लाचलुचपत प्रतिबंधक खाते आता फेसबुकवर..
आजकाल वर्तमानपत्र वाचताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कारवाई केल्याच्या बर्याचशा बातम्या दिसतात. या खात्याचे पोलिस महासंचालक ( Director General) श्री. प्रवीण दिक्षित यांनी नेहमीच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करून लोकांनी पुढे येऊन तक्रार करण्याची वाट न पाहता आपल्याच अधिकार्यांना सरकारी कार्यालयात पेरून लाचखोर मंडळींची माहिती काढावयास लावली आणि अटकसत्र आरंभले. तरीदेखील लाच मागण्याच्या घटना कमी होत नाहीत किंवा कार्यालयाबाहेर केलेल्या देवाणघेवाणीचीही अँटी करप्शन ब्युरोला माहिती मिळणे थोडे अवघड होते.
त्यातच १०० किंवा १०१ यासारखा पटकन लक्षात राहण्यासारखा संपर्क क्रमांक नसल्यामुळेही इच्छा असूनही लोक तक्रारी करू शकत नाहीत. म्हणूनच अधिक लोकाभिमुख होऊन, सोशल नेटवर्कवरती आपल्या घडामोडींची माहिती देण्यासाठी आणि त्याद्वारे लोकांमध्ये अधिक विश्वास संपादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अँटी करप्शन ब्युरोने फेसबुकवर पेज तयार केले आहे. https://www.facebook.com/MaharashtraACB येथे या पेजला भेट देता येईल. सध्यातरी इतर लोकांना त्यावरती नव्या पोस्ट्स टाकता येणार नाहीत, मात्र इतर पोस्टवर कमेंट्स-लाईक-शेअर करता येईल.
सध्या हे पेज प्राथमिक स्वरूपात आहे. काही माहितीपर पोस्टर्स, बातम्या आणि अँटी करप्शन ब्युरोच्या संस्थळावरील काही माहिती इथे देण्यात आली आहे. त्यांच्या वेबसाईटवरील तक्रारदुव्याखेरीज फेसबुकपेजवरती देखील एक गुगल फॉर्मची लिंक आहे जेणेकरून कुठूनही आपल्याला लाचेच्या मागणीची माहिती ब्युरोला कळवता येईल.
अँटी करप्शन ब्युरो संपर्क माहिती:-
- १०६४ - ही नुकतीच भारतभर सुरू झालेली सेवा आहे, परंतु काही ठिकाणी अंमलबजावणी होणे बाकी आहे. महाराष्ट्रात ही सेवा सध्या फक्त टेलिफोनवरून (बीएसएनएल्/एमटीएनएल) वरती उपलब्ध असून आठवड्याभरात मोबाईलवरूनही वापरता येईल.
- १८००२२२०२१ - ही सुद्धा टोलफ्री सेवा असून या क्रमांकावर केलेला फोन जवळच्या जिल्हा केंद्राला जोडला जातो.
- acbwebmail@mahapolice.gov.in या इमेल अॅड्रेसवरती विरोपाने तक्रार कळवता येईल.
- लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या संस्थळावरती या दुव्यावर http://acbmaharashtra.gov.in/complaints_traps.asp सुद्धा तक्रार नोंदवता येईल.
- गुगलफॉर्मचा दुवा..
प्रतिक्रिया
सुंदर उपक्रम !
उपक्रम सुंदर तर खराच. पण यात
शुभेच्छा ! शुभेच्छा !!
नक्कीच!!
कट्टा कब है...कब है कट्टा
अतिशय उत्तम!
वाचनखूण साठवली.
हा कार्यक्रम बराच काळ चालू
सुंदर उपक्रम !