मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मन रे .....

सुहास.. · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
भकास सारीपटावर कुरतडलेल्या स्वप्नांसकट सीतेच्या नकारालाही रावणल्यालं मन ! मांगल्याचा ओढीमध्ये निर्जीव कातळासवे पदस्पर्शाच्या आभासात राऊळल्याल मन ! चंचल पाऊसवेळी कोपर्‍यावरच्या झाडाखाली नाजुक बोटाच्यां गुफणीत, क्षणभर स्थिरावल्याल मन ! शमेना देह तपन जन्मदुखः अशोकवृक्षाचे सुखाच्या मृत्युभयाला वांझोटल्याल मन ! विचारकल्लोळीचा वाकस एकांती समुद्रस्पर्धेत विश्वकर्माच्या रंगसंगतीत माणुसघाण्यावल्याल मन ! सडा रक्तचिखलाचा तुडविला अनवाणी सफेद संगमवरावर डागाळल्याल मन !

वाचने 1865 वाचनखूण प्रतिक्रिया 6