'ती' कोमातून बाहेर आली
नुकत्याच कळलेल्या बातमीनुसार, स्वप्नाली लाड ही मुलगी, जी गेले वीस दिवस कोमात होती, ती शुद्धीवर आलेली आहे. हे वाचून एक अनामिक दिलासा मिळाला. काही दिवसांपूर्वी या मुलीने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तोच जीव धोक्यात घालत रिक्षातून उडी मारली होती. रिक्षावाल्याने सांगितलेल्या रस्त्यावरून रिक्षा न नेता भलत्या रस्त्यावर वळवली आणि मग स्वप्नाली ने चालत्या रिक्षातून उडी घेतली. अर्थातच रिक्षावाला फरार झाला. मग तिला तिथल्या नगरसेविकेने इस्पितळात नेले, ती कोमात गेली, आता ती शुद्धीवर आली हा सगळा पुढचा प्रवास.
दरम्यान, माझा, तुझा चायनल वाल्यांनी अनेक चर्चा घातल्या या विषयाला धरून. कामच आहे ते त्यांचं म्हणा. पोलिसांनी स्कीचेस वगैरे जारी केली, असं सगळं झालं. जरी स्वप्नाली यातून काही भयानक न होता बचावली असली, तरी दिल्ली, मग शक्ती मिल पासून प्रकाशझोतात येऊ लागलेल्या अशा अनेक घटनांपेक्षा ही घटना कमी भयानक आहे असं नक्कीच नाही. यामागची कारणं, समाजाची विचारधारा, हे कधी थांबणार वगैरे प्रश्न चायनल वाल्यांवर सोडायचे म्हटले, तरी याविरुद्ध सामान्य; माफ करा, असामान्य जनता (म्हणजे सारासार विचार करणारी, योग्यायोग्य भेद जाणणारी, सुशिक्षित, सुविचारी, जनता; जी असामान्यच झालेली आहे) कधी एकत्र येऊ शकेल का?
रिक्षावाल्यांवर कडक बहिष्कार, किंवा, एखाद दिवस कुणी कामालाच न जाणे, मुलांना शाळेतच न पाठवणे, या, अशा किंवा याहून अधिक योग्य मार्गांनी लोकं कधीतरी उठाव करतील का? आमची मुंबई आम्हाला सुरक्षितच रहायला हवी, तिची दिल्ली व्हायला नको, म्हणून कधी आग पेटेल का? की समाज सतत कोमातच रहाणार? हे प्रश्न या क्षणी त्रास देतायत.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
समाज सतत कोमातच रहाणार??
ओके
ह्म्म मला पण तेच वाटले होते
मला देखील तसंच वाटलं. असो.
अवघड आहे जगणं! मुलींवरील
...
बाहेरच्या जगात भारताची
एक तरी चांगली बातमी
कधी थांबणार हे बलात्कार?
भिंगरीताई तुम्ही भिवंडी च्या
हो
आहो ते नवऱ्या देखत
भयानक.
अत्याचार
महाराष्ट्रात एका समाजातील
चुकीचा संदेश
अत्याचार सगळेच समाज सारखा
यात काही तरुणांवर आरोप ठेवले
"वन स्मॉल इन्सिडेण्ट ऑफ रेप
'ती' कोमातून बाहेर आली...,..
मटाच्या बातमीनुसार