माझे साईपदयात्रेचे अनुभव - ५
माझे साईपदयात्रेचे अनुभव - १ - http://misalpav.com/node/28447
माझे साईपदयात्रेचे अनुभव - २ - http://misalpav.com/node/28457
माझे साईपदयात्रेचे अनुभव - ३ - http://misalpav.com/node/28464
माझे साईपदयात्रेचे अनुभव - ४ - http://misalpav.com/node/28482
माझे साईपदयात्रेचे अनुभव - ५
आजचा ७ वा दिवस , १ एप्रिल २००९ . सकाळी १.०० च्या दरम्यान मंडळाचे सभासदांनी सर्वांना हाका मारुन उठवले.
नेहमीप्रमाणे सर्व आटपुन तयार झालो. आज पुर्ण अंग व पाय खुप दुखत होते. साधारण रात्री २.१५ ला चालायला सुरुवात केली आणी अचानक लक्षात आले की डाव्या पायाच्या अँकलची शीर खुप दुखत आहे. ५ व्या आणी ६ व्या दिवशीचे जास्त अंतर चालल्याने शीर खुप ठणकत होती. घाट उतरताना झटके बसुन बसुन कमरेची शीरही दुखत होती. पायाची मुरगळल्यासारखी अवस्था झाल्याने लंगडत लंगडत चालु लागले. जोडीदारांनी अँकल सपोर्ट बेल्ट लावला पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. मी थांबुन बेल्ट काढायला लावला. मला पुन्हा गाडीत बसायचंय का असं विचारण्यात आलं , मी नकारच दिला, उद्या तर शिर्डी पोहोचु, इतका पल्ला गाठला आता नाही बसणार. ह्ळु हळु चालायला लागले पण पाय टेकवेना, शेवटी एका बाजुने राउतचा भाउ अमोल व दुसर्या बाजुने राउतचे मामा ह्यांचे नाव श्रीकांत मामा ह्यानी असे दोघांनी मिळुन २ गमछाने मला सपोर्ट दिला. चालणे असह्य झाले होते. मरणप्राय वेदना सुरु झाल्या. बराच वेळ चाललो तरी खुप कमी अंतर कापले जात होते. काय करावे सुचत नव्हते. अजुन २२ ते २५ की,मी. अंतर पार करायचे होते. पदयात्रा सुरु करण्यापुर्वी एक महीना अगोदर घरच्यांबरोबर गाडीने शिर्डीला आले होते. परत येताना पदयात्री दिसत होते. एका पदयात्रीला दोघांनी सपोर्ट दिला होता आणि त्याची अवस्था अतिशय वाईट होती हे पाहुन माझे भाउजी म्हणाले होते कि आपल्या कविताला असेच आणावे लागेल असे वाटते आणि तसेच झाले. माझी अवस्था ही दयनीयच झाली होती.
खुप वेळ चालुन चालुन पाय आणखी ठणकु लागला. ईतके दिवस पुरेशी झोप नसल्याने डोळे ही जड झाले होते. खुप मागे पडलो. चालता चालता सारखे कीती वाजले असे विचारत होते , बरेच अंतर झाल्यावर ४ वाजल्याचे समजले , जोडीदार म्हणत होते आज काही सकाळचा आराम मिळणार नाही, आरामाचा थांबा बराच लांब होता , ते मला म्हणत होते कि पटापट पाउले उचल आरामाच्या थांब्यापर्यंत म्हणजे आराम करता येईल. मी शक्यतो प्रयत्न करत होते पण काही केल्या लवकर चालवेना. ते मला म्हणत होते देवाचे नाव घे, मी साईबाबांना हाका मारत होते. आजुबाजुला का़ळाकुट्ट अंधार होता. काय करावे समजत नव्हते कारण अंधारात कुठेही आरामासाठी थांबणे रीस्की होते. कसेबसे ४.४५ ला आरामाच्या थांब्यावर पोहोचलो. मी लगेचच जागा पाहुन पडले. १५ मिनिटात सर्व उठुन निघाले, आम्हीही उठलो. आता अजुन पाय दुखत होता. २ सपोर्टवर कशी बशी चालु लागले. ५ ची आरती सुरु झाली. मी साईबाबांचे नाव घेउ लागले. आता मात्र अवसान गळु लागले होते. हुंदके द्यायला सुरुवात झाली. आजचा दिवस परीक्षेचा होता. साईबाबांची आरती मनातल्या मनात बोलायला सुरुवात केली पण कुठले कडवे आपण आता म्हंटले आहे हेही विसरुन जात होते. थोडया वेळाने मी साईबाबांना मनातच सांगितले "बस आता यातुन सुटका करा, आता मरण आले तरी चालेल". अक्षरशः आज काही ह्यातुन वाचत नाही असेच वाटत होते आणी मरणाची वाट पाहत होते कारण मेले तर ह्या वेदनापासुन सुटका होईल त्यामुळे साईबाबांपुढे "देवा आता सुटका करा" असा धावा करु लागले पण काहीच फरक नाही. आता मात्र जोरजोरात हुंदके येउ लागले, जोडीदार बिचारे माझ्याकडे हळुच पाहत चालत होते त्यांनाही माझी ही अवस्था पाहुन खुप दया येत होती. थोडयावेळाने मी बाबांना मनातल्या मनात म्हणु लागले की आता तुम्हीच या आणि माझा हात पकडुन मला घेउन चला , आता काही सहन होत नाही. बराच वेळ असं बोलत होते. आम्ही खुप मागे पडलो होतो.
७ वाजताच्या दरम्यान एके ठीकाणी आलो येथे शिर्डी संस्थानने पदयात्रीच्या आरामासाठी मंडपाची सोय केली आहे. आमचे पदयात्रीही इथे थांबले होते पण आम्ही पोहोचेपर्यंत त्यांची निघण्याची वेळ झाली होती. माझ्या जोडीदारांनी मंडळाच्या अध्यक्षांना सांगितले की हि खुप थकलीये आणी हिला नीट झोप सुद्धा मिळाली नाहीये हिला आरामाची खुप गरज आहे तर तुम्ही निघा आम्ही हिला घेउन येतो. तिथे मिळालेली छोटी वेफर्सची पाकीटे हातात देउन मंडळी पुढे निघाली. माझ्याबरोबर आता राउतचा भाउ अमोल, श्रीकांत मामा, निलेश आणि दिपक भाउ थांबले होते. दिपक भाउ पालघर्ला कुठल्यातरी कंपनीमधे झाडाला पाणी शिंपण्याचं काम करतात, दरवर्षी इतक्या उन्हातही शॉप फ्लोअरवर काम करताना घालण्याचे जाड सेफ्टी शुज घालुन पदयात्रा करतात. पदयात्रेत पडेल ते काम करतात मंडळ त्यांना थोडे फार पैसे देतं. थोडावेळ आराम करुन वेफर्स खाउन निघालो, उजेड झाल्याने उन जाणवु लागलं होतं , झोप मिळाल्याने थोडी हुशारी आली होती पण दुखणं कमी झालं नव्हतं, गमछाचा आधार होता. येणारे जाणारे माझ्याकडे दयेने पाहत होते. थोडया थोड्या वेळाने बसत होते. बसले तरी पायातले सॉक्स आणि अँकल सपोर्ट काढायला वाकायचेही त्राण नव्हते. थांबल्यावर अमोल माझ्या पायातले सॉक्स आणि अँकल सपोर्ट काढायचा आणी निघताना घालुनही द्यायचा. खुप मागे राहील्याने आमच्या मंडळाचा नाश्ता ही आम्हाला मिळाला नाही , खुप भुक लागली होती साईबाबांना म्हंटले बाबा भुक लागलीये काही तरी करा, थोडा वेळ चाललो तिथे दुसरे पदयात्री मंडळ नाश्ता देत होते वास्तविक प्रत्येक पदयात्री मंडळ आपापल्या पदयात्रींसाठी नाश्ता पुरवतं पण कुठल्याही पदयात्रीला खाणं पीणं नाकारत नाही. ते रोडवरच टेंम्पोत बसुन त्यांच्या पदयात्रीना नाश्ता देत होते आणि वडापाव असल्याने सगळे हातात घेउन खात खात पुढे जात होते. आम्हीही गेलो आम्हालाही वडापाव मिळाला. आता पाण्याची पंचाईत होती तेव्हा आतासारखे कुणी मोटरसाईकलवर पाणी वाटप करत नव्हते. एके ठीकाणी बसलो. बाजुलाव ५-६ पदयात्री नाश्ता करत बसले होते. स्वतःच चालत निघाले होते , जोडिला २ कार्स होत्या सामान ठेवण्यासाठी. आम्ही उठलो आणी मी दिपक भाऊंना रस्ता क्रॉस करुन समोरच्या दुकानातुन मिनरल वॉटर घेउन यायला सांगितले, त्या पदयात्रींना ऐकु आले आणि त्यांनी लगेच त्यांच्या कडच्या बिसलरीच्या २ बाटल्या मला दिल्या. तेवढ्यात दिपक भाउंनी देखील बाटल्या आणल्या. पाणी पिउन चारही बाटल्या दिपक भाउंनी बॅगेत भरल्या व चालु लागलो. आता त्यामानाने थोडं बरं वाटत होतं . सपोर्टर्स थोड्या थोड्या वेळाने माझ्या पायांना आराम मिळावा म्हणुन मधे मधे मला एकटीला चालायला लावत होते कारण त्यांनी सपोर्ट दिला की मला फास्ट चालावे लागे. हळु हळु करत चालत होतो, उन्हाचा त्रास होत होता. आता मध्ये मध्ये दुसरे पदयात्री मंडळही जोडीने चालत होतं . मध्येच ३ मुले आमच्या पुढे पूढे चालायचे मध्येच पुढे निघुन जायचे किंवा मागे राहायचे. हे तीघेजण खुप हसत खेळत चालले होते. मला तिघांचा ही चेहरा एकदाही दिसला नाही पण जो मधला मुलगा होता तो मागुन जितक्या वेळा दिसला तितक्या वेळा म्हणत होता की "साईबाबा येतील पण ओळखलं पाहीजे", मला ऐकुन शंका यायला लागली की कदाचित आज मला साईबाबा दर्शन देतील. पण मधे मधे वाटु लागलं की ते माझ्यासाठी इथे येतील इतकी माझी कुवत नाही ती पाहु पुढे काय होतं.
पुढे उन्हाचा त्रास खुप होउ लागला आणि चालणंही अवघड झाले. आता दोन्ही गमछा सपोर्टवर चालत होते. थोड्या थोड्या वेळाने बसत होते. वावी साधारण १.५ ते २ की.मी. राहील असेल , सकाळचे ९.५० झाले होते. रोडलगतच एक छोटंसं बंद पडीक हॉटेल होतं तिथे आजुबाजुला कडप्पा लावलेले होते, बसायची सोय असल्याने थांबायचे ठरवले आणि वळलो. तिथे दोन माणसबसली होती, एका माणसाने पांढरी बनियान, पांढरी पँट , डोक्याला साईबाबांसारखा पांढरा रुमाल गुंडाळला होता तो चिलीम ओढत होता. साईबाबा चिलीम ओढायचे हे मला माहीत होते व त्यांच्या ओरीजीनल फोटोमधे त्यांच्या बाजुला चिलीम ठेवल्या असल्याने त्यामाणसाच्या हातात चिलिम आहे हे मी ओळखले. माझे जोडीदार त्या माणसाशी गप्पा मारु लागले. अमोलने त्याला विचारले कि हे तुम्ही काय पित आहात तर मीच उत्तर दिले हि चिलिम आहे त्यावर तो माणुस म्हणाला हो ही चिलीमच आहे आणि ही फक्तं शिर्डीतच मिळते, ह्याचा एक झुरका जरी घेतला तरीही माणुस उलट पायी प्रवास करु शकतो. मला राहुन राहुन वाटत होते की हे साईबाबाच असावेत पण मी कुणालाही काही बोलंले नाही. चिलमीचा धुर अगदी माझ्या पर्यंत पोहोचत होता. आता निघायचं म्हणुन उठ्लो आणी रोडवर एका पदयात्री मंडळाचा थ्री व्हीलर आला त्यात साईबाबांचा ओरीजीनल फोटो आला आणी मी दोन्ही सपोर्ट सोडुन त्या थ्री व्हींलर मागे फास्ट चालु लागले. डोळयातुन अश्रुंच्या धारा वाहत होत्या. साई ढोल ताशा हे गाणं थ्री व्हीलर मधे लावलेलं "पायी हळुहळु चाला मुखाने साईनाथ बोला..." आणि मी अतिशय ईमोशनल झाले होते. त्या भावना मी व्यक्तच करु शकत नाही. माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता, साईबाबा माझ्यासाठी आले होते, अगदी साईबाबा मला स्वत़ हाताने धरुन नेत आहेत असे वाटत होते, आणी मी बराच वेळ ईतकी फास्ट चालत होते, ढसा ढसा रडत होते , मागे वळुन पाहीले तर माझे जोडीदार माझ्याहुन अर्धा ते पाउण की. मी. मागे होते , रस्ता सरळ असल्याने आम्ही एकमेकांना पाहु शकत होतो, ते मला पुढे जा असं खुणावत होते मी पुन्हा वळले आणी साईबाबांच्या समोर हात जोडुन चालु लागले, डोळ्यातुन अश्रुधारा चालुच होत्या. मन शांत होत होते , आजही केव्हाही हा क्षण आठवला की खुप रडते, आताही हा प्रसंग लिहिताना डोळ्यात पाणी येतंय . जे त्या पडीक हॉटेलजवळ भेटले होते ते साईबाबाच होते याची खात्री पटली. जव़ळ जवळ १.५० ते २.०० कीमी अशीच चालत गेले. वावीला शिर्डी संस्थानचा पदयात्रींच्या आरामासाठी २ रा मंडप आहे तिथे जाउन हे थ्री व्हीलर थांबलं , रडतच साईबाबांसमोर डोकं टेकवलं आणि मंडपात प्रवेश केला. इथे बरेच पदयात्री मंडळ प्रवास करतात, इथे संस्थान ने मोफत चहा - नाश्ता आणि डॉक्टर्स ची सुविधा ठेवली आहे . मी नाश्ता घेतला तोपर्यंत जोडीदार आले. मला निलेश म्हणाला की तु जात असताना आम्हाला साईबाबांचा फोटो जिवंत असल्याचाच भास होत होता, त्या फोटोत एक वगळंच तेज जाणवत होतं आता काहीही झाले तरी या पुढे शेवट पर्यंत मी तुझ्याबरोबरच चालणार. आणी आज ही त्याने माझी साथ सोडलेली नाही दर वारीला तो माझ्या बरोबरच असतो मी कीतीही मागे पडले आणि कीतीही त्रास झाला तरीही तो मला केव्हाच एकटं सोडत नाही. नंतर कळले की तो माझा लांबचा नातेवाईकच आहे. नाश्ता करुन आम्ही जमलेल्या पदयात्री मंडळाच्या पालख्या पाहु लागलो. काही मंडळांनी पालखी बरोबर छान आरास केली होती, एक पालखि तर चांदीची बनवलेली होती जवळपास सर्व पालख्या मुंबई, कल्याण , डोंबीवली, नवी मुंबई ह्या भागातल्या होत्या. बाजुलाच अॅक्युपंक्चर , अॅक्युप्रेशर पद्धतीने मसाज करणे चालु होते. मला माझ्या जोडीदारांनी आधीच आधीच सांगितले होते की मसाज करुन घेउन नकोस अजुन अंग दुखेल म्हणुन मसाज कसा करतात हे पाहायला गेलो, तिथे एक माणुस ज्याला मसाज करुन घ्यायचा होता तो उताणा झोपला होता आणी जो मसाज करणार होता त्याने डायरेक्ट त्या माणसांच्या पोटर्यंवर उडीच मारली , मी घाबरुन जोरात ओरडले 'अय्या..." आणी सगळे मला पाहुन हसायला लागले तशी मी ही हसायला लागले, खुप मज्जा आली.
पुन्हा निघालो. बरंचसं बरं वाटत होतं पण पाय मात्र दुखत होते. उन खुपच चढलं होतं , ह्या रस्त्यावर आराम करायला सावलीचं एक झाड सुद्धा नाही सगळीकडे बाभळीची झाडे, आता मात्र चालायला त्रास होत होता. उन्हातच थांबुन थाबुन चालत होते. आणी मंडळी मला सांगत होती की आता १० मिनीटांवर आलंय आणी मी त्यांना सांगत होते की तुम्ही खोटं फसवता नेहमी असंच म्हणता , ते म्हणाले अगं असं सांगितलं नाही तर जो नवीन पदयात्री येतो त्याचं कसं होईल अजुन खुप चालायचंय असं सांगितलं तर त्याचा धीरच सुटेल. अजुन ७-८ की,मी. अंतर पार करायचं होतं. कसंतरी १.३० - २.०० च्या दरम्यान दुपारच्या जेवणाच्या थांब्याला पोहोचलो. मला अतिशय त्रास होत होता, तापासारखं जाणवत होतं. सर्वजण जेवुन आंघोळ करुन आराम करत होते. आज सर्वांच्या घरुन बरीच मंडळी एस.टी. ने या थांब्यावर पोहोचली होती कारण उद्या शिर्डीला पोहोचणार होतो. एक घर होते त्यात बायका बसल्या होत्या, मी जेवुन त्या घरात गेले, मी जवळच बसलेल्या एका मुलीच्या हातात आयोडेक्सची बाटली दिली आणी तिला सांगितलं की प्लीज माझ्या पायाला आयोडेक्स चोळुन दे मला खुप त्रास होतोय मी झोपले. ती मुलगी माझ्या पायाला आयोडेक्स चोळु लागली आणी तिला जाणवले की मला भरपुर ताप भरलाय तीने लगेचच तिच्या भावाला जयचंद्रला बोलावले जो मंडळाचा उपाध्यक्ष होता. बरीच मंडळी आत आली. जयचंद्रने लगेचच बर्फ आणला आणी माझा पाय वाकडा करुन माझ्या तळपायावर त्याने बर्फाचा तुकडा ठेवला पण मी रीस्पॉन्स देत नव्हते , मला जाणवत होते की माझ्या बाजुला बायका आणी सभासद जमलेत , उपाय करतायत पण मी डोळे सुद्दा उघडु शकत नव्हते. जयचंद्र म्हणत होता की ताप भरपुर भरलाय म्हणुन बर्फाचा तुकडा ईतका वेळ तळपायवर ठेवुन सुद्धा हिला काहीच जाणवत नाहीये. त्यांनी बायकांना माझ्याकडे लक्ष ठेवायला सांगितले आणी थोडा वेळ वाट पाहु नाहीतर हिला डॉक्टरकडे नेउ असे ठरवले.
दोनेक तासांनी माझा ताप उतरला आणि मी उठुन बसले, सगळे येउन माझ्या तब्येतीची चौकशी करु लागले. बर्फाचा शेक दिल्याने पाय दुखायचे थांबले होते. बाजुच्या घरात जाउन आंघोळ केली , आता खुपंच बरे वाटु लागले. माझ्या घरुन कुणीच आले नव्हते. संध्याकाळी फक्त पाचच की.मी. चालायचे असल्याने अध्यक्षांनी सांगितले आराम करा. ५ वाजता निघायचे आहे. ५ वाजता चालायला सुरुवात केली. जास्त अंतर चालायचे नसल्याने आरामात हळुहळु विदाउट सपोर्ट चालत होते. आता शिर्डी अवघ्या २० की,मी अंतरावर होती. ७ वाजेपर्यंत रात्रीच्या थांब्यावर पोहोचलो. जेवणं झाली, झोपलो.
याद्या
49052
प्रतिक्रिया
115
मिसळपाव
सॉलिड!
बाकी इछ्छाशक्ती बरीच वाघ
मी बुवा ,बाबा अम्माचे कधी
In reply to बाकी इछ्छाशक्ती बरीच वाघ by टवाळ कार्टा
श्रद्धा आणि अंधश्रद्धा.....
In reply to मी बुवा ,बाबा अम्माचे कधी by कविता१९७८
+१११११११११११
In reply to श्रद्धा आणि अंधश्रद्धा..... by प्रभाकर पेठकर
आधीच सांगितल्याप्रमाणे
In reply to श्रद्धा आणि अंधश्रद्धा..... by प्रभाकर पेठकर
चर्चा व्हावी.
In reply to आधीच सांगितल्याप्रमाणे by कविता१९७८
पेठकरांशी संपूर्ण सहमत!
In reply to चर्चा व्हावी. by प्रभाकर पेठकर
साईबाबांचे दर्शन हा अंतस्थ
In reply to पेठकरांशी संपूर्ण सहमत! by संजय क्षीरसागर
अॅबस्ट्रॅक्ट आणि अॅबसर्ड यात फरक आहे
In reply to साईबाबांचे दर्शन हा अंतस्थ by कवितानागेश
वाचते आहे ...
मस्त
कविताजी, जशी पदयात्रा ही तुमची जिगर आहे,
धन्यवाद संजयजी
In reply to कविताजी, जशी पदयात्रा ही तुमची जिगर आहे, by संजय क्षीरसागर
+७८६ धन्यवाद संजयजी
In reply to धन्यवाद संजयजी by कविता१९७८
जाऊ द्या हो
In reply to कविताजी, जशी पदयात्रा ही तुमची जिगर आहे, by संजय क्षीरसागर
धन्यवाद संक्षीसेठ.
In reply to कविताजी, जशी पदयात्रा ही तुमची जिगर आहे, by संजय क्षीरसागर
डिबी, चर्चाच नको असेल तर एक उपाय सुचवतो!
In reply to धन्यवाद संक्षीसेठ. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चर्चा नको असं मी म्हटलं नाही
In reply to डिबी, चर्चाच नको असेल तर एक उपाय सुचवतो! by संजय क्षीरसागर
आपल्याला एखादा विचार पटत नाही
In reply to चर्चा नको असं मी म्हटलं नाही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१ .. बिरुटे सर अगदी सहमत..
In reply to आपल्याला एखादा विचार पटत नाही by धन्या
हे अशक्य आहे!
In reply to चर्चा नको असं मी म्हटलं नाही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डिबी, मुद्दा मोठा रोचक आहे!
In reply to चर्चा नको असं मी म्हटलं नाही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
...चर्चा व्हायला हवी पण
In reply to चर्चा नको असं मी म्हटलं नाही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
...चर्चा व्हायला हवी पण कोणाचे लेखन थांबुन जाईल इतके आग्रही मत कशाला हवे, आपल्याला काय वाटतं तेवढेच ते सांगावं आणि मोकलं व्हावं...+ १०० हे जेव्हा सर्व मानवजातीला समजेल तेव्हाच या जगातील अतिरेकीपणा नाहिसा होईल... पण मानवस्वभाव पाहता हे शेवटपर्यंत स्वप्नच राहण्याचीच जास्त शक्यता आहे :( :)होय. दहशतवादी कारवाया थांबवणं
In reply to ...चर्चा व्हायला हवी पण by डॉ सुहास म्हात्रे
मला (इतरांना) इतकंच दाखवून
In reply to कविताजी, जशी पदयात्रा ही तुमची जिगर आहे, by संजय क्षीरसागर
क्या बात है विलासराव!
In reply to मला (इतरांना) इतकंच दाखवून by विलासराव
प्रतिसादातलं एक महत्त्वाचं वाक्य संपादित केलं गेलंय!
In reply to क्या बात है विलासराव! by संजय क्षीरसागर
कविताजी तुम्ही उत्तम कसोटी
धन्यवाद
In reply to कविताजी तुम्ही उत्तम कसोटी by स्पा
+१
In reply to कविताजी तुम्ही उत्तम कसोटी by स्पा
खुद्द अन्या दातार यांचा
In reply to +१ by अन्या दातार
हाहाहा
In reply to खुद्द अन्या दातार यांचा by सूड
अरे कवितातैंच्या साईभक्तिचे
In reply to हाहाहा by अन्या दातार
+१
In reply to अरे कवितातैंच्या साईभक्तिचे by धन्या
मी "अंधश्रद्धा" हा शब्द न
In reply to +१ by अन्या दातार
द्विरुक्ति
In reply to मी "अंधश्रद्धा" हा शब्द न by धन्या
>> श्शी बाबा.>>
In reply to द्विरुक्ति by पैसा
वेळ सुद्धा तीच रहात नाही, तर
In reply to >> श्शी बाबा.>> by सूड
श्शी बाबा, अशी कमेंटमधली हवा
In reply to वेळ सुद्धा तीच रहात नाही, तर by यशोधरा
बर्मग, आता मी गप्प बसते.
In reply to श्शी बाबा, अशी कमेंटमधली हवा by सूड
सुड,
मान्य!! आपल्याला आलेले
In reply to सुड, by कविता१९७८
मुंबईकरांनी बाकी सार्या
In reply to सुड, by कविता१९७८
शिर्डी (आणि शनि शिंगणापूर)
In reply to मुंबईकरांनी बाकी सार्या by धन्या
सहमत
In reply to शिर्डी (आणि शनि शिंगणापूर) by प्यारे१
साई बाबांचं तत्त्वज्ञान काय
तुम्हाला काही माहीती हवी असल्यास
In reply to साई बाबांचं तत्त्वज्ञान काय by प्यारे१
साईबाबांचं तत्वज्ञान , उपदेश
In reply to तुम्हाला काही माहीती हवी असल्यास by कविता१९७८
दारु, बिडी, शिग्रीट, पान,
In reply to साईबाबांचं तत्वज्ञान , उपदेश by टवाळ कार्टा
फार दिवसांनी प्रशांत आवले
In reply to दारु, बिडी, शिग्रीट, पान, by प्यारे१
मी दर महीना कामवालिच्या
In reply to साईबाबांचं तत्वज्ञान , उपदेश by टवाळ कार्टा
अभिनंदन..
In reply to मी दर महीना कामवालिच्या by कविता१९७८
_/|\_ अतिशय स्तुत्य...
In reply to मी दर महीना कामवालिच्या by कविता१९७८
मी दर महीना कामवालिच्या
In reply to साईबाबांचं तत्वज्ञान , उपदेश by टवाळ कार्टा
ही `जीवनयात्रा'
In reply to मी दर महीना कामवालिच्या by कविता१९७८
कौतुकास्पद बाब आहे ही !!!
In reply to मी दर महीना कामवालिच्या by कविता१९७८
कौतुकास्पद बाब आहे ही !!!
In reply to मी दर महीना कामवालिच्या by कविता१९७८
स्तुत्य आहे कविता. कोणी आपण
In reply to मी दर महीना कामवालिच्या by कविता१९७८
कविता ताई
मानलं तुम्हाला
पाचही भाग वाचले. प्रतिक्रिया
हा धागा आठवला.
जसे मनात आले तसे तुम्ही
ध्येय असले तरच शरीर आपली
In reply to जसे मनात आले तसे तुम्ही by गवि
सहमत
In reply to ध्येय असले तरच शरीर आपली by बाळ सप्रे
पण शारिरीक क्षमतेपलीकडे ताणून
In reply to ध्येय असले तरच शरीर आपली by बाळ सप्रे
दरवर्षी लोक एकदासुद्धा इतके
In reply to जसे मनात आले तसे तुम्ही by गवि
अत्यंत सहमत.
In reply to दरवर्षी लोक एकदासुद्धा इतके by सखी
धन्यवाद
In reply to अत्यंत सहमत. by गवि
या सर्वांपेक्षा शिस्तीत जिम
In reply to धन्यवाद by सखी
सूड सर म्हणतात म्हणजे तसचं
In reply to या सर्वांपेक्षा शिस्तीत जिम by सूड
+१
In reply to सूड सर म्हणतात म्हणजे तसचं by स्पा
कोणाला?
In reply to +१ by सखी
माझी सहमती स्पावड्याला...
In reply to कोणाला? by यशोधरा
अगो असं काय करते स्पाजी सुड
In reply to कोणाला? by यशोधरा
आमच्या अल्प ज्ञानानुसार स्पा
In reply to अगो असं काय करते स्पाजी सुड by सखी
आता लक्षात आलं...
In reply to आमच्या अल्प ज्ञानानुसार स्पा by धन्या
जी" संस्कृती
In reply to आता लक्षात आलं... by धन्या
सखीजी
In reply to जी" संस्कृती by सखी
बाळ सेना प्रमुख जी असं वाचा.
In reply to सखीजी by नाव आडनाव
>>> आमच्या अल्प ज्ञानानुसार
In reply to आमच्या अल्प ज्ञानानुसार स्पा by धन्या
तू गप रांव रे, वशाड मेलो!!
In reply to सूड सर म्हणतात म्हणजे तसचं by स्पा
तुम्ही उपस्थित केलेल्या
In reply to अत्यंत सहमत. by गवि
सातारा हायवे म्हणतात) >>>>>>
In reply to तुम्ही उपस्थित केलेल्या by धन्या
सातार रोड वायला आनि सातारा
In reply to सातारा हायवे म्हणतात) >>>>>> by प्रसाद१९७१
"सातारा हायवे" नदीच्या
In reply to सातार रोड वायला आनि सातारा by प्यारे१
सहमत.
In reply to दरवर्षी लोक एकदासुद्धा इतके by सखी
तुमचे प्रांजळ लेखन आवडले
आपले अध्यात्मिक अनुभव शक्यतो
In reply to तुमचे प्रांजळ लेखन आवडले by विटेकर