कुकी कप
साहित्यः
मैदा - २ १/४ कप
बटर - १/२ कप
साधी साखर - १/२ कप
ब्राउन शुगर - १/२ कप
अंडे - १
व्हॅनिला इसेन्स - २-३ थेंब
चॉकलेट चिप्स - १/२ कप
कुकिंग चॉकलेट - १/२ कप
मिठ १ चिमटी
बेकिंग ग्लास मोल्ड
दुध
कृती:
१. एका मोठ्या बाऊलमधे बटर, साधी साखर, ब्राउन शुगर एकत्र घेउन electric bitter ने फेटुन घ्यावे.
२. साखर चांगली फेटल्यावर त्यात एक अंडे टाकुन परत फेटुन घ्यावे.
३. त्यामधे मैदा, मिठ व चॉकलेट चिप्स टाकुन चमच्याने एकत्र करावे. आता हे पीठ १-२ तास फ्रिज मधे ठेवावे.
४. तो पर्यंत ग्लास मोल्डला बटर लावुन घ्यावे.
५. फ्रिजमधुन पीठ बाहेर काढुन, ते ग्लास मोल्डमधे निट पसरुन घ्यावे. आतमधील कुकी कप जास्त जाडही नको आणि जास्त बारीकही नको.
६. ओव्ह्न १८० degree celcius ला preheat करुन घ्यावा. त्यामधे ग्लास मोल्ड ठेवुन १५-२० मिनिटे बेक करुन घ्यावे.
७. ग्लास मोल्ड बाह्रेर काढुन पुर्ण गार होवुन द्यावे. गार झाल्यावर कुकी कप अलगदपणे मोल्ड मधुन बाहेर काढावे.
८. Microwave मधे कुकिंग चॉकलेट मेल्ट करुन घ्यावे.
९. गार झालेल्या कपास आतुन मेल्टेड चॉकलेट लावुन घ्यावे व परत फ्रिज मधे १/२ तास ठेवुन द्यावे.
१०. कुकी कप गार दुध / चॉकलेट मिल्कशेक / आईसक्रिम सोबत serve करावे.

वाचने
9407
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
सही
भारी आहे आयडियाची कल्पना! या
भारी अाहे पाकृ!फोटोपण मस्त
आले हे
भन्नाट... !!
मस्त !!
कातिल फोटो!!
सगळ्यांना थँक्स.
मृ....
एक नंबर..
ए मृ
In reply to ए मृ by सानिकास्वप्निल
अगं लगेच पाठवते. तसेही इथुन
In reply to अगं लगेच पाठवते. तसेही इथुन by Mrunalini
मस्त पाकृ
In reply to मस्त पाकृ by मधुरा देशपांडे
अरे हो. बरोबर. नक्की पाठवते.
काय क्लपना आहे. लाळ गळली.
कसलं सुंदर!
आहाहा... आहाहा आणि आहाहा.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisisमला ह्यात
In reply to मला ह्यात by दिपक.कुवेत
हो. आईसक्रिम घालुन पण मस्त
मस्त...