तीर्थजननी नर्मदामैय्या आणि मी.
खुपजण विचारतात नर्मदापरिक्रमा केल्याने काय वाटले, काय मिळाले. उत्तर आहे आत्मिक समाधान. जनतेत असलेली नर्मदेवरची श्रद्धा, असलेली सेवाभावी वृत्ती, माणुसकीचे दिव्यदर्शन, नर्मदाकिनारी असलेले अप्रतिम निसर्गसौन्दर्य, सुन्दर पक्षी, सायन्काळी प्रवाहात दिवे सोडल्यावर दिसणारे मैय्याचे काळी चन्द्रकळा सोनेरी किनारीची नेसलेले सुन्दर मनमोहक रुपडे.
प्रतिकुलता असतानाही माणसाने कसे आनन्दी रहावे, अडचणीन्वर मात करुन कसे जगावे, हे शिकायला मिळाले. जन्गलात राहणारे आदिवासी, खेड्यात राहणारे शेतकरी ते लहानमोटठ्या शहरात राहणारे नागरीक, गरीबातील गरीब, मध्यमवर्गी, श्रीमन्त, हिन्दू-मुसल्मान शीख ईसाई सर्वधर्मीय लोक नर्मदाकिनारी राहणारे सर्वच नर्मदेला मैय्या म्हणतात, तिला पुजतात, सर्वच जण परिक्रमावासीना मान देतात सर्वोतोपरी त्यान्च्या सेवेला तत्पर असतात एवढेच नव्हे तर गावोगावी अहमहमिकेने पुढे येतात स्वागतासाठी.
मी अगदी सामान्य आहे, लिहिता येत नाही असे खुप काही मिळाले मला. समुद्रात सुर्यास्त होताना आपण नेहेमीच पाहतो आणि प्रत्येक वेळ आकाशीची ती रन्गपन्चमी पाहताना आपले भान हारपून जात, मध्यरात्री जीव मुठीत घेऊन कसेबसे नावेत बसल्यावर थन्डीत कुडकुडताना आकाशातील चान्दण्या पाहताना भान हरपुन गेले, भिती कुठे पळून गेली हे समजलेच नाही, आणि पहाटे चन्द्रास्त पाहताना चन्देरी रुपड आकाशाचे आणि रत्नसागराचेही. अप्रतिम. दुसरे शब्दच नाहीत. चन्द्र मावळला आणि अरुणोदय झाला क्षणभरात चन्देरी नभ, सागर सोनेरी रन्गात रन्गुन गेले. दिव्यदर्शन होते. किती लिहू आता शब्द नाहीत माझ्या जवळ. नर्मदे हर!
वाचने
4817
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
हर हर नर्मदे!!!!!!!!!
In reply to हर हर नर्मदे!!!!!!!!! by विलासराव
नर्मदे हर!! कसे आहात विलासराव
आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदचि
In reply to आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदचि by प्रसाद गोडबोले
अगदी खरे नर्मदामैय्या
प्रतिकुलता असतानाही माणसाने
In reply to प्रतिकुलता असतानाही माणसाने by कवितानागेश
धन्यवाद.
व्वा !नर्मदा एकदा पाहिलीय
In reply to व्वा !नर्मदा एकदा पाहिलीय by कंजूस
मीही साम्भाळून ठेवले आहे
वा खुशीताई
In reply to वा खुशीताई by सस्नेह
मलाही खुप आनन्द झाला आहे
In reply to मलाही खुप आनन्द झाला आहे by खुशि
अगदी अगदी!
वा वा!
आवडलं, पण थोडस विस्कळीत आणि
तुमचे नर्मदा परीक्रमेचे अनुभव वाचले
सुंदर