माफ करायचं...
लेखनप्रकार
आयुष्यात केव्हा ना केव्हा आपण कुणाकडून तरी दुखावले जातो. कधी शब्दांनी तर कधी कृतीने.
मनाला जखम होते. कधी वरच्या वर तर कधी खोलवर.
वरच्या वर झालेली जखम थोडासा काळ जाताच भरुन येते. खोलवर झालेली जखम मात्र अधिकाधिक खोलवर जात राहते. ठुसठुसत राहते, मनाला वेदना देत राहते.
माणसाला राग येतो, मन कडवटपणाने भरुन जाते.
ज्या व्यक्तीने दुखावले त्या व्यक्तीचा बदला घेण्याची भावना प्रबळ होत जाते.
हा सुड कसा घेता येईल याचे मन सतत चिंतन करु लागते.
समोरच्या व्यक्तीला धडा शिकवण्याच्या नादात आपणच सुडाच्या, क्रोधाच्या आगीत जळत राहतो.
किंवा अगदीच तसं झालं नाही तरी आपल्या दु:खाला कुणीतरी दुसरा कारणीभूत आहे या विचारांनी मन खिन्न होते.
तो असं बोलला नसता किंवा त्याने असं केलं नसतं तर हा विचार मनात पिंगा घालू लागतो.
दुसर्याला त्रास कसा देता येईल किंवा दुसर्यामुळे आपण कसे दु:खी आहोत या विचारांनी आपली झोप उडते.
आपणच पेटवलेल्या वणव्यात आपणच होरपळत आहोत हे आपल्या गावीही नसते.
हा वणवा विझवून आपण आपल्या जखमेवर हळूवार फुंकर मारु शकतो हे आपल्याला कळत नसते.
फार काही करावं लागत नाही त्यासाठी.
ज्याने आपल्याला दुखावले, शब्दांतून किंवा कृतीतून, त्याला माफ करायचे.
अगदी मनापासून.
तुमच्या-आमच्यासाठी माफ करणे म्हणजे ज्याने आपल्याला दुखावले त्याच्याकडे दुर्लक्ष करणे.
खरं नाही ते तितकंसं.
माफ करणे म्हणजे मनातील कडवटपणा, राग आणि सुडाच्या भावनेचा त्याग करणं.
ज्या शब्दांनी किंवा ज्या कृतीने आपण दुखावलो आहोत ते आपल्यासोबत राहणारच आहे.
मात्र त्या गोष्टीची आपल्यावरील पकड सैल होते.
कधी कधी नुसताच स्पर्श राहतो.
मात्र असे माफ करण्यासाठी आपल्याला दुखावणार्या व्यक्तीला समजून घ्यावे लागते.
मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल सहानुभूती, करुणा निर्माण व्हावी लागते.
माफ करणे म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीने दुखावले आहे ही वस्तूस्थिती नाकारणे नव्हे.
माफ करणे म्हणजे त्या व्यक्तीच्या शब्दांचे किंवा कृतीचे समर्थनही नव्हे.
माफ करणे म्हणजे ज्याने आपल्याला दुखावले, ती व्यक्ती माणूस म्हणून स्खलनशील आहे, तिच्याकडून चूका होऊ शकतात हे स्विकारणे.
माफ करणे म्हणजे दुसर्या व्यक्तीबद्दलच्या कडवटपणाभोवती घुटमळत असलेल्या मनाला मुक्त करणे.
आपणच पेटवलेल्या क्रोधाच्या, सुडाच्या वणव्यावर हळूवार फुंकर मारणे.
थोडासा आपल्याला दुखावणार्या माणसाचा विचार करायचा.
तो ही आपल्यासारखाच माणूस आहे, चूका करु शकणारा.
स्वतःबद्दलच्या आणि सभोवतालच्या जगाबद्दलच्या भ्रामक विचारांच्या जाळयात अडकलेला.
कुठेतरी सुरक्षितता, मान-सन्मान, स्विकृती शोधणारा.
परिस्थीतीवर ताबा ठेवू पाहणारा.
स्वतःच्या जगाबद्दलच्या अपेक्षा पुर्ण न झाल्यामुळे भेदरलेला.
आणि या सार्याच्या मागे असलेला तो आहे तुमच्यासारखंच निसर्गाचे लेकरु, मनःशांतीच्या शोधात असलेला.
न जाणो त्याने लहानपणापासून काय झेललं असेल, कशा-कशाला तोंड दिलं असेल.
त्याला कसं घडवलं गेलं असेल, तो कसा घडला असेल.
कुठल्या विचारांना त्याने आपलंसं केलं असेल, कुठल्या विचारांना त्याने धुडकावून लावलं असेल.
आजचे त्याचे विचार, त्याची कृती कदाचित स्विकारण्याजोगी नसेल.
पण आत खोलवर कुठेतरी हा त्याच्यापरीने मार्ग शोधण्याचा प्रयत्न असेल.
म्हणूनच, सोडून दयायचं.
माफ करायचं...
वाचने
28323
वाचनखूण
प्रतिक्रिया
106
In reply to बऱ्याच वेळेला आपण माफ करतो पण by खटपट्या
साम, दाम दंड भेद हेच बरे
In reply to साम, दाम दंड भेद हेच बरे by धन्या
खरंय,
लेख आवडला. पण माफ करताना ती
धन्या लेख आवडला आणि पटला .
तेवढी
In reply to तेवढी by सस्नेह
ते व्यक्तीगणिक, प्रसंगानुसार
विषय.
काही स्वयंघोषीत महात्म्यांना
In reply to काही स्वयंघोषीत महात्म्यांना by मनीषा
सहमत.
In reply to काही स्वयंघोषीत महात्म्यांना by मनीषा
चपखल, वास्तववादी प्रतिसाद !
मनिषा,+६८२०१४!!
डोकं दुखायला लागलं राव…. कसला
In reply to डोकं दुखायला लागलं राव…. कसला by एक स्पष्टवक्ता..
माफ करायला शिका... डोके
दखल घ्यावी असा लेख.
खूप छान लेख
आपण ज्याला माफ केल त्याला