जाडे मीठ.
लहानपणापासून घरात जाडं मीठ पहात आल्यामुळे, लग्नानंतरहि स्वयंपाकात तेच मी वापरू लागले. माझ्या लहानपणी वाण्याकडे जाड्या व बारीक मीठाची अशी दोन पोती असायची. नंतर 'आयोडीनयुक्त' ,सर सर असं पडणारं बारीक मीठ पिशव्यांतून मिळू लागलं आणि पोत्यांत ठेवलेलं बारीक मीठ दिसेनासं झालं.अजुन जाडं मीठ मात्र , पिशव्यांतूनच, मिळतं.मी अजुनहि स्वयंपाकात, शक्य असेल तेथे जाडं मीठच वापरते. मला वाटतं ह्या जाड्या मीठाचा वापर हल्ली कमी झालाय. बर्याच जणांना जाडं मीठ म्हणजे काय हेच माहित नाही. माझ्या मुलीला, १९९९च्या सुमारास Microbiology हा विषय शिकताना,बहुधा भेसळ ओळखण्यासंदर्भात, कॉलेजात जाडं मीठ न्यायचे होते.वर्गात कोणालाहि ते कसे असते हे माहित नव्हते.म्हणून तिने ते घरून नेले, इतरांना दाखवले व वाण्याकडे मिळते ही बहुमोल माहिती त्यांना दिली. मला वाटतं की स्वयंपाकात जाड्या मीठाचा वापर व्हावयास हवा.ते नैसर्गिक स्वरूपात असतं.Branded बारीक मीठ प्रक्रीया केलेलं असल्यामुळे त्यातील रसायनांमुळे ते तब्येतीस हानीकारक असते असे मला वाटते.दुकानांतहि आता दळून बारीक केलेलं मीठ मिळत नाही. म्हणून मी शक्यतोवर जाडंच मीठ वापरते. तुम्हाला काय वाटतं? माझा समज चुकीचा असेल तर तो सुधारावा.
वाचने
17577
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
चव
दादरप येथील श्रीकृष्ण
In reply to दादरप येथील श्रीकृष्ण by गवि
अरे बापरे....
In reply to दादरप येथील श्रीकृष्ण by गवि
गविंचा प्रतिसाद तिसर्यांदा
In reply to गविंचा प्रतिसाद तिसर्यांदा by सूड
बटाटवड्याच्या पश्चिमेची
In reply to बटाटवड्याच्या पश्चिमेची by गवि
तुम्ही स्वतः संपादक आहात ना?
In reply to तुम्ही स्वतः संपादक आहात ना? by अनुप ढेरे
अहो त्यांनी स्वतःलाच विनंती
यानिमित्ताने विचारून घेतो:
In reply to यानिमित्ताने विचारून घेतो: by आदूबाळ
मिठातल्या कैर्या
In reply to मिठातल्या कैर्या by पैसा
करेक्ट!
In reply to मिठातल्या कैर्या by पैसा
आमटे/अंबाडे लहान चिकू एवढे
जाडे मीठ विरुद्ध बारीक मीठ.
In reply to जाडे मीठ विरुद्ध बारीक मीठ. by प्रभाकर पेठकर
चुकीची दुरुस्ती.
जाडं मीठ आता वाण्याकडे बंद
जाडे मीठ उपेक्षित नाही
In reply to जाडे मीठ उपेक्षित नाही by कंजूस
ज्याला मीठसुध्दा मागावे लागते
In reply to ज्याला मीठसुध्दा मागावे लागते by गवि
हेही खरेच...
In reply to जाडे मीठ उपेक्षित नाही by कंजूस
खरच? वॉव!
मिठाला पारका झाला म्हाणजे
In reply to मिठाला पारका झाला म्हाणजे by कंजूस
हे अजिबातच माहिती नव्हतं.
जाडे (खडे) मीठात सोडियम क्लोराईड व्यतिरिक्त
फारस माहित नाही पण
दातासाठी चागले
मिठागरे आणि स्वच्छता
खडे मीठ ...काळे मीठ !! आयोडिन
आता वारीच्या निमित्ताने
जाड्या मीठाचा वापर होत रहावा