साहित्यः
पिझ्झा सॉस साठि:(करायचा कंटाळा असेल तर रेडिमेड बाजारात मिळतो)
१. लालबुंद टोमॅटो - ३
२. ४ ते ५ पाकळ्या लसुण
३. १ छोटा बाउल ऑलिव्ह ऑईल
४. १/२ छोटा बाउल टोमॅटो केचप
५. पिझ्झा सीझनींग (हे रेडिमेड मिळतं) - २ चमचे
६. चवीनुसार मीठ
कॄती:
१. टोमॅटोंना + चीर देउन उकळत्या पाण्यातुन एक ३-४ मि. घालुन ब्लांच करुन घ्या. गार झाले कि सालं काढुन मिक्सर मधे प्युरे करुन घ्या.

२. लसुण पाकळ्या सोलुन बारीक चीरुन घ्या. आता कढईत तेल तापलं कि बारीक चीरलेला लसुण घालुन परतुन घ्या.

३. लसुण सोनेरी झाला कि प्युरे + केचप एकत्र करुन घाला व मंद आचेवर सतत ढवळत रहा. बाजुच्या कडेने तेल सुटु लागलं कि पिझ्झा सीझनींग मसाला थोडा तळहातावर क्रश करुन घाला.

४. सॉस स्प्रेड करण्याईतपत घनता आली कि गॅस बंद करा. पिझ्झा सॉस तयार आहे.
टिप: हे रेडिमेड पिझ्झा सीझनींग जर मिळालं नाहि तर ड्राय बेसील, ओरॅगॅनो, ईटालीयन मिक्स हर्ब्स प्रत्येकि १ चमचा घ्या आणि हलकेच क्रश करुन घाला
आता थीन क्रस्ट ब्रेड पिझ्झा साठि:
साहित्यः
१. स्लाईस ब्रेड
२. लाल, पिवळि, हिरवी भोपळि मिरची - प्रत्येकि १ चौकोनी चीरुन
३. ब्लॅक ऑलीव्हज - ३ चमचे
४. २ मध्यम कांदे चौकोनी चीरुन
५. मोझ्झेरेला किंवा आपापल्या आवडिचं चीझ
६. पिझ्झा भाजण्यासाठि तेल किंवा बटर
७. आवडत असल्यास मश्रुम्स (मी विसरलो *wink*
कॄती:
१. एका बाउल मधे चौकोनी चीरलेल्या भोपळि मिर्च्या, कांदा आणि ब्लॅक ऑलीव्ह्ज घालुन एकत्र करा.

२. आता थीन क्रस्ट ईफेक्ट साठि ब्रेड स्लाइस घेउन पोळि लाटतो त्या प्रमाणे लाटुन घ्या. अश्या सर्व स्लाईस करुन घ्या.
टिपा:
१. थीन क्रस्ट ब्रेड नको असेल तर स्लाईस तशीच ठेवा. थीक क्रस्ट होईल.
२. अधीक हेल्दि/पौष्टिक करण्यासाठि ब्राउन किंवा मल्टि ग्रेन ब्रेड घेउ शकता.
फायनल असेंबलींगः
१. नॉन स्टिक तवा मंद आचेवर तापत ठेवा. पोळपाटावर सपाट केलेली ब्रेड स्लाईस ठेवुन त्यावर पिझ्झा सॉस लावा.

२. एकत्र केलेल्या भाज्या हलकेच सर्व बाजुनी पेरा. मोझ्झेरेला चीज घालुन टॉपअप करा.

३. मंद आचेवर आधी एक २ मि. भाजा. मग झाकणं ठेवुन चीझ वितळेस्त भाजा. तो पर्यंत ब्रेडची खालची बाजुहि मस्त खरपुस होईल. ओव्हन असेल तर बेक करा (त्यावर असलेल्या सुचनांनुसार).
गॅस मंदच असु द्या अन्यथा ब्रेड खालुन करपेल.

४. गर्मागरम ब्रेड पिझ्झाचा लुफ्त घ्या
टिपा:
१. आवडत असल्यास सर्व करतेवेळि वरुन चीली फ्लेक्स / पारमेझान चीज घालायला विसरु नका.
२. नॉन व्हेज वाले ह्यात त्यांच्या आवडिने व्हेरीएशन्स करु शकतात.
३. भाज्या अश्याच थोड्याश्या वाफवुन मस्त क्रंची राहतात पण तश्या नको असतील तर टॉपींग करण्याआधी कढईत घालुन एक/दोन वाफा काढुन घ्या. पण त्यात मजा येत नाहि आय मीन खाताना त्या ओलसर लागतात आणि वाफवल्यामुळे कदाचीत ब्रेडवर नीट सेट होणार/बसणार नाहित.
४. ह्याच ब्रेडचे चार भाग केले कि
बाईट साईझ मिनी पिझ्झा ह्या नावाने पार्टि स्टार्टर म्हणुन सर्व करता येतील.
५. हा असा सॉस रेडि करुन ठेवला कि झट्पट कधीहि मनात आल्यावर पिझ्झाचा लुफ्त घेता येईल. काय मग कोसळणारा धो धो पाउस, हे असे बाईट साईझ पिझ्झा आणि वाफाळणारा आलं किंवा पाती चहा घालुन केलेला चहा....कस वाटतं चित्र??? चियर्स... *drinks*

मस्त आणि झटपट !
In reply to मस्त आणि झटपट ! by गणपा
+१
In reply to मस्त आणि झटपट ! by गणपा
+१
मस्त आयडिया. अशाच तिखट
मस्त पा.क्रु.
मस्तच...
आवडलं!!!!! झक्कास!!!
वा वा!
ए
एक नंबर आयडिया..
व्वा! झकास! असे पदार्थ पाहिले
आला परत!
कढई फारच काळी झालीये नै?
In reply to कढई फारच काळी झालीये नै? by सूड
कढई फारच काळी...
In reply to कढई फारच काळी... by दिपक.कुवेत
(No subject)
चांगला दिसतोय ब्रेड पिझ्झा!
वॉव..
लय भारी!
आवडली पाकृ० . पावसात मस्तच
यावर पनीर नाही?
In reply to यावर पनीर नाही? by अनन्न्या
मिळतात ग!
मस्तच दिसतोय. रन्गित रन्गित.
आता पाऊस पडतोय इथे. आणा
छान..
हे नक्की करता येईल - प्रयत्न
मस्तच!
एक प्रश्न - ३ टोमॅटो साठी
In reply to एक प्रश्न - ३ टोमॅटो साठी by मनिष
हो रे मनिष
In reply to हो रे मनिष by दिपक.कुवेत
खुलाशाबद्द्ल धन्यवाद! बाकी
कसलं भारी!
भूक..भंयंकर चाळवणारे फोटू!
छान दिसतय
सहीच... नक्की करून बघणार
मस्त पाकृृ.
हे शाब्बास...!!!!!!!
थीन क्रस्ट ची आयडीया मस्त आहे
बनवला,मस्त झाला होता,माझ्या
धन्यवाद मंडळि
In reply to धन्यवाद मंडळि by दिपक.कुवेत
मस्तच
मस्त!!मी वाटीने ब्रेड गोल
मस्त पाक्रु :)
पिझ्झा सॉसची पाकृ आवडली. करुन
आल्मोस्ट असच!
In reply to आल्मोस्ट असच! by विशारद
@ विशारद
अथवा जाडसर डोसा वा उत्तप्प्याचा बेस?
पोळ्या/फुलके एवजी