Skip to main content

इतिहास मनमोहन सिंग यांचे मूल्यमापन कसे करेल ?

लेखक पिंपातला उंदीर यांनी रविवार, 03/08/2014 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
I honestly believe that history will be kinder to me than the contemporary media, or for that matter, the Opposition parties in Parliament. - Manmohan Singh नुकतच मनमोहन सिंग यांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारू लिखीत 'The Accidental Prime Minister' पुस्तक वाचून झाल . बारू हे केवळ सिंग यांचे माध्यम सल्लागार नव्हते तर ते सिंग यांच्या अंतर्गत वर्तुळातले एक महत्वपूर्ण अधिकारी होते . २००४ ते २००९ या काळात सिंग यांच्यासोबत त्यांनी खूप जवळून काम केले आहे . UPA-2 च्या काळात जेंव्हा रोज भ्रष्टाचाराचे नवनवीन सुरस कथा कानावर यायच्या तेंव्हा विरोधकांनी सिंग यांची तुलना आपल्या मुलांच्या दुष्कृत्याकडे डोळेझाक करणाऱ्या धृतराष्ट्राशी करायला सुरुवात केली . यापूर्वी एकदा यशवंत सिन्हा यांनी सिंग याना शिखंडी ची उपमा दिली होती . पण बारू यांनी या आपल्या एके काळच्या बॉस ची तुलना भीष्म या व्यक्तिरेखेशी केली आहे . चुकीच्या पक्षात असलेला एक अत्यंत प्रामाणिक , विद्वान माणूस . भीष्माच्या आयुष्याची जरी शोकांतिका झाली असली तरी ते महानायक होते . मनमोहन सिंग यांच्या बद्दल असे म्हणता येईल का? . स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासावर ज्या काही थोड्या लोकांनी आपला न पुसणारा ठसा उमटवला आहे त्यात सिंग यांचे नाव नक्की येईल . १९९१ मध्ये देश आर्थिक गर्तेत सापडला असताना नरसिंह राव यांच्यासोबत सिंग यांनी हा आर्थिक शकट सांभाळला . इतकेच नव्हे तर या देशातल्या लाखो तरुणांना जागतिकीकरणाचे फायदे होतील अशी धोरण राबवली . दुर्दैवाने ज्या लोकाना या चे सर्वाधिक फायदे झाले तेच लोक आज त्यांच्यावर प्रच्छन्न टीका करताना दिसतात . दुसऱ्या महायुद्धात अविस्मरणीय विजय मिळवून दिल्यानंतर चर्चिल यांनी लोकांनी सार्वत्रिक निवडणुकीत घरी बसवलं होत . बर्यापैकी सरकार चालवून पण वाजपेयी यांच्यापेक्षा सोनियांना लोकांनी २००४ मध्ये पसंती दिली होति. लोकशाहीत जन मानसाचा अंदाज येणे कठीणच . आणि त्यात पण भारतासारख्या खंडप्राय , बहुविध , बहुभाषिक देशात तर अजूनच अवघड . मनमोहन यांच्या कारकीर्दीच्या दोन बाजू आहेत अस मला वाटत . अर्थमंत्री आणि UPA-१ चे पंतप्रधान म्हणून एक दैदिप्यमान बाजू . आणि भ्रष्टाचार , अकार्यक्षमताचे आरोप आणि कळसूत्री बाहूल म्हणून हेटाळणी पदरात पडलेली UPA-2 कारकीर्द . एकदम २ टोक . पण जेंव्हा विरोधक मनमोहन सिंग यांचे मूल्यमापन करतात तेंव्हा सरसकट त्यांच्या १० वर्ष पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला मोडीत काढतात . पण हे खरे आहे का ? UPA-१ च्या काळात विकासदर ९ % वर पोहोंचला होता . सरकार साम्यवाद्यांच्या पाठीम्ब्यांवर असताना पण अमेरिकेसोबत अणुकरार करताना सिंग यांनी राजकीय धाडस दाखवून त्याना फाट्यावर मारल .( देशात तो पर्यंत काही भागात का होईना साम्यवाद्यांचे वर्चस्व होते त्याला ओहोटी लागण्याची प्रक्रिया तिथून सुरु झाली असे माझे निरीक्षण . चूभू द्या घ्या . या पतनाची सुरुवात करण्याचेश्रेय सिंग यांना द्यावे का ? ) २००९ मध्ये कॉंग्रेस ने जो विजय मिळवला आणि स्वतःच्या जागा मध्ये भर घातली त्याचे श्रेय बारू पूर्णपणे मनमोहन यांना देतात . यासंबंधी चे एक छान उदाहरण त्यांनी पुस्तकात दिले आहे . 'द हिंदू ' या दैनिकाच्या विद्या सुब्रमन्यम यांनी ग्रामीण तसेच मुस्लिम जनतेला प्रश्न केला होता . तुमच मत कुणाला ? त्यावर त्यांनी एकमुखाने उत्तर दिले होते . ' सरदार को '. ते सर्व जण सिंग याना नेक आदमी संबोधत असतो . सत्तेवर असलेले पंतप्रधान आपली पाच वर्षाची मुदत पूर्ण करतात आणि नंतर बहुमताने निवडून येतात असे १९६२ नंतर पहिल्यांदाच घडले होते . विरोधक कायम सिंग यांच्यावर उत्तम अर्थ तज्ञ पण वाईट राजकारणी म्हणून टीका करायचे . पण नंतर दिग्विजय सिंग म्हणाले तसे सिंग यांच्यातल्या चलाख राजकारण्याकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केले . सिंग हे राजकारण करण्यात पारंगत होते हे अमान्य करण्यात काही अर्थ नाही . १० वर्ष पक्षांतर्गत विरोधक , सत्ताबाह्य केंद्र , विरोधक यांना तोंड देऊन सरकार चालवणे काही खायचे काम आहे का ? बाह्य सत्ताकेंद्र हि भारतीय राजकारणाची खासियत बनत चालली आहे का ? गोविन्दाचार्यानी वाजपेयी यांना 'मुखवटा ' म्हणून संबोधले होते . सिंग यांच्या पंतप्रधान पदाची कारकीर्द सोनिया यांच्या सावली खाली गेली हे नाकारण्यात अर्थ नाही . अनेक धोरण निव्वळ पक्ष संघटनेच्या (पक्षी -सोनिया ) आग्रहामुळे राबवावी लागली . सोनिया वरचा स्वयंसेवी संस्थांचा प्रभाव बहुश्रुत आहे . मंत्री मंडळातले अनेक ज्येष्ठ सदस्य प्रणव मुखर्जी , अर्जुन सिंग हे आपले reporting थेट सोनियांना करायचे . अनेक लोकांच्या मते राहुल गांधी यांनी जेंव्हा राजकारणाच्या गुन्हेगारीचे विधेयक 'nonsense' म्हणून फाडून फेकला होते तेंव्हा तरी आत्म सम्मान दाखवून सिंग यांनी राजीनामा द्याला पाहिजे होता . पण सिंग यांनी त्यावेळेस आपल्या पदाला चिकटून राहणेच पसंद केले २००९ नंतर आणि नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात मनमोहन सिंग यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर हल्ले झाले . सरकार ची धोरण , भ्रष्टाचार , अकार्यक्षमता यांच्यावर होणारी टीका हि बर्याच अंशी स्वाभाविक असली तरी त्यानिम्मिताने मोठ्या लोकांवर अतिशय घाणेरडी वैयक्तिक टीका करण्याचा ट्रेंड भारतीय राजकारणात रुजला हि खरी घातक बाब . म्हणजे सिंग हे एका 'बाई ' चे ऐकतात म्हणून त्यांच्यावर टीका करणारे लोक मी पाहिले आहेत . त्यांना सत्ताबाह्य केंद्र हा मुद्दा महत्वाचा वाटत नसून एक पुरुषासारखा पुरुष एका बाई चे कसे मुकाटपणे ऐकतो हा मुद्दा महत्वाचा वाटायचा . सर्वात धक्कादायक म्हणजे काही स्त्रिया पण हा मुद्दा हिरीरीने मांडायच्या . मनमोहन सिंग आणि सोनियांची आक्षेपार्ह morphed photograph सगळ्यांनीच पाहिली आहेत . इतिहासातले स्थान वैगेरे राहूच दे पण या देशाच्या अर्थकारणाला कायमचे वेगळे वळण देणाऱ्या सिंग यांचा सरसकट एकेरी आणि मन्नू वैगेरे उल्लेख करणे कितपत योग्य आहे . देशातील बहुतांश जनसमुदाय हा फारवेळ कुठल्याच लाटेखाली राहत नाही . कदाचित अजून काही वर्षांनी नकारात्मकते चे ढग विरून सिंग यांचे वास्तविक मूल्यमापन हा देश करेल हि अपेक्षा . इतिहास च माझे खरे मूल्यमापन करेल असे विधान करण्यामागे हाच मनमोहन सिंग यांचा उद्देश असेल कदाचित .

वाचने 28446
प्रतिक्रिया 79

प्रतिक्रिया

मनमोहन सिंग यांची काही खास वक्तव्ये :- "देशातील साधनसंपत्तीवर सर्वप्रथम अधिकार अल्पसंख्यांकांचा आहे. नानावाटी आयोगाने १९८४ च्या दंगलीत जगदीश टायटलर दोषी आहेत हे जाहीर केल्यावर "जगदीश टायटलर निर्दोष आहे. मी त्यांना मंत्रीमंडळातून मुळीच काढणार नाही." "कॉमनवेल्थ खेळांमध्ये कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही." "ए. राजा निर्दोष आहे." "अण्णा हजारेंनी निवडणूक लढवून जनतेतून निवडून यावे आणि मग जनलोकपाल आणावा!" स्वतः मनमोहन सिंग राज्यसभेचे सभासद आहेत. "राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी सर्वाथाने योग्य आहेत!" "शिबू सोरेन, लालू यादव यांना मंत्रीमंडळातून काढणार नाही!" "चिदंबरमने कोणताही गैरव्यवहार केलेला नाही!" "महगाईसाठी शरद पवार जबाबदार आहेत!" विरोधाभासाचा सर्वोत्कॄष्ठ नमुना! "मी हतबल आहे. आघाडी सरकारमुळे मला भ्रष्टाचाराविरुध्द काही करता येत नाही!" "मी दुर्बल नाही, कणखर आहे!" "मी कोणताही भ्रष्टाचार सहन करणार नाही!" दक्षता आयोगाच्या अध्यक्षपदी थॉमस यांची नेमणूक. सर्वोच्च न्यायालयाने हकालपट्टी केल्यावर, "या प्रकरणात पृथ्वीराज चव्हाण दोषी आहेत! मी नाही!" "नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे देशास घातक!" हे राजकीय विरोध म्हणून सोडून देता येईल. मनमोहन अर्थतज्ञ म्हणून निश्चीतच अनुभवी आणि कर्तबगार होते. परंतु त्यांनी राबवलेल्या निर्णयांचं श्रेय नरसिंहराव यांचं काहीच नाही का? नरसिंहराव यांच्या काळात गांधी घराण्याची लुडबूड राजकारणात नव्हती त्यामुळे आर्थीक उदारीकरणाचे निर्णय राबवताना अन्न सुरक्षा योजनेसारख्या आतबट्ट्याच्या व्यवहाराला केवळ आले सोनियाच्या मना म्हणून राबवावे लागले नव्हते. परंतु, पंतप्रधान म्हणून त्यांनी फक्त 'येस बॉस!' इतकेच आपले इतिकर्तव्य मानले.

In reply to by स्पार्टाकस

मनमोहन अर्थतज्ञ म्हणून निश्चीतच अनुभवी आणि कर्तबगार होते >>>>>>>>>> हे मिथ आहे. १९९१ च्या सुध्हरणांचे श्रेय राव साहेबांचे आहे. ममोंनी बरीच पदे भुषवली पण कुठल्याच पदावर लक्षणीय काम केले नाही. एकेकाळी ममो सरकारीकरणाच्या बाजुला होते कारण इंदीरा गांधी पंतप्रधान होत्या. नंतर उदारीकरणाच्या बाजुने झाले कारण राव साहेब आले. त्यांना स्वताचे काही मत नाही आणि सत्व पण नाही. वरुन हुकुम आला की कागद्पत्र फक्त तयार करायची.

मनमोहन अर्थतज्ञ म्हणून निश्चीतच अनुभवी आणि कर्तबगार होते >>>>>>>>>> हे मिथ आहे. १९९१ च्या सुध्हरणांचे श्रेय राव साहेबांचे आहे. >>>>> नाही हो इतकही कमी लेखू नका त्यांना रावांशी त्यांची तुलना करू नका. माझ्या समजुतीप्रमाणे रावांवर हर्षद मेहताकडून एक कोटी रुपये घेतल्याचा आरोप होता त्या काळात ती बरीच मोठी रक्कम होती. ममो ह्यांच्यावर असले आरोप कधी झाले नाहीत.

काही अपवाद वगळता, वरच्या सर्व प्रतिक्रियांमध्ये मनमोहन सिंग यांचे फक्त युपीए १ आणि २ या काळातले मुल्यांकन केले आहे. वरच्या प्रतिक्रिया वाचुन 'इतिहास मनमोहन सिंग यांचे (पंतप्रधान म्हणुन) मूल्यमापन कसे करेल ?' असे धाग्याचे शीर्षक आहे का अशी शंका आली. पंतप्रधान म्हणुन त्यांना कितीही नावे ठेवली तरी, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर (१९८२ - ८५) पासुन, भारताच्या योजना आयोगाचे ऊपाध्यक्ष (१९८५ - ८७), भारतीय प्रधानमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार (१९९० - ९१) आणि नरसिंहराव यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारमध्ये अर्थमंत्री ही त्यांची कामगिरी नक्कीच अभिमानास्पद आहे.

इतर अनेक लोक उपलब्ध असताना ..इतिहास या माणसाचे अनालिसिस करन्यत वेल घालवेल असे वाटत नाहि.

धाग्यावर Score Settling होत आहे का ? मनमोहन २००९ मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर मत घेऊन का निवडून आले याचे तटस्थ विश्लेषण करण्यात कुणालाच रस नाही का ? कारण इथे अनेक लोक जस म्हणत आहे तसे मनमोहन अकार्यक्षम , कळसूत्री बाहुले असते तर लोकांनी त्यांना सलग दुसरी टर्म दिलीच नसती . अटलजींना (सलग २ पूर्ण काळ टर्म ) पण हि संधी लोकांनी दिल्या नाहीत मात्र भारतीय जनतेनी हा विश्वास मनमोहन यांच्यावर दाखवला . कुछ तो बात होगी . मी स्वतहा मोदी यांचा 'भक्त ' नाही . पण त्यांचे मूल्यमापन अजून ५ वर्षांनी केल्या जावे असे माझे मत आहे . चांगल्याला चांगले म्हण्याला काय हरकत आहे . नाहीतर आंधळेपण पोटी मोदी भक्तांनी जेखालच्या पातळीचे bashing केल ते आणि मोदी यांच जे हनन चालू आहे ते याच्यात फारसा गुणात्मक फरक नाही असे मला वाटते . बाकी हा खंडप्राय देश खूप सुज्ञ आहे . यापूर्वी त्यांनी इंडिया shining चा भोपळा फोडला होता मोदी अपयशी ठरले त्यांना पण जनता बाहेरचा रस्ता दाखवेलच . चर्चा आता मनमोहन यांच्या उपलब्धी आणि अपयश यांच्याकडे वळावी असे वाटते

In reply to by पिंपातला उंदीर

हा खंडप्राय देश खूप सुज्ञ आहे ह्याच्याशी सहमत. गेल्या काही निवडणुकांचे निकाल हा विश्वास बळकट करणारे आहेत. बाकी युपीए १ चे यश मी वर नमूद केले आहे. त्याचे श्रेय मनमोहन सिंघना देण्याचे नाकारणे अयोग्य आहे.

चर्चा आता मनमोहन यांच्या उपलब्धी आणि अपयश यांच्याकडे वळावी असे वाटते ] आपले हे वाक्य मोलाचे आहे. या धाग्यात मी वर दिलेला प्रतिसाद काय सांगतो ? त्यातूनही मला वाटते की यातील यश काळाचे व अपयश हे मनमोहन यांचे आहे. कारण ते काय किंवा जाणता राजा(?) शरद पवार यांचे आरोग्य, शिक्षण, न्यायदान व निवडणूक प्रक्रिया या बाबीवर अजिबात लक्ष नाही. हे अनेक कॉंग्रेसी व भाजपा नेत्यांचे असेच आहे. भाजपा चा कारभार दगडापेक्षा वीट मऊ इतपतच ठीक चालेल. व हे कट्ट्रर भाजप वाल्यानाही ठाउक आहे. कारण सलमान गजाआड जाउ नये अशीच न्यायव्यवस्था हवी असाच दोघांचा अप्रोच आहे.

देशाच्या विकासासाठी लागणाऱ्या तीन मूलभूत बाबी , सडक, रेल्वे, कृषी साठी लागणारी सिचाई सुविधा या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आले. वाजपायी सरकार ने ५ वर्षात जितके कार्य केले त्याचा १/४ कार्य ही गेल्या १० वर्षात झाले नाही. वाजपायी सरकार जर पुन्हा जिंकले असते तर चतुर्भुज योजना केंव्हाच पूर्ण झाली असती.dfc चे कार्य ही पूर्ण झाले असते. काही नदी जोड प्रकल्प ही पूर्ण झाले असते. रोजगार आणि देशाचा आर्थिक विकास कित्येक पट वाढला असता. मनमोहन सरकारने सर्वप्रथम नदी जोड प्रकल्पाला कचरा पेटी दाखविली आणि सडक आणि रेल्वे दोन्ही आधार भूत बाबींवर खर्च कमी केला. का? याचे उत्तर कोण देणार. आज ८० टक्के माल रस्त्यावरून न्यावा लागतो आहे त्या मुले वाहतूक खर्च कित्येकपट वाढला. देशाचा बिकास खुंटला. UPA-I मधेच मूलभूत बाबींवर दुर्लक्ष करण्यात आले. सर्व बाबतीत पीछेहाट झाली तरीही UPA पुन्हा जिंकली कारण विरोधी पक्षात नेतृत्वाचा अभाव होता. बाकी निवडणूक जिंकायचे म्हणाल तर केजरीवाल सारखा व्यक्ती ही निवडणूक जिंकू शकतो. बाकी अधिक बोलू शकत नाही.