जॉर्डनची भटकंती : ०४ : मदाबा गाव आणि केराक किल्ला
...मध्यपूर्वेत स्थापना झालेल्या दोन मोठ्या धर्मांच्या सुरुवातीच्या काळाशी संबद्ध असल्याचा दावा असलेल्या ठिकाणाची आणि तेथील अवशेषांची ओळख बरोबर घेऊन आमचा प्रवास पुढच्या आकर्षणाच्या दिशेने सुरू झाला.
मदाबा गाव
अम्मानच्या दक्षिणेला ८६ किमीवर मदाबा नावाचे गेल्या ४,५०० वर्षांपासून अस्तित्वात असलेले गाव आहे. याचा बायबलमध्ये "मोआबाईट लोकांचे मदाबा" असा उल्लेख आहे. अनेक शतकांच्या मोआबाईट आणि नेबॅतियन राजसत्तांनंतर रोमन सम्राट ट्राजानने हा भूभाग रोमन सत्तेच्या अरेबिया प्रांताचा भाग बनवला. ख्रिश्चन धर्मविरोधी असलेल्या '(पश्चिम) रोमन' साम्राज्यात (Western Roman Empire) विरोध व छळ होत असूनही पहिल्या शतकात ख्रिश्चियानिटी येथे जोमाने वाढत होती. चवथ्या शतकात सम्राट काँस्टंटाईनने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर मात्र तो धर्म राजमान्य आणि अर्थातच सर्व साम्राज्यभर प्रबळ झाला. हा नंतरचा काळ 'पूर्व रोम' अथवा 'बायझांटाईन' साम्राज्याचा (Eastern Roman / Byzantine Empire) काळ समजला जातो. हा काळ मदाबाचा सुवर्णकाळ होता. या परिसरात सापडणार्या रंगीत दगडांचे तुकडे वापरून ६ ते ८ व्या शतकात वैशिष्ट्यपूर्ण मोझेईक कलाकृती असलेली अनेक चर्चेस येथे बांधली गेल्यामुळे हा भाग नावारूपाला आला. इ स ७४९ मध्ये झालेल्या जबरदस्त भूकंपाने हे गाव जमीनदोस्त होऊन जवळ जवळ हजार एक वर्षे ओसाड झाले. इ स १८९७ मध्ये शेजारच्या केराक नावाच्या शहरातून काही ख्रिश्चन कुटुंबांनी या ओसाड पडलेल्या गावात स्थलांतर केले. ते परत वसविताना, नवीन इमारती बांधण्यासाठी खणताना, अनेक जुन्या इमारती, चर्चेस आणि मोझेईकचा खजिना जगाच्या नजरेला आला. इथल्या नवीन नागरिकांनी मोझेइकची कला पुढे आणून मदाबाला आधुनिक काळातले जागतिक पर्यटक आकर्षण बनविले आहे. इ स १९९६ पासून आजतागायत येथे टोरोंटो युनिव्हर्सिटी (कॅनडा) तर्फे उत्खनन केले जात आहे. चला तर मारूया फेरफटका या एका वेगळ्या प्राचीन कलाकारीसाठी प्रसिद्ध असलेल्या गावाचा...
मदाबा : ०१ : एक रस्ता
मदाबा : ०२ : एक रस्ता
मदाबा : ०३ : मोझेईक चित्रे व चिनी मातीच्या वस्तू
मदाबा : ०४ : लाकडावरील मोझेईक कला
मदाबा : ०५ : मोझेईक कलाकृती
मदाबा : ०६ : मोझेईक चित्रे
सेंट जॉर्ज ऑर्थॉडॉक्स चर्च आणि पवित्र भूमीचा मोझेईक नकाशा
बाजारपेठेतून फिरत फिरत आम्ही सेंट जॉर्ज ऑर्थॉडॉक्स चर्चला पोहोचलो. गावाच्या मध्यभागी असलेल्या या प्राचीन चर्चमध्ये इ स ५६० मध्ये बनवलेला पवित्र जमिनीचा (होली लॅंडचा) मोझेईक नकाशा आहे. इ स १८९७ मध्ये या जागेवर नवीन चर्च बनविण्यासाठी खणताना हा अमोल प्राचीन खजिना सापडला. मूळ नकाशा १५.७ x ५.७ मीटर आकाराचा होता. २० लाख रंगीत दगडांच्या तुकड्यांनी बनवलेल्या या नकाश्यात उत्तरेकडील (आधुनिक लेबॅनॉनमधील) टायर आणि सायडॉन या शहरांपासून दक्षिणेकडील इजिप्तपर्यंत, तर पश्चिमेकडील भूमध्य समुद्रापासून पूर्वेकडील अरबस्थानापर्यंत इतक्या विशाल आवाक्याचा समावेश आहे. नकाश्याच्या मध्यभागी असलेल्या जेरुसलेम शहराची आणि त्यातील महत्त्वाच्या (Church of the Holy Sepulchre, कॉर्डो मॅक्सिमस, कोलोनेड असलेले रस्ते, इ) भागांची मांडणी आश्चर्यकारक वाटावी इतकी अचूक आहे. त्याशिवाय त्यात अनेक डोंगर-दर्या, शहर-गावे, नाईल नदीचा त्रिभुज प्रदेश, इत्यादी १५७ महत्त्वाच्या जागा त्यांच्या नावासकट दाखविलेल्या आहेत. त्या नावांमध्ये मदाबा व केराक या आजच्या सफरीतल्या दोन गावांचाही समावेश आहे.
मदाबातले सेंट जॉर्ज ऑर्थॉडॉक्स चर्च : ०१ : मार्गदर्शक खमीस मोझेईक नकाशाचा फोटो वापरून त्याची माहिती देताना
मदाबातले सेंट जॉर्ज ऑर्थॉडॉक्स चर्च : ०२ : मोझेईक नकाशा
मदाबातले सेंट जॉर्ज ऑर्थॉडॉक्स चर्च : ०३ : मोझेईक नकाशा
मदाबातले सेंट जॉर्ज ऑर्थॉडॉक्स चर्च : ०४ : अंतर्भाग
मदाबा हिप्पोलायटस हॉलमधले मोझेईक
मोझेईक इंस्टिट्यूट : ०१
मोझेईक इंस्टिट्यूट : ०२
मोझेईक इंस्टिट्यूट : ०३
मोझेईक इंस्टिट्यूट : ०४
मदाबा ते केराक रस्ता : ०१
मदाबा ते केराक रस्ता : ०२
मदाबा ते केराक रस्ता : ०३
मदाबा ते केराक रस्ता : ०४
मदाबा ते केराक रस्ता : ०५
केराक गाव व केराक किल्ला
केराक शहर अम्मानच्या दक्षिणेला १४० किमीवर आहे. केराकच्या जागी कमीत कमी लोहयुगापासून तरी मानववस्ती असल्याचे पुरावे सापडले आहेत. बायबलमध्ये या गावाचा उल्लेख अस्सिरियन साम्राज्याचा भाग असलेले 'केर हारेसेथ' किंवा 'मोअबचे किर' असा केलेला आहे. उत्तर पॅलेस्टाईनमध्ये स्थिरावण्याआधी ज्या जागी सिरियन लोक गेले तो हा भाग असल्याचा Books of Kings व Book of Amos या पुस्तकांत उल्लेख आहे. पहिल्या शतकात हा भाग नेबॅतियन साम्राज्याचा भाग बनला. त्यानंतर रोमन, बायझँटियन आणि अरब अश्या सत्तांनी त्याच्यावर हक्क प्रस्थापित केला. ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मातल्या क्रूसेड्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युद्धांमध्ये इथला किल्ला ख्रिश्चनांनी अखेरपर्यंत ४६ वर्षे लढवला. पण अखेरीस इ स ११४८ मध्ये तो सालादीनच्या हाती पडला. दमास्कस व इजिप्त मधला व्यापारी मार्ग आणि दमास्कस-मक्का हा धार्मिक यात्रेचा मार्ग हे दोन मार्ग या किल्ल्यावरून जात असल्याने तो सतत एक महत्त्वाचे ठाणे राहिला आहे. नामवंत अरब वैद्य इब्न अल् कफ् याचे केराक गाव जन्मस्थान आहे. त्याच्या शल्यचिकित्सेवरील पुस्तकांची गणना अरब जगतातील त्या विषयावरील पहिल्या काही पुस्तकात केली जाते. समुद्रसपाटीपेक्षा १००० मीटर उंचीवरचा केराक किल्ला ट्रान्स्जॉर्डन विभागातल्या मोठ्या तीन किल्ल्यांपैकी एक आहे. त्यातला हाच एकटा आधुनिक जॉर्डनमध्ये आहे इतर दोन किल्ले आधुनिक सिरीयात आहेत. शहरात शिरण्याअगोदर उंचावर असलेला हा किल्ला आपल्या नजरेस पडतो...
केराक किल्ला : ०१ : दुरून झालेले पहिले दर्शन
केराक किल्ला : ०२
केराक किल्ला : ०३ :
केराक किल्ला : ०४
किल्ल्याची भिंत चढण्यासाठी वापरल्या जाणार्या शिडीचा एक प्रकार (चित्रात डावीकडे) (चित्र जालावरून साभार)
केराक किल्ला : ०५
मी पयली!
मस्त
In reply to मस्त by कुसुमावती
+१...असेच म्हणतो.
हाही भाग माहितीपूर्ण
In reply to हाही भाग माहितीपूर्ण by एस
धन्यवाद !
पण तरीही त्यावर सैनिकांना चढून जाणे इतके अवघड दिसत नाही.त्याच्या तळाला असलेल्या रस्त्यावरच्या माणसांचा आकार पाहिल्यास मत बदलेल असे वाटते :)In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
छ्या:
In reply to छ्या: by एस
पण त्यांच्याकडे घोरपडी
धन्यवाद !
वाचतीये..आता पेत्रा दरीच्या
मस्त फोटो !! धरणाचे फोटो मीपा
मोझेईक कलाकृती अद्भूत आहेत.
धन्यवाद !
मस्तच
आवडलं.
धन्यवाद !
तुमची प्रवासवर्णने अन
+१ टु स्नेहातै
धन्यवाद !
मीही आपल्या प्रत्येक सहलीत