Skip to main content

जवाबदेही

लेखक रसिया बालम यांनी मंगळवार, 19/08/2014 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
शिवाशीव विस्मरणात गेली वस्ती आता एक झाली मनं तशीच राहीली जातीभेदांनी विटाळलेली उतरंड संपली, भिंती पडल्या अजुन करतो जातीचा उपहास हा 'भटक्‍या' तो 'मागास' उच्चत्वाचा मिथ्या आभास दोन अनोळखी भेटताना नवीन ओळख होताना आडनाव महत्वाचं वाटते कारण त्याची जात सांगते -- रसिया बालम
लेखनविषय:

वाचने 1738
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

कविता आवडली. -दिलीप बिरुटे (जातीपातीचा विचार न करणारा)

आडनाव महत्वाचं वाटते कारण त्याची जात सांगते अहो, माझे आडनाव "जोशी". या आडनावाचा किती जातीत समावेश आहे कुणास ठाऊक. मात्र, मी जात मानतो. (कारण, मला सवलती मिळत नाहीत.) पण, त्यातील उच्च-नीच भाव नाही. कोणी जसे आपले नाव सांगते, तितक्याच सहजतेने आपण जात घेतली पाहिजे.

In reply to by अजय जोशी

आडनाव विचारतात कारण त्यावरून जात कळते. नाही कळाली तर मग पुढचा प्रश्न असतो तुमचे गाव कुठले. सध्याचे वास्तव्याचे गाव सांगितले की विचारतात मूळ गाव कोणते. आणि अगदी त्यावरूनही नाही कळलं तर मग अंदाजाने स्वतःच्या नातेवाईकांची आडनावे एकामागोमाग एक घेऊन विचारतात ह्या अमुक गावचे हे माहीत असतील ना? आणि अगदीच लोचट असतील तर सरळ विचारतात, 'तुम्ही कोण? नाही म्हणजे XXX की ZZZ?' तुम्ही जात का मानता हे कळलं नाही. तुम्ही दिलेलं कारण त्यासाठी योग्य कसे हे समजलं नाही. असो. तुमच्या जात मानण्या-न मानण्याबद्दल काही म्हणणं नाही.

धन्यवाद मित्रहो मी जात मानत नाही. अवघे विश्वचि माझे घर...