्रीमंत आणि उधळ्या होता का?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
+१
कष्ट करण्याचे प्रयत्न होताना दिसत नाही
चव हा गुणधर्म (वर्णन करण्यास
स्पष्टीकरण
समस्या...
दुध व मांसाहार, दही व मांसाहार, दुध व फळे, थंड व गरम पदार्थ एकत्र खावू नये असे सांगितले आहे.दुध व मांसाहार : कित्येक मांसाहारी पदार्थांत क्रिम टाकतात आणि ते कोणत्याही समस्येशिवाय लोक चवीने वारंवार खातात. दही व मांसाहार : अनेक प्रकारचे मांस दह्यात मरिनेट करतात असे ऐकून आहे. दुध व फळे : हे टाळायचे तर फ्रूट सलादच नव्हे तर केळ्याचे शिक्रणही टाळावे लागेल. थंड व गरम पदार्थ एकत्र खावू नये : असं कसं, असं कसं ? फ्राईड आइस्क्रिम आमचा अत्यंत आवडता पदार्थ आहे. पाककलाविषारद आणि अन्नशास्त्रज्ञांच्या विश्लेषणाच्या प्रतिक्षेत.>>असं कसं, असं कसं ?
तोच हेतू होता !
सूड - द चूकशोधक
समाधान....
>>> नख, केस प्रमाणेच खुरात
ताजे दही/ताक + गूळ हे योग्यच
मला माहीत असलेली काही उत्तरे...
(२)
(५) ताक किंवा दह्यामध्ये गूळ
(१) घोडा व बैलाच्या तळपायांना खिळे मारून नाल ठोकले जातात.
खूप छान माहीती आसिफ !!
आंबा हे उष्ण फळ
पपई खाण्यामागे असे करण्याचा
परत तेच करताय तुम्ही
+१
दोन शास्त्रांमधला फरक लक्षात
बापरे! काय हो तुमचा मित्र!
माझाही एक गंभीर प्रश्न
ब-याच वेळी दाराला कडी अथवा लॅचच नसते.
हिंदी चित्रपट आणि तर्कशास्त्र