Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अविनाशकुलकर्णी on Sat, 08/16/2014 - 07:58
लेखनविषय (Tags)
कला
एक वाचलेला किस्सा सादर करीत आहे.. इंदोर मध्ये एक धनी मराठी परिवार रहात होता..पिढीजात श्रीमंती व त्या बरोबर परिवार रसिक पण होता व श्रद्धाळू पण.. कोजागरी च्या रात्री त्यांचा कडे रात्र जागवण्याचा मोठा कार्यक्रम असे. नामवंत गायक कलाकार हजेरी लावत असत. व नंतर केशरी दूध सर्व उपस्थितांना दिले जाई व कार्यक्रमाची सांगता होत असे... एका वर्षी असाच कार्यक्रम झाला ..पाहुणे गेल्यानंतर यजमान व यजमान बाई आवराअवर करत होते.. त्यांचे केशरी दूध घ्यायचे राहिले होते.. पातेले मोठे होते ज्यात केशरी दूध होते व दूध पण बेताचे उरले होते.. यजमान बाईनी मोठ्या पातेल्यातून लहान पातेल्यात दूध ओतायला सर्वात केली अन त्या घाबरल्या मोठ्या पातेल्याच्या तळाशी एक पाल मरुन पडलेली त्यांना दिसली.. बहुतेक दूध उकळताना वरुन पाल टपकली असावी व आतच मेली असावी.. मोठा कठीण प्रसंग होता पाहुणे तर दूध पिऊन घरी गेले होते.. अजाणते पणाने घडू नये ते घडून गेले होते.. यजमान व त्यांच्या बायकोने विचार केला दुधाचे पेले भरले व दूध प्राशणं केले.. त्यांनी विचार केला की जे पाहुण्यांचे होईल तेच आपले होईल या हेतुने.. परिवार नाना महाराजाचे भक्त होते त्यांना अशुभ घडू नये म्हणून साकडे घातले. सुदैवाने वा गुरु माउली कृपेने काही झाले नाही.
  • Log in or register to post comments
  • 15989 views

प्रतिक्रिया

Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Tue, 08/19/2014 - 18:58

In reply to झेपले नाहि by पालव

Permalink

झेपले नाहि बुआ

झेपले नाहि बुआ
बुवा पार पोचलेले आहेत. कसे झेपतील?
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Wed, 08/20/2014 - 12:18

Permalink

बर झाल त्यांनी उरलेल दुध पिउन

बर झाल त्यांनी उरलेल दुध पिउन टाकलं, उगाच वाया कशाला घालवायच? दुध प्यायच्या आधी पाल पिळुन घेतली की नाही? नंतर त्या पालीच काय केल? (त्याची रेशीपी विचारुन इकडे टाकलीत तर ती एक चांगली समाजसेवा होइल) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Wed, 08/20/2014 - 14:11

Permalink

(No subject)

:-))
  • Log in or register to post comments

Submitted by तुमचा अभिषेक on Wed, 08/20/2014 - 16:22

Permalink

आमच्या बिल्डींगमधील एका घरातील किस्सा

घरच्यांची सर्वांची दुपारची जेवणे झाली. शेवटाला घरातला कर्ता पुरुष कामानिमित्त बाहेर गेलेला तो येऊन ताटावर बसला. समोर डाळीचा टोप. तळाला उरलेली थोडीशी डाळ. चमच्याने सहज ढवळून पाहिले तर त्यात मरून पडलेली पाल नजरेस पडली. घरातले सारे जेऊन तासभर झाला होता, अजून कोणाला काही झाले नव्हते तरीही सर्व भितीने थंडगार पडले. या महापुरुषाने मग काय करावे. त्या सर्वांना धीर येण्यासाठी म्हणून लिमडा मिरची काढतात तसे पाल बाहेर काढून उरलेली डाळ बिनधास्तपणे प्राशन केली.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 08/20/2014 - 16:30

In reply to आमच्या बिल्डींगमधील एका घरातील किस्सा by तुमचा अभिषेक

Permalink

आयला,

म्हणजे हिरो (उर्फ नाना महाराजांचा) रोलच पिक्चर मधून डिलीट! आता कसा चालणार पिक्चर?
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Wed, 08/20/2014 - 16:41

In reply to आयला, by संजय क्षीरसागर

Permalink

असा कसा डिलीट? त्याला तसं

असा कसा डिलीट? त्याला तसं करायची बुद्धी कुणी दिली? नामांनीच.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 08/20/2014 - 16:57

In reply to असा कसा डिलीट? त्याला तसं by आदूबाळ

Permalink

आता तुला नानांना `नामां' म्हणायची हिंमत कुठून आली?

तर त्यांच्यामुळेच!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 08/20/2014 - 17:17

Permalink

पाल घातलेली केशरी दुध चवीला

पाल घातलेली केशरी दुध चवीला कसे लागेल ह्याचा विचार करीत आहे ... करायचा एकदा हा बेत मिपाकरांनो पालमिल्कशेक ...कोजागरी जवळच आली आहे ... मजा येईल ... !!
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 08/20/2014 - 17:44

In reply to पाल घातलेली केशरी दुध चवीला by प्रसाद गोडबोले

Permalink

अतिअवांतर

तेलुगु आणि तमिऴ भाषेत दुधालाच पाल म्हणतात =))
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 08/20/2014 - 17:54

In reply to अतिअवांतर by बॅटमॅन

Permalink

अति अति अवांतर

बंगालीत तर काही काही माणसांनाच पाल म्हणतात : उदाहरणार्थ बिपिनचंद्र पाल *lol* इंग्रजीत पाल हा शब्द मित्र ह्या अर्थाने वापरतात : Hey , how are you , Pal ? *pleasantry*
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 08/20/2014 - 18:26

In reply to अति अति अवांतर by प्रसाद गोडबोले

Permalink

हा हा हा

हा हा हा =)) 'आपले' डिरेक्टर २००९-१० साली शंकर पाल म्हणून होते ते आठवलं. शंकरपाळ्याची आठवण व्हायची त्यांना पाहिलं की.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 08/20/2014 - 18:29

In reply to हा हा हा by बॅटमॅन

Permalink

अतिअतिअतिअति अवांतर

बंगालीत झाडू साठीचा शब्द, तमिऴ मध्ये सामान्य किड्यासाठीचा शब्द, तेलुगुमध्ये आदरार्थी 'इथे या, जनाब आईये' छाप शब्द, काश्मिरी भाषेतला ब्रेड/चपाती/नान/रोटी इ. साठीचा शब्द, हे सर्व शब्द एकदा पहा आणि नै हास्यस्फोट झाला तर सांगा.
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Wed, 08/20/2014 - 19:24

In reply to अतिअतिअतिअति अवांतर by बॅटमॅन

Permalink

तेलुगुमध्ये आदरार्थी 'इथे या,

तेलुगुमध्ये आदरार्थी 'इथे या, जनाब आईये' छाप शब्द,
रा ** इक्कडा वस्तायी. एका तेलुगू चित्रपटात जेव्हा हे पहिल्यांदा ऐकलं होतं तेव्हा फुटलो होतो. :)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 08/20/2014 - 19:33

In reply to तेलुगुमध्ये आदरार्थी 'इथे या, by धन्या

Permalink

हा हा हा, अगदी अगदी.

हा हा हा, अगदी अगदी. :)
  • Log in or register to post comments

Submitted by mbhosle on Wed, 08/20/2014 - 18:09

In reply to अतिअवांतर by बॅटमॅन

Permalink

तुम्हाला एकूण किती भाषा येतात

तुम्हाला एकूण किती भाषा येतात हो ?
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Wed, 08/20/2014 - 17:52

Permalink

घाणेरडी माणसं!!

घाणेरडी माणसं!! =))
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Wed, 08/20/2014 - 18:00

Permalink

फार वर्षांपूर्वी अगदी लहानपणी

फार वर्षांपूर्वी अगदी लहानपणी अशी एक गोष्ट एका नामांकीत साप्ताहिकात वाचली होती (सा. सकाळ/लोकप्रभा/.चित्रलेखा इ. पैकी असावे) पाहुणे सकाळी सकाळी घरी जायला निघतात, तेव्हा दूध का खीर का असलंच काही त्यांना बरोबर देतात. त्यांची गाडी निघाल्यानंतर थोड्या वेळाने हे पण तो पदार्थ वाढून घेतात, तर भांड्यात मेलेली पाल. पण त्या गोष्टीत हे लोक पार जीवाच्या आकांताने ही गोष्ट या पाहुण्यांना कळवायचा प्रयत्न करतात. पोलीसांना सांगतात. आणखी कुणाकुणाला सांगतात, पोलीसही लगेच सायरन वाजवत त्यांनी सांगितलेल्या गाडीच्या शोधात निघतात. दुपारपर्यंत जेव्हा गाडी सापडत नाही, तेव्हा शेवटी रेडिओ वर अनाउंस करतात- "दूध पिऊ नका, दुधात पाल सापडली आहे" असं काहीतरी. शेवटी पोलीसांनाच हे लोक सापडतात, पण त्यांनी तोवर दूध पिलेले नसते. मग सगळे हाश्श हुश्श होते. मी उगाच वाचलं होतं ते. आणि विचार करत होतो यात छापून येण्यासारखे काय आहे... .
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Wed, 08/20/2014 - 20:29

In reply to फार वर्षांपूर्वी अगदी लहानपणी by असंका

Permalink

किशोर मध्ये आली होती गोष्ट.

किशोर मध्ये आली होती गोष्ट.
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Wed, 08/20/2014 - 20:38

In reply to किशोर मध्ये आली होती गोष्ट. by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

मी उगाच वाचलं होतं ते. आणि

मी उगाच वाचलं होतं ते. आणि विचार करत होतो यात छापून येण्यासारखे काय आहे... .
किशोर मध्ये आली होती गोष्ट.
*lol*
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Wed, 08/20/2014 - 21:19

In reply to किशोर मध्ये आली होती गोष्ट. by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

हो ना! आपण पण वाचली आहे तर!

हो ना! आपण पण वाचली आहे तर!
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com