मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्ट्फ्ड कांदा पूरी आणि जीरा-आलू

सानिकास्वप्निल · · पाककृती
साहित्य जीरा-आलू: १२-१५ छोटे बटाटे (बेबी पटेटोज)उकडून, सालं काढून घेणे १ टीस्पून जीरे १/२ टीस्पून हळद दीड टीस्पून लाल तिखट १ टीस्पून धणेपुड १ टीस्पून जीरेपूड मीठ चवीनुसार १ टेस्पून लिंबाचा रस बारीक चिरलेली कोथींबीर . पाकृ: बटाट्यांना काट्याने टोचे मारून घ्यावे. पॅनमध्ये तेल गरम करुन जीर्‍याची फोडणी करावी. त्यात उकडलेले बटाटे, मीठ व सुके मसाले घालून परतून घ्यावे. झाकून एक वाफ काढावी. त्यात शेवटी लिंबाचा रस व चिरलेली कोथींबीर घालून एकत्र करावे. . साहित्य स्टफ्ड कांदा पूरी: नेहमीप्रमाणे पुर्‍यांसाठी कणिक भिजवतो तशी भिजवून घ्यावी. १ छोटा कांदा बारीक चोचवून/ चिरून घ्यावा. १/२ टीस्पून हळद दीड टीस्पून लाल तिखट १ टीस्पून धणेपूड १ हिरवी मिरची बारीक चिरलेली मीठ चवीनुसार बारीक चिरलेली कोथींबीर . पाकृ: एका भांड्यात कांदा, हिरवी मिरची, कोथींबीर, हळद, लाल तिखट, धणेपूड, मीठ व चिरलेली कोथींबीर एकत्र करावे. कणकेची छोटी पारी लाटून त्यावर एक चमचा कांद्याचे सारण घालावे. सर्व बाजूंनी नीट बंद करुन, दाबून हलक्या हाताने जाडसर पूरी लाटावी. तेल गरम करायला ठेवावे. तेलात पूरी सोडून सोनेरी रंगावर तळून घ्यावी. चिरलेला कांदा असल्यामुळे पुर्‍या जास्तं फुगत नाही. . गरमचं सर्व्ह कराव्यात. तुम्ही ह्या पुर्‍या चहा, चटणी, सॉससोबत सर्व्ह करु शकता, मी जीरा-आलूसोबत सर्व्ह केल्या आहेत :) . नोटः वरील प्रमाणेच कणकेऐवजी मैदा भिजवून त्यात हे सारण भरावे व मंद आचेवर तळावे. खुसखुशीत कांद्याची कचोरी तयार, पण फार टिकत नाही लगेच संपवाव्या लागतात. थोड्या हेवी असतात म्हणून नाश्त्याला सर्व्ह करता येतात.

वाचने 14543 वाचनखूण प्रतिक्रिया 31

इथे आम्ही रोज जेवायला काय करायचं अशा गहन प्रश्नात असतो आणि ही सतत नवीन नवीन पदार्थ टाकते. त्याचे तेवढेच भारी फोटो टाकते. त्रास आहे नुसता. पाकृ बद्दल बोलायलाच नको. नेहमीप्रमाणेच.

In reply to by मधुरा देशपांडे

सस्नेह Fri, 08/15/2014 - 10:40
रोज उठून वेगळे काय करायचे हा ज्वलंत प्रश्न आहे. सानिकातैला सलाम्स !

In reply to by मधुरा देशपांडे

प्रभाकर पेठकर Fri, 08/15/2014 - 14:28
आपल्याला काय काय करता येतं, शिवाय अशा पाककृतींपैकी आपल्याला आवडलेल्या, साध्या सोप्या पाककृतींची एक यादी बनवायची आणि तारखेनुसार लिहून ठेवायची. लागोपाठच्या दिवशी साधारण एकाच प्रकारच्या भाज्या येणार नाहित एव्हडी काळजी घ्यावी. म्हणजे चारपाच दिवस बटाटा, मिश्र भाजी, पालेभाजी, दह्यातल्या भाज्या अशी मांडणी नाही करायची. दोन सारख्याच प्रकारच्या भाज्यांमध्ये एका आठवड्याचे तरी अंतर ठेवायचे. भाज्यांचे ३० ते ४५ प्रकार सहज करता येतात. रोज उद्या काय करायचं हे त्या यादीत आदल्या दिवशी पाहून तयारी करून ठेवायची. रोज नवी भाजी, नवा पदार्थ. घरचेही खुष आणि आपल्यालाही मेंदूला जास्त ताण द्यावा लागत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

मी पण नेहमीच यादी बनवते. आदूबाळ म्हणाले तसेच एक्सेलमध्ये. पण कधी भाज्यांची उपलब्धता (त्यात इकडे मिळणार्या मर्यादित भाज्या), घरात सगळे साहित्य असणे, आणि तेवढा वेळ नसणे अशा किंवा इतर काही कारणांमुळे यात गडबड होते. अर्थात मिपाचा पाक़कृती विभाग सुद्धा असतोच मदतीला. :)

बहुगुणी Fri, 08/15/2014 - 02:46
नेहेमीप्रमाणेच (सानिकाताई आणि इतर ५-६ बल्लवाचार्यांच्या पाककृतींना करतो तसं) आधी वाचनखूण साठवून टाकली! मग चवी-चवीने पाककृती वाचली, पाककृतीही फर्मासच!

एस Sun, 08/17/2014 - 20:59
तो शेवटचा फोटू काढून झाल्यावर तुम्ही या खाद्यपदार्थांचं काय करता बरं? ;-) नै म्हंजे आम्ही फार्फार्फार म्हणजे फार्रच भुकेले आहोत हो. गेल्या दोन वर्षांत काहीसुद्धा (तुमच्या हातचं) खाल्लं नाहीये. आम्हांला द्या हो ह्या कांदापुर्‍या आन् जिरेबटाटा. देणार ना? प्लीज प्लीज प्लीज. ताईमाईअक्का... द्या ना! शेजारधर्म म्हणून द्या! :-P :-))

पैसा Wed, 08/20/2014 - 15:30
मस्तच! पुरी आणि बटाट्याची भाजी हे नेहमीच्या ओळखीचे पदार्थ नवे कपडे घालून मस्त दिसताहेत!